Vrushali Thakur

Horror

2.5  

Vrushali Thakur

Horror

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ५ )

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ५ )

11 mins
1.6K


चंद्रग्रहण मध्यावर होत.. करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले. बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली. त्या आकृतीच्या रेखा हळदी कुंकवाने भरून टाकल्या. चारीही बाजूला चार सफेद कवट्या व हाडांची रास रचली गेली. आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर खंजिराने वार करत त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला व मोठ्या आवाजात यक्षिणीला आवाहन करणं चालू केलं. त्याच्या तळव्यातून अखंड रक्ताची धार लागली होती पण मुखातून गगनभेदी मंत्रोच्चार चालू होते. चंद्रग्रहणाचा महत्त्वाचा प्रहर चालू झाला. इतक्या वर्षांची त्याची मनोकामना काहीच वेळात पूर्णत्वास जाणार होती. आणि अचानक कोंदट वाटणारा वारा जोरजोरात वाहू लागला. गढूळलेल्या वातावरणात अजुनच काळोख दाटला. वाऱ्याच्या फुंकरीने भडभडत जळणारे दिवे फरफर करत विझून गेले. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासोबत आकाशात एक वीज लखाकली. हवेत छोट्या पांढऱ्या ढगांसारखे पुंजके गोळा होऊ लागले. एक एक करत त्याचे थर रचले गेले. भोवताली पसरलेल्या मिट्ट काळोखात केवळ त्या पुंजक्यातून निघणार प्रकाश एकमेव समोर काय घडतंय ते दाखवत होता. त्या सफेद पायघडयांवर उतरत कोणीतरी येत होत. मानवी आकारात कमरेत वाकलेली एक क्रूर जख्ख म्हातारी आपले लालभडक डोळे गरगर फिरवत वाऱ्याच्या वेगाने उतरत होती. तिचे पांढरे कुरतडलेले केस सुकल्या गवतासारखे वाऱ्यावर उडत होते. सर्वांगावरुन ओघळलेल्या कातडीने तिचा चेहरा अत्यंत किळसवाणा व विद्रूप दिसत होता. ढगांमधून बाहेर पडून ती पापणी लावण्याच्या आत थेट करालसमोरच्या यज्ञासमोर बसली. यज्ञात जेमतेम चार निखारे जळत होते. तिने खाली वाकत त्यावर फुंकर घातली आणि त्यासोबत भयानक आगीचा भडका उडाला. तिचा इशारा समजुन करालने तिच्यासमोर झुकत लगेच एक नरबळी कापला. मानवाचं गरम रक्त उडताच ती बेभान झाली. कित्येक दिवस उपाशी असल्यासारखी ती त्या बळीवर तुटून पडली. आपली लांब नख त्याच्या सर्वांगात रुतवत कातडी सोलून रक्त पिऊ लागली. आपली तहान भागताच तिने आपला रक्ताने माखलेला बीभत्स चेहरा करालकडे वळवला. कराल तिच्या आज्ञेच्या प्रतीक्षेत होता. 

" अजुन बळी पाहिजे..." आपल्या घरघरणाऱ्या घशातून खरखरीत आवाजात ती म्हातारी चित्कारली.

" जशी आज्ञा.." करालने तिला वंदन करत मागे वळून अजुन माणस घेऊन येण्याची आज्ञा दिली. 

" मला इथलाच बळी पाहिजे.." म्हातारी पुन्हा त्याच कर्णकर्कश्य आवाजात ओरडली. तिच्या ओरडण्यामुळे तिची लोंबती कातडी अजुनच थरथरू लागली.

" अवश्य... कोण पाहिजे..." करालने तितक्याच शांत शब्दात विचारले. 

" तो.." म्हातारीचे गरगरणारे बटबटीत डोळे विश्वनाथ शास्त्रींवर रोखले होते. अचानक झालेल्या प्रकाराने विश्वनाथ शास्त्री दचकून गेले. त्यांच्या अनुमानाप्रमाणे शशिकलेचा बळी मागणं अपेक्षित होत पण फासे उलटे पडले होते. दैवही जणू आज त्यांच्या सहाय्यावर नव्हते. आता काहीही केलं तरी ह्या क्षणाला अघोरी शक्तींचा प्रभाव सर्वत्र जोरावर होता. " लपतोस काय..? बोलावं तुझ्या देवाला... तुला वाचवायला... आला तर आधी त्याच्याशी लढते मग तुझ्याकडे वळते पण आज तुझ्याच रक्ताने खरी तहान भागवेन माझी... मज्जा येईल खायला... ही ही ही..." स्वतःशीच हसत म्हातारी घोड्यासारखी खींखाळली.

" पकडा रे..." करालच्या धारदार आवाजातील आज्ञेने सर्वच त्यांना पकडायला धावले. विश्वनाथ शास्त्री काही प्रयत्न करायच्या आतच मजबूत दोऱ्यानी बांधले गेले होते. परंतु इतक्या धावपळीत त्यांनी आपली मुठ खोलली नव्हती. 

म्हातारीला पाहिजे असलेलं भक्ष्य तिच्या समोर होत. आता फक्त तिला त्याला खेळवून मारायचं होत. त्यांच्या जवळ येत म्हातारी त्यांचं अंग हुंगू लागली. तिला कसलासा वास आला म्हणून आपल वाकड नाक तिने अजुनच फेंदारल. वासाची तीव्रता जाणवत होती परंतु कसला वास ते समजत नव्हतं. तिने आपल एक बोट उचलून शास्त्रींच्या अंगरख्यावर ठेवलं. बोटापेक्षा तिची नखच जास्त लांब होती. आताच खाल्लेल्या बळीच्या रक्ताचे थेंब अजूनही तिच्या नखातून ठिबकत होते. नखांवर मांसाचा थर जमा साचला होता. इथे एव्हाना शास्त्रींच्या हातातील दगड जळते निखारे बनले होते. वेदना असह्य होऊन त्यांची मुठ सुटली आणि सारे चमकणारे खडे जमिनीवर पडले. तिथल्या दाट काळोखात सारे खडे अत्यंत तीव्रतेने चमकू लागले. त्या प्रकाशाने करालचे डोळेदेखील विस्फारले. प्रकाशाची तिरीप डोळ्यावर पडताच म्हातारी जोराने किंचाळली. त्या किरणांनी तिची कातडी जळू लागली. त्या जाळाने ती तळमळत होती. आक्रंदत होती. त्यांचा डाव फसत होता. करालची कित्येक वर्षांची परीक्षा विफल होऊ पाहत होती. काही क्षणात सर्वशक्तिमान बनण्याची आशा बाळगणारा तो सर्व काही हातातून जाताना पाहु शकत नव्हता. त्याचे आधीच ताठरलेले डोळे अजुनच त्वेषाने भरले. त्याने एक जोराचा फटका शास्त्रींच्या मुखावर लगावला. त्याच्या हल्ल्याने शास्त्री रक्तबंबाळ झाले. यक्षिणी प्रसन्न नसली तरीही बाकीच्या सर्व ताकदवान शक्ती त्याच्याच अखत्यारीत होत्या. त्याने गडगडाटी आवाजात अघोरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या ताकदीची प्रचिती पुन्हा एकदा शास्त्रींना झाली. आतापर्यंत तेजाने तळपणारे सारे खडे आपलं तेज हरवून आपल्या मूळ दगडी स्वरूपात परावर्तित होऊ लागले. जर सर्व खड्यांचं तेज लोप पावल तर हे सगळं रोखणं असंभव होत. तो तेजस्वी प्रकाशच अंधाराचा मारक होता. शास्त्रींनी सावकाश झोळीतील चिमुटभर राख आपल्या जिभेवर घेतली व आपले मंत्रोच्चार चालू केले. मंत्रोच्चाराच्या साहाय्याने पुन्हा त्या खड्यांतील ऊर्जा जागृत व्हावी म्हणून डोळ्यांसमोर अंधारी येत असतानाही शास्त्री शकत तितक्या मोठ्या आवाजात मंत्र उच्चारू लागले. 

करालचा राग अनावर होत होता. एक सामान्य शूद्र मनुष्य आपल्याच गोटात राहून आपल्या विरोधात बंड पुकारतो हे त्याला सहन झाले नाही व इतके दिवस त्याने मनाच्या तळाशी डांबून टाकलेला अहंकार उसळी मारून वर आला. त्याने रागाने छाती पिटत गळा फाडून गगनभेदी गर्जना केली. बाजूची मगाशी बळीच्या मानेवर चालवलेली तलवार उचलून त्याने सर्व शक्तिनिशी शास्त्रींच्या अंगावर फेकली. बंदिस्त असल्याने त्यांना काही हालचाल करणं जमत नव्हतं. करालने फेकलेल्या तलवारीने तडक त्यांच्या छातीचा वेध घेतला. रक्ताची एक चिळकांडी म्हातारीच्या जळणाऱ्या अंगावर उडाली. ती त्याही जळक्या अवस्थेत भीषण हसली. शास्त्री आपली शुद्ध हरपत जमिनीवर कोसळले. त्यांच्या हतबलतेवर हसत करालने आपले मंत्रोच्चार अजुन जोमाने चालू ठेवले. खड्यातील प्रकाश अगदी अंधुक होत संपणार होता. तसंही म्हातारी आता करालवर खूष झाली असती. शास्त्री रक्ताच्या थारोळ्यात शेवटच्या घटका मोजत होते. श्वास बंद पडत होता. सर्व संपून जात होत...

इतक्यात सारे खडे पुन्हा एकदा लकाकले. ती सूक्ष्म चमक शास्त्रींच्या डोळ्यांनी अचूक टिपली. आपले अंधारी येऊन बंद होणारे डोळे मोठ्या कष्टाने उघडे ठेवत त्यांनी नजरेच्या टप्प्यातील अंधुक दिसणाऱ्या परिसराचा वेध घेतला. आपल्या नाजूक पैंजनांची किणकिण करत शशिकला नग्नावस्थेत हरिणीच्या चालीने चालत होती. माथ्यावरून मोकळे सोडलेले तिचे काळेभोर केस तिच्या कपाळावर लाडिक हालचाली करत होते. तिची गोरीपान काया त्या अंधारातही चमकत होती. नाजुक वळणाऱ्या तिच्या कंबरेची हालचाल सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत होती. थंडीने ताठरलेल तीच शरीर सर्वांच्या पौरुष्याला साद घालत होते. तिच्या शरीराच्या गंधाने मोहित होऊन करालचीही नजर तिच्या दिशेने वळली. आपल्या इंद्रियांवर वर्चस्व गाजवणाऱ्या करालचाही तीच निसर्गावस्थेतील रूप पाहून काम जागृत झाला. आपल्या उभ्या आयुष्यात कधी तरुण स्त्रीकडे कोणत्याच दृष्टीने न पाहणाऱ्या करालसमोर अप्सरेलाही लाजवील अस सौंदर्य त्याच्या कामाग्नीला साद घालत उभ होत. तिच्या सौंदर्याच्या रसापानात त्याच्या तोंडातून निघणारी मंत्राची आवर्तने कधीच बंद झाली. स्वतःच भान हरपून तिला न्याहाळताना त्याच शरीर कधी प्रणयातूर झाल त्याला कळलंच नाही. आजूबाजूच वातावरण विसरून तो थेट शशीकलेच्या शरीराशी भिडला. तेवढ्या काही क्षणांच्या अवधीत खड्यांची चमक पहिल्याप्रमाणे प्रखर झाली. चंद्रग्रहणाचा मुहूर्त कधीचाच टळून गेला होता. खड्यांच्या तेजाने म्हातारीच शरीर जळू पुन्हा जळू लागलं. तिच्या किंकाळ्यानी कराल भानावर आला. क्षणिक मोह त्याला भलताच महाग पडला होता. जळता जळता म्हातारी त्याला सर्व शक्ती गमावण्याचा शाप देऊन राख होऊन पडली. करालने चिडून शशीकलेचे केस खेचले त्याला त्यात काहीतरी वेगळं जाणवलं म्हणून गुरासारखे तिचे केस ओढू लागला. तिच्या केसातून एक प्रकाशणारा खडा घरंगळून जमिनीवर पडला. वेदनेने शशिकला जोराने किंचाळली. परंतु त्याला अजिबात दया येणार नव्हती. त्याच्या तेजोभंगाला शशिकलाही जबाबदार होती. त्याने आपली मजबूत लाथ तिच्या पोटात मारली. असह्य वेदनेने ती मागेच भेलकांडली. धावत जात त्याने तिचा गळा पकडला. सर्व शक्तिनिशी आपली बोट तिच्या नाजूक गळ्याभोवती रूतवत तिला परलोकी पाठवलं. एव्हाना पहाट झाली होती. त्याच्याच शक्ती त्याच्या गुलामीतून मुक्त होऊन भुकेने त्याच्यासहीत सर्वच अनुयायांवर तुटून पडल्या. पहाटेच्या किरणांबरोबर एक संकट टळलं होत मात्र शशिकला नाहक बळी गेली होती. 

परमेश्वर कृपेने विश्वनाथशास्त्री मात्र मरतामरता वाचले. त्यानंतर बरीच क्रियाकर्म करून सर्व शक्तींना बंदिस्त करून पृथ्वीला संकटमुक्त केलं. जे काही थोडे लोक वाचले होते त्यांच्याच हातात उरलेला सर्व कार्यभार सोपवला गेला. व त्या सर्वांनी करालच्या स्मृती इतिहासातून पुसून टाकल्या. त्यामुळे कुठेच कराल व इतर कोणाचाच उल्लेख कुठेही आढळत नाही. विश्वनाथशास्त्री मात्र भविष्य जाणून होते. कोणत्याही शक्तीला अंत नाही त्या अधांतरी कुठेतरी भटकत राहतील व त्यांची वेळ येताच त्या ह्या जगात पुन्हा प्रवेश करतील. त्यामुळे कोणा न कोणाला त्यांचा सामना करण्यासाठी कार्यक्षम राहण्याची गरज होती. म्हणून त्यांनी आपल्या काही निवडक अनुयायांना ह्या प्रकाराची कल्पना देऊन त्यावर शक्य त्या प्रकारचे उपायही सुचविले गेले. एका हस्तलिखिताच्या स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही माहिती हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे माझ्यासारखे काही लोक ह्या एकाच उद्देशाने आयुष्यभर तपश्चर्या करत आले आहेत जेणेकरून पुन्हा सामन्याची परिस्थिती उद्भवली तर पूर्ण तयारी असली पाहिजे. " बराच वेळ बोलल्याने गुरुजींना दम लागला. त्यांच्या एका अनुयायाने तत्काळ पुढे येत त्यांना पाणी पाजले. 

इतका वेळ केवळ श्रोत्याची भूमिका घेतलेला ओम बावरून गेला. एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशीच सगळी कथा होती. विश्वास न ठेवावा तर आतापर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण शुद्धीत अनुभवला होता. त्यामुळे हे सगळं स्वप्न समजून विसरू शकत नव्हता. मुख्य म्हणजे तो स्वतः का गोवला गेलाय ह्याच उत्तर त्याला पाहिजे होत. आणि फक्त गुरुजी त्याला उलगडा करू शकत होते. म्हणून तो शांतपणे गुरुजींच्या बोलण्याची वाट बघत बसला.

" बराच वेळ झालाय ओम.. दमला असशील ना.. बाकीचं सकाळी बोलूया का..?" शांत बसून पेंगणाऱ्या ओमकडे पाहत गुरुजींनी विचारलं.

त्यांच्या प्रश्नावर तो ताडकन जागा झाला. इतक्या विचित्र प्रवासाने थकण साहजिकच होत. परंतु सर्व तर्कसंगती लावून त्याचा मेंदू जास्त थकला होता. व इतका विचार केल्यावरही ठोस अस काहीच उत्तर मिळालं नव्हतं. " नाही गुरुजी.. मला ऐकायचं.. अर्धवट ऐकून रात्री त्याच विचारांत झोप नाही लागणार.." 

" बर ठीक आहे..." गालातल्या गालात हसत गुरुजींनी पुढे बोलायला सुरुवात केली. " खरतर करालने एक चूक केली होती. यक्षिणीविद्याप्राप्तीच्या नादात त्याने चुकून भलत्याच कुठल्यातरी शक्तीला आवाहन केलं होत. यक्षिणी असती तर आपला बळी घेऊन निघून गेली असती. मात्र ऐन वेळी कोपिष्ट होऊन आपण करत असलेली क्रिया चूक की बरोबर इतका साधा विचार करण्याची शक्ती तो गमावून बसला व चुकत जाऊन जे काही मंत्र उच्चारले त्याने एका भयानक शक्तीला आपल्या जगतात पाचारल. त्या खड्यांच्या मंतरलेल्या प्रकाशाने आपल काम चोख पार पाडून शक्ती परतवून लावली मात्र तिच्या शापाने करालही आपली शक्ती गमावून बसला. अर्थात ते बरच होत. संकट खूप जास्त वेळासाठी टळलं. परंतु ते जेव्हा परतेल ते त्याच्या कित्येक पटीने ताकदवान होऊन... वर्षानुवर्षे केलेल्या तपाने आम्हाला भविष्यात घडणाऱ्या काही घटना पहायची शक्ती दिली. व आमच्या पिढ्यानपिढ्या करालच्या कारवाया जाणून घेऊ लागल्या. त्यावेळी माझा जन्मही झाला नसेल तेव्हा आमच्या एका पूर्वजाला करालच्या परतीचे वेध मिळाले आणि सगळे सावध झाले. माझ्या कालावधीत तर आम्हाला अजुनच कडक आदेश होते. त्या ताकदिशी लढणारी आम्ही शेवटची तुकडी होतो. परंतु कदाचित योग्य माध्यम न मिळाल्याने करालच ह्या जगात प्रवेश करणं लांबत गेलं आणि आम्हा लोकांची वय वाढत गेली. ह्या नवीन पिढीचा कशावर विश्वास नाही की काही नाही. त्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे पण. म्हणूनच वारसदार कोणाला करावं ह्या संभ्रमात आम्ही सगळेच होतो. एव्हाना ती चा जन्म झाला होता.. अगदी खग्रास चंद्रग्रहणाच्या मुहूर्तावर... का कोण जाणे पण मनात तेव्हा पाल चुकचुकली होती. नंतर काहीतरी कारणाने तिची पत्रिका पाहिली आणि खात्री पटली की हीच करालच माध्यम होऊ शकते. त्यावेळी मी तिच्या वडिलांना थोडीफार कल्पना देऊन काही उपाय सुचवायचा प्रयत्न करून पाहिला. पण अंधश्रद्धेच्या नावाखाली तिच्या वडिलांनी माझं म्हणणं धुडकावून लावल. या ना त्या प्रकारे त्यांना मनवायचे हरेक प्रयत्न केले परंतु त्याला वैतागुन त्यांनी शहर बदललं. पुढे शिक्षणासाठी ती परगावी गेली. आधीच तिच्या पत्रिकेतील ग्रहदोषाप्रमाणे ती कोणत्याही अमानवी शक्तीसाठी उत्तम माध्यम होती. त्यात तिथे एकटेपणात ती बऱ्याचदा वैतागुन जायची व विरंगुळा म्हणून निरनिराळ्या कल्पना करत बसायची. कल्पनाही अशाच भयाण.. किळसवाण्या... विचित्र अशा... अशाच कल्पनेच्या माध्यमातून त्या सर्वांनी तिच्या शरीराला वापरत ह्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पृथ्वीतलावरची अस्तिकता त्यांना प्रवेश देण्यास नाकारते. परंतु त्यावर मात करून त्या सगळ्या शक्ती कधी ना कधी अवतरतीलच...." 

" परंतु तीच का... असे अजूनही लोक असतीलच ना ह्या जगात.. मी ही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच कल्पनाचित्र रंगवत बसतोच..." ओमने कधीपासून मनात ठसठसनारा प्रश्न विचारला. 

त्याच्या प्रश्नावर गुरुजी फिकटसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा. व तितक्याच शांतपणे उत्तरले. " ती म्हणजे.. शशिकलाचा पुनर्जन्म आहे.. " 

" काहीही..." ओम इतक्या सगळ्या कथांवर विश्वास ठेवणारा नव्हता. 

" हे खरंय ओम... माहितेय तुझा विश्वास बसणार नाही... मरण आपल्या शरीराला असतं.. आत्म्याला नाही.... " गुरुजींना माहित होत ओम सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातील नाही आहे. 

" माफ करा गुरुजी पण मी ही थिअरी मानत नाही." अत्यंत नम्र शब्दात तो उत्तरला. त्याला मनात मात्र आपल्या उत्तराने अनेक प्रश्न उठले. गुरुजींना वाईट वाटले तर... त्याची मान वर करून गुरुजींना पाहण्याची हिम्मत होत नव्हती. गुरुजींच्या बोलण्याची वाट पाहत तो तसाच मान खाली घालून बसला. 

" तुमच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर काही गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होतात ना. ह्या सगळ्या साखळीत कुठल्या ना कुठल्या नव्या जीवाची गुणसूत्र त्याच्या कोण्या पूर्वजाशी मिळतात व त्याची ठेवण व वागणूक बरीचशी त्या पुर्वजाशी मिळतीजुळती असते. आणि आपण म्हणतो आपला एखादा पूर्वज जन्माला आला.... बरोबर ना..." गुरुजींकडे विज्ञानी भाषेतही उत्तर होते.

" हो..." ओमने थोड्या संभ्रमित स्वरात उत्तर दिले. 

" मी ही चांगला शिकलेला आहे म्हटलं.." ओमचा चेहरा पाहून गुरुजी पोट धरून हसू लागले. त्यांच्या हसण्याने त्यांची लांब दाढी मजेशीर उडत होती. " घर संसार आणि नोकरी सांभाळत ही जबाबदारी पार पाडत आलो आहे. कथेतल्या ऋषीमुनींसारख आयुष्यभर रानात राहून तपश्चर्या करणं नाही जमलं...." 

" माफ करा..मी.." ओम पूर्णतः ओशाळून गेला. आता यापुढे काय बोलायचे हे त्याला काही सुचेना.

" बघ ओम... तुमची पिढी म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अश्या विचारसरणीची.. सगळ्याचे पुरावे हवे असतात. पण पुरावे नसतील तर ती गोष्ट नाहीच अस नसत ना... मन,भावना ह्या गोष्टींना दृष्य स्वरूप नाहीये पण आपण मानतोच ना की ते आहे...मग.... शास्त्रज्ञाना शोध लागायच्या आधीही बऱ्याच गोष्टी अस्तित्वात होत्या की... त्यांनी त्या फक्त शोधून काढल्या बनवल्या नाहीत.. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर आपण मानव केवळ एक टक्का जाणतो ह्या विश्र्वाबद्दल. उरलेलं नव्व्यांनव टक्के काय ते माहीतच नाही आपल्याला... एक ना एक दिवस कदाचित ह्या सगळ्याचे पुरावे सापडतील पण आपण तेव्हा कदाचित असू नसू... असो.." 

" गुरुजी... शशिकलाचा पुनर्जन्म झाला म्हणून करालच्या शक्तींना काही ना काही कनेक्शन मिळालं पुन्हा परतायचं... ओके... पण करालने तर तिचा बदला घेतला पाहिजे ना..." ओमने अप्रत्यक्षरीत्या मान्य करून टाकलं.

" करालचा तिच्याशी सामना शेवटी झाला होता.. त्याने त्याच जन्मात तिचा जीव घेतला होता. त्यामुळे तो तिच्या मनाशी काहीच धागा जुळवू शकत नाही. जे कोणी येऊन तिच्याशी संबंध प्रस्थपित करतंय तो चांद्रहास आहे..." गुरुजींनी खुलासा केला.

" चांद्रहास... हा त्याच काय झालं... त्याचा कुठे उल्लेखच नाही आला..." ओमने आश्चर्याने विचारल. 

" सगळ्या प्रकारात मुख्य भूमिका त्याचीच होती. सगळ काही त्यानेच घडवून आणलं. मात्र शेवटच्या प्रसंगी त्याच्याकडे कोणत्याच शक्ती नसल्याने त्याने बघ्याची भूमिका घेतली. अघोरी शक्तींकडून जसा कराल मारला गेला तसाच चांद्रहासदेखील मारला गेला..." 

" आणि आता दोघे मिळून पुन्हा येतायत तेच सगळ करायला... ती फक्त माध्यम आहे. एकदा ते परत आले तर ह्या जन्मातही तिचा बदला घेतला जाईल का..?" ओमने शंका विचारली.

" कदाचित हो.. मागच्या वेळी त्यांच्या ऱ्हासाला तीच कारणीभूत ठरली होती. त्यांना पुन्हा कुठलाही धोका पत्करायचा नसेलच. म्हणूनच ती हे त्यांचं पहिलं लक्ष्य असेल..." गुरुजींच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली.

" तिला आधी वाचवलं पाहिजे गुरुजी..." ओम काळजीच्या स्वरूपात उद्गारला.

" हो आणि ते फक्त तूच करू शकतोस..." गुरुजींनी जणू मोठा रहस्यस्फोट केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror