Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

त्यांनी फुलण सोडलं नाही

त्यांनी फुलण सोडलं नाही

2 mins
249


आज असाच गमतीशीर अनुभव घेतला. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दोन दिवसापूर्वी मुंबईत प्रचंड वादळ झाले. तर माझ्या हॉस्पिटल पासून साधारण एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर एकंदरीत सहा ते सात झाडे उन्मळून पडली होती. शिवाय अनेक झाडांच्या फांद्या तुटून खाली पडलेल्या आणि  हळूहळू महानगरपालिकेची कामगार मंडळी त्यांना तोडून तोडून बाजूला करत आहेत.


त्यातही जास्त झाडं बहाव्याची पडलेली आहेत. साधारणता आपली भारतीय झाडे आंबा, चिंच जांभळ, वड एवढ्या सहजासहजी उन्मळून पडत नाहीत. त्यांची मुळे या मातीशी घट्ट रुजलेली असतात आणि वरच्या वर लावलेली शोची झाडे सहज उन्मळून पडतात .


सहजच मी आज येता येता बघितले तर त्या झाडांच्या ढिगा मध्ये  मला एक जास्वंदीचं फूल उमललेल दिसलं. म्हणून मी पुढे गेलेली पुन्हा मागे आले. अरे! या बहाव्याच्या पडलेल्या, तोडलेल्या झाडांमध्ये जास्वंदीचे फूल कोठून आलं ?हाताने वर खाली केलं तेव्हा लक्षात आलं एका सोसायटीतील अशोकाचं झाड देखील पडलं होतं. कंपाऊंडच्या बाहेर आलं होतं, रोडवर पडलं होतं. पडता पडता ते जास्वंदीच्या दोन मोठ्या फांद्यांना घेऊन पडलं आणि त्या फांदीला बऱ्याच कळ्या होत्या. पण त्यांनी आपला उमलायचा गुणधर्म सोडला नव्हता. झाडे पडलेला आज तिसरा चौथा दिवस आहे परंतु वर खाली केल्यावर मला 7/8 जास्वंदीची उमललेली फुले मिळाली, आणि चार-पाच कळ्या देखील मिळाल्या. म्हणजे तुफानात तुटले, गळाले, मोडले पण त्यांनी आपला  उमलायचा धर्म सोडला नाही. आता ती सारी फुले आणि कळ्या मी डब्यात भरून गणपती बाप्पा साठी घरी आणली हे काही सांगायला नकोच😊😊😊


यातून आपण काय शिकायचं करण्यासारखे अशी कितीही संकटे आली तरी डगमगून जायचं नाही घाबरायचं नाही निराश व्हायचं नाही आणि आपलं जगणं आपलं फुलंण मुळीच सोडायचं नाही. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केला ना तर जगणं असह्य होतं पण तेच जर हॅपी गो लकी राहिलो तर तेच जगणं सुसह्य होतं नाहीतरी आपण घाबरून विचार करून परिस्थितीमध्ये काही फरक पडणार नसतो फक्त सावध पावले टाकायची सर्वांनाच शुभेच्छा जगा जगा आणि जगू द्या


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational