STORYMIRROR

Abhishek Gosavi

Drama Romance Fantasy

3  

Abhishek Gosavi

Drama Romance Fantasy

बहरलेली रात्र

बहरलेली रात्र

5 mins
221

            

कबीर आणि राधा हे नवविवाहित दांपत्य नुकतेच दोन वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या विवाहाला . कबीर मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे तसेच राधा चा स्वताचा क्लास आहे आधी चार वर्षाचे प्रेम अन मग त्यानंतर लग्न आसा त्यांचा प्रवास होता. दोघांच्या ही घरचे वेल ऐज्यूकेटेड असल्याने लग्नाला काही प्रॉब्लम आला नाही. त्यामुळे प्रेम मिळवन्यासाठी फार काही कष्ट त्याना घ्याव लागले नाही.

    रोज नेहामि प्रमाने राधा आपले काम आवरून कॉफ़ी चा मग हातात घेउन नेमकी बसणार तोच दाराची बेल वाजली .कपाळावर आठ्या आनीत तिने तो दरवाजा उघडला दरवाजा उघडताच कबीर तिच्या अंगावर खेकसला, "तू मला आज एकही फोन का केला नाहीस ?" थक्क झालेली राधा स्वताला सावरत म्हणाली,"अरे आज दुपार पासूनच माझा फोन डेड आहे बँट्री प्रॉब्लम आहे कदाचित "

कबीर - अरे मग दुसर्याच्या फोन वरुन फोन करायचा ना

राधा - अरे पण झाल तरी काय एव्ह्डा का चिडतोय?

कबीर - अग काय सांगू तुला आज माझा मोबाइल चोरीला गेलाय

राधा - काय ?

कबीर - हो ना ..

राधा - अन तसही मी कॉल लाउन तो तुला कसा आला असता ?

कबीर - नाही पण मी ह्या काळजित होतो की तू कॉल केला अन मी उचला नाही ह्या गोष्टिने तू घाबरुन जाशील

राधा - अरे माझा मोबाईल खरच आज दुपारपासून खराब झालाय बरं चिल शांत हो हात पाय धूउन घे मी जेवायला वाढते.

कबीर - हो जेवायला वाढ डोक काम करत नाही त्याच्याशिवाय माझ

आता कबीर चा पारा चढ़लाय अन कबीर ला भूक लागल्या नंतर तो खुप चिड चिड करतो याची कल्पना राधाला होतीच त्यामुळे तिने लगेच विषय थांबवला.

दोघेही जेवायला बसलेत जेवायला बसल्या नंतरही कबीर ला भास होत होते की आपला फोन वाजतोय, परंतु राधा त्याला नाही अशी खात्री करून देत होती.

"खुप कामाचे कॉल येउन गेले असतील आता" कबीर म्हणाला आधी एक पोळी खाल्यानंतर त्याने समोरच ताट - "बस झाल" अस म्हणून दूर लोटत हात धुवायला गेला. त्यावर लगेचच राधा म्हणाली - "अरे हे काय जेवण आहे जरा भात तरी घे" नंतर कबीर हात धुवायला गेलेला बघून तीही शांत बसली काही वेळानंतर कंटाला येउन तिनेही हात धुन टाकला.अन डायनिंग टेबल आवरू लागली.

तेव्हडयात हॉल मधून कबीर चा आवाज आला - "राधा हां टीवी लागत का नाहीये ग ?"

" आज सकाळीच त्याच रिचार्ज संपल " - काम आवरता आवरता राधा म्हणाली .

" अरे यार ...तुझा मोबाईल घे बरं....नाही तो पण डेड आहे अन आता नाक्यावरच दूकान एव्हाना बंदही झाल्या असतील खुप लांब जावे लगेंन "- असे तो स्वताशिच पुटपुटु लागला बेस्ट वे म्हणून शिळा का होइना पण पेपर वाचण्यात व्यस्त झाला .

       सर्व कामे आवरून राधा बालकनीत उभी राहिली

पेपर वाचता वाचता कबीरच तिकडे लक्ष गेल अणि तो पेपर बाजूला ठेउन तिच्याकडे बालकनित गेला

" राधा ते मघाशी उगाच भांडलो तुझ्याशी अन त्या भांडनाला तसही काही तारतम्य नव्हत "

राधा - तारतम्य नव्हत म्हणून तर पुढे काही बोले नव्हते न काही विचार न करता तू फ़क्त एकाच वेळेस भांडतो जेव्हा तुझ्या पोटात कही नसत तेव्हाच

कबीर - तुम्ही पोरी पण न अगदी मनकवड्या असतात बघा पण तुझी ही आधीपासून ची सवय आहे माला समजुन घेण्याची.

राधा - अन तुझीही सवय आहे नेहमी चिडन्याची .

कबीर - काय ? तू पण ना ...

राधा - काही नहीं रे गंमत केली.

कबिर - बर एक रात्र किती झाली चल झोप आता मी ही माझ काम आवरून घेतो दोन तिन इ- मेल पाठवायचे आहेत माला ते पाठून घेतो    अरे यार शेट.....

राधा - काय झाल

कबीर - अग मोडेम मधल नेट संपून महिना झाला किती दिवस झाले मी मोबाइल कनेक्ट करुण काम चालवायचो.

राधा - तू ना असाच वेंधळा आहेस कोणतीच गोष्ट मनावर घेत नाहीस

कबीर - मनावर घेतल नाही म्हणून तू आज माझी बायको आहेस का ?

आशा प्रकारे आपली बाजू मांडत त्याने एक गोड भांडनाला जल्म दिला . पण निरुत्तर होतील त्या स्त्रिया कसल्या त्याचा तो शब्द धरून लगेच राधा म्हणाली - "काही मोठेपणा नाही हां जेव्हा माझ्या बाबांना बोलायची वेळ आलती तेव्हा कसा सिंहाचा उंदीर झालता " आशा गमतीदार भांडनाने तब्बल एक दिड तास लग्नाचा पूर्ण अल्बमच उघडला. नंतर दोघनेहि एकमेकांकड़े बघून स्मितहास्य केले. खर तर एव्हद्या दिवसात दोघेही एव्ह्ड मनमोकळ कधी बोलले नव्हते .

गप्पांमद्ये रंगत येत होती त्यावर लगेच राधा म्हणाली " ice - crem खाणार ?" "एव्हडया रात्रि" अस म्हणून तो चकित झाला नंतर त्यालाच फ्रीज मधील ice-crem दोन वाट्यामद्ये काढून अनावी लागली.

राधा झोपल्यावर आशा ठिकाणी बसली होती की बाल्कनीतून चंद्र अगदी स्पष्ठ दिसत होता. हातातली वाटी पुढे करताच राधाला चंद्र अन कबीर एकदाच दिसला त्या दिवशी नकळत राधा कबिरच्या दुसर्यांदा प्रेमात पडली. दिघेही शेजारी शेजारी बसून ice- crem खात होते . अचानक हुक्की येउन कबीर गान गुनगुनु लागला -" इशारों इशारों में दिल देने वाले बता ये हुनर तूने सिखा कहासे" हम... हम.... हम....काय रे पुढच विसरलास का अस म्हणून तिने गान पूर्ण केल "निघाहो निघाहो में जादू चलाना मेरी जान सिखा है तुमने जहासे "

"आठवत तुला कॉलेज मद्ये असताना लास्ट इयर ला आपल्या क्लास मद्ये फिश पोंड झालत तेव्हा में तुझ्यावर टाकला होता - पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झुटा ही सही तेव्हा सर्व क्लास तुझ्याकडे बघून हसत होता आणि तू लाजुन क्लास च्या बाहेर चाल्या गेलीस"  असे म्हणून तो जुन्या आठवानित रमला

राधा - हो रे .. तुला लक्षात आहे.

कॉलेज च प्रेम आज नव्याने तरुण झाल्याने दोघही एक्मेकात गुंतले..

राधा लगेच म्हणाली -" ए तू कॉलेज मद्ये किती छान कविता करायचा एखादी कर ना "

आता ?..अस कबीर आश्चर्याने उद्गारला.

" हो कर ना......" असा हट्ट राधाने केला. कविता करून खुप वर्ष झाल्याने कविता जमेल की नाही याची भीती कबीर ला वाटत होती तरी हसायच नाही हां अशी ग्वाही घेउन त्याने सुरु केलि-

आं.... हं..... हा तर ऐक -

" तुझ्या पैंजनाची किनकिन वेड लावत आहे...

तुझ्या रुपाची प्रतिमा माझ्या डोळ्यात दाटली आहे..

तुझ्या मधाळ शब्दात

साखरेचा गोडवा आहे....

रुपाला साथ आहे तुझ्या हजारो नक्षत्रांची

इथेच भेट होइल आपल्या अधांतर क्षितिजांची "

कविता बनवत बनवत तो बाल्कनीत येतो अन कविता झाल्यावर अचानक मागे बघतो तर ती आश्चर्यचकित झालेली असते.

बघ तुला म्हणल होत न जमणार नाही म्हणून जाऊ दे हसू नको आता माझ्यावर त्याला थांबवत लगेच राधा म्हणाली - " अरे वेडा झालायस का जमली म्हणजे तूफ़ान जमलीये असं म्हणता म्हणता दोघेही परत जुन्य आठवानित रमून गेले .

    घड्याळीत तिन चा टोल पडला तर कबीर राधा च्या मांडीवर डोक ठेउन निरागस पने झोपी गेलेला आणि राधाही मान टाकुन झोपाळ्यावरच झोपी गेलेली होती.

कदाचित स्वप्नातही ते एकमेकांशी खुप गप्पा खुप गोष्टी

खुप भांड़ने करत असतील दोन वर्ष लग्नाला होउनही आज काम नोकरी स्मार्टफोन सोशलमिडिया यांचे त्यांनी दोघांनी स्वताच्या भोवती एक जाळ तयार करून घेतल होत . सोशल मीडियाचा एक बांध त्यानी निर्मान करून घेतला होता. त्यामुळेच त्यानी आज ती

रात्र मुक्तपणे नव्याने जगुन घेतली आणि खऱ्या अर्थाने ती रात्र बहरली यात शंका नाही .

                 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama