तूच माझी तुळस
तूच माझी तुळस


ती आणि तो दोघेही आनंदात राहात होते... बाल्कनीत हौशीने तिने तुळशीचे रोप लावले, त्याला रोज पाणी घालायची आणि म्हणायची तुझ्याप्रमाणे आमचा संसार बहरू दे...
बाळंतपणासाठी ती माहेरी आली होती... रोज फोन होतच होते, ती आठवण करायची तुळशीला पाणी घालत जा... तिला कोमेजून देऊ नको... तो म्हणायचा आहे माझे लक्ष...
पण तो कामात... विसरून जातो पाणी घालायचं... एक दिवस फोनवर ती विचारते तुळशीचे रोप बहरलंय ना...
त्याला आठवण होते... त्याचे मौन तिने ओळखले आणि ती रडू लागली...
मी तुळशीला म्हणाले होते, तुझ्याप्रमाणे आमचे नाते बहरू दे... आता आपल्या नात्याला पण...
तो म्हणाला, वेडाबाई असे कुठे असते का? तूच माझी तुळस आहेस. माझ्या अंगणात सदैव बहरत राहणारी, तू हसलीस की ही तुळस पण बहरेल...