बालवाडीतील पहिल्या दिवसाची आठव
बालवाडीतील पहिल्या दिवसाची आठव


1975, 1976 या काळात बालवाडी नव्हती, त्यावेळी मुलं सहा-सात वर्षांची झाली की त्यांना डायरेक्ट पहिलीत बसवल जाई,
मी पहिली ईयत्तेत शाळेत जाण्याआधी माझ्या बाबांनी घरी ट्युशन लावला होता. प्राथमिक शाळेतल्या फाटकबाई अर्धा-एक तास मला घरी शिकवायच्या , माझी पाटीवर ग म भ ण पासुन क का कि की कु कू के कै को कौ कं क: पर्यंत, उजळणी पासून गणिता पर्यंत चांगली तय्यारी करुन घेतली होती. फाटक बाई सडसडीत शरीरयष्टीच्या,गोर्यापान वर्णाच्या, केसांच्या लांबसडक केसांच्या एकच वेणी घालणाऱ्या अशा आमच्या बाई फाठक बाई शांत, धीर गंभीर स्वभाव ,नेमके बोलणाऱ्या आणि आमच्या शेजारच्या काकू पंडित काकू त्यांच्या नातेवाईक आणि त्या फाटक बाई आमच्या प्राथमिक शाळेला शिक्षिका म्हणून ठाण्यातुन सात किलोमिटरच्या अंतरावर पातलीपाडा गावात येत होत्या ,आमच्या शेजारच्या काकू पासून ओळख झाली होती, म्हणजेच त्यावेळी आमची शाळा चौथीपर्यंत होती, आणि आमच्या फाटक बाईंनी मला होम ट्युशन दिला होता, म्हणजेच मला आठ वर्ष झाले तरी लिहायला वाचायला जमत नव्हतं कारण मला त्यावेळी बोलता येत नव्हतं, एक-दोन वर्ष माझ्या जिभेच्या ट्रीटमेंट वर गेली,आणि नंतर डॉक्टरी उपचारानंतर मला व्यवस्थित बोलायला यायला लागलं, त्यामुळे माझी दोन वर्ष वाढलीआणि त्यावेळी वय वर्ष आठ पार व्हायला आलं होतं कारण उपचारात दोन वर्ष गेली होती आणि मी 1974,1975 साली मी आठ नऊ नऊ वर्षाचा असताना घरच्या घरी होमट्यूशन घेतलं होतं,पाटीवर लिखाण करण्याचा सहामाही झाली आणि मला सहामाही परीक्षा नंतर पहिली मध्ये बसवलं. कारण सहा महिन्यात फाटक बाईने माझं पहिलीचा अभ्यास चांगलं करून घेतलं होतं. म्हणजेच माझं घरच्या घरी ट्युशन घेतला गेला आणि अशा ट्युशनला आताची बालवाडी अंगणवाडी म्हटले तरी चालेल कारण बाईंच्या ट्युशन मध्ये घरी ट्युशन घेत असल्यामुळे मी होम ट्यूशन म्हणुन फाटक बाई कडून शिक्षण घेत होतो,
आता जी पद्धत आहे, पहिलीच्या पूर्व अभ्यासक्रमाची सवय होण्यासाठी मुलांना आधी बालवाडीत ,अंगणवाडीत शिकायची प्रवेशाची अट असते अगदी अशीच परिस्थिती माझ्या बाबतीत झाली होती.
त्यावेळी अंगणवाडी बालवाडीचा पूर्व तयारी अभ्यासाचा पहिला मिळालेला मान मला असेल असं गंमतीनं म्हणावसं वाटतं कारण पहिलीच्या आधी घरी सहा महिने मला होम ट्यूशन होतं. अंगणवाडी बालवाडी सारखच पूर्वी शाळेत पहिला पहिलीला कवितांचं ,गाण्यांचं, उजळणी रट्टा मारून घेत म्हणजे शाळा सुटण्याच्या आधी एक तास पूर्वी त्याला परवाचा घेणे असे त्यावेळची जुनी माणसं म्हणत आणि आमच्या फाटक बाई शाळा सुटण्याच्या आधी एक तास पूर्वी एका तासापूर्वी परवाच्या आमच्याकडून करुन घेत असे म्हणजेच ज्यामुळे आमचे उजळणीचे कवितेचे पाठांतर मस्त होत होंते. दर आठवड्याला आधी शनिवारी शाळा सुटतान सांगितले जाई,, रविवारी हातापायाची नखे कापुन येणे, दात स्वच्छ ठेवणे,शाळेच्या ड्रेससाठी कपडे पण धुतलेले स्वच्छ असावेत असा त्यांचा नियम होता.मुलांना नियम लावायला त्या एकाग्र असत आणि फाटक बाई बरोबर सोमवारी शाळेत सगळ्यांचे आता पायाची बोटांची नखे कापली आहेत की नाहीत हे ते सर्व पाहून घेत आणि ज्यांची नखे कापलेले नसतील त्यांना घरी पाठवत ,
मी मात्र रविवारीच हातापायाची नखे कापून सोमवारी शाळेत वेळेवर येत असायचो,फाटकबाई सगळयासमोर मला उभा करत वर्गातील विद्यार्थ्यांना बोलत "पाहिलत कृष्णकांत खरे त्याच नखशिखान्त मस्त गडी
दर दिवशी सकाळी आमच्या घरी प्रत्येकाची गरम पाण्याचे आंघोळी असायची शाळेत मात्र किती मुले आंघोळ नाही करता पण यायची त्यांना मात्र फाटक बाई सज्जड दम द्यायच्या, ह्या मुलाकडे पहा म्हणायच्या "खरे कडे बघा त्याची नखे दर रविवारी कापून येतो. असतो आणि त्याची रोज त्याची आंघोळी झालेली असते नुसतीच आंघोळी करत आहे तर अंगाने स्वच्छ होऊन येतो. अंगणवाडी बालवाडी सारखं पहिलीच्या शाळेत माझं पहिला दिवस मस्त मजेत गेला सगळ्यांची चांगले ओळख झाली कारण आणि गावातले सगळे मुले एक दुसऱ्याचे ओळखीचे होते
आता ते अंगणवाडी बालवाडी सारखे शाळेतला पहिला दिवस होता. त्यातली काही मुलं आता कोणी नगरसेवक,तर कोणी डॉक्टर , तर कोणी हवलदार तर कोणी इन्स्पेक्टर ,तर कोणीऑफिसर तर कुणी आर्टिस्ट तर कुणी रायटर तर कोणी कंडक्टर तर कोणी ड्रायव्हर झालेला आहे तर कोणी बिल्डर झालेला आहे, तर कोणी पत्रकार सुद्धा झालेला आहे म्हणजे आताच्या लहान मुलात उद्याचा त्यांचं भवितव्य उज्वल करायला शाळा हेच माध्यम असतं मग ते अंगणवाडीचा असो बालवाडीचा असो,
सुरूवातीला त्यांना पहिल्या अनुभवातून जावंच लागतं ,
मलाही फाटक बाईंच्या शाळेच्या पहिलीच्या मध्ये अंगणवाडी बालवाडी सारखं बाईंच्या होम ट्यूशन मधून शिकायला मिळालं हेच माझं परम भाग्य होतं म्हणून मी कसा विसरणार तो शाळेतला अंगणवाडी बालवाडी सारखा पहिला अनुभव. पातलीपाडाच्या शाळा सोडुन दुसर्या शाळेत ट्रान्सफर होतात.आणि आम्ही चौथी नंतर पुढे पुढे शाळा,कोलेज करत पुढे नौकरी,लग्न वगैरे करून आम्ही आमच्या संसारात बिझी राहिलो,काही वर्षानंतर
त्याच फाटक बाई कित्येक वर्षानंतर म्हणजे आता माझी मुलं कॉलेजला गेल्यानंतर घरी गावात आम्हाला भेटायला त्यांच्या मिस्टरांबरोबर आल्या होत्या, मिस्टर सायंटिस्ट होते ते रिटायर झाले होते.
फाटकबाईंचं आम्ही मनापासून स्वागत केलं त्यांच्या मिस्टरांचे पण चांगले स्वागत केलं ,
आईने माझ्या त्यां दोघांचं खणानारळाने औक्षण केलं, त्यांचं स्वागत केलं पण फाटक बाईने माझ्या आईला साडीचे भेट आणली होती पण यांना आम्हा सगळ्यांना इतक्या वर्षानंतर फाटक बाई भेटल्या याचा आनंद आम्हा सगळ्यांना झाला होता कारण इतका मधल्या जीवनाच्या पिरियड मध्ये प्रत्येकाचेच आयुष्य संसाराच्या घडामोडी असतातच सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आपापले संसारात मग्न असतील पण कधीतरी अचानक कोणाला तरी इतक्या वर्षानंतर भेटावे वाटते आणि फाटक बाई आम्हाला आम्ही लहान असल्यावर आम्हाला शिकवायला शिक्षक म्हणून होत्या त्याने आमचं बालपण लहानपण बघितलेला आहे त्या बाई गुरु शिक्षिका म्हणून फार मोठ्या मला वाटतात मनाने सुद्धा मोठ्याच आहेत .
फक्त एकच आठवण आपण चांगली गोष्ट केलेली आणि चांगल्या गोष्टींचा सुखद आनंद सुख समाधान मिळतं गेलेली पण या काळाच्या प्रवासात पुढे कोणी कोणाला वय परत्वे सोडून जात असतो.
आता आमचे आईबाबा या जगात देखील नाहीयेत पण त्याआधी फाटक बाई येऊन त्यांना म्हणजे माझ्या आईला साडीची भेट व बाबांना शर्ट पैंटपीस भेटी देऊन गेल्या
त्याच त्या बाई फाटक बाई माझ्या होम ट्यूशन बाई किंवा अंगणवाडी किंवा बालवाडीच्या सारख्या माझ्या पहिलीच्या शाळेमधल्या मराठी वर्गशिक्षिका फाटकबाईंना मनातून मनापासून कोटी कोटी प्रणाम ....
आमच्या फाटकबाईं आता फक्त या लेखाद्वारे त्यांची माहिती ,त्यांची आठवण राहिलेली आहे, बालवाडीचा पहिला दिवस पण माझ्या त्यावेळच्या शाळेतला पहिलीतला आमचा पहिला दिवस होता......
भलेही पूर्वी अंगणवाडी बालवाडी नव्हती तरीही पहिलीच्या शाळेत मुलांना व्यवस्थितरित्या शिकवले जाई , पण मला त्यावेळी सुद्धा अंगणवाडी, बालवाडी शिक्षणाचा लाभ झाला म्हणून बालवाडीचा तो पहिला दिवस तोच माझा पहिलीचा पहिला दिवस पण त्या फाटक बाई........