Yogita Takatrao

Inspirational

4.5  

Yogita Takatrao

Inspirational

तटस्थ

तटस्थ

3 mins
1.3K


स्वयंपाक घरातून श्रीखंड,पूरी,गरम गरम वरण भात आणि त्यावर तुपाची धार ........खमंग सुवास येत होता आणि अभिची भुक चाळवली! ये वाढ ना जेवायला !त्याने बायकोला फर्मान सोडलं ! आणते ! आणते ! नैवेद्याचं बाजूला काढून ठेवू दे ! किर्ती ओरडली स्वयंपाक घरातूनच ! गुढीपाडवा होता ना आज !त्याची जय्यत तयारी चालली होती ! सगळंच आटोपून झालं होतं किर्तीचं जवळ जवळ ! अभिची आई देवघरातल्या देवतांना अभ्यंग स्नान घालत होत्या. सगळयांची आपआपली कामे चालू होती. छोटी निती मस्ती करण्यात मस्तपैकी रमलेेेली आणि तिच्याहूून मोठा वलय ,हे महोदय ,पीएसफोर वर खेेळ खेेेळण्यात एवढे रममाण झाले होते की ,त्या खेेळातल्या पात्रांपैैकीच एक पात्र झाले होते. आणि इकडे छोट्या नितीची खूूपच मस्ती वाढलेली, किर्त्तीनेे बजावलेल्या गोष्टींना जास्त मनावर न घेेता,त्यांच आपलं सोफा कम बेेडवर बसून,आपल्याच पायांनी त्याचा आतला बेेड बाहेर ढकलून देेणं चालू होतं . किर्त्ती ते जेेेवढ्या वेेळ आत ढकलून निट करून जायची ,तेवढ्या वेळा आणि त्यावर एक जास्तच कुरघोडी म्हणुुन की काय ? निती ,परत अजून एकदा तो बेेड बाहेर ढकलून मोकळा करून ठेेेवायची.

शेवटी न राहवून किर्तीने परत तो सोफा कम बेड निट केला आणि "किडे कमी नाहीत हां अंगात,निती" असं दरडावून दमही दिला नितीला ! तेवढ्यात तिच्या सासुबाई मध्ये पडल्याचा,"तू कसली भाषा वापरते"? किर्ती म्हणाली ..भाषा तर सामान्यच आहे,किडे म्हणजे मस्ती ! काही बोललं की उत्तरं दयायलाचं पाहिजे का? किर्ती ? इ. सासूबाई बोलल्या ठसक्यातचं जणू तिने काही घाणेरडया शिव्याच दिल्या असाव्या ह्या सुरातच ! मी बोलू शकते ,मलाही बोलण्याचा हक्क आहे,सासूबाई! आणि झालं........दोघीं मधल्या छोट्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात झालं......रामायण...महाभारत....सगळं आलं त्यात! शेवटी वैतागून अभिला मध्ये पडावंच लागलं," गप्प बसा दोघीही ! नुसत्या भांडत बसता दर चार महिन्यांनी ......कंटाळा आलाय मला ! एकीने तरी समजुतीने वागा.....? त्याची आई म्हणाली,हिची भाषा बघ ,कशी वापरते? ते? किर्ती म्हणाली, मी ह्यांच्या पर्यंत कुठल्याही गोष्टी घेऊन जात नाही,मध्ये का पडतात दरवेळी माझ्या आणि मुलांमध्ये.....? अभि चिडलाच .......मलाच कंटाळा आलाय तुम्हा दोघींबरोबर राहण्याचा.......पुरे करा.....आणि बोलू नका नाही पटत तर एकमेकींन सोबत....! सणवार बघत नाहीत,काही बघत नाहीत...? भांडण काढत बसतात नुसत्या........?

अभिचा रक्तदाब वाढला हे सगळं बघून,बोलून ! चक्कर आल्या सारखंच वाटलं त्याला,तो त्याच्या बेडवर जाऊन पडून राहिला बराच वेळ ! काय नेहमीचंच तेच ....ते.....! सगळीकडे निरव शांतता पसरलेली ! तिकडे अभि ची आईही उपोषणाला बसली .......किर्ती ने ह्यावेळी मुद्दाम विचारलंच नाही सासुबाई ना ,जेवता का? कारण ती ही वैतागली होती दरवेळी सासुबाई अश्याच वागतं ! त्यांच्या अतिरेकी ,अतिभावना किर्तीला छळायच्या ...! किर्ती ला स्वतःच्या भावना दाखवायची सवय नव्हती, मग तिचा जीव गुदमरायचा .......! आणि हे उपोषण नेहमीचचं ...! ती बेडरूम मध्ये गेली.....अभिला विचारलं तिने," तुला काही हवयं का? किती आहे रक्तदाब ? तु सोड ना किर्ती ? काय फरक पडतो ?

तुम्ही दोघी बसा ना भांडत ! ......किर्ती काही नाही बोलली....अभि.....आई ऊगीचच काही ना काहीतरी काढून बसतात...! मी किती ऐकून घेऊ ? मी पुतळा नाही आहे ना ? की समोरचा काहीपण बोलेल आणि मी माझं मतही मांडू नये....? आणि कुठल्याही गोष्टी समजून घेत नाहीत काही नीट बोललं तरी टोकते मला दिवसभर बोलतात...! लहान मुलांना कसंही समजावून सांगू शकतो....दम देऊन,दरडावून,धपाटे घालून ! ह्या मोठ्या वयाच्या मुलाला कसं समजावून सांगायचं ? आणि तू नको मध्ये पडू ? तटस्थ रहा...! आपल्या घरी फार कमी भांडण म्हणजे कमीच असते वादावादी .......दुसरी कडे पाहशील तर रोजचीच असतात........प्रत्येक घरी जवळ पास समानच असतात अशी भांडणे.......! होतं नंतर सगळं ठीक......!

अभि तयार होऊन संध्याकाळी फेरफटका मारून आला.......ताजातवाना होऊन आला ....येताना सगळयांच्या आवडीचे खाद्य पदार्थ घेऊन आला.......आई त्याची अजूनही उपोषणावर होती.....केळं आणि मोसंबी रसावर ........पण हे सामान्य आहे कळलं त्याला,स्विकारलं त्याने, आईवर लक्ष ठेवूनच होता अभि.............!

त्याने आवडीचा सिनेमा लावला आणि त्यातलं गाणं ही गुणगुणू लागला..........क्या यही प्यार है....? हा...! यही प्यार है.......बिन ..तेरे बिन ...दिल लगता नही....वक्त गुजरता नही.........बोलता बोलता....बायको कडे कटाक्ष टाकत होता......ती मनोमनी आस्वाद घेत होती त्याच्या गाण्याचा , वरून काहीच न दाखवता........किर्ती तिचं काम करत होती........आई अजूनही उपोषणावरच होती(आज फक्त जेवणाचा बहिष्कार होता ,बाकी सगळं खाणं चालू होतं) ...........!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational