सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

तू माझं स्वप्न आहेस...

तू माझं स्वप्न आहेस...

1 min
255


प्रिया,

 तू भेटलास आणि आयुष्याला नवीन वळण मिळालं.. खाचखळग्यांची वाटही फुलाप्रमाणे कोमल वाटू लागली.. ओसाड जीवन सप्तरंगी वाटू लागलं.. रटाळ वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीत नाविन्य भासू लागलं... जीवन नव्या रंगाने, नव्या गंधाने उमलू लागलं... 


प्रिया... 


पूर्वीचीच मी... पूर्वीचेच मन.. .. मग असे नाविन्य का... तुझं येणं.. मला चिडवणं.. तुझं माझ्याशी बोलणं... तू कधी रुसल्यावर माझं लाडिक समजूत काढणं... सर्व काही नवीन आहे पण तू मला कधी नवा वाटलाच नाही.. मी तुला ओळखते खूप खूप वर्षापासून... मागील जन्मापासून... पण तू माझ्या समीर आलास .. नव्या रुपात .. नव्या थाटात... 

   

तुझं हसणं... तुझ बोलणं... या सर्वांनी माझं मन अगदी मोहून टाकलं... तुझी प्रत्येक हालचाल निराळी.. तूच निराळा... सामान्य असूनही असामान्य... तू स्वर्ग लोकातून अवतरलेला आहेस..? की स्वप्ननगरीतला राजकुमार..? आहेस तरी कोण....? इतरांच्या दृष्टीने अगदीच साधारण असलास तरी तू माझ्यासाठी माझं आयुष्य आहेस... तुझ्याशिवाय मी माझ्या अस्तित्वाची कल्पनाच करू शकत नाही. करणार तरी कशी..? अरे वेड्या तू आणि मी विभक्त आहोत तरी का..?


   तू माझ्यातून आणि मी तुझ्यातून विभक्त तरी असणार कसे..? तू माझं स्वप्न आहेस. मला तुला आता सांगाव वाटते की मी तुझ्यावर प्रेम करतेय... फक्त आता मला तुझ्याकडून होकार हवा... सख्या... 

    मला पूर्ण विश्वास आहे की, तू माझ्या प्रेमाला नक्कीच उत्तर होकार देशील... माझ्या स्वप्नाला वास्तविक रूप देशील... मी तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत... आणि मला विश्वास आहे.. लवकरच माझी ही प्रतिक्षा संपेल.. मला खात्री आहे... तू माझ्या प्रेमाला नक्कीच होकार देशील.. नक्कीच होकार देशील... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance