krishnakant khare

Others

1  

krishnakant khare

Others

तुमचा जन्म झालेल्या घर/ ठिक

तुमचा जन्म झालेल्या घर/ ठिक

7 mins
945


माणसाचा जन्म झाला की त्याला त्याच्या कर्तव्याची सुरुवात होते. मग ते कोणत्याही माध्यमांना असो. पण काय कान चा जन्म कसा डब्यात कचऱ्याच्या डब्यात नदीकिनारी रस्त्याच्या किनारी झालेला असतो तसं पाहिलं तर आशा अर्भकांचा कोणीच नसतं ते अर्भक बेवारस असतं त्याला आपण लावारिस असे ही म्हणतो. म्हणजे आपला जन्म आणि आपल्या मृत्यू आपल्या हातात नसतो. आपल्याला निसर्गाने किंवा देवाने जन्ममृत्यू माणसाच्या हातात दिला नाही. पण हिंदू शास्त्रात जन्म मृत्यू बद्दल पूर्वज आणि आपल्या ग्रंथात खूप काही लिहून ठेवलेला आहे त्यावर प्रामाणिकपणे पूर्ण अभ्यास होणे जरुरी आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्या शास्त्राचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. भारतात असे बरेच काही संशोधन पर ग्रंथ आहेत त्यावर अभ्यास होणे जरुरी आहे त्यामुळे बरेच काही रहस्य बाहेर पडू शकतं. त्यामुळे मानवी जीवनाला फार मोठा उपयोग होऊ शकतो. कोणी म्हणतं देव पाहिला का तर आपण म्हणतो देवा हा आपण नाही पाहिला. पण मानवाला कुठून तरी हे जग चालतं त्यामागे काहीतरी अदृश्य शक्ती असली पाहिजे याची जाणीव होते त्याचप्रमाणे आपण जो काही प्राण वायू घेतो ज्याने आपल्या जीवन चालतं त्या हवेला कोणी पाहिलं कोणीच नाही पण हवे ची जाणीव आपल्याला स्पर्शाने होत असते पण आपल्याला हवा दिसत नाही त्याचप्रमाणे हिंदू शास्त्र मधल्या असे बरेच काही गुपिते आहेत त्याला शास्त्र आधारही आहे पण त्याला प्रामाणिक संशोधन करणारा अभ्यासक असावा लागणार आहे. जन्म हा शब्द सर्वांना आनंद आशा सुख जागवणारा शब्द आहे. प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जन्मस्थानाचा जन्मगावाचा ठिकाण प्रिय वाटतो.

ज्यावेळी हिंदुस्तान पाकिस्तान यांचे युद्ध झालं त्या साली   माझा जन्म ठाण्यातल्या कोलशेत गावी सकाळी सात वाजता एक फेब्रुवारी1965 साली झाला. आमच्या कोलशेत गावी पडद्यावरचे पिक्चर त्यावेळी मिलिटरी एअरफोर्स कॅम्प मध्ये गावातले बरेच जण रविवारी पिक्चर बघायला जायचे,

 रविवारी रात्रीचा  पिक्चरचा शो असायचा माझी आई माझी जन्माची आठवण मिलिटरी एअर फोर्स कॅम्प मधून घरी आल्यावर सकाळी सात वाजता माझा जन्म झाला. माझं जन्म ठिकाण माझं कोलशेत गाव या कोलशेत गावाला फार ऐतिहासिक महत्व परंपरा आहे. इथेच सँडोजबाग औषधांची कंपनी होती त्यावेळी संडोज औषधाची कंपनी मध्ये काही मोठे प्रोग्राम होते त्या कार्यक्रमाला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. भारत स्वतंत्र झालं त्यानंतर अठरा वर्षा नंतर माझं ठाण्यातल्या कोलशेत गावी 1 फेब्रुवारी 1965 साली जन्म झाला. त्यावेळचा काळ मुंबईपासून ठाण्यापर्यंत सूतगिरण्या असायच्या त्याला मिल्स असे म्हणायचे माझ्या जन्मगावी कोलशेतला किरण मिल्स ही गिरणी कंपनी होते आणि ह्या कंपनीचा (सायरन)भोंगा बरोबर सकाळी सहा वाजता सात वाजता, नऊ वाजता, एक वाजता आणि कामगार सुटल्यावर वाजायचं आणि माझ्या जन्मगावी कोलशेत गावकऱ्यांना वाजले किती याचा टाइमिंग बरोबर त्या किरण मिल्स कंपनीच्या भोंगाच्या आवाजावरून कळत असे.जन्म झालं तेव्हा माझं शरीर चांगलं बाळसं घेतलेलं होतं. फोटोतल्या बाळकृष्ण प्रमाणे माझा चेहरामोहरा शरीरयष्टी, गुटगुटीत बाळसं घेतलेला होता. त्यामुळे मी सगळ्यांना हवाहवासा वाटत होतं माझ्या आधी दोन भावांचा जन्म झाला होता या जन्माला दोन दोन-दोन वर्षाचा अंतर होतं आमच्या सगळ्या मोठा भाऊ माझ्या मोठ्या काकांचा मुलगा त्याचं नाव बळीराम दत्तू खरे, मग आता माझ्या बारशाच्या वेळी माझ्या नावाबद्दल चर्चा चालली होती.

 कोणी म्हणत होता माझं नाव भिम ठेवा तर कोणी म्हणत होता बाळकृष्ण नाव ठेवा पण बाबाने भटजी कडून माझी जन्मवेळ तारीख सगळे मिळून कुंडली काढली होती.त्यात 'क' वरून बरेच काही नावे आली होती, आणि माझा सख्खा मोठा भाऊ त्यांची नावे देवांची होती. एक नारायण रामचंद्र खरे दुसऱा गुरुनाथ रामचंद्र खरे मग आता ह्या तिसर्‍या मुलाचं नाव सुद्धा देवाच ठेवु 

मग बाबांच्या भावाचा मोठ्या मुलाचं नाव बळीराम होता आणि महाभारत ग्रंथात बळीरामचा भाऊ श्रीकृष्ण आहे म्हणून मग बाबांनी माझं नाव कृष्णकांत ठेवले. भटजीने माझं भविष्यही माझ्या आई-बाबांना सांगितलं होतं म्हणाले होते हा मुलगा तुमचा गुणी, मातृपितृ भक्त होईल. त्यांनी मनात आणलं तर हा आपल्या मेहनतीने मोठा होईल. रवी चंद्राचे योग सौम्य सौम्य होऊन राज योग झाला आहे, फक्त ह्याला चांगलं मार्गदर्शन, चांगलं शिकवलं तर तुमच्या घरादाराचा नाव काढेल फक्त सुरुवातीला फक्त ह्याच्या तब्येतीला जपा आणि दुसरं काही घाबरण्याचे कारण नाही. त्याच्याकडून चांगले काम कसे होतील ते बघा कधीकधी साधासरळ दिसणारा हा न काम होणारे कामे करून दाखवू शकतो आणि कधीकधी तुम्हाला वाटला चांगले काम करेल पण तुमची निराशा पण होईल म्हणूनच त्याच्याकडे चांगले लक्ष देऊ त्याच्याकडून चांगले काम करून घ्या मग त्याला पुढे जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही. कुठेही असला तरी आपला प्रभाव दाखवेल. त्याच्या सुरुवाती पेक्षा उत्तरार्थ दिवस सुखासमाधानात जातील. हे ज्योतिष शास्त्राने भटजीने माझी कुंडली काढून माझ्या जन्मगावी कोलशेतला बारशाच्या वेळी माझ्या बाबां जवळ गोष्ट काढली होती. आईबाबांना आनंद झाला होता. बरोबर काही वर्षांनी म्हणजेच 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध चालले होते, त्यावेळी आमच्या कोलशेत गावातील किरण मिल्सच्या बाजूला आपल्या भारताचं मोठ मिलिटरी एअर फोर्स कॅम्प आहे त्यावेळी कोलशेतच्या गाववाल्यांना मॅसेज मिळायचा, कि आता युद्ध चालू होणार आहे, युद्ध चालू झाला आहे वगैरे माझ्या जन्मगावाच्या कोलशेतच्या घरापासून मिलिटरी एअरफोर्स कॅम्प दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मिलिटरी एअरफोर्स कॅम्प मधला संदेश आम्हा गावकऱ्यांना सगळ्यांना मिळत होता मग गावागावात ही चर्चा चालू होती. जर बाय चान्स पाकिस्तानाच्या एअरफोर्स ने ह्या भारताच्या कोलशेत गावातल्या मिलटरी एअरफोर्स केंम्पवर बॉम्ब पडला तर आजुबाजुच्या गावावर फार वाईट परिणाम झाला असता त्यापुर्वी आपण काय करायचं त्या सुरक्षेसाठी मिलिटरी एअरफोर्स कॅम्पच्या मोठ्या सिनीयर अधिकार्यांनी एक चांगला बंदोबस्त म्हणून त्यांच्या अधिकार्याना पुर्व उपाय योजना सुरक्षिते साठी आर्डर दिल्या ,

मोठ्या मैदानात जागोजागी खोल खड्डे चौकोनी आकाराचे खंडे होते खणले होते. मग गावागावात ही चर्चा होती की चौकोनी खोल खड्डे कशाकरता खणले? मिलिटरी मधल्या मोठ्या अधिकाऱ्यांना गावाला गाववाल्यांना, कोलशेतकराना सांगितलं जर वरून बाम वगैरे पडण्याचे संकेत आले तर सुरक्षा म्हणून या खड्यात लपायचं बॉम्बचा धूर जमिनी वरुन वाहून जाईल पण खड्ड्यात येणार नाही त्यामुळे बरेच जण यात वाचतील, तेव्हा कुठे गावाला त्या मोठ्या मैदानातल्या चौकोनी खड्ड्याचा रहस्य समजलं होतं पण आम्हाला सगळ्यांना तेवढेच ते युद्धाचं वातावरण फार भितीच वाटत होते कधी काय बॉम्ब स्फोट झाला तर जीवितहानी व्हायला कितीसा वेळ लागणार? पण माझ्या जन्मगावी कोलशेतला युद्धाचा काहीच प्रॉब्लेम झाला नाहीआणि काही वर्षांनी आम्ही पातलीपाडा या गावात राहायला आलो. कलेक्टर कडून आम्हाला पाटलीपाड्यात राहण्याची जागा पास झाली होती.आम्ही पातलीपाड्यात राहायला आलो. पण कोलशेत मधले आमचे दोन रूम आम्ही सोडले नाही कारण ती आजी-आजोबांची राहता घरातलं आमचं होतं. आणि माझं ते जन्मघर होतं, त्याच माझ्या जन्मगावी लहानपणी माझा भाऊ गुरुनाथ खरे त्याच्याबरोबर कोलशेत गावाच्या गल्लोगल्ली हिंडलो फिरलो. गावातल्या लग्न मंडपातल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या गाणी प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात गायलेलं रेकॉर्ड साऊंड रेकॉर्ड गाणे आम्ही ऐकायचो त्यावेळी आणि आता पण प्रल्हाद शिंदे साहेंबांनी पार्श्वगायन केलेले गाणे "ऐका सत्यनारायणाची कथा" श्रीसत्यनारायणच्या भटजीच्या पुजेनंतर गाणं हमखास वाजवले जायचे त्याशिवाय सत्यनारायणाची पुजा पुर्ण झाली असं वाटायची नाही.

  तर माझ्या कोलशेत या जन्मगावात गावातली जत्रा त्या जत्रेतील पिक्चर मिलिटरी कॅम्प मधील रविवारचे पिक्चर माझ्या मासूम लहानपणीच्या डोळ्याने पाहिलेत मला पिक्चर मध्ये नवरा बायकोचा भांडण-तंटा मारझोडपणा बिलकुल आवडत नसायचे कारण घरी आई-बाबांनी भांडण केलं तर मला आवडत नव्हतं मला वाटायचं ते चांगले राहावेत तसे माझ्या आई बाबा सुद्धा चांगले राहायचे, आईच शिक्षण कमी असल्याने तिची समज एक वेगळ्या प्रकारचे होती त्यामुळे बाबां स्वतः तिला समजून घेत ,माझ्या जन्मगावी  कोलशेतला बाबांचे शिक्षण सातवी पास झालेले होते आणि सातवी पास हे त्यावेळी मास्तराच्या नोकरीसाठी पात्रतेतील होती. माझ्या जन्मगावी कोलशेत या गावात गावातील तिघेच सातवी पास झालेले होते. त्यामध्ये माझ्या बाबांचा हाय स्कोर नंबर होता. बाबा सरपंचाच्या मर्जीत असल्याने लिखाण काम वगैरे करुन सरपंचाच्या कामाचा भार कमी करायचे , कारण माझ्या बाबांची मराठीतून, हिंदीतून इंग्रजीतून लिहिण्याची पद्धत फार चांगली होती, हिशोब वही क्लिअर असायची मोत्यासारखा सुंदर अक्षर असायचे. इंग्लिश आणि मराठी यात त्यांची मास्टरकी होती म्हणून गावातील सरपंच ऑफिसच्या कामासाठी बाबांना बोलावून घेत. त्यांच्याकडून हिशोबा पासून गावातील विकासाबद्दल टाईमटेबल अक्यरेट करुन घेत.घरात बाबा वर्तमानपत्र सगळ्यांना बातम्या वाचून दाखवत. त्यामुळे गावात बाबांना सरपंचसुद्धा आपल्या कार्यालयात वर्तमानपत्र वाचन करायला बोलवत बाबांना सुद्धा सरपंच सारखाच मान मिळत होता , तरी बाबा छोट्या-मोठ्या कामापासून काम करायला लाजत नसत ते म्हणायचे काम आपली ओळख देतो त्याला मोठा कमी मोठा शब्द लागत नाहीत. कोणत्याही व्यक्तीला काम छोटा मोठा करावाच लागतो, मग मेहनतीचे कामाला लाज कसली .

बाबा शेतातली कामं करत .आपल्याही शेतावर काम करत पण त्यावेळी कंपन्या प्रत्येक क्षेत्रात आल्या होत्या कापूरवाडी पासून , बाळकुम पासून, तर कोलशेत पर्यंत कंपन्या झाल्या होत्या. बाबांनी कोलशेतल्या संडोजबाग औषधाचा कंपनीत ऑपरेटर म्हणून काम केलं होतं तसेच ते जे. के .फाईल कंपनी मध्येही काम केलं होतं. नंतर चेस ब्राईट स्टिल कंपनीत बॉयलर अटेंडस काम केलं आता बाबा त्याच कंपनीत राहून आपलं काम प्रामाणिकपणे करीत होते, आणि कोलशेत मधल्या माझ्या जन्मगावी लोहार व्यवसायही करायचे, कोलशेत मध्येच त्यांच्यावर लोहारकामाला तेजी होती आत्ताच आठ तास कंपनीची नोकरी केल्यावर ते आपल्या परंपरागत लोहार कामाला वेळ देत त्यामुळे त्यांच्या कष्टकरी स्वभावामुळे त्यांनी लवकरच इतरांपेक्षा स्वतःची प्रगती करून घेतली होती, आता आम्ही सर्व पातलीपाडा गावात राहून कधी मध्ये जत्रेला कोलशेतला यायचो त्यातल्या गावदेवीच्या देवीला खणानारळाची ओटी भरून पूजा करायचो, पण माझं जन्मगाव कोलशेत मला कायम लक्षात राहिला.

 पातलीपाडा गावात चार-चार बाहेर गावाचे लोकं येऊन राहिल्याने प्रत्येक गावकऱ्यांमध्ये एक एक आपापला भारतातल्या प्रत्येक शहरातला एक एक गावकरी राहायला आले आहेत पण हेच गावकरी ज्यावेळी त्यांच्या गावाला जातात तर त्यांचं गाव युपी, मध्य प्रदेश ,सातारा, सांगली, गोवा, नाशिक, वाडा असायचे पण गावाला जाताना स्वाभिमानाने सांगयचे की आम्ही गावाला चाललो,आमच्या जन्मगावाला चाललो, तुमचं पण गाव असेल कि,

 मी मात्र आमच्या पातलीपाडा पासून अवघ आमचं गाव कोलशेत गाव रिक्षाने दहा-पंधरा मिनिटावर आहे असं कौतुकाने सांगायचो कारण मला माझ्या जन्मगावाचा स्वाभिमान आहे.

 "मला माझ्या जन्म गावाचा स्वाभिमान का नसावा जिथे ज्याचा जन्म झाला तिथे त्या गावाचा त्याला स्वाभिमान हा असलाच पाहिजे. वरील प्रमाणे मला जन्मगावाला कोलशेतला भेट दिल्यावर सगळ्या गोष्टी आठवतात. आणि एक ऋणानुबंध ची नाल आपल्या जन्मगावाशी जोडली जाते ते हेच खरे.....


   "मला माझ्या जन्म गावाचा स्वाभिमान का नसावा जिथे ज्याचा जन्म झाला तिथे त्या गावाचा त्याला स्वाभिमान हा असलाच पाहिजे. वरील प्रमाणे मला जन्मगावाला कोलशेतला भेट दिल्यावर सगळ्या गोष्टी आठवतात. आणि एक ऋणानुबंधाची नाल आपल्या जन्मगावाशी जोडली जाते ते हेच खरे.....


Rate this content
Log in