तोची दिवाळी दसरा .....
तोची दिवाळी दसरा .....
घरात आज आमच्या तिघांची वेगळीच लगबग सुरू होती. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली वरच्या मजल्यावरचे छबू काका दरवाजा उघडताच आत आले. "कुठे आहेत वहिनी ? आवरल नाही का अजुन? किती वेळ लावताय?" - छबू काका वैतागुन म्हणाले.
"हो हो आवरतच आहे ती येइलच इतक्यात"- बाबा छबू काकांना म्हणाले.
आमचे छबू काका नावाप्रामानेच अगदी विनोदी आहेत. त्यांच्या समोर उभ राहाण्याची कोणाची हिंमतच नाही, त्यांना घाबरून नव्हे तर ते कुठल्याही विषयावर ओढून ताणून चर्चा करू शकतात. माझ नशीब त्या दिवशी खुप खराब होत आणि जिन्यात आमची भेट झाली. तेव्हा छबू काकांनी शिवकालीन कोरोना तत्कालीन अफजलखान अन शिवाजी माहाराज यांची गळाभेट आणि अफजलखानाच्या वधानंतर महाराज चौदा दिवस कोरंटाइन हां अप्रतिम विषय आहे नाटक लिहिन्यासाठी यावर माला जवळ जवळ पावून तास लेक्चर दिले होते. दातात फट असल्यामुळे पावून तास मी त्यांच्या सैनिटायझर ने चिंब भिजलो, खरा अन्याय तर त्यांचा नातू सहन करतो जेव्हा हाताच्या पंज्याचा कना ताठ करूँन बोट आणि अंगठा यातील मधली जागा ओठाजवळ लावून ते जेव्हा रेल्वे कशी धावते याचा आवाज काढून दाखवतात. तेव्हा मात्र त्यांच्या नातवाची दुसर्यांदा अंघोळ होते. तर असे हे आमचे छबू काका अगदी मनमौजी माणूस आहेत.
" आई आवरल का? किती वेळ लावतेस चल न पटकन ? " दादा आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाला. आमचा दादा म्हणजे आमच्या आईच गुणी लेकरु, बाबांची शान, नेहमी नाकाच्या सरळ रेषेत चालनार गुणी बाळ अशी काहीशी त्याची मूर्ति.
त्यानंतर मी आईची भलीमोठी बैग हॉल मध्ये
घेवुन आलो. कदाचित आईला आवरायला आणि घराच्या काळजीने तिचा हात उचलत नसेल तिचा पाय घरातुन निघत नसेल म्हणून मी तिची आत मदत करत होतो.
किती वेळानंतर माझ्यामगुन आई आली तोंडाला पदर लावून आतल्या आतच हुंदके देत होती, परत परत मागे घराकड़े पाहात होती. एकता कपूर च्या डेलीसोप ला ही लाजवेल असा सीन आमच्या घरात सुरु होता. त्यात विर्झन घालीत बाबा जोऱ्यात ओरडून म्हणाले- " दोन दिवसच तर जातेस ना माहेरी?, मग कशाला एव्हडि नाटक करतेस?"
तोच आईने आपले खरे रूप दाखवन्यास सुरुवात केली तोंडावरचा पदर कमरेला खोचुन आई अलका कुबल ची उषा नाडकार्नी होवून म्हणाली - " दोन दिवस चालले आल्यावर दोन महिन्याचा पसारा करून ठेवला तर याद राखा माझ्या एव्ह्ड वाईट कोणीच नाही."
यावर आमच्या तिघाही बापलेकांचे मन सोबत उच्चारली - " कोणी असूच शकत नाही." आता तुम्हाला समजले असेल एव्हडी घाई कशासाठी चालू होती?
" बर गिळायच काय करणार आहात? नीट स्वयंपाक करून चालले. उगीच बाहेरून नॉन व्हेज ची भाजी आणून माझ्या मेथी मोती ला टाकायची नाही. पोट दुखते त्याच" यावर आनंद झाला म्हणून मोती 2 वेळेस भूंकला आणि आमची तिघांची मने एकसाथ उच्चारली - " बिचारा मोती, मोतीच अस तर आमच कस होत असेल ?"
" नाही ग ....तुझ्या हातची सर त्या होटेल वाल्याला थोडीच येणार आहे?" - बाबा घाबरून म्हणाले की प्रेमाने हे तुम्हीवच ठरवा.
बर मुलांनो मी आईला सोडायला स्टेशन वर चाललो आहे तिकडून तिकडेच छबू काकांच कलेक्टर ऑफिस ला काम आहे यायला उशीर होईल" - बाबांनी सुचना केल्या.
"मी सुद्धा आज अभ्यासिकेत ज़रा जास्त वेळ बसणार आहे, मालाही उशीर होईल" - दादाच्या या वाक्यावर आईच्या हाताने दादाची दृष्ट काढली आणि डोळ्यांनी बघ शिक ज़रा अशी ताकीद दिली.
यावर मी सुद्धा म्हणालो - आज माझ्या एकांकिकेची तालीम सुद्धा खुप वेळ चालेल. कोस्टूम फायनल करायचे मला हो खुप वेळ लागेल.
यावर सर्वांनी माना डोलावल्या आइसोबत आन्ही सर्व घर लॉक करून बाहेर पडलो. तेव्हड्यात आईला सुर्वे वहिनी दिसल्या. " अग बाई....सुर्वे वहिनी ज़रा एकता का? ज़रा गावी निघाले मुल आणि हे घरी आहेत ज़रा लक्ष ठेवाल का? - आई म्हणाली.
- "हो...हो.... ठेवेल की अगदी घरच्याप्रमाने लक्ष ठेवेल." सुर्वे काकू लाडात येवून म्हणाल्या..
यावर परत आमच्या तिघांची मन एक होवून म्हणाली - " हिने हे बाकी चांगल केल."
आमच्या पुढ्यात टैक्सी आली. आम्ही भराभरा आईचे सामान टैक्सीत टाकले. आईची बडबड काही केल्या थांबेना मग छबू काकांनि दरवाजा उघडला व बाबांनी लोटत लोटत आईला टैक्सी मध्यॆ टाकले व टैक्सी तिथून निघुन गेली.
" चल बंड्या येतो मी खुप अभ्यास करायचाय बाबा. बर माला सांग तुला खरच उशीर लागणार आहे का रे?" - दादा म्हणाला.
" हो .....का रे काय झाल?" - मी म्हणालो.
"नाही रे काही नाही सहजच." अस म्हणूनन तिथून दादा निघुन गेला.
तो गेलाय याची खात्री करून घेतली अन खिशात हात घालून मोबाईल काढला अन राजेश ला फोन केला. " अरे ऐक ना......घरी कोणी नाही आज......."
एव्ह्डच बोलून फोन कट झाला मी हैल्लो हैल्लो करत खिड़कीजवळ ज़ात असतांनाच आमची नाटक मंडळी माझ्याआधी खिड़कीजवळ हजर होती. त्यात आमच्या जोश्याने तर कहरच केला घरी कोणी नाही म्हान्ल्यावर भरलेल्या हातानेच जेवण्याच्या ताट़ावरुन उठून आला. व्यवस्थापनात आमच्या नाटक मंडळींचा कोणी हात घरु शकत नाही. एरवी नाटकामध्ये कुठली प्रोपर्टी कुठे वापरायची हे माहीत नसलेली पोर घरी कोणी नाही म्हान्ल्यावर एक हाफ, दोन शेंगदान्याच्या पुड्या, मुगड़ाळ वगरे घेउन लढाईला चालल्यासारखे तैयार असतात.
शेजारच्या काकुंना घरी मी घरी आलेलो आहे हे समजू नए म्हणून आम्ही सर्व खिड़की मधुन आत गेलो. आमच्या अतिउत्साही नाटक मंडळींने लगेच बैठकिला सुरवात केली. थोडीशी दारु पोटात गेल्यानंतर आमच्या नाटक मंडळीमधील नटसम्राट जागा झाला.
इतक्यात मला खिड़की मधून खुडखुड असा आवाज आला मी सतर्क झालो सर्वांना कसबस शांत करीत मी मधल्या रुम मध्ये घेउन गेलो. बाकी बाटल्या वगरे सर्व सोफ्याच्या खाली सरकावून मी सर्वांना शांत करीत मी आतल्या रूम मधून डोकावून पाहू लागलो. आम्ही ज्या खिड़कीतून आत आलो ती खिड़की उघडल्या गेली अन त्यातून दादा मध्ये आला. मी बूचकाळ्यात पडलो दादा असा का आला असावा? मग दादाने खिड़कीतुन हात बाहेर केला अन खिड़की मधून आत आली एक सुन्दर मुलगी दादा ने लगबगीने खिडक्या लावून त्यावर पड़दे ओढले. त्या सुंदर मुलीकडे पाहून दादा म्हणाला -" आज घरी कोणी नाही फ़क्त आपन दोघच..." असे म्हणून दादा रोमांटिक गाने गुणगुनु लागला अन दोघेही मस्त कपल डांस करू लागली.
त्यात आमच्या धन्या ला ज़रा जास्तच झालेली होती. माला हुलकावनी देवून डगमगनाऱ्या पावलाने तो आतल्या रूम मधून निसटला अन ती सुंदर मुलगी लाजुन दादाच्या मिठीत जान्याऐवजी आमचा धन्याच दादाच्या मीठीत गेला. धन्याला दादाच्या मिठीत पाहून ती मुलगी जोऱ्यात किंचाळली, रोमांटिक मूड मधून बाहेर आल्यावर धन्याला पाहून दादाही किंचाळला,अन मी सुद्धा बाहेर येउन किंचाळलो आमच्या किंचाळन्याच्या जुगलबंदीनंतर आम्ही सर्व समोरासमोर आलो.
" तू गेला नाहीस नाटकाच्या प्रक्टिस ला?" - दपक्या आवाजात दादा म्हणाला.
त्यावर तितक्याच दपक्या आवाजात मी म्हणालो - " तू आज जास्त वेळ अभ्यास करनार होतास ना ? "
"आज अभ्यासिकेत खुप आवाज होता म्हणल घरी येवूनच अभ्यास करू वाटेत ही भेटली म्हणल सोबतच अभ्यास करू...हो...ना ?" दादा त्या मुलीकडे इशारे करून म्हणाला. त्या बिचाऱ्या मुलीला हो म्हानाव की नाही सुचत नव्हत. त्यावर विषय बदलावा म्हणून दादाने थोड्या मोठ्या आवाजात विचारल - " हां वास कसला येतोय रे ?"
त्यावर आमचा अती उत्साही धन्या डगमगनाऱ्या पावलांनी सोफ्याखालची बाटली काढून त्याच चुंबन घेउन त्याच्या वळनाऱ्या बोबडी त म्हणाला -" अर्रे....कसली काय वी...विचारतोयस दादा ....हां तर सुगंध आहे अत्तराच्या कु...कु.....कुपिचा."
यावर दादा चिडून म्हणाला - " काय हे बंड्या?"
" हा...हा...कशी वाटली आमच्या धनु ची ऍकटिंग? आणि रे दारु वगरे नाही फक्त रंगीत पाणी आहे" -मी हसण्यावारी नेवून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
"आन बघू इकडे" - अस म्हणून दादा ने सोफ्याखालचा ग्लास हातात घेतला अन त्यात उरलेला अर्धा पेग संपवला. माझ्यासकट सर्व दादाच्या तोंडाकड़े पाहू लागले.
" अजुन थोड टाक चव समजली नाही." असे म्हणून दादा ने अजुन एक पेग संपवला. नंतर त्या मुली च्या डोळ्यात दादा ला स्वताच क्लोजअप प्रतिबिंब न दिसता तो अक्खा दिसेल एव्हडे मोठे डोळे झाल्यावर दादा घाबरून म्हणाला - " रंगीत पानीच आहे ...."
त्यावर आमच्या आईच गुणी बाळ पुढे वहीनीच्या धाकात राहील याची शाश्वती माला भेटली.
"तुम्ही काय तुमची नाटकाची तालीम आहे ती इथे करा, आम्ही आमचा अभ्यास आत बेडरुममध्ये करतो." अस दादा म्हणाला. त्यावर आम्ही प्रक्टिस बेडरुममध्ये करतो तुम्ही अभ्यास इथे करा यावर आमचे वाद सुरु झाले. दादाने त्याच्या परीने माला हॉल मध्ये प्रक्टिस करन्याचे शक्य तितके फायदे समजावून संगीतले अन मी सुद्धा त्याला हॉल मध्ये अभ्यास करन्याचे फायदे समजावून सांगितले. शेवटी अभ्यास आणि प्रक्टिस दोन्हीही हॉल मध्येच होणार यावर शिक्का मोर्तब केला. दादा त्या मुलीला घेउन एका कोपऱ्यात अभ्यासाला बसला आणि दोघांनिही एकाच पुस्तकातून अभ्यास सुरु केला. अभ्यास कदाचित विनोदी असावा म्हणूनच मधुन मधून हसन्याचे आवाज येत असावेत असो अर्धवट राहिलेली बैठक आमची वाट पाहात होती.
अर्धा पावून तास झाल्यानंतर दादाही त्याच्या गुलाबी अभ्यासात मग्न झालेला होता अन अन आमचीही तालीम रंगात आली होती. तेव्हडयात दारावर कसला तरी आवाज झाला. आता ह्या आनिबानिच्या प्रसंगात अजुन कोणत संकट उभ ठाकल या विचारानेच आम्ही सर्व जन घाबरुन गेलो होतो. दादा येण्याच्या आधी ज्या जागेवर लपलो होतो परत त्याच जागेवर जावून लपलो . फरक एव्ह्डाच की दादा अन वहिनी सुद्धा त्याच जागेवर लपलेले होते.
दरवाजा उघडला अन बाबा अन छबू काका लगबगीने आत आले. खर तर बाबा ही खिड़की मधुनच आत यायला हवे होते? आता फ़क्त दादाच अन माझ मन सोबत म्हणल. घरी मूलं नाही वाहिनी नाही या विचाराने अती उत्साहीहोवून छबू काकांनी त्यांच्या पिशवीमधील बाटली काढली ती डोक्यावर ठेवली अन विक्षिप्तपने नाचु लागले यावर बाबाही ही रंगात येउन ते सुद्धा नाचु लागले.
इथे माला मी त्यांचाच मुलगा आहे याची खात्री पटली कारण आमच्या दोघांचाही ब्रांड एकच होता.
त्यावर आमच्या धन्याला परत हुक्की आली अन आमच्या सर्वांच्या नजरेतुन निसटून तो परत बाबा अन छबू काकांच्या सोबत नाचायला गेला. बाबा ही एव्ह्डे मग्न होते की आपल्या नृत्यकलेमध्ये कोणीतरी वेगळाच येवून रंग भरतोय याची जाणीवही त्यांना झाली नाही. नागिन डांस करतांना बिन वाजवनारे छबू काका नसून धन्या आहे हे समजताच बाबा जोऱ्यात किंचाळले, त्यावर आमचा धन्याही कींचाळला, त्यात आमच्या भावी वहिनीसाहेबांना दाराच्या मागे विस फुट अंतरावर एक झुरळ दिसल
त्यामुले त्या किंचाळल्या.
आम्ही सर्वजन बाहेर आलो. दोन मिनिटे वादळापूर्वीची नीरव शांतता पसरली. आम्ही सर्व एका ओळीत खाली मान घालून बाबांसमोर उभ होतो. धन्या अजुनही बिन वाजवण्याच्या भुमिकेतुन बाहेर आलेला नव्हता. बाबा आले हे समजल्यावर श्रीकृष्णाच्या पोज मध्ये बिन ची बासरी करून उभा होता.
त्याला सावरत आता बाबा काय म्हणतील याची वाट पाहू लागलो.
त्यावर दपक्या स्वरात बाबा म्हणाले-" तू तर अभ्यासीकेत जाणार होतास ना?" आणि माझ्याकडे पाहून - " तुझी तालीम आज खुप वेळ चालणार होतीना ?" यावर तेव्हड्याच दपक्या आवाजात आम्ही दोघेही सोबत उच्चारलो - " तुम्ही सुद्धा आज कलेक्टर ऑफिस ला जाणार होता ना ?"
तेव्हड्यात बाबांना सोफ्याखाली सरकवलेली बाटली दिसली अन सोफ्याच्या बाजूला उभी असलेली दादाची मैत्रीनही दिसली. बाबा जोऱ्यात खेकसले - " बंड्या काय हे ...? , आणि ही मुलगी कोण?" यावर दादा आणि मी दोघेही खोटे खोटे हसू लागलो कसाबसा वेळ मारण्याचा प्रयत्न करू लागलो. " हसू नका काय प्रकार आहे सांगा..." बाबा अजुनच चिडून म्हणाले. त्यावर दादा म्हणाला - " हि बंड्याची नाटकाची प्रक्टीस चालु आहे. काय मस्त नाटक करतो आपला बंड्या अगदी हुबेहूब आणि ह्या बाटल्या त्याच्या नाटकाचाच एक भाग आहे."
नंतर मी म्हणालो - " आणि बाबा हि दादासोबत अभ्यासिकेत असते. त्याचीच वर्ग मैत्रीन खुप हुशार आहे. दादाच्या अभ्यासिकेत लाईट नव्हती म्हणून इथे आलेत अभ्यासाला ......हो न .....दादा ...?"
राम-लखन, जय विरु, अजय विजय, यांच्या जोड़ीलाही लाजवेल अशी आमची मने सोबत गाऊ लागली-" ये बंधन तो प्यार का बांधन है जन्मो का संगम है ।" यावर दादाच लक्ष छबू काकांच्या हातात असलेल्या दारूच्या बाटलीवर गेल त्यावर दादा तेव्हडच चिडून म्हणाला - "बाबा काय हे ? काकांच्या हातात खरी खुरी दारुची बाटली ?"
त्यावर आमच्या सर्वांचा "औ........" असा कोरस लागला. यावर बाबांनी अन छबूकाकांनि दोघांनिही हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर - " हसू नका? काय प्रकार आहे सांगा" घाबरत घाबरत खडसावून प्रश्न दादाने केला.
" अरे .....ते....त्याच ......हां हे आपले छबूकाका त्यांच्या घरी त्यांची बायको त्यांचा खुपच छळ करते रे...त्यांच्या मनात खुप दुख: आहे त्यांना मोकळ होण्यासाठी थोड़ी मदत करावी....हो की नाही रे...."
बाबा छबू काकांना खुनावत म्हणाले.
बाबांचा इशारा समजुन छबू काका बळजबरीच रडन्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच रडन खोट आहे हे दिसून येत आहे हे लक्षात आल्यावर बाबांनी त्यांना मिठी मारून -" असू दे ....असू दे....छबू ...नको रडू मी आहे ना ....." असा दिलासा दिला.
आता बाबा दिलासा देण्यासाठी दादा अभ्यास करन्यासाठी आणि आम्ही प्रक्टिस करण्यासाठी कुठे बसणार यात पुन्हा एकदा वाद सुरु झाले.
यावर बाबांनि बेडरुमवर आपला मालकी हक्क दाखवत ते आणि छबू काका मध्येच बसनार हे ठरवून टाकले. आम्हाला सुद्धा इतक्यात घरातून बाहेर हाकलल्या जायच नव्हत. त्यामुळे बाबांच्या आदेशाला होकाराच स्वरुप देवून मी माझ्या नाटकाच्या प्रक्टिस ला लागलो अन दादाही त्याच्या अभ्यासाला लागला.
बऱ्याच वेळाने बाबा बाहेर आले. - " अरे तुमच्या नाटकाच्या प्रक्टिस मध्ये मुगडाळीचा काही रोल नसेल तर आम्ही घेउ का? "
त्यावर आमच्या धन्या ने उरलेली नाटकाची प्रक्टिस आमच्या बाबांसोबतच केली. छबू काकांची अन धन्याची जागतिक दर्ज्याची महाचार्चेला उधान आलेल होत. तेव्हड्यात आमचा बाहेरचा मोती जोरजोऱ्यात भुंकु लागला. तोच दादा तडकन उठून बाहेर आले. दादासुद्धा कावरा बावरा झाला अन माझ दारुड्याच्या रोल साठी आनलेल आवसान क्षणात उतरल आता मात्र मोती ज़रा जोऱ्यात भुंकु लागला तोपर्यंत इकडे व्यस्तित आवरा सावरी सुरु झाली, बाबा सोफ्यावर तिन दिवसा पुर्वीचा शीळा पेपर उलटा वाचत बसले. दादाने वहीनीला एका कोपऱ्यात व स्वताला एका कोपऱ्यात बसवून तिथून च गणिते सोडवू लागला. मी सुद्धा धन्याला कसाबसा खिडकिच्या बाहेर काढायचा प्रयत्न करू लागलो.
दारावरची बेल वाजली परत सगळेच जन कावरे बावरे झाले. मोती भूंकल तेव्हाच आई आलेली याची खात्री झालेली होती. दोन तीन वेळेस बेल वाजली यावर काय काराव? आईला काय सांगाव ? या विचारात असतांनाच धन्या परत निघाला अन धाड़कन दार उघडल.
तोच आई रूद्र अवतार घेवुन हातातली बैग आपटीत एका हातात अंगन झाड़ायचा खराटा घेवुन आई रागामध्ये आतमध्ये आली.
आमच्या तिघांचे मन आता सोबत थर थर कापू लागली "सगळ तर आवरलय, रूम फ्रेशनर तर मारलय, धन्याच्या तोंडात एक मुठभर बड़ीशेप टाकली परन्तु आईला समजल तरी कस ?"
" अरे.....? तू ....? तू तर गावाला गेली होतीस ना ?" बाबा दपक्या आवाजात म्हनाले. परंतु आता समोरून दपका आवाज नव्हता तो होता फ़क्त रूद्र अवतार. "काय हो? हे पराक्रम गाजवताय का मी नसल्यावर." - आईने बाबाकड़े डोळे वटारले.
बाबांचे ओठ तर हालत होते पण आवाज काही निघत नव्हता. वडीलांनी यावर घरातल्या थोरल्या मुलाला पुढेकेले. " आई........तू....तू....गावाला जाणार होतीस ना?" असे घाबरत घाबरत दादाने म्हणून टाकले. आईचा चंडी अवतार पाहून छबू काका म्हणाले - " माझ दुःख आता संपलय ...खुप हलक हलक वाटतय येतो मी ..."
" माला सुद्धा घरुन फोन येता आहेत खुप उशीर झालाय ....मलाही जाव लागेल.." भावी सासूबाईंच्या रागाला घाबरून मोठ्या सुनबाईंनी पळ काढायचा प्रयत्न केला.
शेवटी "कोणीही येऊ देत.... नडला कि फोडला... आमच्या भावाशी वाकड त्याचे नदीवर लाकडं ..." अशी फालतू डायलॉग मारणारे आमचे मित्र मंडळी निघायचं पाहात होती. तोच आईने धन्याला धरले , " तुम्ही कुठे जाताय साहेब कार्यक्रम नीट पार पडला आभार प्रदर्शन घेऊन जा.."
आईने सांगायला सुरवात केली, - " मला स्टेशन वर पोहोचायला थोडा उशीर झाला अन माझी गाडी सुटली हेच सांगायला मी फोन केला पण कोणीच उचलत नव्हते नंतर लाइन्ड लाईन वर लावला तेव्हा या धनंजय साहेबानी फोन उचलला. अन रॉंग नंबर म्हणून फोन तसाच ठेवला तुमचे सर्व प्रताप ऐकले हो फोनवर.."
" आता कोणीही कुठेहि जाण्याची गरज नाही...." असे म्हणून आईने सर्व उपस्थितांना कार्यक्रमाच्या शेवटी खराट्याच्या महाप्रसादाची सोय केली अन बाबांसकट सर्वजण प्रसाद टाळन्यायासाठी घरभर अस्ताव्यस्त धावू लागले.
आमच्या दिवाळी दसऱ्या वर संक्रात जरी आली असली तरी फटाके मात्र भरपूर फुटले यात शंका नाही.
