krishnakant khare

Others

2.5  

krishnakant khare

Others

तूमची सर्वात मोठी भिती

तूमची सर्वात मोठी भिती

8 mins
765


भीती कोणाला, कशाबद्दल वाटत नाही असा मनुष्य विरळाच, कारण ज्याला भीती नाही त्याला कसलेच बंधन नाही मग आशा माणसाचं नक्कीच कुठेतरी आधोपात, नाश हा 100% ठरलेलाच कारण ज्याला भीती नाही,बंधन नाही मग अशी व्यक्ती वाईट स्वभावाची, कमी विचाराची असू शकते, कारण काहीकाच्या मनात कुठल्याच प्रकारची भीती नसेल तर ती व्यक्ती बेफिकीर, कसेही वागू शकते पण अशा व्यक्तीचा समाजाला कुठून कुठून धोका होऊ शकतो आणि तो धोका आपल्याला होऊ नये म्हणून अशा व्यक्तीचा कुठे ना कुठ, कसं पण खून , मर्डर ,हत्या होऊ शकते, म्हणून आपल्याला पूर्वजा पासून पूर्वजांकडून कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती घालून दिलेली आहे मग ती भीती देवाची असो वा मरणाची असो वा आपल्या कठीण परिस्थितीची असो अशा भीतीमुळे आपण स्वतःला सावरून घेतो, कुटुंबालाही सावरून घेतो.

एका गावात सिद्धार्थ पंथ नावाचा सद्गृहस्थ राहत होता. त्याला पाच मुले होती, पण मुलगी नव्हती पण सिद्धार्थ पंथ दोन मुला नंतर जास्त मुले नको म्हणून गप्पच होते. पण झालं काय सिद्धार्थ पंथ व त्याची बायको त्यांना मुलगी हवी होती, त्यासाठी मुलीच्या हौसेने आता मुलगी होईल असे करता करता मुलगी न होता मुलगेच झाले, त्यांना पाचही मुलगे झाले. आता मात्र सिद्धार्थ पंथ आणि त्याची बायको सावध झाले आणि आता मुले नकोत म्हणून पुढे काही प्रयत्न केला नाही. सिद्धार्थ पंथ यांना लहान मुलांचा फार लळा.

 आता रक्ताचे नाते सांगणारे असे पाच मुले सिद्धार्थ पंथाना झाले होते, ह्याच मुळे सिद्धार्थ पंथ त्या पाचही मुलांचे लाड करत. त्यामुळे झालं काय मुलांनासुद्धा कसलीच भीती राहिली नाही. ना स्वावलंबन जाण ना कष्टाची जाण त्यामुळे ती पाचही मुले बेफिकीर झाली.

 जसं त्यांचं वय वाढत होतं तो चिखलाचा गोळा हळूहळू घट्ट होत चालला होता.आता चिखलाचा घट्ट झाल्याने नंतर त्या चिखलाचा गोळ्याला आकार येत नाही जो आकार पहिला असतो तोच आकारात राहतो. असलाच प्रकार सिद्धार्थ पंथाच्या मुलांच्या बाबतीत झालं, पाच मुलांपैकी एक मुलगा आपल्या मित्रांबरोबर बाईकने फिरायला गेला होता पण घरी येत असताना. त्यांच्या बाईकला एक्सीडेंट झाला. सिद्धार्थ पंथाच्या मुलाने हेल्मेट न घातल्याने ते त्याच्या जीवावर बेतले, हेल्मेट घातलेला त्याचा मित्र तो त्याच्या बाइकच्या अपघातात वाचला. इथे सिद्धार्थ पंथाच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला पाच मुलांपैकी एक मुलगा अपघातात असा वारला जर त्याला आपल्या मरणाची भीती वाटली असती तर त्याने सुद्धा हेल्मेट घातली असती. म्हणजेच माणसाला आपल्या सुरक्षितेसाठी भीती, काळजी असेल तर तो स्वतःला अधिक सुरक्षित ठेवू शकतो. सिद्धार्थ पंथ आपल्या मुलांना सांगत होते " मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की बाईक ने प्रवास करताना स्वतःला जपा नाहीतर क्रिकेटर अझरुद्दीन चा मुलगा कसा एक्सीडेंटने वारला तसा तुमचा होता कामा नये. प्रत्येक आई बापाला आपली मुलं प्यारी असतात पण अझरुद्दीनने किती तरी लाखाची आपल्या मुलाला वाढदिवसाची बाईक भेट दिली होती पण बाईक मुळे स्वता काळजी न घेतल्याने त्याच्या जीवावर बेतलं,तस तुमच्या बाबतीतही घडु शकतं "असा मी तुम्हा मुलांना किती वेळा तरी सांगितलं पण तुम्ही काय ऐकले नाहीत आता बघितलं 5 मुलांमधले एक मुलगा त्याच्या निष्काळजीपणामुळे बाईक अपघात मरण पावला त्यावर काय उपाय आहे का आता तुम्हाला काय समजायचे ते समजा असं बोलून सिद्धार्थपंत धाय मोकळं सोडून रडू लागला पण मुलाने त्यांना सावरलं आणि आम्ही आता काबाड कष्ट करू आणि प्रामाणिक पणे मेहनत करू आणि आमच्या जीवाला सुद्धा जपू हे असं वचन ऐकल्यावर सिद्धार्थ पंतांच्या मनाला समाधान वाटले पण एक मुलगा नाहक त्याच्या निष्काळजीपणामुळे गेला याचे शल्य मात्र सिद्धार्थ पंतांच्या मनाला कायम राहिलं. सिद्धार्थ पंथाचे चार मुले भावाच्या अपघाताने घाबरले आता स्वतःला सुरक्षिततेसाठी व्यवस्थित वागू लागले. पण आपणही आपल्या जीवनात असंच वागतो दुसऱ्याला ठेच लागली की आपण सुधारतो सिद्धार्थ पंथाच्या आता चार मुलांपैकी एक मुलगा आपल्या मित्रांबरोबर कॉलेजचे तास संपले की रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचं, एकदा काय झालं त्याचा मित्र त्याला म्हणाला "अरे आपण जवानीत आलेली मुलं, या वयात तरुणमुलं मौज मस्ती, ड्रिंक सिगारेट पिणे इत्यादी करतात, तारुण्याचाजीवनाचा मजा घेतात. आपण इथ काय करतो? चला आपण पण मौजमस्ती करूया" पण सिद्धार्थ पंथाचा चौथा मुलगा या गोष्टीला गंभीरपणे घेतो आणि विचार करून बोलतो "कारे आपल्या या तारुण्यात दारू पिणे, सिगारेट ओढणे ,तंबाखू खाणे, गुटखा खाणे म्हणजे आपल्या तारुण्याची लाइफ आपण यामध्ये म्हणजे मौज मस्ती केल्यानंतर आपल्याला कोणता खरा आनंद मिळेल, बेनिफिट मिळेल याचा विचार कधी केलाय का? कारण आपण या गोष्टीपासून सुरुवातीलाच त्याच्या वाईट परिणामाची भीती नाही बाळगली तर आपल्याला फार मोठ्या वाईट प्रसंगातून जावे लागेल किंवा वाईट प्रसंग आपल्याला ओढवला असेल आणि आपण या जगात नसो यावरून आपण या जगात का नसू याबद्दलची भीती असायला हवी तरच आपण स्वतःला सावरून ड्रग्स ॲडिक्ट होणार नाहीत, दारू पिणार नाहीत ,चरस गांजा घेणार नाहीत, हे मात्र खरं

पण जर का तू मला मोज मस्ती साठी दारू प्यायला लावशील, तर तू माझा शत्रू ,गुप्त शत्रू असं मला समजायला काहीच हरकत नाही. हे ऐकल्यावर काय समजायचं तो समजला आणि त्यालाही कळलं मोज मस्ती, व्यसन आपण करतो त्यामागे फार बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागते मग तिथे वाचवायला कोणीच नसतं. इतर गोष्टीची भीती असल्यामुळेच आपल्याला प्रतिकार म्हणून असा विचार आपण करतो त्यामुळे आपल्याला येणाऱ्या संकटापासून भीती राहत नाही आणि आपण सुरक्षित राहतो. अशा तऱ्हेने सिद्धार्थ पंथाचे मुलं हुशार निघाले पण त्या मुलांना आपला पाचवा भाऊ गेला पण त्याने आम्हाला प्रत्येकाला भीती चा धडा देऊन गेला त्यामुळे आयुष्यात आणि चांगलेच कामे करू" असं सिद्धार्थ पंथाच्या मुलांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे सुखाने राहू लागले. 

मला लहानपणी एक वाईट स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नात माझी आई मरण पावलेली आहे आणि मी ओक्साबोक्सी रडतो आहे, आणि रडताना माझ्या मनात कितीतरी मनाला वेदनामय विचार आले. स्वप्नात आई गेल्यानंतर माझ्याजवळ फक्त माझे वडील माझी दोन-दोन भावंड एवढाच पण आई आपल्याला सगळ्यांना घरात सावरून घेते, सगळ्यांचे सुखदुःख वाटून घेते आपण आजारी असलो मग रात्रंदिवस आपल्याकडे लक्ष देते ती स्वतः जागरण करून आपल्याला सर्दीतापात फणफणलो असता मीठपाण्याची मीठ पट्टी कपाळावर ठेवून ताप नॉर्मल होई पर्यंत जागी राहायची, स्वच्छ कपडे द्यायची नाऊ खाऊ घालायची खरच कल्पवृक्षा सारखी आई तिच्या कर्तव्याला तोड नाही आणि ते नसेल तर आम्हाला कोण बघेल,सावत्र आई ती सावत्र आईच ती थोडी सख्या आई सारखी थोडीच काळजी घेईल एवढा मी स्वप्नात अनुभवलं एवढं लहान असताना. 

सकाळी उठलो रात्रीचे स्वप्न देव्हारात देवपूजा करताना देवबाप्पाला प्रार्थना केली माझ्या आईला घेऊन जाऊ नकोस आम्हाला आई हवी आहे जी आमची आई आहे तीच मला हवी आहे. मी त्यासाठी आई बरोबर कधी भांडणार नाही मी तिच्या वाटणीचं काम करेन पण माझ्या आईला देवा तू हिरावून येऊ नकोस एवढी मी प्रार्थना देवासमोर केली होती. नंतर मी आईला त्रास होणार नाही असं जपत होतो पण मला पडलेला हे भीतीदायक स्वप्न आईला सांगितलं नव्हतं कारण आईला भीती वाटू नये म्हणून मी गप्प बसून जे माझ्याकडून होईल घरात मदत ती मदत करत राहिलो .घरी मी शाळेचे कपडे स्वतः इस्त्री करून ठेवू लागलो ,घरात सकाळ संध्याकाळ पाणी भरून ठेवायचो,

 वेळ मिळाला तर घरातलं झाडू सफाई करायचो त्यामुळे आईला माझ्यातला बदल जाणवला मी म्हणायचं आई तू कधी आजारी असतेस ना म्हणून मी मदत केली तर काय झालं ? 

 आईला मदत करणे मुलाचे कर्तव्यच आहे" अशी आईची मी समजूत काढायचो आईलाही बरं वाटायचं 

काही वर्षाने , आम्ही मोठी झालो दादाचं लग्न झालं माझंही लग्न झालं पण मी माझ्या बायकोचं माझ्या आईबाबांविषयी मत विचारलं तर भारतीने म्हणजे माझ्या धर्म पत्नीने मला जे अपेक्षित होते तेच उत्तर दिले होते,तीचे अपेक्षित उत्तर " आपण आईबाबां बरोबरच राहायचं,"हे होते. माझ्या बहिणीचे लग्न झाले आणि जो तो आपापल्या संसाराला लागलं ,संसार म्हटल्या नंतर भांड्याला भांडे लागणारच पण ज्यावेळी आई बाबांचं उतरत वयाला त्या वयाला वार्धक्यामुळे छोटे-मोठे रोग येतातच त्याप्रमाणे बाबांना सांधेदुखीचा त्रास यांचा त्रास प्रोस्टेट ग्लेंडचा त्रास झाला त्यातून त्यांचा ऑपरेशन झाला आम्ही भावंड बाबांवर चांगलं लक्ष देऊन सेवा केली. काय वर्ष बाबांनी आयुष्य चांगल्या पद्धतीने काढलं , आणि एके दिवशी सकाळी पहाटे अटॅक आला आणि त्यात बाबा गेले.त्यांच्या मित्राचीम्हणजे शुक्ला चाचाजींची इच्छा होती. काशी बनारस येथे काशीनाथ विश्वेश्वर येथे अस्थि पुजाविधी करायची ती विधी मी स्वता जाऊन केली मग त्यांचे मित्र शुक्ला चाचांना पण बरं वाटलं नंतर काही वर्षानी आमची आईला सुद्धा डायबिटीस ब्लॅड प्रेशर आणि वजन जास्त वाढला होता तिला डायबिटीस मुळे भूक लागायची कधीकधी चिडचिड व्हायची पण आणि भावंडानी तिची चांगली सेवा केली, कधीकधी चालता चालता साडीत घाण करायची आम्ही भावंडं मनात काहीच मनात न आणता, काही न रागावता साफसफाई करायचं,तिची स्वच्छता ठेवायचो तिला प्रसन्न ठेवायचं एकदा तर आई माझी परीक्षा घेतल्याप्रमाणे बोलत होती पण मी म्हणालो "आई तू आमचं लहानपणी हागलमुतलं काढलंस तेंव्हा कोणाची भीड ठेवलीस, मग आम्हाला पण तुझं हागलंमुतलं काढायला कसलीच भीड वाटत नाही उलट आम्हाला तुझी सेवा करायला  आनंदच वाटतो तुझी सेवा केली म्हणजे आम्ही मोठे काम केलं असं नाही, तु आमचं जे संगोपण केले त्यापुढे आमची तुझ्या बद्दल सेवा काहिच नाही तेव्हा तू काही मनाला लावून घेऊ नकोस आम्ही तुझी सेवा मस्तपैकी करू, तू काय मनाला वाटून घेऊ नकोस "तेव्हा आई मला म्हणाली "बाळा भविष्यात तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही "मी म्हणालो "आई हे असं आता काय बोलायला लागलीस, असं नको ना बोलू, मला तू हवी आहेस, आम्हा भावांना तू हवी आहेस, तुझ्या मला सेवा चांगली करायची आहे याचा मला फार समाधान वाटतं सुख वाटतं."

मला लहानपणी आई गेल्याचे म्हणजे आई मरण पावल्याचे स्वप्न पडले होते आई मरू नये म्हणून त्या भितीमुळे मी आई बरोबर आयुष्यभर चांगला वागत आलो तशी माझी भावंडेसुद्धा चांगले वागत होते पण मला भिती होती स्वप्नातले आई गेल्याचे खरंच कधी काय झालं तर पण भीतीमुळे तिची सेवा माझ्याकडून  झाली.

नाहीतर माणूस गेल्यानंतर त्याची ही सेवा करायची राहिली तर काय उपयोग? म्हणून वेळ फुकट न घालवता आईच्या सेवेत वेळ दिला माझ्या आंतर्त्माला समाधान मिळालं.  नेहमीच्या वातावरणात आई बरोबर मी चांगलं वागत राहिलो त्यामुळे मला सर्वात मोठी भीती वाटत होती आई मेल्याची ते लहानपणीच स्वप्न पडलं होतं त्यामुळे मी तिच्याबरोबर म्हणजे आई बरोबर चांगला राहून मला तिथे तिची सेवा करता आली आणि आता ती हयातीत नाही पण तिचा तो शब्द मला बोलेली"तुला कोणत्याच गोष्टीचे कमी भासणार नाही ,"ह्यामुळे मला आईचा आधार मिळाला

पण....... पण मला आईची सेवा करता आली आणि कुठेच तिची सेवा करायचे बाकी राहिली नाही यामुळे ती चिंता राहिली नाही,मी पुर्ण समाधानी झालो होतो. त्या भीतीदायक स्वप्नाने मला सर्वात मोठी भिती वाटली होती ,त्या मोठ्या भितीने मला आईची सेवा करण्यास प्रेरित केले होते.मग आईची सेवा करण्यात कोणतीच कसूर राहिली नाही. मला सर्वात मोठी भीती लहानपणी पडलेल्या स्वप्नाची होती त्यात माझी आई मरण पावलेली पाहिल्याने आपण आई या जगात आहे तोपर्यंत आईचेसेवा करायची आणि आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली होती..........


आपण भीती कोणत्याच गोष्टीची बाळगली नाही तर आपण स्वैराचार ,गुंडागर्दी, लुटमार बरेच काही खुशाल

करू शकतो. म्हणून तर पूर्वजानी देवाची कृती केली असावी. त्यामुळे माणूस वाईट काम करणार नाही. देवाला घाबरून चांगलं काम करायला लागेल म्हणजेच कुठेतरी भिती पाहिजे मग ती कशी भिती पण माझ्याकडून आईची सेवा कोणत्या मोठ्या भीतीमुळे झाली?

ती एक सर्वात मोठी भीती कोणती होती? 

ते एक लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.......


Rate this content
Log in