STORYMIRROR

Abhishek Gosavi

Comedy Drama Others

2  

Abhishek Gosavi

Comedy Drama Others

नवीन शर्ट

नवीन शर्ट

7 mins
63

                         आज मी आईवर खुप जोऱ्यात खेकसलो, कारण ती माझ्या नव्या कोऱ्या शर्टावर कुंकु टाकत होती. तीच अस मत होत की कुठल्याही नविन गोष्टीची आधी पूजा करायची अन मग वापरायला सुरवात करायची. गाडी, कार, फ्रिज,कूलर इथपर्यंत ठीक आहे पण कपडे सुद्धा कुंकू वाहून हे जरा मला अतिच वाटल. हां आता एव्हडया कारनासाठी आईवर ओरडन खरं तर चुकीच आहे म्हणा पण तो शर्ट खरेदी करायला मला रानीने भाग पाडलेल. हो रानीच आमच्या शेजारच्या कंपनी मधील अकाउंटन्ट "रेश्मा चव्हान" खर तर माझ्या चेहरयावरच उतू जनार तेज पाहाता मी रेश्मा ला रानी म्हनतो आणि ती सुद्धा माझ्याशी प्रेमाने बोलते हे बघून तिच्या माझ्या ओफ़ीस मध्ये अन राहील त्या वोचमन च्या केबिन मध्ये सुद्धा आग लागायची. मी तिला बिनधास्त रानी म्हणायचो अन ती सुद्धा माझ्याशी प्रेमाने बोलायची अन तसही तिच्याकड़े दूसरा पर्याय नव्हता कारण ती फ़क्त नावाला अकाउटंन्ट होती तिच्या कंपनि च्या अकाउंट चा अक्खा लोड माझ्यावर असायचा खर तर मी माझ्या अन तिच्या अशा दोन कंपन्यांचा अकाउंटन्ट होतो.

         तर विषय असा रानीला घड्याळ घ्यायच होत त्यामुळे सत्तेचाळीसाव्या दुकानाला रिजेक्ट करूँन अट्ठेचाळीसाव्या दुकानात शिरलो. पहिल्या दुकानात गेलो तेव्हा तिला घड्याळ घ्यायच होत आणि आता अट्ठेचाळीसाव्या दुकानात तिला टॉप घ्यायचा होता.

माझ्या यशाच्या दिशेने उत्साहात चालनाऱ्या पावलांनी -" बस आता नको " अस उत्तर देऊन टाकल होत. नीट चांगल्या घडी घातलेल्या कपडयांची घडी मोडून ढिग लावण्यात रानी यशस्वी होत होती. टॉप छातीवर धरून दाखवता दाखवता आता रानिपेक्षा सुंदर मला तो सेल्समनच दिसू लागला. एव्ह्ड होऊंन सुद्धा -" इथे काही व्हरायटी नाही आपन दुसरीकडे जाऊ." असे रानीने म्हणल्यावर माझे पाय कमरेपासून वेगळे होणार आणि तो सेल्समन मला मारायला उठनार तेव्हड्यात मी म्हनालो मला एक शर्ट घ्यायचा. सेल्समन ने परत काढलेली तलवार म्यानबंद करून हसून माझे स्वागत केले. त्यानी मला कपडे दाखवन्यास सुरवात केली.

एरव्ही 250 ते 300 किमतीपर्यंतच पोहोचनारे माझे आखुड हात आज रानिमुळे 1000 ते 1200 कीमतीपर्यंत जाऊंन कानून च्या हाता पेक्षा पण लांब झाले होते. त्यातील एक फुला फुलांचे भड़क लाल रंगाचे शर्ट रानीने माझ्या छातीवर धरले आणि म्हणाली " हां तुला खुप छान दिसेल ट्राय कर " तेव्हड्यात तो सेल्समन पाणी प्यायला गेला आणि मी सुद्धा ट्रायल साठी गेलो. शर्ट घातल आणि आरशात बघतो तर काय फ़क्त एक लाल नाक आणि गोंड्याची टोपी पुरेशी होती माझा जोकर चा कोस्टुम पूर्ण करायला तेव्हा मला लक्षात आल तो सेल्समन पाणी प्यायला का गेला कादाचित त्याने मला आधीच या आवतारात इमेजिन केल असाव. मी ट्रायल रुम मधून बाहेर पडलो तर सर्व माझ्याकडे असे पाहात होते जस की त्यांनी पृथ्वी वर चालता फिरता एलियन पाहिलाय. या वेळेस देवाने माझी बाजू घेतली आणि रानीला तो शर्ट आवडला नाही. नंतर एक मस्त पांढऱ्या रंगाचा शर्ट तिने निवडला पानी प्यायला गेलेला तो सेल्समन तिथेच होता त्यावरून मी अंदाज लावला हां शर्ट आपल्याला आता चांगला दिसेल ह्या अश्या एतिहासिक शर्टावर माझी आई कुंकू वाहाते म्हणजे काय राग तर येणारच ना.

         मस्त अंघोळ करून ओले अंग स्वच्छ कोरड्या टोवेल ने पुसल. ओठांचा चंबू करुण मस्त एक रोमांटिक गान गुणगुनत मी नविन शर्टाची घडी मोडत होतो.

शर्ट बनवन्याच्या किमतीपेक्षा त्याच्या पैकिंग ची किंमतच जास्त असेल पण नको तिथे डोक लावन सोडून मी मस्त शर्ट घालून नाश्ता करून घराबाहेर पडलो.

सगळ्या जन्माच पुन्य आजच आडव आल होत की काय माहीत पण शेजारची रजनी सुद्धा त्याच वेळेस घराबाहेर पडली होती. तिच्या चोरून पाहण्याचा प्रयत्नात ती अपयशी झाल्याने माला समजल नविन शर्ट माला खुपच खुलुन दिसतोय.

अतिशय उत्साहात आनंदात मी ओफ़ीस ला जायला निघालो. बस ची वाट बघत स्टैंड वर उभा असताना एकाने उरलेल सिगारेट च फिल्टर आशा दिमाखात फेकल की थेट ती माझ्या शर्टावरच पडेल पण मी सुद्धा मोठ्या चपळाईने मी ते चुकवल. तेव्हड्यात बस आली म्हणून बर झाल नाहीतर त्या मानसाच काही खर नव्हत.  असो तर घरातून निघल्यापासून एकाच गोष्टीचा भास् माला होत होता की माझ्या समोर यानारा प्रत्येक व्यक्ति हां माझ्याकडेच पहातोय त्यात एक मुलगी खुपच निरखुन पहात होती. अगदी पापणी न लावता ती पाहात होती. माझ्या सभ्य मनात मात्र उकळ्या फूटत होत्या बस मधील एव्हडया गर्दित मागच्या खिशात हात घालून मी माझा कंगवा काढला अन भांग पाडला नंतर स्टॉप आल्यावर जेव्हा तिने पर्स मधून काठी आणि गोगल काढला तेव्हा माला समजल ती अंधळी होती. माझ्या ऑफीस चा स्टॉप आला मी बस मधून उतरलो. ऑफिस मध्ये प्रवेश घेतल्यावर लगेच वोचमन च्या भुवया ऊंचावल्या शर्ट मस्त दिसतोय अस त्याच्या तोंडाला सांगायच होत परंतु त्याच्या इगो ने भरलेल्या मेंदूने त्याला तो आदेश दिलाच नाही मी सुद्धा मनातल्या मनात त्याला धन्यवाद म्हणून टाकले.

तेव्हड्यात एक धुळीचा लोंढा माझ्याकडे येतांना माला दिसला आमची शांताबाई उगीच ऑफीस समोरचा भाग झाडत होती सर्व खकाना माझ्या नव्या कोऱ्या शर्टावर बसला. मी तिला तिथेच बोलणार होतो पण तिचे आग ओकनारे डोळे, भारदस्त शरीर आणि हातातला झाड़ू बघून माला माझे धूळीने माखलेले शर्ट झटकने जास्त सोईचे वाटले.

    आज मुद्दामून राणीच्या ऑफीस बाहेर मी अर्धा तास उभा होतो. दर पाच मिनीटाला शर्ट इन वगरे चेक करत होतो. नंतर पंधरा मिनिटाने राणी आली मला फ़क्त हाय करून ऑफ़ीस मध्ये निघुन गेली मी तिथेच हाय हाय करत माझ्या ऑफिस मध्ये निघून आलो. नविन शर्टामुळे माझा उत्साह सुद्धा अगदी नविन होता सर्व ऑफिस मध्ये माझ्यामुळेच नवचैतन्य पसरलय की काय असे मला वाटत असतांनाच सर्व जन उभे राहु लागले. सर्वात पाहिल्या टेबलापासून गुड मोर्निंग ची लाट सुरु झाली अन काय आश्चर्य ती लाट माझ्या पर्यंत येवून थांबली आणि प्रत्यक्ष बॉसही थांबले. मनात म्हणल वा !! नविन शर्टाचा फायदा झाला रानी नाही तर नाही बॉस तरी इम्प्रेस झाला.

त्याने माझ्याकडे पाहिले मी त्याच्याकड़े पाहिले. कौतुकाचे दोन शब्द ऐकन्यासाठी माझे कान आतुर झाले, तेव्हाच तो जोऱ्यात खेकसून म्हणाला - "पुढच्या दहा मिनिटात माला ऑफिस मध्ये येउन भेटा." कौतुक ऐकन्यासाठी आतुरलेले माझे कान त्यातून आता फ़क्त रक्त येने बाकी होते. तसाच तडक बॉस च्या केबिन कड़े निघणार होतो पण रस्त्यात गजूचा चहां आडवा आला. आमच्या गजू च्या हातचा चहा म्हणजे अमृतच मस्त कपामध्ये चहां माझ्यापर्यंत येत होता तोच शिंकेने घोटाळा केला. आमच्या गजूलाही आताच शिंका यायची होती अन मलासुद्धा चहां पिण्याचा मोह आताच होयचा होता.

आता पर्यंत नविन शर्टा ला वाचवन्याचे माझे प्रयत्न सफल झाले पण आता मी काही माझ्या शर्टाला वाचवू शकलो नाही. चहांचा भला मोठा दाग माझ्या शर्टावर लागला. तेव्हड्यात बॉस ची आरोळी माझ्या कानापर्यंत आली. सर्व सोडून आधी बॉस च्या केबिन कड़े पळालो. घाईघाईत नॉक न करून आल्यामुळे परत जाऊंन माला नॉक करून यावे लागले. मला एक नाही समजत यांनीच माला बोलावल, यांना माहीत आहे मी येणार आहे. मग त्या दारावर बोटाचा टोकदार भाग आपटून आवाज ऐकन्यात यांना कोणता आनंद मिळत असेल कुणास ठावूक? असो तर -"येस सर" अस म्हणून मी भारतीय जवान असल्यासारख मी त्याच्या समोर उभा होतो परंतु त्यांनी परराष्ट्राचा सैनिक असल्यासारखा अपमानावर अपमान करायला सुरुवात केली.

         अखंड अपमानाचा सप्ताह झाल्यानंतर महाप्रसाद म्हणून त्यांनी माला मागील दोन वर्षाच्या पर्चेस च्या फाइल्स आणायला लावल्या. तस हे काम आमच्या पियुन च आहे पण तो कुठे पियुन पडला काय माहित तर आता स्टोर रूम मध्ये जावून त्या फाइल्स चा गट्ठा मलाच काढावा लागणार होता.

स्टोर रूम मध्ये जावून मी तो गट्ठा काढण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाहि त्या फाईल वरच्या धूळीला सुद्धा माझ नविन शर्ट चांगल दिसल नसाव म्हणून सर्व धूळ माझ्या शर्टावर पडली आणि माझं नव कोर शर्ट दुसऱ्यांदा खराब झाल.

         एरवी माझ्या शर्टा कड़े पाहून भुवया उंचावनारे लोक आता माझ्या शर्टाकड़े पाहून नाक मुरडू लागले. माझे माझ्या शर्टावरचे दाग लपवन्याचे प्रयत्न असफल होतांना पाहून मी प्रयत्न करनेसुद्धा सोडून दिले. माझ्या शर्टाच्या धाग्याची पुण्याई होती की त्याच्या बटनांच पुन्य आडव आल माहीत नाही परंतु पुढचे तिन तास मजेत गेले माझ्यासाठी नसून माझ्या शर्टासाठी.

    शर्टाच्या धाग्याची पुन्याई संपुष्टात आली आणि त्याच्या बटनांच पुन्य मून वोक करत पुन्हा आपल्या जागेवर आल चांगला काळ इतक्या लवकर संपेल अस वाटले सुद्धा नाही. आमच्या मंजूषा मैडम च्या बाजुला मोठा घोळका माला दिसला. माझी उत्सुक्ता अनावर झाली आणि न राहुन मी तिथे गेलो तेव्हा माला समजल मंजूषा मैडम त्यांच्या दोन वर्षाच्या छोट्या मुलीला ऑफिस मध्ये घेवून आल्या होत्या.

त्या छोट्या चिऊ च कौतुक होतच पण आमच्या मंजूषा मैडम दिसायला ही खुप सुंदर होत्या त्यामुळेच माझ्यासकट सर्व पुरुष मंडळी त्या मुलीचे गोडवे गाण्यात, पापी , गाल्गुच्चे घेण्यात स्पर्धा करू लागले.

   आपन ह्यामध्ये किती वेगळे आहोत हे दाखवन्याच्या माझ्या अट्टहासात मी छकुली ला उचलून घेतल आणि तिला खेळवनयाचा प्रयत्न करू लागलो तोच माझ्या पोटाच्या बाजुला माला काही जाणवू लागल. सगळे माझ्याकडे हात दाखवून हसू लागले मंजूषा मैडम सुद्धा तोंडाला हात लावून खुदकन हसल्या नंतर मला जाणवल ह्या खारी ने सुद्धा माझ शर्ट खराब करण्यात सिंव्हाचा वाटा घेतला होता. तेव्हडच करून छकुली थांबली नाही मंजूषा मैडम जेव्हा छकुली ला घेत होत्या तेव्हा छकुली च पैजंन माझ्या शर्टाच्या खिशाला अडकून खिसा एका बाजूने लटकला आणि माझ्या नव्या कोऱ्या शर्टाने फाटन्याची हौसही पूर्ण करून घेतली.

                     मला आता विवस्त्र घरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे तडक डबा उचलला आणि चक्क दिड तास बाकी असतांनाच मी ऑफिस बाहेर पडलो. एरव्ही सकाळी शर्ट पाहून काहीच न रिस्पोंस देणाऱ्या रानिबाई त्या माझी अवस्था पाहून म्हणाल्या - " अरे हां तोच शर्ट न आपन काल................." तीच अर्ध वाक्य तोडत मी तिथून पळ काढला. थेट घरी आलो दारावर थाप मारली आईने दरवाजा उघडला आईला बाजुला सारून मी लगेच दरवाजाची कड़ी लावून घेतली तिथून निघणार तोच " टर्र्रर्र्र......." असा आवाज आला.

मी पुढे सरकलो परंतु माझा शर्ट तसाच त्या कड़ी कोंड्याला छिन्न विछिन्न अवस्तेत लटकलेला होता.

शेवटी दीर्घ आजाराने ग्रासलेल्या माझ्या शर्टाचे अंतिम संस्कारही पूर्ण झाले.

                  या सर्व प्रकाराने आश्चर्यचकीत होण्याएवजी तोंडाला पदर लावून हसनाऱ्या माझ्या आईला पाहून मला ही हसू आवरेनासे झाले. सकाळी उगाच आईवर चिडलो असे वाटु लागले. आता नविन कपडे तर सोडाच नविन अंतरवस्त्रे जरी आनलेत तरी मी आता कुंकू वाहूनच घालू लागलो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy