Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Swapnil Kamble

Tragedy


4  

Swapnil Kamble

Tragedy


उचकी

उचकी

6 mins 243 6 mins 243

तो दिवस आठवला की ,अंगावर शहारे येतात.त्या दिवशी रात्री जेवण उरकुन झाले होते.दहा वाजले होते.अचानक मला उचकी चालु होते.उचकी खुप वेळ होती .उचकी थांबत नाही .खुप पाणी प्यायला तरी थांबत नव्हती.आधी वाटलं कि पोटात गँस अँसिटीडी मुळे लागत असावी.म्हणुन आेवा खातो पण व्यर्थ .ईनो ची पावडर होती ती पाण्यात घोळुन खातो पण तरी ही व्यरथच...मग शेवटचा पर्यंत म्हनुन एरझर्या घालतो…….पण कसले काय….ती गळ्यात अटकल्यासारखी….पिच्छा सोडत नव्हती...बायको म्हणत होती ..कोणी तरी आठवण काढीत असेल...म्हनुन घरातील सर्वांची नावे घेवुन झाली..पण निष्फळ सारे.

तेवढ्यात मोबाइलची रींग वाजते ...एवढ्या रात्री कोणाचा फोन...म्हनुन मन सुन्न झाले .मन काळजीने व्याकुळ होते.तोपर्यंत घरातील कामे आटपून झाली होती.

उचकी आता थांबायचे नाव घेत नव्हती.बायको फोन उचलते.हेलो..कोण ….तेवढ्यात बायकोचा चेहरा गंभीर मुद्रेने वलय केले होते.तिचा चेहऱ्यावर कसल्या प्रतिक्रिया उमटत नव्हत्या…..फक्त ….कायय….काय…...एवढेच ऐकु आले ...बातमी ऐकताच अवसान गळाले तिचे होते...बातमि तशी होती.तीचा कोमजलेला चेहरा करुन खिन्न स्वरात म्हणाली ..बाबा गेले…!

काय…..?...मी चकीत होवुन हें कसे शक्य आहे.

….बाबा गेले…..एवढेच बोलुन तीं रडू लागली .मला काहीच सुचत नव्हत.े मीच एकाच जागी स्तब्ध उभा होतो.काहीही सुचत नव्हते.विजेचा झटका मक् यतो तसा अंगात झिंनझिन्या आल्या होत्या. “.बाप गेल्याची”बातमी ऐकताच कान सुन्न झाले.वि चार जाणिवा संवेदना कसलिच स्पर्श जाणवत नव्हता.कदाचित हा मनाला लागलेला अपघात सहन करु शकत नव्हतो.मी फक्त बापाचा आठवणीत रुळत होतो.दुपारी कामातुन येताना, बापाने नारळ पाणी मागितले ते मी आणुन देतो.वर्ष एकाच जागी खाटीवर आजा-राने त्रस्त होता. दिवस झाले अन्नाचा एकही कन पोटात गेला नव्हता.त्यादिवशी खुप संध्याकाळ झाली होती.बाप-एकटक माझ्याकडे बघत होता.पण मलाही नंतर खुप उशीर झाला होता.मग कुर्ला घरी निघतो.त्या नजरेनी पारख आेळखु शकलो नाही.जरी माहीत होत कीं , बाप हें जगी सोडुन जाणार होता तर् मीच तिथुन निघणार नव्हतो.बापाची तीं शेवटची भेट अगदी शेवटची ठरेल हें कुठे ठावुक होते.

ह्या घटनेने मीच माझ्या संतुलन बिघडले होते.मला लागलेली उचकी आता गायब झाली होती.तीं उचकी मुतृर्ची घंटा होती का?..की संदेश ….माहीत नाही.वडिलांचा शेवटचा संदेश ….मीच हें जग सोडुन जातोय.म्हनुन की काय ती सांगायला आली होती.

 त्यानंतर थोड्यावेळाने मी भानावर येतो.जे.जे ला जायची तयारी होती .लगबग सुरु होते.आम्ही आवरा आवर करत तोवर पुन्हा उचकी सुरु. होते.मी खुप वैतागत.आता ..आणी म्हतकी…….बाबा येतोय मी …..नाव घेताच उचकी जाते.हें काय अचंबित ईपरीत घडतय मला समजत नव्हते.आफीसच्या बँगेत कपडे भरतो थोडेसे..बँगेततील वस्तु काढता काढता बायकोचे लक्ष काँडमच्या पँककडे जाते.ती काही बोलत नाही .मीच पुन्हा तें पँक बँगेत कोपर्यात खुपसून .खुप दिवस झाले आम्ही मनासारखे मिलन केले नाही म्हनुन म्हटल थोडसं सुख घेवु; पण फोल ठरते.आजही काय, आता तरी बायको पासुन दुर रहावे लागणार या विचाराने मला विशेष काय वाटत नव्हते.वाटत व्हते ते या उचकीचे. जी पुन्हा नरड्यात घुसली होती.मला आता काहीच सुचत नव्हते मी भोंदु झालो होतो..बापाच्या जाण्याने...मी नशेत आहे का?....की मला गुंगीचे ई्जेक्शन दिले गेले आहे का ...हेच माहीत नाही.संपुर्ण अंग सुन्न , इदास, भकास चेहर्यावर कसलाच अविर्भाव उमटत नव्हता.कळलीच ईच्छा आस उरली नव्हती .मी माझा तोही निट सावरू शकत नव्हतो.

तेवढ्यात बायको तयार होते .मी ही टी .शर्ट व पँट घालुन बँग पाठीवर टाकुन घराला कुलुप लावतो.आता रात्री चे आकरा वाजले होते .मुलगी झोपलेली तशीच खांद्यावर टाकुन स्टेशनला जाणारी रिक्षा पकडतो.प्लँटफार्मवर ट्रेनची वाट पाहत बापाच्या आठवणीत रेंगाळत होतो.ट्रेन चा जसा आवाज येत होता तसे एक एक द्रृ ष्य डोळ्यासमोर येत होते.जशी ट्रेन पुढे येते तसा तो बापच वाटत होता..गावी येताना तोच रुबाब दार पेहराव, ते कपडे, तो हाता ट्रंक , ती वाढवलेला दाढी ,आठवत होते.ते कुर्ले केसाची जटा पाहुन तर आम्ही घाबरायचे बापाला पाहुन.घरी पोचल्यावर काही क्षण मी त्याचेहर्याकडे पाहत होतो.तीच दाढी आठवत होतो.पण ते कुर्ले केस आता सफेद रंगाची माखले होते.तिच दाढी तिच शरीर रचना काहीच बदल नव्हता.मी एकटक पाहत होतो.तो सफेद रंगाचा सदरा आता अंगावर कफण बनला होता.


आजुबाजुला कुजबुज चर्चा चालु होती .काहीजण म्हनत होती जेवन अन्न नलिकेत भाताचे शिटकुन आटकला व श्वास कोंडला होता.शेवटचा श्वास उच्च….उच्चच….करुन ….एक मोठा उसासा आंवंडा घेतला व एक उचकी सरशी जीव गेला, .श्वास रोखला.ती शेवटची उचकी मला लागली होती.जुणी जानती माणंस म्हणतात की , ‘जी व्यक्ती आपली आठवण काढते ती लांब आसल्यावर उचकी बनुन त्याचा पाठी मोरे फिरत असते.मग जेव्हा त्याचे नाव घेतल्यावर ती निघुन जाते ,ती उचकी माझ्यासाठीच होती.बरोबर रात्रीचे दहा वाजता बापाने प्राण सोडला होता व उचकी ही मला बरोबर त्याच वेळी लागली होती .हा काय योगायोग नव्हे बरं.!

माणुस मेल्यावर त्याचा प्राण रेंगाळत असतो.निरंतर, निर्विकार , असं मतात.

घरी पोचल्यावर सफेद कपड्यात लपेटलेेले शरीर पाहुन मला आले .मी बँग टाकली, आईप्रेताजवळ रडत बसली होती डोक्यावर हात फिरवून,’माझ्या राजा , माझ्या धनी , अशी विव्हळत होती.तिला पाहुन मला ही रडु कोसळले.आयुष्यात पहिल्यांदाच डोळ्यातुन अश्रु घरंगळले होते.ते अश्रु आर्टिफिशल नव्हते.वरवरची खोटे नाटे नौटंकी अश्रु नव्हते.तें मनाचा खोल दरीतुन उंबळट दगडातुन पाझरतो तशी होती ते अश्रु अगदी नितळ व सोज्वळ प्रेमळ मायेप्रमाणे..स्वच्छंदी ..विहार करत व्हते.ते निस्सीम त्यागाचे प्रमाणपत्र दर्शवत होते त्या व्यक्तीने केलेल्या कामाचे कुटुंबासाठी, समाजासाठी,

मी सहसा रडलो नाही पण बापाला पाहुन खुप रडलो त्यादिवशी त्याने समाजासाठी केलेल्या कामासाठी ,आमच्यासाठी;पण आज पहिल्यांदाच अश्रु ढाळले होते.बापाचा तो निस्तेज चेहरा , तेजोमय वलयाचे एक प्रभा मंडळ फिरत होते चेह्यावरती.ते वलय मला त्याने केलेल्या कामाची एथल्या चाळीतील संघटनेशी ग्वाही देत होती.बाप येथे राहायला आला तेव्हा कोणा एकत्र नव्हते .नाही कसले मंडळ बापाने समाज एकत्र येण्यासाठी बौद्ध शाखेचं स्थापना केली.त्याची ग्वाही त्याचे फल हें तेजोमय वलय सांगत आहे.

मी बापाचा चेहेर् याकडे पाहत मला आठवत होता तोच कचर् याचा डबा, चंदनवाडी चौकी, तिथल्या कचऱ्याच्या डब्यावर पंचवीस वर्ष सर्व्हिस केली.ती वाटेवरुन आज त्याच दिशेने प्रेत त्याच जंदनवाडीुन जाणार होते.


“मि मरेन ते ह्याच खोलीत”आसा एकदा बाप बोलला होता.पण ते आज खरोखर खरे होणार होते.

थोडावेळ मी काय करतोय हेच भान विसरलो होतो.मी तोंडाच्या तोंडात बडबडत होतो.तेवढ्यात आई मध्येच उसासा घेत बोलली मध्येच,

“बावा काय बोलतंय, ते निट बोल, गालाचा गाळात बोलु नको”

मी एका अनंत परमुलखात विहार करीत होतो.मी स्वताचा भान विसरलो होतो.सावकाश सावकाश डोळ्यांनी झडप कमी कमी होत होती .डोळ्यावर अंधुक पणा येत होता.त्यावर चिप कलेला अंश्रुंचा पुर मला एक वेगळ्याच दुनियेत घेवुन जात होता.एक उत्कंठा, एक मनाचा आवेग;मनाच्या मनात हुंदका देत होता.एकजण बोलला की , ‘आतल्या आत रडु नको डोळ्यातुन अश्रु व तोंडातून आवाज रडण्याचे आलाच पाहीजे त्यामुळे मने हलके होते.नाहीतर “दातखिळी” बसते, एक बाई मध्येच बोलते.

पण मी एका वेगळ्याच दुनियेत होतो.मी काहीही बोलत नव्हत.फक्त डोळ्यातुन अश्रु टिपत होते व तोंडातून हुंदका येत होता या पलिकडे माझ्याकडुन काहीच प्रतिक्रिया नव्हत्या.जमलेल्या लोकाना माझी दातखिली बसु शकते असा संशय येत होत.पण मला उचकी व हुंदका या एकत्र येत होत्या.त्यामुळे. असा भास जाणवत होता.पण बाहेर काय घडलंय त्या पेक्षा माझे लक्ष बापाचा उशाला ठेवलेले तांट त्यात अगरबत्ती व मेणबत्ती पेटत होत्या .मधुन मधुन गुलाब जल ची बाटलीतल पाणी अंगावर शिंपडल जात होत.अगरबत्ती वास घुमत होता. तांदळाने कप ताटात त्यात रुतून ठेवलेल्या अगरबत्ती बंच गच्च दाबुन व मेणबत्तीसचे मेण जळत्या ज्योती कडे टक लावुन पाहत होतो की ,” जीवन हें नश्वर आहे “ह्या मेणबत्ती च्या मेणाप्रमाणे जीवन विरघळत जाते व अखेर उरतो तो फक्त” धुराचा पुंजा “जो अखेरीस क्षणाला अगरबत्तीच्या धुरात मिसळुन जात होती.वातावरणात सुगंध पसरला होता.सावकाश सावकाश माझे संपुर्ण लक्ष बापाचा आठवणीत विरळ होत होते.

सकाळी प्रेत त्याच दिशेने ने ण्यात आले जेथे बापाची आयुष्य कचर्याचा डब्यावर कचरा गेला बिएमसी कामगार म्हनुन त्याच डब्यांच्या कडेला एक कुत्रा मेलेला, सडलेला कुत्राचा सडका वास सुटला होता.परंतु त्यचा तोंडाची बत्तीस चमकत होती.त्याचे दात मोत्याप्रमाणे चमकत होते .तसेच शरीर नष्ट होईल पण विचार व समाज कार्य अमर ह्या दाताचा पंक्तीत सारखे चमकत राहतील आयुष्य संपल्यावर पण.निरंतर …

त्या विद्युत दहन यंत्रात कायमचा देह आगी च्या विळख्यात झेप घेणार होता .शेवटी त्या तप्त स्रेचर वर शरीर ठेवण्यात आले.रुळावरुन स्ट्रेचर आत जातो अचानक ..धस्स ...असा आवाज येत ...क्षणार्धात शरीर राखेत परिवर्तित होते. त्या आठवणिबरोबर मला आलेली उचकी ही आता गायब झाली होती.ती उचकी जेव्हा जेव्हा मला लागेल तेव्हा तेव्हा बापाचे कार्य मला आठवत राहील


Rate this content
Log in

More marathi story from Swapnil Kamble

Similar marathi story from Tragedy