सुमनांजली बनसोडे

Romance Fantasy Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Fantasy Others

तुझ्या सोबत...

तुझ्या सोबत...

2 mins
270


आयुष्याच्या सुदंर वळणावर 

सापडलेलं प्रतिबिंब ते तुझं होतं

हरवलं ते मन माझं होतं 

देऊ केलेलं ते सोभाग्य मला ते तुझं होतं

तु नाकारले मला ते दुर्भाग्य माझं होतं...


मी खूप वेळा प्रयत्न केला माझं प्रेम व्यक्त करण्याचा.. मी तुझ्यासाठी झगडलेयं... पण सार अपेक्षेपेक्षा निरर्थक ठरलं... तुला मी आवडते की नाही हे मला ठाऊक नसतानाही तुझ्यावर प्रेम करत राहीले... माझी अपेक्षा तुझ्या होकाराची नव्हती... ते तुझ्यावर विसंबून होतं...

    

तू मनाने नितांत सुंदर आहेस .. पण तुझ्या पिळदार शरीरयष्टीपेक्षा बरंच काही बघितलं होतं मी तुझ्यात...तुमचा समजुन घेतलं नाहीस... माझ्या भावनांचा विचार केला नाहीस... आणि माझी भावनाच अशी झाली की .. दरवेळी तुच मला समजुन घ्यायला हव... मला समजुन घेण्याची जबाबदारी तु कधी उचलली नाहीस... माझ्या भावन विश्वात तु रमलाच नाही... माझ मन तुझ झालच नाही... माझ्या मनाचा गाभारा तुझ्या प्रेमानं अधिकच सुगंधी झाला होता... आणि मनाच्या एका कोपर्‍यात तुझी मोहक मूर्ती कायमची कोरली गेली... पण तुला ते कळलचं नाही...


   आठवते तुला ते अनोळखी दिवस... त्या दिवशी तुझ्या पावलांना मिळालेली दुस-या दोन पावलांची साथ... पण.. आयुष्यातलं वास्तविकतेचं गणित उलगडल्यावर कुणाचा "पती" हे लेबल तुला चिकटलयं..पण भूतकाळातील पाश तोडणं अवघड जाईल तुला... तु माझ्या जीवनात एकदम स्वप्नातल्या परीसारखा आलास .. श्रावणातला वारा अंगाला स्पर्शून जावा आणि अलगद जाग यावी तसा तु आलास आणि आता निघुन जात आहेस... 

तुझ्या विरहाची दाहकता पचवन्या इतकी खरच आता माझ्यात ताकत नाहीये.... 


    दवबिंदूसारखं आपलं नातं सुंदर ... पण काही क्षणाचच... रक्तानात्याचा म्हण किंवा जातीपातीचा म्हण... विचार तसा नाहीच.... फक्त हे जीवन जगायचंय..... तुझ्यासोबत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance