krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

नवीन वर्षाचा तुमचा संकल्प

नवीन वर्षाचा तुमचा संकल्प

7 mins
977


प्रत्येक व्यक्तीला आपल्या संकल्पाचा फार महत्त्व आहे कारण संकल्प केल्याने आपल्याला त्याचा अंदाज येतो व आपण आपल्या ध्येयासाठी पेटून उठतो. म्हणजेच ध्येयासाठी मेहनत घ्यायला मागेपुढे बघत नाही माझे पण काही संकल्प आहेत तुमचे पण काही संकल्प असतील पण काहीकाना संकल्प म्हणजे काय हाही प्रश्न पडलेला असेल त्याचं काय असतं आपण आपल्या जीवनात ध्येयासाठी झटत असतो पण आपली पूर्व योजना नसेल तर मग आपल्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नाही. म्हणून संकल्प म्हणजे पूर्व योजना आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीसाठी आखतो आणि त्यानुसार आपण योजनाबद्ध प्रयत्न करतो मग त्यामुळे आपल्याला यश मिळते. म्हणून तर आपण वर्ष सरता सरता नवीन वर्षासाठी आपण आपले संकल्प करतो आणि त्यात आपण यशस्वी होतो तर काही थोड्या फार प्रमाणात यशस्वी होतात तर काहि यशस्वी व्हायला अजून वेळ लागतो. आणि प्रत्येकाच्या जीवनात संकल्प हा असायलाच पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनाचं आपल्याला काय महत्त्व आहे याची किंमत आपल्याला कळते.

2019 यावर्षी माझे संकल्प मी मनात विचार केला नव्हता त्याही पेक्षा मला माझ्याबरोबर माझ्या हितेशीना सुद्धा लाभ झाला. मला माझ्या पूर्वकामाचा नुसार, माझ्या कामाच्या अनुभवानुसार, माझ्या कामाच्या कार्यकृती नुसार 2019 या रोजी  नॅशनल अवॉर्ड 2019 या पुरस्काराने , सन्मानपदकाने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंतच्या फिल्म इंडस्ट्रीज मध्ये टीव्ही सिरीयल, चित्रपट यामध्ये आजपर्यंतच्या छोट्या-मोठ्या भूमिकां केल्यामुळे व काही सामाजिक उल्लेखनीय कार्यामुळे व काहिक उल्लेखनीय लेखन कार्य केल्यामुळे, व लोक संगीतात विशेष कार्य केल्यामुळे लोकसेवा पुरस्कार,जीवन रक्षक पुरस्कार, वीरनागरिक पुरस्कार ज्ञान रत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित केल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला 2019 मध्ये नॅशनल अवॉर्ड 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निरीक्षण केले तर मी काही फळाची आशा न करता नेहमीचे काम प्रामाणिकपणे करत होतो, त्यामध्ये माझ्या संकल्पनांची पुर्वयोजना होती.

2019 मध्ये नॅशनल अवॉर्ड 2019 ने मला सन्मानित केले. 

ठाणे वैभव कडून ठाणे शहर घरगुती गणपती उत्सव आरास बद्दल उत्तेजनार्थ पुरस्कार व सन्मान पदकाने सन्मानित करण्यात आले. आणि 2019 वर्ष सरता सरता छोटे-मोठे पुरस्कार सन्मानपत्राने सन्मानित होत होतो म्हणजेच 2019 वर्ष हे देशाकरता महत्त्वाचा ऐतिहासिक काळ होता त्याबरोबर माझ्यासाठी पण महत्त्वाचे दिवस होते. स्वामी समर्थ महासोहळा 27/12/2019 मध्ये त्र्यंबकेश्वर, दिंडोरी गुरु पिठ येथे झाला,त्या सोहळ्यात मी गेलो होतो,गुरुमाऊली अण्णा साहेब मोरेंचे प्रवचन असते,त्यांच्या प्रवचनात त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव व सामाजिक प्रबोधनाच्या गोष्टी असतात,ह्यात शेतकी विषयापासून ते आयुर्वेदिक औषधे, धार्मिक गोष्टी इत्यादीमुळे जीवनात येणाऱ्या समस्यावर उपाय सापडत असतात.आपल्या रोजच्या एक रूपया मदतीने एक सामाजिक भान ,कर्तव्य म्हणून वर्षाची मदत करायची असते पण हे काही कोणाला सक्तीचे नाही.ज्याला सामाजिक ऋणानुबंधाची जाण आहे ते मदतच करतात.त्यासाठी मोठे ईस्पितळ जनतेसाठी चालू केलेले आहे ,त्यात मोठ्या रोगापासून ते छोट्या रोगा पासून उपचार चालतात, मोठ्या रोगांवर उपाय करण्यासाठी बाहेर देशातील नागरिक त्र्यंबकेश्वरच्या दिंडोरी गुरुपिठात येतात,

रक्तदान शिबीरही असतं त्यासाठी कोणी पण रक्तदान करावं अशी सक्ती नसते, वयस्कर, आजारी व्यक्तीना रक्तदान करता येत नाही त्यासाठी वैयक्तिक आपली ओळख द्यावी लागते.

रक्तदानासाठी योग्य व्यक्तीची निवड करतात परत ती व्यक्ती रक्तदान करण्यास स्व ईच्छुक असेल तरच पण जी व्यक्ती रक्तदान करते ती व्यक्ती खरोखरच  समाजासाठी एक मोठे कार्येच करीत असते. रक्तदान हि एक अशी गोष्ट आहे आपण जीवंतपणी जाणीव ठेवतो कि माझ्या कडून रक्तदान होत आहे आणि माझ्या मुळे कुणाचे तरी जीवन सुरक्षित होत आहे,वेळप्रसंगी कोणत्या तरी व्यक्तीला जीवनदान मिळत आहे. 

आपण जीवंत असताना आपली इच्छा असेल आणि देहदानाच्या तसं प्रोसिजर ,फार्मालिटिज पुर्ण केले असेल तर आपल्या मृत्यु नंतर आपल्या देहाचा वैद्यकीय क्षेत्रात मोठा उपयोग होऊ शकतो ,ज्या व्यक्तिना कोणत्या ही प्रकाराचा एखादा अवयव नसेल तर अशा देहादानातून त्या अवयवाची पुर्तता होते,आणि न वाचणारा पेशंट त्या देहादानातून अवयवामुळे वाचतो,पेशंट ज्या अवयव पासुन वंचित असतो ते अवयव ते देहादानातून मिळवून आपले नैसर्गिक अवयवासारखे त्या अवयवा पासुन आपली गरज भागवु शकतो, पण हि क्रिया होते ती जो देहदान करतो त्याला त्याच्या मृत्यु नंतरच.

काही अशा हृदयाद्रावक घटना घडलेल्या आहेत,जीवंतपणीच जे अवयव दान केले जाते ते दोन डोळ्यातून एक डोळा,दोन किडन्यातून एक किडनी म्हणजेच शरीरातील दोन अवयव असलेल्यातून इमर्जन्सी मध्ये इच्छुकदात्या कडुन ते अवयव घेऊन अवयव घेत्या शरीरात प्रत्यारोपण केले जाते व ज्या अवयवा अभावी अवयव घेत्याचे जीव संकटात असते त्याचे जीव वाचवले जाते.त्यामुळे आईने आपल्या ममतेच्या भावनेने आपल्या दारुड्या मुलाचे दोन किडण्या खराब झाल्या कारणाने त्या माऊलीने,आईने आपल्या स्वताच्या दोन किडनीतून एक किडनी दारूड्या मुलाच्या शरिराला दिली व मुलाचे जीव वाचवले या कामी डॉक्टरांची या प्रत्यारोपणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.एवढं डोंगरा एवढे त्या मातेचे उपकार असताना तो दारुड्या मुलगा चांगला झाल्यावर परत त्या मातेला सतावतो त्यावेळी त्या आईला फार वाईट वाटते,पण वृद्धाश्रमातील कार्यकर्ते येऊन त्या आईची बाजु घेऊन त्या मुलाची पुर्ण इज्ज़त काढतात त्याला खजिल करतात त्या कार्यकर्तांबरोबर असलेले पोलिस त्या दारुड्या मुलाची चांगलीच नशा उतरवतात.हि खरी घडलेली कथा थोडक्यात आहे.असो मला एवढं मोठं महादान करता येणं अशक्य ,पण मी ती कमी 2020 ला व नंतर दरवर्षांला एकदोनदा रक्तदान करून माझा संकल्प पुर्ण करणार आहे.


माझे बाबा रामचंद्र वाळकु खरे ह्यांना फार पूर्वीपासून गाण्याची आवड होती. बाबा माझ्या अजीज नाजा, प्रल्हाद शिंदे ,विठ्ठल उमप अशा कव्वालीकरांच्या कव्वालीला जात,

 माझ्या बाबांना कव्वाली ऐकायला बघायला आवडत असे . याच पिरेड मध्ये त्यांनी काही गाणी लिहून ठेवली होती. ती गाणी एका जुनी डायरीमध्ये आम्हाला सापडली. आम्ही त्यातले काही गाणी त्यांच्या आठवणी खातर ऑडिओ सीडी मध्ये तयार केले. गीतकार म्हणून रामचंद्र खरे यांची गाणी दोन घेतली. बाकीची गाणी दादा श्री नारायण खरे याची सात आठ गाणी होती. हि गाणी आम्ही घरातील सदस्यांनी गायली. सुरुवातीला दादा श्री नारायण खरे यांनी स्वतःच्या आवाजात दोन-तीन गाणी गायली मग मी कृष्णकांत खरे, मी सुद्धा त्यामध्ये दोन गाणी गायली बाकी आमची मातोश्री,आई सुनंदा रामचंद्र खरे हिने रचलेले गाणं माझ्या वहिनीने म्हणजे प्रणोती नारायण खरे हिने आपल्या आवाजात गायले. संगीतकार जगदीश मोहिते ने सुद्धा गायक म्हणून एक गाणं गायले किरण गायकवाड या गायिकेने सुद्धा एक गाणं गायले आणि आमच्या दहा गाण्यांची सीडी, ऑडिओ सीडी तयार झाली आता फक्त व्हिडिओ सीडी करायची बाकी होती आणि ती सीडी मार्केटमध्ये विकण्यासाठी आणायची होती . विकायची कशी हा प्रश्न होता संगीतकार जगदीश मोहिते ह्याने यासाठी चांगले सहकार्य केले एका संगीत डिस्ट्रीब्यूटर बरोबर ओळख करून दिली आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आमच्या गाण्याच्या सीडी ला पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. आम्ही नवीन असल्यामुळे आमचा गोंधळ होणार होता पण संगीतकार जगदीश मोहिते यांनी आम्हाला सावरून धरलं आणि होणारा पुढे होणाऱ्या आम्हाला त्रास कमी झाला, संगीत श्री.जगदीश मोहिते यांनी सहनिर्माता श्री.प्रवीण कदम यांच्याशी ओळख करून दिली. मग गीतकार श्री.नारायण खरे याने आई एकविरा बद्दल एक चांगलं गीत लिहिलं सहनिर्माता श्री प्रवीण कदम ह्यांना पण गाणं गायचं होतं ते गाणं गीतकार श्री नारायण खरे यांच्या गाण्यावर गायले. "एकविरा आईचा जय जयकार "हे गाणं सहनिर्माता प्रवीण कदम त्यांनी गायले होते त्याच गाण्याच्या जोडीला गीतकार किरण गायकवाड यांच गाणं "होड्या लागल्या दरिया किनाऱ्याला" हे गाणे सहनिर्माते प्रवीण कदम यांनी गायले आणि मग आमचे गाण्याची सीडी, ऑडिओ सीडी तयार झाली होती. आणि त्या सीडीचा टायटल नाव होतं “एकविराआईचा जय जय कार” सहनिर्माते श्री प्रवीण कदम याने  मास्टर कॉपी वरून बरीच सीडी गाणी "एकविरा आईचा जयजयकार "या नावाने ऑडिओ सीडी काढली आणि" एकविरा आईचा जय जय कार "या सीडी मधील एक गाणं गीतकार श्री नारायण खरे यांनी लिहिलेला" चंद्र लागतील नंद्रा" हे गाणं खुद्द संगीतकार जगदीश मोहिते यांनी गायलं होतं ते गाणं "शांताबाई" या गाण्याचे कोरिओग्राफर यांनी जगदीश मोहिते यांनी आपल्या यूट्यूब साठी घेतले. पण मात्र संगीतकार जगदीश मोहिते यांना मी सांगितला की हे गाणं मी व्हिडिओ अल्बम करणार होतो आणि त्यात मुख्य डान्सर म्हणून मी डान्स करणार होतो पण ते तुम्ही गाणं स्वतः त्या गाण्याचं व्हिडिओ तयार केला पण जेव्हा आम्ही करू तेव्हा मी ते परत करीन आणि त्यात मुख्य डान्सर म्हणून मी काम करणार, काही घरच्या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला त्या गाण्याचं व्हिडिओ अल्बम करता नाही पण आता या 2020 मध्ये आम्ही व्हिडिओ अल्बम तयार करणार आहोत म्हणजेच 2020 चा आमचा हा संकल्प मी करणार आहे आणि अजून आमची गाणी, दादाने आणि मी लिहलेली गाणी, अशी गाणी तीस-पस्तीस होतील. ती गाणी दहा दहा करून ऑडिओ सीडी ,व्हिडिओ अल्बम करायची आहेत आणि शॉर्ट फिल्म व मोठी मूवी ती देखील करायचा आहे त्यामध्ये प्रमुख कलाकार म्हणून मी कृष्णकांत खरे आणि माझा भाऊ श्री नारायण खरे काम करणार आहोत, बाकी आमची सगळी टीम सगळे व्यवस्थित काम सांभाळून लोकांना आवडेल असच प्रेक्षकांना आवडेल असच काम करणार आहेत, त्यात तसे प्रयत्न असणार आहे, सुरुवातीला काही निवडक गाणी, काही शॉर्ट फिल्म तर काही सिनेमा प्रोडूसर म्हणून करायचा आहे हे सगळी कलाकृती मायबाप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी बरेच मेहनत प्रामाणिकपणे काम करायचे आहे गाण्याचे अल्बम यामध्ये मी व आमचे डान्सर योग्य तो डान्स करून आम्ही प्रेक्षकांच्या हमखास पसंतीस उतरू हे मात्र 100% 

कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून मी चित्रपट, सिरीयल मध्ये काम करतो. तेथे सुद्धा मी काम करत असणार आणि लेखन कार्यही माझं चालूच असणार आहे संकल्प मी मनात ठेवला आहे आणि महत्वकांक्षा पण माझ्या मोठ्या आहेत ,हे मला दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे असं नाही कारण त्या संकल्पना मधले माझे ध्येय साध्य झालं नाही तर तेवढेच नैराश्याने मला ग्रासले जाईल, कारण मला माहिती आहे दुनिया दोन्हीही बाजूंनी बोलणारी असते फक्त कटपुटली सारखं आपल्याला जीवनाच्या वाटेवर वावरायचं असतं. व आपल्या स्वतःला स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यायचं असतं, घर संसार, प्रॉपर्टी संभाळून आपल्याला आपले आवड सुद्धा जोपासायची आहे. तसं पाहिलं तर संसारात माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या प्रापंचिक गोष्टीला महत्त्व असतं म्हणून तर घर काम काज सांभाळून जी व्यक्ती प्रामाणिकपणे आपला संकल्प करते तीला सगळ्यांचे शुभाशीर्वाद, शुभेच्छा मिळणे आवश्यक आहे तरच माझ्या ह्या संकल्पनाला अर्थ आहे.


प्रत्येक माणसाने नव्या नववर्ष येताना आपली संकल्पना सत्यात आणण्यासाठी त्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न कसे असले पाहिजेत? आणि आपण या प्रयत्नाला किती  मेहनतीची जोड देतो यावर अवलंबून आहे, इतरांच्या हितात आपलं हित कसं साध्य होतं ? ती संकल्पना कोणती त्याच विषयी थोडा फार लिहिण्याचा प्रयत्न.....


Rate this content
Log in