krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

एखाद्या सणाची आठवण.

एखाद्या सणाची आठवण.

7 mins
1.0K


भारत देश अनेक जाती धर्माने नटलेला आहे आणि प्रत्येक जाती धर्मातल्या सणांचा एक वेगळा महत्त्व आहे. मी तर म्हणेन प्रत्येक धर्माच्या सणात सहभाग घेऊन समरसून गेलं पाहिजे कारण प्रत्येक धर्म भाईचाऱ्या, बंधुता या विचाराच सूत्र सांगतो.

गणपतीच्या दिवसात जो तो आपआपल्या गणपतीसणाचे दहा दिवसा अगोदर गणपतीचे डेकोरेशन ला तयार करायला घेत, माझे बाबा रामचंद्र खरे हे पण गणपतीची आरास सुरेख तयार करत. आमच्या गणपतीची आरस बघायला आमच्या पातलीपाडाच्या चार गावातून गणपतीची आरास बघायला येत असत म्हणून बाबा एक चॅलेंज म्हणून गणपतीची आरास बनवायला घेत असत. बाबांच्या उमेदीच्या काळात त्यांनी बरेचसे डेकोरेशन बनवले होते त्यामध्ये तांबड्या मातीचे चिकन माती घेऊन दिव्य भव्य मूर्ती बनवायचे आणि मूर्तीमध्ये माती म्हणजे चिखल गवताच्यासुख्या जुडी मध्ये मिक्स करून मूर्ती तयार करायला घेताना हाताच्या भागाला, खांद्याच्या भागाला पाठिच्या भागाला, पुढच्या भागाला मजबूत जॉईन्ट मारत त्यामुळे अशी ही मूर्ती गणपतीच्या उत्साहात दहा दिवस काही ना तडकता काहि ना क्रॅक होता जशीच्या तशी टिकून राहत असे आणि हीच मूर्ती आमच्या पातलीपाडा परिसराच्या चार गावातून लोकं गणपती दर्शनाला येत आणि गणपतीचे डेकोरेशन पाहण्याचाआनंद घेत कधी कधी तर आम्ही बनवलेली डेकोरेशन मुर्ती गणपती गेल्यानंतरही जशीच्या तशी टिकून राहायची,आम्ही गुढग्यावर बसलेला रामभक्त हानुमान पण छाती फाडुन त्यामध्ये पण रामसीता दिसायची अशी हनुमंताची रामभक्ती असते त्याच धर्तीची हनुमानी मुर्ती बनवली जायाची व फाडलेल्या छातीत रामसीता प्रसन्न होतात आम्ही त्याऐवजी गौरी गणपतीची मुर्ती प्राणप्रतिष्ठस्थापना करत व विसर्जनच्या वेळी विसर्जनासाठी गौरी गणपतीलाच फक्त घेत.  मग फक्त डेकोरेशनची हानूमानाची ती मुर्ती सार्वजनिक नवरात्रीला उपयोगात आणत.गणपती गेले तरी लोकं डेकोरेशन बघायला दोनतीन दिवस येत , आमच्या पातलीपाडा गावाचे परिसरातल्या चार गावातून एक-दोन गावातून हमखास नवरात्रीच्या डेकोरेशन बनवण्यासाठी बोलावलं जाई. कधी कधी तर कधी तर गणपतीतील डेकोरेशन बनवलेले ते डेकोरेशन घ्यायला यायचे. मग जिथे कुठे नवरात्रीसाठी डेकोरेशन करायचे असल्यास माझे बाबा रामचंद्र खरेंना तिथे बोलावलं जाई, बाबा काही ठिकाणी ज्या काही मुर्त्या बनवायचे किंवा वाघाच्या तोंडातली प्रवेशद्वार, राक्षसाचा तोंडातली प्रवेशद्वार ही त्यांची बनवण्याचे खास येत पद्धत असायची हे म्हणजे गणपतीच्या सणाला, नवरात्राचे सणाला अंगमेहनत व कलाकुसर याचा मिलाफ करूनच बाबा गणपतीच्या सणाला नवरात्रीच्या सणाला मुर्त्या घडवायच्या त्याकामी आम्ही म्हणजे त्यांची दोन मुले नारायण खरे कृष्णकांत खरे त्यांना मदत करायचे आम्ही मुले पण फार हुशार त्यामुळे बाबांचं काम आणखीन सोप्प व्हायचं एकदा कासारवडवलीच्या गजबजलेल्या गावात दादा नारायण खरे बाबांनी बनवलेला डेकोरेशन बघायला गेला होता तिथल्या एका माणसाने बाबांची तारीफ करून दादाला त्या डेकोरेशनची माहिती देत होता ह्या माणसाला दादा बाबांचाच मुलगा असं काही माहीत नव्हतं त्याला वाटले पहायचा कोणी बाहेरचा आला असेल आणि नवरात्रीच्या देवीच्या दर्शनाला आला असेल म्हणून तो बाबांबद्दल दादाला माहिती देत होता तो म्हणत होता "हो हो खरे साहेब आहे ना अरे ऊनके पास जबरदस्त हुन्नर है वह मुर्ती मिट्टी के दलदलसे बनाते है और घास का पिंडा उसमे मिक्स करके जोड जोड के मूर्ती बनाते है अरे मूर्ती नऊ दिन नवरात तक आराम से बिना तडके रहता है" दादा हे त्याचे बोलणे ऐकून मनोमन सुखावत होता कारण त्याने बाबांची स्तुती केली होती. बाबा चांगले कंपनीत चांगले वर्कर चांगले बॉयलर अटेंडेंट, चांगले लीडर ,चांगले कलाकार, चांगले लोहार,चांगले समाजसेवक असं त्यांच्या प्रत्येक हुरहुनरचा प्रत्यय नेहमीच्या व्यवहारात आम्हाला आला पण चांगला मूर्तिकारही त्याचा प्रत्यय आम्हाला गणपतीच्या सणात नवरात्रीच्या सणात आला. बाबांचं एक चांगलं मूर्तिकार म्हणून गणपतीच्या विसर्जनाच्या दहाव्या दिवशीच्या एक दिवशी अगोदर चांगलं सन्मान करण्यात आला त्यांना शाल श्रीफल देऊन जगातले नामांकित योद्धा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धा आकार छोटी मूर्ती बाबांच्या कडे चांगले मूर्ती घडवणारे मूर्तिकार म्हणून सन्मानाने सपुर्द करण्यात आली.

  घरी बाबा शाल श्रीफळ व शिवछत्रपती महाराजांची मूर्ती घेऊन आले होते यापेक्षा जगातले असा मोठा सन्मान कोणता असू शकेल ?जे नवरात्रीच्या सणाला बाबांना मिळाले होते. बाबा कमी खर्चात, अक्कल हुशारीने थोडी मेहनत घेऊन गणपतीचा सणाला आम्ही पण त्यांच्या मदतीला असायचो. गणपतीच्या सणाला आमचा गणपतीचे डेकोरेशन चार गावात प्रसिद्ध असायचा, सर्वस्वी आमचे बाबा रामचंद्र खरे आणि त्यांची सोन्यासारखे दोन मुलगे हे पण हौसेने आपली कलाकुसर गणपतीच्या सणाला डेकोरेशन बनवताना दाखवायचे हेच बाबांना सुद्धा बरे वाटून जायचे आणि विशेष कमी खर्चात चांगलं डेकोरेशन बनवायचे. आमच्या गणपतीच्या सणात पण गणपतीच्या सणाच्या आधी आमची आई सुनंदा रामचंद्र खरे दहा दिवसा अगोदर आमच्याकडून गणपतीची सणाची कामे उरकून घेण्यासाठी आमच्या मागे कटकट करत असे"अरे गणपती चार दिवसावर आले अजून तुम्ही तुमचा कामाला पाहिजे तसा हातभार लागत नाही त्या तेव्हा तुम्ही लवकर काम करावे घराची पेंटिंग करा, गणपतीच्या सणाला स्वयंपाकाची सामान आणा पूजेचे सामान आणा इत्यादी तकलादू आमच्या मागे लावायची, तिची कटकट आहे पण त्या कट कटी मागे तिचं गणपतीचे डेकोरेशन छान झालं पाहिजे लोक लांबून लांबून बघायला येतात हे तिचं दुरदृष्टीचे वाक्य नेहमी असायचं, पण तिच्या आशा व्यवहाराने आम्ही काही चिडत नव्हतो कारण आम्हाला माहित होतं की त्यामागे गणपतीची सणाची कामे लवकर उरकून गणपतीचा सण आम्हा सगळ्यांना साजरा करता येईल आणि गणपतीत जे कोणी गणपती पाहायला येतील ती त्यांच्याकडून त्यांचं गणपतीबद्दल रिएक्शन आहे काय आहे ती आजमवायची, चांगले दोन शब्द त्यांच्याकडून ऐकायला मिळाले की आईला बरे वाटायचे आमच्या गणपती सणाला हिंदी मुस्लिम सिख ईसाई सगळे गणपती दर्शन करायला यायचे आणि एक विशेष म्हणजे ज्यांचे हिंदू-मुस्लीम दंगेत आम्ही चार-पाच कुटुंबाला वाचवले होते ती कुटुंबे आता लांब लांब दूर राहायला गेलेले तेवढ्या दुरून खास आपल्याकडे एकेक करून गणपती दर्शनाला यायचे म्हणजेच आमच्या बाबांनी चार-पाच मुसलमान कुटुंब मुस्लिम कुटुंबांना वाचून हिंदूमुस्लिम भाई भाई चा भाईचारा कायम चांगला ठेवला होता तिथे हेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर प्रत्येक धर्मात आपला धर्म श्रेष्ठ या नादात इतर धर्माला आपण कमी लेखलं तर जगात धर्माधर्मात अवडंबर माजेल,जे प्रेमाने, भाईचाराने, बंधुभावाने अशक्य गोष्ट शक्य होते ते शत्रुत्वाने कधीच शक्य होणार आपण मरून गेलो तरी,म्हणून शहाणेच माणसे हुशार असतात जे भाईचाराने राहुन आप आपल्या धर्माच्या चार चांगल्या गोष्टी घेऊन इतर धर्मात भाईचाराने आदानप्रदान करतात व आपआपल्या धर्माचा स्वाभिमान राहतो आणि इतर धर्माला पण कळते त्यांचा धर्म पण महान आहे आणि आपला भारत पण महान आहे,हे जिवंतपणीच अक्कल हुशीरीने भाईचाराचा व्यवहार ठेवला तर आपल्याला सारी सुखे मिळु शकतात याबाबतीत बाबांचे व आम्हा दोघांभावडांचे एकमत होते ,हे असे पण इथे आमच्या गणपती सणाला विविध धर्माचे विविध पंथांचे विविध जातीचे गणपतीच्या दर्शनाला यायचे हीच एकता बघून आमचे बाबा रामचंद्र खरे आमचे आई सुनंदा रामचंद्र खरे आणि आम्ही दोन मुलं नारायण खरे कृष्णकांत खरे गणपतीचा सण येण्याच्या आधी गणपतीची सणाची तयारी मोठ्या उत्साहात करायचो. आमच्या गणपतीच्या सणात आमच्या पातलीपाडा गावातल्या मुली सासरी गेलेली असत त्या परत गणपतीच्या सणाला आमच्या गणपतीच्या सणात गणपती दर्शन करायला यायच्या याच पातलीपाडाच्या मुली विविध जातीतील पंथातील असायच्या पण आमचे आमच्या माहेरचा सण गणपतीचा सण म्हणून त्या कौतुकानं त्यांच्या पतिराजांना त्यांच्या सासरच्या नातेवाईकांना आपल्या पातलीपाड्याच्या रामचंद्र खरे यांच्या गणपतीच्या सणाची माहिती आवर्जून देत आणि गणपतीत मुले एकीकडे जागरण करत व एकीकडे फक्त मुली गणपती मध्ये जागरण करून झिम्मा पुढे फुगडी बिन पैशाचे पत्ते खेळून रात्र जागवत व कोणाला जागरण सहन होत नसे तर ते झोपत यावेळी त्यांना काळीमिशी अबिर गुलालाची लावत, तोंडाला लावत म्हणजे या झोपलेल्या पोरी सकाळी उठल्या म्हणजे सगळे एकमेकांना बघून हसत व आपापल्या घरी निघून जात पण या गणपतीची सणाची माहिती त्याआपल्या मनात कायम कोरून ठेवत पण ह्याच मुली सासरी गेल्या का जेव्हा माहेरी म्हणजे पातलीपाड्यात येत तेव्हा आपल्या गणपती सणाची सासू-सासर्‍यांना नवऱ्याला कौतुकाने आम्ही इथे गणपती जागरण करायचं मग ते जय भीम वाले असो मग ते मुस्लीम असो ख्रिश्चन असो सगळ्या मुली या गणपतीच्या सणात एक व्हायचा असा आपला भारतातला प्रमुख सण ज्याने भारतीय एकता साधते, एकोपा राहतो अजून ह्यापेक्षा आपलेपणा अजून काय पाहिजे म्हणूनच हा आमचा हा गणपतीचा सण कायम आठवणीत राहणारा आहे पण आता आमचं बघुन चक्क जयभीमवाल्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मांडायला सुरुवात केली आहे,पण त्या गणपतीत खाणारे पिणारे जुगार खेळणारे ते पैशाचे जुगार खेळणारे चक्क दोनदोन दिवस एकाजागेवर खेळत असतात पण देवदर्शनासाठी येणारांना गैरसोय होते,डिजे साऊंड आवाज मोठा करून सिनेमाची गाणी लावत असतात पण असा विचार करीत नाहित की शेजारीपाजारी कोणी म्हतारे माणसे, कोणी ब्लेडप्रेशरचे,हार्टटेकचे पेशंट असतात त्यांना हा डिजे साऊंडचा आवाज सहन न होणारा असतो,म्हणून ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत फक्त निव्वळ मौजमजेचा गणपती उत्सव नसुन त्याला टशास्त्रीय आधाराने सण साजरा करता आला पाहिजे तरच त्याला महत्त्व आहे,आमच्याकडे जयभीमवाल्यांची बायांमुली सुद्धा गणशोत्सवला जागरणाला आलेल्या असतात त्या उलट त्या सार्वजनिक गणपतीउत्सव मंडळांना समजावून सांगत असतात, आम्ही कसे अप्पां खरेंच्या गणपतीला जातो तस आपल्याकडे पण येऊ पण तुमच्या मंडळाच्या गणपतीत दारू पिणारे जुगाराला बसतात,डीजे मोठ्या आवाजात लावलेला असतो,

कोणाचा कोणाला तालमेल नसतो ते आधी सुधारा मग आम्ही येऊ तुमच्या गणपतीला" आता आमचे आई वडील हयातीत नाहीत ना त्यामुळे थोडसं दुःख मनावर असतं पण त्यांची काम करण्याची जिद्द आम्ही आमच्यात कायम ठेवली आहे मग आम्ही नारायण खरे, प्रणोती नारायण खरे,कृष्णकांत खरे,भारती कृष्णकांत खरे ,पृथ्वीराज कृष्णकांत खरे,हिमालय नारायण खरे इत्यादि आम्ही खरे कुटुंबीय मुलांबाळांसहित गणपती सण दरवर्षी हौसेने साजरा करतो यावर्षीही आम्ही हा गणपतीचा सण दहा पंधरा दिवस आधी डेकोरेशन बनवलं आणि ठाण्याशहरातल्या 

घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा2019च्या ठाण्यातील "ठाणे वैभल"या सुप्रसिद्ध वर्तमानपत्र आयोजक मिलिन्दजी बल्लाळ व निखिलजी बल्लाळआणि ओम साई माऊली पदयात्रीक सेवाभावी संस्था आयोजक सुरेशजी म्हात्रे(बाल्याजी मामा),सुहासजी देसाई, संजयजी कदम यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2019च्या आम्हाला घरगुती गणपती डेकोरेशन मध्ये ठाणे वैभव या प्रसिद्ध वर्तमानपत्राने आम्हाला उत्तेजनार्थ सन्मान पत्र देऊन आमचा भावंडांचा काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिर हॉल येथे गौरव केला.आम्ही ज्येष्ठ कलावंत स्वर्गीय काशिनाथ घाणेकर यांच्या मोठ्या प्रतिमेसमोर आमचा सन्मान केलेलं श्रीफळ छान प्रशस्तीपत्रक सन्मान पदक घेऊन आम्ही भावंडांनी कृष्णकांत खारे 

नारायण खरे मिळूनफोटो काढला हे सगळं गणपतीच्या सणात झालेलं आम्हाला आठवण राहील असे हे काम होतं आणि हे आमचं गणपतीचा सण सर्वानाच भावेल असं होतं आणि आहे यापुढेही आम्ही त्याच उत्साहात आई-वडिलांच्या आशीर्वादाने जोमाने गणपतीचा सण दरवर्षाप्रमाणे उत्साहाने साजरा करू आणि दरवर्षी आठवणीतलं सण आमच्या मनात कायम कोरून ठेवू आणि आमचा गणपती बाप्पा चा सण राष्ट्रीय एकात्मता साधनाणारं आहे त्यामुळे हा गणपती बाप्पा तसं सण आठवणीतला सण आहे .


 मी तर म्हणेन धर्मातील सण प्रत्येक धर्मातील माणसाने आपापसात सण साजरा केला पाहिजे आणि त्याचे महत्त्व एकमेकांना सांगितले पाहिजे आणि आपल्या शास्त्राचा आधार काय आहे माहिती मिळाली तर प्रत्येक धर्म बंधुता ,भाईचारा सांगतो आमच्या आठवणीतला गणपती उत्सव आमच्या घरगुती सण आठवणीत राहिलेला आहे पण तो कसा धर्माधर्मात भाईचारा बंधुता वाढवितो आणि येणारा काळ आपला भविष्य उज्वल ठेवतो त्याविषयी थोडंसं हा लिहिण्याचा प्रयत्न.......


Rate this content
Log in