krishnakant khare

Others

3.6  

krishnakant khare

Others

त्या दिवशी तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला

त्या दिवशी तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला

3 mins
1.1K


आपल्या भारतात माझा जन्म झाला मला भारतीय असल्याचा अभिमान असणारच,पण जेंव्हा कळायला लागतं जीवनाची जाण येते त्यावेळी पक्क वाटतं की आपण भारतीय आहोत हीच मोठी गोष्ट आहे. कारण जगाच्या इतिहासात. आपल्या भारताचा फार मोठा इतिहास आहे.

विशेष म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला. भारत स्वतंत्र होण्या मागे हिंदू, मुस्लिम ,सिख ,ईसाई असे विविध धर्माचे लोक इत्यादींचे हातभार लागले होते. जगातल्या प्रत्येक देशात आपल्या भारतासारखे विविध जाती जमातीचे , विविध धर्माचे, विविध संप्रदायाचे नाहीत पण भारतात ते सगळे आहेत

म्हणून तर हिच तर एक अभिमानाची गोष्ट आहे. येथे सगळे प्रकारचे जात, धर्माचे असले तरी माणुसकी हिच जात, धर्म समजून सगळे भारतीय गुण्यागोविंदाने, एकोप्याने राहतात आणि जगातल्या देशांना भारत सर्वधर्मसमभावाचा देश आहे याचा संदेश देतात. ज्या दिवशी हिंदू-मुस्लीम यांची दंगल झाली त्यादिवशी माझ्या बाबांनी व मी आणि माझ्या भावाने मुस्लिमांच्या सहा कुटुंबाला जिवातून वाचवलं त्यावेळी आम्ही खरे कुटुंबीय आपण भारतीय आहोत त्या अनुषंगाने कर्तव्य करत होतो आणि आमच्या कर्तव्याला यश आलं ती मुस्लिमांची सहासहकुटुंब आमच्यामुळे जिवातून वाचली. त्यादिवशी आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला. आपण आपल्या भारतात विविध जाती-धर्माचे असलो तरी आपली बंधुता ,भाईचारा कायम ठेवून आपापसातील भांडण-तंटे सामोपचाराने मिटवले पाहिजेत. जुन्या पासून तर आतापर्यंत त्या इतिहासाला बंधुता शिवाय पर्यायच नाही असं आपण कितीतरी वेळा अनुभवलेला आहे. ज्या दंगलीत आम्ही मुस्लिमांच्या सहा कुटुंबाला वाचवला ते मुस्लिम बंधू त्यांचे विचार चांगले आहेत मग दंगलीत त्यांना का दगाफटका, नुकसान भुर्दंड का? "ज्या देशात आम्ही राहतो, त्या देशाचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे त्यासाठी आम्ही भाईचाऱ्यानेच राहू, आमचा जन्म भारतात झाला आणि आम्ही पाकिस्तानचे गोडवे गावे, त्यांचा का अभिमान बाळगावा ? म्हणून आशा वृत्तीला कुराणात सुद्धा स्थान नाही. तो सच्चा मुसलमान होऊच शकत नाही .सच्चा मुस्लिम तो जो ज्या देशात राहतो आणि त्या देशासाठी प्राणापलिकडे ही देशाचा स्वाभिमान बाळगतो देशाचं रक्षणाकरता आपले प्राण अर्पण करतो तोच सच्चा मुस्लिम होय ,जगात मुस्लिम धर्माला शांततेचा प्रतीक मानलं जातं, अल्लाने काही कर्तव्य दिलेले आहेत ती सर्व कर्तव्य शांततेच्या मार्गाने जातात. ती कर्तव्य सच्चा मुस्लिमांसाठी महत्वाची आहेत. तरच मुस्लिम धर्माचे नाव आदराने,मानाने घेतले जाईल". मैं भारत में रहता हुं ,मेरा ईमान ये भारत देश है। गैर मुल्क, मेरे लिये गैर ही होगा, तो मै अपने मुस्लिम धर्म को अच्छा लगे वही काम करुंगा ,आपने भारत देशसे हमेशा इमान 

रखुंगा।" हे वाक्य वय झालेल्या, दंगलीत जीव वाचलेल्या अब्दुल चाचाचे होते. म्हणजेच आपल्या बंधूता मध्ये किती ताकद असते हेच आम्ही मुस्लिम भाऊंना वाचवलं त्यावेळी त्यांच्या तोंडून अशी वाक्ये आल्यावर आपल्या राष्ट्रीय एकोपाला अजून काय पाहिजे. आणि गुजरात पासून ते बंगाल पर्यंत, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ज्यावेळी आपला भारत देश स्वातंत्र्याचा उद्देशाने एकत्र आला होता या एकजूटीमुळेच अशा कितीतरी परकीय सत्तेला माघार घ्यावी लागली.अशामुळे आपण कितीतरी सामाजिक समस्या, अचानक उद्भभवणार्या निसर्गाच्या प्रकोपाला,परकीय सत्तेवर एकजूटीने संघर्ष करून त्यावर मात केली.हिच राष्ट्रीय एकोपाची भावना आता येणार्या पिढीत रुजवली पाहिजे तरच आपला भारत देश सर्वांर्थाने सावरला जाऊ शकतो.आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा अबाधित राष्ट्रीय भवनात फडकत राहिला पाहिजे त्यासाठी भारतातील जनतेने आपल्या मुलांमध्ये राष्ट्रीय भावना कुठल्याही परिस्थितीत जागवलीच पाहिजे तरच येणारा पुढचा काळ उज्वल राहील.आपल्या १९४७ या रोजी भारत स्वातंत्र झाला, ब्रिटिश झेंडा खाली उतरुन आपला राष्ट्रीय झेंडा तिरंगा राष्ट्रीय भुवनात फडकतोय,आणि आम्ही घरातील सगळे निर्व्यसनी आहोत,परोपकारी आहोत,आम्ही भारतीय नागरिक असल्याची जबाबदारीची आम्हाला जाण आहे तेंव्हा पासून आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय...


Rate this content
Log in