krishnakant khare

Tragedy

2  

krishnakant khare

Tragedy

तुमची नोकरी किंवा तुम्ही केलेली नोकरी

तुमची नोकरी किंवा तुम्ही केलेली नोकरी

5 mins
709


स्टोरी मिरर


माझे जीवन माझे शब्द


तुमच्या आठवणींना उजाला द्या


अनादिकालापासून मानवाने पोट भरण्यासाठी बरेच काही उद्योग केले त्यावेळी नोकरी किंवा धंदा हा प्रश्नच येत नव्हता फक्त स्वतः अन्नासाठी वनवन भटकत आणि प्राण्यांची पक्ष्यांची , माशाची शिकार करत आणि प्राणी ,पक्षाला ,माशाला मारून त्यांचा मास मटण खाऊन आपली भूक भागवत हेच अनादिकालापासून माणूस करीत आला आहे. ते नाही मिळाले तर जंगलातल्या मातीमधले कंदमुळे खाऊन आपली गुजराण करीत असे. पण हे त्यांचे उद्योग ते स्वतः करीत स्वतःचं पोट स्वतः भरीत म्हणजे हे काही नोकरी नव्हती हे काही उद्योगाचा माध्यम नव्हतं त्यावेळची ती गतच तशी होती. पण हळूहळू कित्येक वर्षानंतर माणसाच्या राहणीमानात बदल होत गेला आणि त्याच्या उद्योगाला कधी नोकरीचे स्वरूप आले तर कधी तर कधी धंद्याचे स्वरूप आले आता मानवी जीवनात मानवाला उद्योग धंदा किंवा नोकरी याशिवाय उदरनिर्वाहाचा उपायच नाही राहिला.


आता आपल्या मर्जीनुसार आपण ज्यात कौशल्य प्राप्त केले त्या पोस्ट त्या पदाचा आपण नोकरीत किंवा उद्योग-धंद्यात उपयोग करतो. म्हणजेच आपल्या कार्यक्षमता नुसार आपण नोकरी किंवा धंदा करतो पण नोकरीत सलग आपल्याला आठ तास, बारा तास द्यावे लागतात. आपण जर विचार केला आपल्या दिनचर्याचे आपल्या जीवनाचे तास किती तर आपण म्हणतो 24 तास मग चोवीस तासात आपल्याला रात्रीचे विश्रांतीचेआठ तास व दिवसाचे कामाचे बारा तास आपण आपले उरलेले आठ तास नेहमीच्या दिनचर्येत खर्च करतो म्हणजेच आपल्या जीवनातील बारा तास आपण कोणाला तरी देऊन आपले पोट भरतो , उदरनिर्वाह करतो. म्हणजेच आपल्या जीवनातील बारा तास दुसऱ्यासाठी नोकरीत दिलेली असतात पण धंदा करणारा हेच 12तास आपल्या धंद्यात लावून आपली कसब लावून उद्योग धंदा मेहनत करून करीत असतो पण जास्त करून जे धंदे करतात ते कमी अवधीत आपल्या कौशल्याने नोकरीवाल्या पेक्षाही वरचढ होतात आणि धंदा म्हणजे मनमर्जी धंदा असतो आपल्या मनानेच ग्राहकांसाठी वेळ द्यायचा असतो नाय पटलं तर दुसरीकडे धंद्यासाठी वेळ द्यायचं असतं म्हणजेच स्वतः धंदेवाईक आपल्या कलाकुसरीने चांगला मेहनतीने श्रीमंत होऊ शकतो तेच नोकरी करून प्रमोशन घेता घेता आयुष्य वाढत जातं आणि वयानंतर ती व्यक्ती परत नोकरी करू शकेल अशी गॅरंटी नसते सरकारी ते प्रायव्हेट नोकरीतून वयाची मर्यादा आड आल्याने साठेची आतच नोकरीत ती व्यक्ती रिटायर्ड होते म्हणजेच आपल्याला नोकरी धंद्यातील वजाबाकी हे कळलेच असेल .ती व्यक्ती नोकरीत दुसऱ्याच्या अंतर्गत काम करीत असते पण धंद्यात स्वतःच्याच हिम्मत हुशारीने काम करीत असते आणि लगेच पैसा कमवीत असते . पण नोकरीत तसं नसतं त्याला महिना गेला की पगार असतो त्याला आठ तास, बारा तास कामाचे द्यावे लागतात, नोकरीत दोन भाग पडतात एक कुशल कामगार एक अकुशल कामगार कुशल कामगार अकुशल कामगारा पेक्षा जास्त पगार घेत असतो. अकुशल कामगार शिकाऊ असतो त्याला कमी पगारात कामे करावी लागतात तसं धंद्यात नाही कधी सीजन असला तर दोन तीन महिन्याची कमाई एकदमच करून टाकतात आणि मग बाकीचे महिन्यात धंदा नाही झाला तरी जी कमाई झालेली असते त्यात ती लेवल करतात म्हणजेच अनुभवी धंदेवाईक असेल तर तो आपल्या दिमाखाने धंदा चांगल्या तऱ्हेने करतो. मी माझं नॅचरोपॅथी मेडिसिन डीएसएम कोर्स केला होता आणि मुन्सिपल खातेआरोग्य खाद्य विभागातून परमिशन नोंदणी घेऊन दवाखाना चालू करायचा होता. पण सकाळ संध्याकाळ दवाखान्याचा टाईम असल्याने मला माझ्या आवडीचा छंद जोपासता आला नसता म्हणून मी डी .ए. एस. एम. पात्रता त्या नुसार सनराइज् फार्मा मधून नोकरी करू लागलो. 


माझा मित्र सनरेज फार्मा मध्ये मला सीनियर होता आणि त्याच्याकडूनच मी नोकरीला लागलो होतो, मला एरीया दिला होता. ठाण्यापासून कर्जत कसारा पर्यंत. माझा मी मेहनतीने काम करायचो, फक्त जिथे स्पेशल एक्सपर्ट डॉक्टर असायचे त्यांच्या तारखा एम. आर.ला भेटायच्या त्याच वेळी भेट घ्यायची असं असायची बुधवार मंगळवार असं स्पेशल डॉक्टरांसाठी विजिट द्यावे लागत .माझा मी काम बरोबर करायचं पण माझा सीनियर ऑफिसर त्याचा भाऊ त्यालासुद्धा एम आर मध्ये लावला होता. झालं काय मी जे काही डॉक्टर कॉल करायचो, ते तो आपल्या भावाच्या रजिस्टर वहीमध्ये डॉक्टर कालचे लावायचा, मला नंतर कळलं आणि मला पेमेंट कमी दिला आणि माझा केलेला उरलेल्या कामाचे दिवस तो त्याचा भावाकडे त्याच्या रजिस्टर वहीत वळवायचा त्यातून त्याला पेंमेंट दिले म्हणजे मी जे काही श्रम केले होते तो कष्टाचा पैसा आपल्या भावाच्या ड्युटीवर लावून देत होता आणि मी जे काय केलं होतं महिन्याभराचा काम त्यातला अर्धा पगार फक्त मला दिला आणि अर्धा त्याच्या कडे ठेवून त्याच्या भावाकडे द्यायचा. यावरून तो सिनिअर ऑफिसर माझ्या नजरेतून पार उतरला त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट माझ्या मनात राहिला नाही मी फक्त एम. आर. जी नोकरी माझ्या बाल नाट्याला रिहर्सल करायला वेळ मिळावा म्हणून करत होतो. 


पण मी पण माझी ड्युटी फार प्रामाणिकपणे करीत होतो पण त्याच्या या सीनियरच्या वाईट हरकतीमुळे मला ती नोकरी सोडावी लागली. पण महिनाभरात जे काम केलं होतं कामाचा रेकॉर्ड कंपनीतल्या साहेबाला कळलं होतं त्यांनी मला स्वतःहून काम करण्यासाठी प्रपोज केला होता पण एकदाचा माझ्या मनातून तो सिनीयर ऑफिसर उतरला होता. म्हणून मी कंपनीच्या साहेबाला देखील सांगितलेही तसं . पण आता मला एम आर चा चांगला अनुभव झाला होता आणि मी माझ्या कामाचा टाईम टेबल ठेवून जर काम केलं तर कंपनीला व मला चांगलाच फायदा होईल असा आत्मविश्वास माझ्या कामामुळे मला आला होता पण माझी आवड अभिनयाची होती. मला अजून पुरेसा वेळ हवा होता म्हणून मी बालनाट्यातच जास्त लक्ष दिला आणि ही माझी नोकरी एम.आर. ची शेवटची केली.


मी नोकरी चांगली प्रामाणिकपणे करत होतो. मेहनत घेतली होती पण माझा लबाड सिनीयर  बघता त्याच्या भावाकरता माझा बळीचा बकरा केला होता.पण मला अशी अपेक्षा नव्हती. कामाच्या बाबतीत सिनीयर ऑफिसर इतक्या खालच्या टोकाची भूमिका घेणे त्यामुळे सिनियर ऑफीसर मला मनातून पार उतरला होता. ही मी प्रामाणिक पणे नोकरी केली होती. भले मजा सीनियर आपल्या स्वार्थासाठी भावासाठी माझ्या वर अन्याय केला होता. त्याने मी दहा-बारा दिवसाचे डॉक्टर कॉलिंगचे काम त्याच्या भावाच्या रजिसटर वही कडे वळवली आणि ते पैसे भावाला दिले.पण त्यांनी अस न करता माझ्या मेहनतीचा पैसा माझा मला दिला असता तर माझा त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढला असता,आणि आता मी ह्याला त्याला त्याच्याबद्दलचे विश्वास घाताचे कारनामे सांगत होतो,ते मी कुणाला सांगितले नसते.म्हणजेच त्यांनी आपल्या ड्युटीवर नेमलेल्या माणसाला त्याचा कामाचा ,मेहनतीचा पैसा त्यालाच दिला असता तर तो दुसर्या वेळी त्याच्या कामाला परत उपयोगी झाला असता,आणि त्याच्या मनात सिनीयर ओफिसरविषयी कायम आदरभाव निर्माण झाला असता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy