krishnakant khare

Others

3.3  

krishnakant khare

Others

कौटुंबिक जुने फोटो चाळताना

कौटुंबिक जुने फोटो चाळताना

6 mins
895


सहजच फोटो अल्बम मधील जुने कौटुंबिक ग्रुप फोटो चाळताना बघितलं बाबांचा फोटो. आज या आठवड्यामध्ये बाबांचा सहावा पुण्यस्मरण बरोबर 26 /12/2019 ह्या दिवशी होता. बाबांचा फोटो पाहिलं मन भरून आलं आणि तो प्रसंग, बाबांनी मला जवळ बोलवले फार दुःख वाटलं मला. 

सकाळची वेळ होती सहा साडेसहा वाजताची वेळ बाबांनी दादाला सांगितलं होतं " बाहेरुन रिक्षा घेऊन ये "आणि मला त्यांच्या बरोबर हॉस्पीटला जायला तयार व्हायला सांगितलं. शर्ट पेंट घालून तयार होतो. काही वेळानंतर बाबाने माझ्याकडे पाहीले आणि खाटेवर बसलेले खाटेवरच कोसळले .

मला वाटलं नेहमी सारखी चक्कर आली असेल बाबांना लगेच आम्ही घाई केली रिक्षात बसवून भाऊ आणि मी ठाण्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला त्यांचा तो नेहमीचाच हॉस्पिटल होता. तर आम्ही ॲडमिट करत होतो आय. सी. यु .मध्ये ठेवायचो,

आता आम्ही सकाळी डॉक्टरांकडे बाबांना आणलं होतं, डॉक्टरांची ट्रिटमेंट चालु होती,पण बाबांची शुद्ध हरपली होती, बाबा आम्हाला जग सोडून गेले होते, मला राहवलं नाही ,फार दुःख झालं मला,पण मी मनाला धीर दिला मन घट्ट करुन घेतलं, कारण मी धीर सोडतोय तर दादा हातपाय गाळुन बसला असता, दादा पण असह्य झाला. इतक्यात दादाने माझ्या चुलत दादाला फोन केला तोही आला. तोपर्यंत डॉक्टरने अथक प्रयत्न केले होते पण केस बाहेर गेली होती, बाबा या जगात नव्हते,आमचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता ,आता बाबा होते,लगेज कायमचे निघून गेले होते, जीव गुदमरल्यासारखं झालं होतं, हे सारे आठवताना जीव कासावीस होत होता, बाकीचे त्यांचे किस्सेही आठवायला लागले, आता कौटुंबिक ग्रुप फोटो चालताना त्यांचा शेवटचा उत्तरार्ध दिवसात आपल्या भविष्यात कोणत्या तर्हेची आम्हाला रुखरूख राहु नये म्हणून आम्ही त्यांची चांगली सेवा केली होती. एकदा माणूस गेला की त्याचा या जगात काहीच राहत नाही. फक्त राहतात त्याच्या त्या आठवणी.

त्यांचा गणपती सणांमधला इतर जुने कौटुंबिक फोटो चालताना सुरुवातीपासूनच्या बर्‍याच आठवणी दाटून आल्या.. 

बाबा गेल्यापासून आज सहाव्या वर्षी त्यांचे ।पुण्यस्मरण म्हणून न्यूज पेपरात त्यांच्या पुण्यस्मरणाची माहिती द्यायची होती. म्हणून फोटोअल्बम मधले त्यांचे जुने कौटुंबिक ग्रुप फोटो बघत होतो, 

मी आपल्या प्रिय बाबांच्या पुण्यस्मरण याबद्दल माहिती लिहायला घेतली होती.

 त्यांचा जीवनाचा ग्राफ पाहिला तर किती स्वच्छ कार्यपद्धती?, मनातून समाजाबद्दल किती कळवळ आणि ती आस्था ?आणि प्रत्येक धर्माला आपला तो एकच माणुसकीचा धर्म..  *क्रांतिवीर'* फिल्म मधल्या नाना पाटेकर फासावर जाणाऱ्या व्यक्तीची भुमिका करीत असतात व ते मुस्लिम बांधवाला म्हणजे मुस्लिम बांधवाची भूमिका ज्यांनी केली होती.त्यात जनार्धन परबांना रक्ताच नात  सांगणारा सीन होता. म्हणजे जगातल्या कुठेही कोणताही धर्म असला तरी पण त्या धर्माचा माणसाचा रक्त लालच असतो.

धर्म चांगला आहे पण माणसाने स्वार्थासाठी केलेली धर्मातली मतभेदाची दुही कमी करण्यासाठी सिनेमा माध्यम, वर्तमानपत्र माध्यम ,संदेश मीडिया आणि समाजातले काही थोर व्यक्ती समाजसेवक असेच असतात अशाच मध्ये माझ्या बाबांचही कार्यही खारीचा वाटा या लेव्हलला होतं का? होतं तर कसे? त्या अशा गोष्टी आठवल्या की त्याचं सकारात्मक उत्तर मिळत आहे. आपल्याला आपल्या जीवनात खरंच चांगली प्रगती करता येईल का? तर मग ते कसं? हेच बाबांच्या माहितीच्या ग्राफवरून कळून येत होतं.

संसारात असताना जीवनात दुःखीकष्टी असताना व्यसनापासून दूर राहता येईल का?

 हेच बाबांच्या माहितीच्या ग्राफवरून त्याचे उत्तर मिळतय असं वाटतंय. हिंदुमुस्लीम कोणत्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहू शकतात? कोणी कितीही आपल्या धर्माचा कट्टर असला तरी जीवाच्या पलीकडे गैर धर्माचा जर इतर धर्माच्या माणसाचा दंगली सारख्या प्रसंगात जीव वाचवलं तर दोन्ही धर्म आपले अहंकार विसरून भाईचार्याने एकत्र एकदुसऱ्याचे धर्म स्वीकारल्या सारखं गुणगोविंदाने राहु शकतात, तर मग ते कसे? हे बाबांच्या जीवनाच्या ग्राफ वरून कळून येत होतं.

*शुन्यातून वलयांकित झालेले परोपकारी, एक अजोड व्यक्तीमत्व* *रामचंद्र वाळकु खरे* यांचा जन्म १८मार्च१९४०रोजी कोलशेत,ठाणे येथे झाला.

त्यांचे शिक्षण इयत्ता सातवी पास ठाणे जिल्हा परिषद ठाणे येथील शाळा क्रमांक १मध्ये झाले. ते इंग्रजी आणि गणित या विषयात हुशार होते.त्यांना जनरल नाॅलेजचे ज्ञान चांगले होते.कोलशेत येथील **खरे कुटूंबियातील त्यांच्या पिढीतील सातवी पास एकमेव व्यक्ती*, कोलशेत गावांतील तीन व्यक्ती पैकी हि एकमेव व्यक्ती अशी त्यांची गणना केली जात होती.  

    नोकरी करुन ते आपला पंरपरागत असलेला लोहारकामाचा व्यवसायात त्यांचा तांत्रिक अनुभव फार दांडगा होता. व्यवसायात त्यांनी फक्त पैसे न कमावता माणुसकीचा चांगुलपणा जपला, या त्यांच्या स्वभावामुळे परिसरातील पंचक्रोशीतील नविन कारखानेदार आणि शेतकरी हे यांच्याकडुन आपले साहित्य,हत्यारे बनवुन तयार करुन घेत असताना मौलिक सल्ला ही देत, आगरी,कोळी, आदिवासी भुमीपुत्रांचे हत्यार बनवताना, त्यांनी आपली नातीगोतींची ओळख ठेवुन कित्येकांची उपवर मुलींची, मुलांची लग्न जमवली, कित्येक आगरी, कोळी ,आदिवासी भुमीपुत्रांना चेस ब्राईट स्टिल कंपनीत कामालाही लावले.

कै.रामचंद्र खरे यांनी पातलीपाडा येथे कोलशेत ग्रामपंचायतीच्या कालावधी पासुन आता पर्यंत अनेक नागरीसुविधा बाबतही पाठपुरावा केला.तसेच येथील संपुर्ण पातलीपाडा परिसरातील जागेस सनद मिळावी म्हणुन स्थानिक रहिवाशांना घेऊन महाराष्ट्र शाषन दरबारी त्यांनी खुप प्रयत्न केले,परिसरातील वादविवादाचे प्रश्न ते सामाेपचाराने सोडवत होते.

खरेंना नाटकात काम करायची फारच आवड होती,मध्यम ऊंची पण आवाज सिंहगर्जेतला असल्याने त्यांनी सामाजिक,ऐतिहासिक नाटकात काम करुन वाहवा मिळवली,काही बक्षिसेही मिळाली होती, त्यांना संगीताची आवड होती,पण त्यांनी आपला पहिला संसार पाहिला, त्यांना माहित होतं की नुसतं कला माध्यमाशी राहुन चालणार नाही म्हणुन त्यांनी कुटुंबासाठी आपली नोकरी व व्यवसाय केला त्यांत त्यांनी आपला परमार्थ साधला व कलेची आस्था ही ठेवली होती,त्यांच्या कलेची कदर म्हणुन  त्यांचा मुलाने म्हणजे लेखक,कवी,अभिनेता, गायक श्री.कृष्णकांत खरेंनी,त्यांच्या आठवणीस सादर म्हणुन त्यांची काही रचलेली गाणी घेऊन परत त्यांचा जेष्ट पुत्र कवी,गायक,अभिनेता श्री.नारायण खरेंची काही गाणी घेऊन "एकविरा आईचच जयजयकार  हि    ओडिओ सिडी     तयार केली आहे,त्यातलं गीतकार : नारायण खरेचं गाणं* *चंदरा लागतील नंदरा*हे गाणं युट्युबवर खुप गाजतेय*

सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असत, *गणपतीच्या दिवशी दिवशी सार्या चार गावात रामचंद्र खरेंचं गणपतीला चला दर्शनाला असं भाविकांची इच्छा असायच, कारण ते जे गणपती डेकोरेशन बनयायचे ते एक तर कमी खर्चाचे, मातीचे असायचे, गणपतीच्या दिवशी दिवसरात्र एक करुन दहा पंधरा दिवस अगोदर स्वताच्या हाताने,आपल्या मुलांना बरोबर घेऊन गणपतीचे डेकोरेशनची कलाकुसर साधुन, कमी खर्चातला गणपती डेकोरेशन बनवत. त्यामुळे कासारवडवली ,वाघबिल,बाळकुम , आझाद नगर कोलशेतला नवरात्रीच्या , गणपतीच्या डेकोरेशन बनवायला बोलवत, या काळात रामचंद्र खरेंना हमखास संस्थेकडुन बक्षीसे मिळायचीच, त्यामुळे ते प्रत्येक वर्षी एकाहुन एक डेकोरेशन बनवायसाठी झटत. अशीच काय ती कलेची धडपड असायची म्हणजे हेच काय ते व्यसन,आवड असायची, पण कधी आयुष्यात दारु,सिगारेट, धुम्रपान वगैरे सारखा कसलाच वाईट व्यसन,नाद केला नाही, गरिबी, काबाडकष्ट काय असते?ह्या गोष्टी अनुभवल्या होत्या, कुटुंबाला कष्ट पडु नयेत म्हणुन त्यांची धडपड असायची. पैसा जरी संसाराला होता पण पैशाचा विनियोग बरोबर ठिकाणीच केला, गरज कोणाला पडत नाही सगळ्यांनाच गरज पडते पण हा लोहार पण असाच होता सौ सोनार कि एक लोहार की असा पुरुन उरणारा होता, समाजतल्या धनदांडगापासुन, गरीबाला,गरजवंताला,   आजीमाजी ,सरपंच, व्यापारांना ,धंदेवाईकांना, आमदार नातेवाईकांच्या पडत्या काळात पैशाची मदत करुन त्यांची गरज,त्यांची इज्ज़त ,त्यांचा जीव वाचवलेत.( *लोहार कामात घाम गाळुन कमावलेला    पैशातुन,त्यांच्या सर्विस मधल्या पैशातून संसार संभाळुन, अडलेनडलेंच्या गरजा पण भागवत*)) .दंगलीत तर चार कुटुंबाचे जीव वाचवले म्हणुन ते कुटुंब त्यांना घरदार द्यायला बघत होते पण त्यांनी   नाकारले होते , रामचंद्र खरेंनी तो स्वार्थ कधी साधला नाही उलट *"मैं कुछ इंसानियत के नाते,भाईचारे के नाते कर रहा हुं इसका मतलब ये नही की मैं कुछ मोबदला ले लुं,उससे अच्छा मैं इंसानियत के नाते जो कुछ कर रहा हुं वही ना करुं*,ऐसे हरकत के वजहसे सबका दिल जीत लिया था,वही कट्टर मुस्लिम भाई गणपति के त्यौहार पर दर्शन के लिये आते ,पुजापाठ करके इधरउधर की सुखदुख की बाते करते चले जाते ,जो हिंसा से बात नही होती वो अहिंसा से बात होती है,यही मिसाल रामचंद्र खरेंजीं की थी !रामचंद्र खरेंच्या अशा चांगल्या वागण्याने मुस्लिम भाई को भी, मालुम पडता हिंदू समाज भी अच्छा समाज है, या विचारवंत व्यक्तीने सामाजिक,धार्मिक एकताच साधली होती.अशा विचारवंत व्यक्तीस समाज मुकला आहे.त्यांच्या जाण्याने समाज ,परिसर एक महान अष्टपैैलु व्यक्तीमत्वास मुकला आहे,असा एकही दिवस नाही की त्यांंची आठवण येत नाही ते कायम आमच्या मनी धनी हृदयात राहिले आहेत. कधी पाच वर्ष झाले ,त्यांच्या जाण्याला हे सुद्धा कळलें नाही,आज त्यांच्या सहाव्या वर्षी पुण्यतिंथि असल्याने त्यांच्या पुण्यसस्मृतीस महान समाज बांधवास समाजाच्या वतीने आणि आपल्या ,कोलशेत, पातलीपाडा परिसरातील 

रहिवाशींच्या वतीने भावपुुर्ण विनम्र आभिवादन.  


महत्वाची ज्ञानवर्धक आणि एकोपा साधण्यासाठी आणि आपली प्रगती कोणत्या पद्धतीने केले तर आपली प्रगती होऊ शकते हेच बाबांच्या जीवनाच्या ग्राफ वरून कळून येतं होतं. म्हणजेच फोटो हे आपले गत काळातील जीवनाचे रेकॉर्ड आठवणीत ठेवत असते त्यायोगे भविष्यात त्या फोटोतून आपण आपल्या जुन्या-नव्या आठवणीत जातो ....हेच लिहण्याचा थोडासा प्रयत्न.


Rate this content
Log in