शब्दसखी सुनिता

Inspirational

4  

शब्दसखी सुनिता

Inspirational

तरीही ती लढा देत राहिली

तरीही ती लढा देत राहिली

4 mins
199


   संध्या अतिशय गरिब कुटुंबातील मुलगी. आई - वडील , बहीण आणि आजी असा तिचा परिवार.दोन एकर शेती होती. तिथेच त्यांची छोटी झोपडी होती. शेतीत कष्ट करून ते आपल पोट भरत होते. दोन्ही मुली शिकत होत्या. संध्याचे घरचे सगळे अशिक्षीत होते. संध्या शेतात जाऊन सुट्टी असली की शेतात मदत करायची. पाचवीला होती ती. पिक चांगल आल तर चांगल नाहीतर  कर्ज काढाव लागत. सगळ ठीक चालू असताना  एक दिवस वडील त्यांना सोडून गेले.


     सगळी जबाबदारी संध्या आणि आईवर  येऊन पडली. दुसर कोणीच त्यांना आधार नव्हत. मोठ्या हिंमतीने तिने आईला आधार दिला. आई शेतात काम करायची. संध्या तिला मदत करत असे. आजी जमेल तेवढ करायची.

पण त्यांना पैसे पुरत नव्हते. घर चालवणार का शिक्षण करणार म्हणून संध्या सुट्टीच्या दिवशी दुसर्‍याच्या शेतात काम करायची.आईचीही तब्येत मध्येच बिघडायची.मग संध्या ला खुप भिती वाटायची. आपल कस होणार.पण तिला समजल किहीतरी करू. तिने हिंमत हारली नाही. ती स्वतः एकटी लढा देत राहीली. ती आठवीत गेली तर आजीही त्यांना सोडून गेली. संध्यावर दुसरा आघात झाला. तिची आईतर खचून गेली. आजी होती तर त्यांना आधार होता. घरात मोठ माणूस कोणी नाही राहील आणि दोन्ही मुलींच पुढे कस होणार म्हणून विचार करू लागली. संध्याने मात्र अश्रु आवरले,स्वतःला सावरून तिने आईला धीर दिला.


   मी आहे तुझ्यासोबत आईला सांगितल. संध्याची बहीण राणीही आता मोठी झाली. ती पण शेतीत मदत करू लागली. संध्या दहावी पर्यंत शिकली. पुढे परिस्थिती आणखी बिकट झाली म्हणून तिने शाळा सोडली.शेतात पूर्ण दिवस काम करू लागली. शेतीत भाजीपाला व फळांची लागवड केल्याने चांगल उत्पन्न मिळू लागल.आई तर खूप मेहनत घेत होती. संध्या जीवाच रान करत होती. ती आता मोठी होऊ लागली. दिसायला दोघीही छान होत्या.

संध्या गावात काही कामासाठी गेली की मुले तीची छेड काढायची. तसेच बहीणीला त्रास देऊ लागली. पण ती डगमगली नाही. तिने ती त्यांना धडा शिकवू लागली. मग कोणी त्यांच्या वाटेला जात नसे. आपल्यालापाठी मागे कोणी नाही म्हणून लोक गैरफायदा घेतात. आपण खंबीर राहील पाहीजे हे तिने ठरवलच होत. त्या दोघी मोठ्या होत आहेत म्हणून आईला जास्तच काळजी लागून राहीली. थोडे पैसे जमवले होते . त्यातच आईने संध्याच लग्न ठरवल. शेजारच्या गावातील मुलगा त्याची आईही म्हातारी होती. तो चांगल काम करतो. म्हणून आईने संध्याच लग्न प्रकाशबरोबर लावून दिल.

संध्याच्या आईची कळजी मिटली.आई आणि बहीण आता शेती करत होत्या. संध्याच सगळ व्सवस्थित चालू होत. ती घरच आवरून दुसर्‍याच्या शेतीत जायची. परिस्थिती इथेही बेताचीच होती. प्रकाश काम करत होता. पण एकटा माणूस 

काय करणार म्हणून हातभार लावत होती. घरी सासुबाईच पण ती करायची. घरच आणि बाहेरच होन्ही बघत होती. एक दोन महीन्यांनंतर अचानक प्रकाशच वागणच बदलल. तो मित्रांसोबत गावात दिवसभर फिरायचा आणि रात्री दारू पिऊन यायचा. संध्याला तो त्रास द्यायला लागला. तिला पैसे मागत , नाही दिलेतर तो मारहाण  करत. प्रकाशला त्याची आई समजावत होती पण तो दोघींच पण ऐकत नव्हता. त्याने काम करण सोडल. नुसत दारू पिऊन येणे फिरणे 

अस त्याच चालत. दिवसभर भटकत आणि रात्री घरी यायचा. संध्या त्याला खुप समजावत होती. पण तो ऐकतच नव्हता. इकडे आईला काय  सांगू म्हणून ती सगळ ठीक आहे म्हणून सांगायची. आईही एकदिवस त्याला सोडून गेली तरी काडीमात्र त्याच्यात फरक नाही पडला. सहा महीने झाले लग्नाला पण प्रकाश सुधरत नव्हता. इकडे संध्या मात्र कष्ट करून संसार 

कसाबसा चालवत होती. आता ती एकटी पडली.

प्रकाश तर आता अति करायला लागला. तो संध्याला तुमची जमीन विकून मला पैसे द्या अस म्हणायचा पण कस शक्य आहे?अस केल तर आई आणि राणी कुठे जातील हा विचार करून गप्प बसून त्याचा त्रास सहन करत होती.तो खूप छळ करू लागला. तिने त्याला खूप समजावून सांगितल. त्याने  खूप कर्ज करून ठेवल होत. त्यातच तो खूप आजारी पडला अचानक त्याला हाॅस्पिटल मध्ये दाखल केल. तब्येत खूप बिघडली. तिने आईला बोलवून घेतल. आई आणि संध्या  हाॅस्पिटलमध्ये संध्याला धीर देऊ लागला. डाॅक्टरांनी सांगितले की व्यसनामुळे हे जास्त दिवस जगणार नाही.आम्ही प्रयत्न करीत आहोत.


   पण संध्याने प्रकाश बरा व्हावा म्हणून पैशाचा विचार केला नाही.आईनेही जमा केलेले पैसे लेकीला देऊन टाकले. संध्याने पण जमा केलेले पैसे सगळे प्रकाशसाठी खर्च केले. पण यातून तो काही वाचू शकला नाही. व्यसनामुळे त्याचाबळी घेतला. तो तर व्यसनामुळे गेला. पण प्रकाशने करून ठेवलेल कर्ज आणि हाॅस्पिटलच खर्च यामुळे ते कर्ज फेडता फेडता संध्याचे 

खूप पैसे खर्च झाले. ती प्रकाशला वाचवू शकली नाही, याच दुःख तिला होतच. पण तिला सावरण खुप कठीण होतो. पण आपण हारलो तर आईच आणि बहीणच काय होईल ? म्हणून आईकडे ती आली आणि शेती करू लागली.

नशीब साथ देतच नव्हत. वडील गेले, आणि आता नवराही तिला सोडून गेला. खुप आघात मनावर झेलत ती कष्ट करत होती. आईही थकली होती. राणीच काॅलेचही चालू होत. संध्या मनातून खचली होती. पण मन घट्ट करून ती आलेल्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात होती.

तिची बहीण संध्याला बाहेरून परिक्षा  दे, काहीतरी कर असच कष्ट कधीपर्यंत करशील ?अस सांगत होती. ते ऐकून ती पण जरा विचार करते आणि बाहेरून बारावीचा परिक्षा देऊन ती उत्तीर्ण होते, तिचा आत्मविश्वास वाढतो, मग ती शेती करता करता पोलिस भरतीची तयारी करते. सराव करते. तिचा निश्चय होता की आपण पोलीस बनायच तिने पोलिस भरतीत ती पहिल्याच प्रयत्नात फिजीकल आणि  लेखी परिक्षा उत्तीर्ण होते . तिच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. बहीणला आनंद

 झाला. गावात तिच खूप कौतुक झाल, सत्कार झाला. तिलाही आनंद झाला. आपण केलेल्या कष्टाच चीझ झाल. संध्या लवकरच पोलीस सेवेत रूजू झाली. तीने आई आणि बहीणीची जबाबदारी घेतली.


  संध्याने लहानपणापासून येणार्‍या संकटांचा  जिद्यीने सामना केला , ती हरली नाही. थांबली नाही.कष्ट करत राहीली. नशीब साथ देत नाही  म्हणून डगमगली नाही उलट नशीबालाही  तिच्यासमोर हार मानावी लागली. अखेर आयुष्याचा लढा संध्याने यशस्वी करून दाखविला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational