krishnakant khare

Others

4.3  

krishnakant khare

Others

आवडता खाद्यपदार्थ आणि तो खाण्य

आवडता खाद्यपदार्थ आणि तो खाण्य

5 mins
867


मी त्यादिवशी पायी पायी फुटपाथवरन चालत घरी  येत होतो, समोरच एक रोयल इन्फिल्ड वर हेल्मेट घातलेला स्वारी समोरून येत होती, लांबूनच तो बाईकस्वार मला हात करीत होता. जसा त्याच्या कोणी जवळचा आहे असा. मी बघितलं मला वाटलं माझ्या कोणी मागे असेल त्याला हात करीत असेल म्हणून आपल्या रस्ताने चालता झालो,पण जोरात त्याने आपल्या बाईकला ब्रेक दाबला आणि भांडण्याच्या स्वरात बोलु लागला,"तूम्हाला रस्तात नीट चालता येतं की नाही" हे बोलने ऐकून त्याला बोललो ,"ओ माझा मी फुटपाथवर बरोबर चाललो आहे,तुम्हीच बघा फुटपाथवर यायचा प्रयत्न करताय,हेल्मट मधनंच काय बोलता , हेल्मट काढून बोला"तसा त्याने डोक्यातन हेल्मेट काढला, आणि हसत म्हणाला "अरे कृष्णकांत खरे कधी रे ओळखशील मला? अरे मी जितेंद्र गंभीर तूझ्या गावातला,तुझ्या शाळेतला मित्र!" मी हे ऐकून मी त्याच्या कडे हसत कौतुकाने बघतच राहिलो, व बोललो" अरे किती वर्षाने भेटतो आपण,अरे कसा आहेस? घरची सगळी कशी आहेत? जितेंद्र गंभीर बोलला" अरे सगळी बरी आहेत ,तुझी फैमिली कशी आहेत ते आधी सांग? मी पण आपली फैमिली व्यवस्थित आहेत वगैरे बोललो.आम्ही जवळच कैंटिन कडे चालत गेलो,आणि कैंटिन वाल्याला दोन कटिंग ची ओर्डर दिली.किती दिवसानी भेटतोय म्हटल्यावर आम्ही एकदुसर्याला आपल्या जीवनात झालेल्या गोष्टींना आठवून आपल्या  स्मृतिला उजाला देत होतो मध्येच जीतेंद्र गंभीर म्हणाला "अरे खरे तुला माहीत आहे,लहानपणी तुझाकडे आलो होतो,मला फार मजा आली होती,"त्याचे बोलणे ऐकुन मी पण लहानपणीच्या आठवणीत रमुन गेलो.  

मी त्यावेळी चौथी,पाचवीला असेन आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपले भारतातील सण आणि त्यामुळे लोकांमध्ये असलेला उत्साह होळी असो की दिवाळी जे कधी वर्षभरात भेटत नसतील ते दिवाळी होळीला भेटतात.

 होळी रात्र जागवायची असते आणि मग होळीची पूजा वगैरे करून थोडे नाच-गाणी होतात आणि काहिक पत्ते खेळतात काहिक जुगार ही खेळतात, आणि कोण कामानिमित्त बाहेर देशील शहरी गेलेला असतो तो त्यादिवशी आलेला असतो तीच गत दिवाळीची पण असते दिवाळी हा चार पाच दिवसाचा सण असतो प्रत्येक वारी त्याचं महत्त्व वेगवेगळे असतात दिवाळी पाडवा याचाही महत्व वेगळं असतं म्हणजे पाडव्याला पत्नी पतीला ओवाळणी करते औक्षण करते मग पती पत्नीला सुद्धा चांगली भेट तू देतो. नंतर येते दिवाळी भाऊबीज, भाऊ बहिणीच्या घरी भाऊबीज साठी येतो, बहिण भाऊचे ओवाळणी करून औक्षण करते भाऊ बहिणीसाठी साडी वस्त्र वगैरे घेतो भेट देतो... पण या दिवशी भावाला आपल्या बहिणी घरी जेवायचं असतं बहिण पण आपल्या भावासाठी आवडीने पंचपकवाण् तिखट जेवण श्रीखंड पुरी करत असते .

बरं झालं श्रीखंड पुरी वरून आठवण झाली...मलाही श्रीखंड खायला आवडतं मन लावून श्रीखंड खात असतो.


अशाच दिवाळीतले एक गोष्ट मी त्यावेळी चौथी,पाचवीला असेन आणि आपल्याला या भारतीय सणांची फार आवड भाऊबीज या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे पंचपक्वान्न खायला जात असतो हेतू असतो भाऊबीजेचा आणि या दिवशी काही तरी गोड धोड करावं म्हणून जो तो आपआपल्या ऐपतीप्रमाणे गोड-धोड करत असतो तसेच दिवाळीला आमच्या घरी भाऊबीजेच्या दिवशी तिखट जेवणाबरोबर श्रीखंड पुरी ठरलेली असायची.दिवाळी सण गेला ,शाळा सुरु झाली तरी घरात उरलेला श्रीखंड जास्त दिवस झाला तरी लवकर खराब होत नसे कारण आई श्रीखंड व्यवस्थित जपून ठेवीत असे.दिवाळीसुट्टी संपून अजून तरी शाळेत असताना वाटायचं घरी कधी जातो आणि श्रीखंड खाकरावर (खाकरा म्हणजे पुरीचाच प्रकार पण हि पुरी खारी सारखी लवकर खराब न होणारी कुरकुरीत असते.), शाळेत गोष्टीचे पुस्तक वाचायला मनाई असायची, मग मी घरीच शाळेची मधली सुट्टी झाली की कमी वेळात मी जेवण उरकून आधी  पुस्तक वाचुन काढत असे. शाळेत असं व्हायचं ,आवडीचे पुस्तक असले की घरी कधी येऊन पुस्तक वाचतो असं व्हायचं , एकदा तर शेजारची मावशी मला म्हणाली "अरे पुस्तक वाचायला घरी यायला बरा रे घाई करतोस", मग अजून गमतीने ती मावशी म्हणायची,

'हे तर काहीच नाही रे ,तुझं लग्न झालं की मग कामावर असलास ना सहज मग तुला असं होईल कधी येतो घरी आणि बायकोचा दर्शन घेतो "आणि अशा तर्हेने मावशी माझी चेष्टा करत असायची म्हणून ना मी घरी श्रीखंड पुरी खाकरा खाणार हे कोणाला सांगितले नाही. आज माझं आवडीचं श्रीखंड खाकरा खायला मिळणार! मग तो आनंद कोणीतरी सांगायला हवंना म्हणून फक्त शाळेतल्या एका मित्राला सांगितले होतं. मी घरी दुपारच्या सुट्टीत जेवायला आलो आणि घरी बनवलेले पंचपक्वान्न ते मी मनसोक्त खाल्लं आणि श्रीखंड-खाणार इतक्यात तो माझा शाळेतला मित्र जितेंद्र गंभीर खिडकीसमोर उभा मग मला राहवलं नाही मी त्याला बोललो "काय रे श्रीखंड कधी खाल्ल्यास का? तो म्हणाला" नाही, मला माहिती नाही रे श्रीखंड काय असतं ते" मग मलाच वाटलं

 हे काय मी सणाला श्रीखंड वगैरे खातोच ना ,

मग का नको माझ्या मित्राला श्रीखंड-खाकरा खायला देऊ,

 मी त्याला माझ्या जवळचे मला आवडणारे श्रीखंड-खाकरा त्याला पण खायला दिले, सहा खाकरा होत्या त्यातल्या दोन खाकरा व एक चमचा श्रीखंड एवढा मी फक्त खायला घेतलं बाकी त्याला देऊन टाकलं. मी मात्र माझ्याजवळचं श्रीखंड खाकरा सोन्याचा घास महत्त्वाचा या पद्धतीने हळूहळू खात राहिलो पण माझ्या शाळेतल्या मित्रांने छान चार-पाच खाकरा व वाटीतलं श्रीखंड मस्तपैकी आवडीनं फस्त केलं होतं म्हणजे खाल्लं होतं,त्याला ते खुप आवडलं होतं, तोपर्यंत अजुनही मी श्रीखंड आणि खाकरा खात होतो.

 जितेंद्र गंभीर घाईघाईने आवडलं म्हणून श्रीखंड खाकरा खाऊन मोकळा आणि म्हणतो कसा" श्रीखंड खाकरा  होतं की काय होते, पण खायाला फार मजा वाटली,श्रीखंड हे असं असतं हे तुझ्यामुळे माहिती पडलं,आमच्या घरी रे कसले रे सण करतात त्याचे हे बोलणे ऐकून मला एक आनंद झाला वाटलं,त्याला श्रीखंड खाकरा खाऊन त्याला बरं वाटलं ना आपण रे सणाच्या सणाला निरनिराळे मेवामिठाई खातो, श्रीखंड पुरी,खाकरा खातो या बिचाऱ्याची तशी ऐपत नसेल परिस्थिती नव्हती ना आज त्याला खायाला मिळालं आणि त्याला आनंद झाला आवडलं त्याला आजचा सण काय असतं हे त्याला माहित पडल यातच हे सगळं आलं.... हेच मी विचार करू लागलो होतो, सण काय येतात आणि काय जातात आपण आपले सणानुसार मौजमजा, खाना पिना सर्व काही करतो पण अशाच सणाच्या दिवशी आपण कोणातरी गरिबाला,गरजवंताला काही सणाचा फराळ दिलं तर हे सण सगळ्यांना आनंद देऊन जाणार हे मात्र नक्की हा विचार माझ्या मनात आला आणि प्रत्येक सणाला सणाला मला कोणाला ना कोणाला आपल्या जेवणातील 25% भाग द्यायला हवं आणि मला आनंद व्हायचा,माझ्या आवडीचं श्रीखंडपुरी,ती माझी आठवण कायम मला आनंदून जाते माझ्यात तनामनाला आनंदून जाते कारण माझ्याकडून चांगलं काम झालं होतं असाच आनंद मला मिळत राहतोय म्हणजेच आपण अन्नाला, जेवणालाअन्नपूर्णा देवता म्हणतो ते उगीच नाही. ती माझ्या आवडीच्या खाण्याची तीच आठवण आली का मन माझं समाधान होऊन जातं.मी विचारात होतो तितक्यात जितेंद्र गंभीरने मला भानावर आणलं. "अरे कृष्णकांत खरे आपल्या लहाणपणीच्या आठवणीतून बाहेर ये"मी जितेनला(जितेंद्र गंभीरला)बोललो" चल येतोस घरी,चल परत श्रीखंडपुरी किंवा श्रीखंड खाकरा खाऊ या "आम्ही स्मितहास्य करून एकमेकांना हस्तोआंदोलन केलं आणि घरी जाण्यासाठी निरोप घेतला,पण निरोप घेताना जितेन्द्र गंभीर मला म्हणाला"पण यावेळी तुझं कुटुंब,माझं कुटुंब आपण सारे एका रिसॉर्ट मध्ये सुट्टी घालवू मात्र मी सारा खर्च करीन,तुला मात्र ,तुला मला आवडलेली श्रीखंडपुरी किंवा श्रीखंड खाकरा तुझा, माझा कुटुंबाला तू ते खायाचं द्यायचं,म्हणजे आपल्याला आवडलेलं खाद्यपदार्थ व आवडलेलं खाद्यपदार्थाची आठवण त्या सगळ्यांना समजेल.आपल्या सगळ्यांना फार बरे वाटेल.


प्रत्येकाला आपल्या खाण्यात संबंधीची आवड असते,

 आणखी आवडीसाठी तो स्वतः आवडीचे पदार्थ बनवतो किंवा विकत आणून ते तो आवडीने खातो पण कधीकधी माणुसकी ही ह्याखाण्या संबंधी आड येते त्यावेळी आपण दिलदार होतो त्यामुळे होते काय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे खाल्लेलं आज, उद्या तरी कधी तरी त्याची आठवण येते कारण जी वस्तू आवडलेली असते तरी मिळत नाही आणि मग ज्यांच्याकडे मिळते त्यांचं जीवनात ती कायमआठवण राहते म्हणून आपण माणसं माणुसकीने राहायचा प्रयत्न करतो. मलाही खाद्यपदार्थ आवडले होते त्याची आठवण नंतर माझा मित्र मला काढून देईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं त्यावरूनच ही छोटीशी कथा आपल्यासमोर सादर आहे .


Rate this content
Log in