Vrushali Thakur

Horror

2  

Vrushali Thakur

Horror

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ८)

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ८)

6 mins
707


" महाभयंकर.." एवढा एकच शब्द अनयच्या तोंडातून निघाला. आपण जे ऐकलंय ते खर की खोटं हे समजण्यापलीकडे त्याचा मेंदू बधीर झाला होता. जे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यानंतर तो जगातील कोणत्याच गोष्टीवर अविश्वास दाखवू शकणार नव्हता. 

" पुढे काय.." अनयच्या विस्फारलेल्या डोळ्यांतील प्रचंड भीती ओम वाचू शकत होता. 

" अनय, आपल्याला त्या शक्तीशी लढायच आहे." ओम स्वतःचा आत्मविश्वास चाचपडत बोलला. 

" कसं..? कधी...?" अनयच्या मनात बरेच प्रश्न उमटत होते. परंतु आपल्या बायकोच्या प्रेमाखातर ते बाजूला ठेवून येईल त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तो तयार होता.

" आज.." ओम शांतपणे उत्तराला.

" आज.." अनय जवळपास किंचाळलाच. अजूनही त्याच्या मनाने जे घडतंय ते पूर्णपणे मान्य केलं नव्हतं. 

" आजच चंद्रग्रहण आहे...कित्येक वर्षांपूर्वीचा मुहूर्त पुन्हा आलाय... ते जे काही आहे ते आज पूर्ण ताकदीनिशी तयार आहे.. त्याच्या इतक्या वर्षांचा बदला घ्यायला..." ओम बोलतच होता. त्याच्याही मनात भीती होतीच.

" आज.. आपण... कसं... आपल्याला तर माहित पण नाहीये काय करायचं ते..." अनयची शंका रास्त होती.

" आपण तयार असू नसू... ते हल्ला करणार तर आजच... कारण चंद्रग्रहणात त्याची ताकद प्रचंड असते. त्यात आज तर त्यांच्यासाठी खास चंद्रग्रहण आहे... त्यांचा उद्देश ह्या जगात येऊन त्यांचं साम्राज्य निर्माण करायचा आहे... काळोखाच साम्राज्य.... आपल्याला फक्त तिलाच नाही तर संपूर्ण विश्वाला वाचवायच...." ओम त्याला समजावत होता.

" आपल्या हातून काही चूक झाली तर...." पुन्हा अनयची शंका.

" तर जे होईल ते बघून घेऊ.." ओमने विश्वासाने त्याच्या पाठीवर थोपटल. " चल आता...आपल्याला खूप तयारी करायची आहे. "

------------------------------------------------------------------------

तांबूस पसरलेली सायंकाळ संपत आली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. ती पुन्हा पुन्हा सार घर फिरून त्याला धुंडाळत होती. आधी तिने आठवण काढली की लगेच हजर... पण आज झाल होत कुणास ठावूक... तिला मनातुन सारखं अस्वस्थ वाटत होत. काळीज उगाचच धडधडत होते. कसल्या कसल्या शंका कुशंका मनात येत होत्या. तो सोबत असतं तर त्याच्या मिठीत सामावून ती विसरून गेली असती. पण....

तिने तयार व्हायला सुरुवात केली. जर तो आलाच तर राग नको का घालवायला. तिने कपाटातील खास नाजूक सोनेरी वर्क केलेली तिच्या आवडीची साडी काढली. मोती कलरच्या साडीला जर्द गुलाबी काठ होता. त्यावर सोनेरी धाग्याने वेलबुट्टी गुंफली होती. मध्येच नुकतीच उमललेली फुल होती. त्याभोवती खड्यांच कोंदण होत. त्याने कधीतरी भेट दिली होती... पुन्हा त्याची आठवण... तिच्या छातीत एक बारीकशी कळ उमटली. आणि पापण्यांच्या कडांना आसवांचे थेंब साचले. स्वतःशी उसन हसत तिने साडी नेसली. आपल्या मोकळ्या तांबूस कुरळ्या केसांना सावरत तिने मोठा अंबाडा घातला. अशा भरगच्च अंबाड्यावर लालबुंद काश्मिरी गुलाब खोचायला खूप आवडायचं तिला. पण ऐनवेळी फुल कुठून आणावी... तिने ड्रावर खोलला. लग्नाच्या पहिल्या रात्री अनयने तिला भेट दिलेला एक ब्रॉच होता. सोनेरी रंगाच्या ब्रॉचवर लखलखत्या हिऱ्यांमध्ये एक मोठा दुधाळ रंगाचा खडा बसवला होता. तिला आधी कधी तो ब्रॉच वापरवासा वाटला नव्हता... अनयशी कधी तीच मन जुळल नव्हता ना. पण आता ह्या साडीवर बरोबर मॅचींग होत होता. तिने त्या खड्यावरून हळुवार हात फिरवला.. बिचारा अनय.... त्याची काहीही चूक नसताना आपल्यामुळे त्रास भोगतोय....त्याच्या वागण्यावरून वाटत की त्याचं प्रेम असाव.. पण... आपल आवरून आणि मेकअप करून ती स्वतःला न्याहाळत होती. तिची सुंदर चेहऱ्यावर उदासीच्या छटा होत्या. काय चाललंय हे आयुष्यात.. आपण कोणासाठी तयार होतोय इतके आणि ते ही कोणी दिलेल्या वस्तू घालून.. क्षणासाठी तिला स्वतःचीच लाज वाटली...काय चालवलय मी हे सगळं.. माझी वागणूक इतक्या खालच्या दर्जाची कशी होऊ शकते... माझं लग्न झालंय... नाही अशी वाहवत जाऊ शकत मी.... मी काय करतेय हे... तिच्या मनात अनेक विचारांचं द्वंद्व चालू झालं. तिचे निळसर डोळे अजुनच भरून आले. तिला त्या घरातून निघून जावस वाटत होत. ती तशीच दरवाजाच्या दिशेने वळली मात्र अचानक तिच्या सर्वांगाला कापर भरल. ड्रेसिंग टेबलच्या आधारासाठी ती थोडीशी वाकली. पण वाकतानाच तिच्या पाठीच्या मणक्यात जोरदार लचक भरली. त्या वेदनेची सनक तिच्या पाठीतून मस्तकात प्रवाहित होत होती. सर्वांगातून कसलीशी शिरशिरी लहरत गेली. आणि काही कळायच्या आधीच तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. आपल्याला काय होतंय ते न कळून ती जोराने किंचाळली. परंतु तिचा आवाज घशातच अडकला. तिच्याभोवती पांढऱ्या रंगाचा धूर आपल वळत बनवत होता. सफेद धुक्यासारखे दिसणारे ढग त्या वलयाभोवती गोलसर फिरत होते. तिच्या अंधारलेल्या डोळ्यांना काही नीटस दिसेना. परंतु काहीतरी विचित्र चाललंय हे ती समजून चुकली. तिला अजुन ओरडायच होत... कोणाला तरी मदतीला पुकरायच होत. परंतु घशातून आवाज निघेना. घाबरून तिचे श्वासही अडकू लागले. पांढऱ्या धुरात तिचा जीव गुदमरू लागला. खोल श्वास घ्यायला ती तडफडू लागली पण धुक्याच वलय अजुनच घट्ट आवळल जात होत. तिच्या दुखऱ्या शरीराची तडफड अजुनच वाढली. धुक्याच्या पुंजक्यांनी अजुनच आपली पकड घट्ट केली एखाद्या भिजल्या कापडाला पिळाव तस व तरंगत जाऊन खोलीभर विसावले. तीच तडफडणार शरीर निस्तेज होऊन जमिनीवर कोसळलं. तिच्या भोवतीचे ढग वाऱ्यावर लहरत खोलीतच फिरत होते....

-----------------------------------------------------------------------

" घाई करायला हवी..." हातातील सामान पटापट पिशवीत भरत गुरुजी ओरडले. अनयच्या हाताला खेचत ओम त्याला त्याच्या घरी घेऊन आला होता. अचानक भेटणं, ओळख दाखवणं, हक्काने ओढत घरी घेऊन येणं.... अनयसाठी ओमच वागण अनपेक्षित असल तरीही त्याला ह्या क्षणी कशालाच विरोध करायचा नव्हता. ओमच्या घरी आल्यावर त्याला अजून एक धक्का बसला. तिथे गुरुजी व तिचे बाबा आधीच उपस्थित होते. जराही वेळ न दडवता जुजबी ओळख करून घेऊन ओम व गुरुजींनी मिळून त्याला सगळ काही थोडक्यात समजावलं. शेकडो वर्षांआधी घडल्या गोष्टींचे असे काही पडसाद उमटले जाऊ शकतात ह्याची त्या बिचाऱ्याला काही कल्पना नव्हती... जगात ह्या ही गोष्टी असतात....त्याची बुध्दी ह्या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. परंतु मन... ते मात्र तिच्याकडे ओढ घेत होत. तिच्यावर आलेलं प्रत्येक संकटाला त्याला पुढे होऊन सामना करायचा होता. अग्नीच्या सात फेऱ्यांत त्याने वचन जे दिलं होत. त्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ येऊन ठेपली होती.

" काय झालंय गुरुजी..." अनयने काळजीने विचारलं.

" तिच्यावर हल्ला झालाय..." गुरुजींच्या अंतर्दृष्टीला तिच्यासोबत घडल्या घटनेची जाणीव झाली.

" हे कसं शक्य आहे.." बाबांच्या अनुभवात ते प्रथमच अस ऐकत होते. अनयने जरा रागानेच त्यांच्याकडे पाहिलं. पण त्याच अस पाहणं गुरुजींच्या नजरेने बरोबर टिपलं.

" आजवर त्या शक्तीसाठी तीच एकमेव माध्यम होती मात्र आज ते आपल्या मितीत येण्यासाठी सज्ज आहेत. एकदा का त्यांना आपल्या मितित प्रवेश मिळाला की त्यांच्यासाठी तिची गरज संपते... आणि तिच्याच माध्यमातून त्यांना पुन्हा त्यांच्या मितीत परत पाठवता येईल व म्हणूनच त्याचा आपल्या जगात प्रवेश होताच ते सर्वात आधी तिला संपवतील....." गुरुजी एका दमात बोलून मोकळे झाले. आणि ते ऐकून बाबा व अनयची हालत बघण्यासारखी झाली. 

" नाही... आपल्याला काहीतरी करायला हवं..." ओमच्या तोंडून नकळत निघून गेलं. तसंही आज सकाळपासून त्याला काहीतरी विचित्र वाटत होत. त्याच वागणं बोलणं पूर्णपणे बदलून गेलं होत. अनयला अचूक ओळखून ज्या प्रकारे तो त्याला घरी घेऊन आला होता ते त्याच्याचसाठी अनपेक्षित होत. आवश्यक सामान भरलेल्या पिशव्या उचलत त्याने बाहेर धाव घेतली. त्याच्या मागोमाग बाकीचे तिघेही उरलं सुरल सामान घेऊन वेगात निघाले.

रात्रीचे साधारण आठ वाजले असावेत. रोजपेक्षा आजच वातावरण जरा जास्तच गडद होत. आभाळातील ढग काळोखात माखून गेले होते. आजच्या रात्रीवर जणू काळोखाची सत्ता असल्याप्रमाणे चांदण्याही लुप्त होऊन गेल्या होत्या. वारा अगदी थकून मंद गतीने वाहत होता. त्यात त्याची नेहमीची चंचलता नव्हती. कोणी येऊन आपल्या साऱ्या क्रियांवर हुकूमत गाजवावी तसा साऱ्या वातावरणात कसलासा दबाव भरून राहिला होता. त्या अशुभाची चाहूल आधीच प्राण्यांना लागली असावी म्हणूनच ते पोटतिडकीने रडत भेकत होते. सकाळी वाऱ्यावर बेधुंद डोलणाऱ्या झाडांनी चढत्या अंधारासोबत मलूल होत माना टाकल्या होत्या. मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ होता तो मानव... बाबा गुरुजी अनय व ओम सोडता बाकी कोणालाच घडणाऱ्या प्रकाराची खबर नव्हती. 

कुठल्याशा गावच्या शंकराच्या मंदिरात एका पुजाऱ्याला काहीतरी अघटीत घडेल की काय ह्याची शंका चाटून गेली. विचार करण्यात क्षणाचाही विलंब न करता शुचिर्भूत होऊन पूजेला बसला. जे काही घडेल त्यात ह्या जगाला शिवशक्ती तारून नेईल ह्यावर त्याचा पक्का विश्वास होता. रात्रीच्या अंधारातही ते मंदिर प्रकाशमान दिव्यांनी आणि त्याच्या मंत्रजपाने उजळून निघत होत.

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror