STORYMIRROR

Abhishek Gosavi

Romance Tragedy

4  

Abhishek Gosavi

Romance Tragedy

तू असा जवळी राहा.....

तू असा जवळी राहा.....

6 mins
335

" आहो, जेवलात का....?"

" गोळया घेतल्या ना...? "

" त्रास कमी होतोय न..? "

 आज आठ फोन लावूनही भास्कररावांनी फोन उचलला नाही. म्हणून रीमा एकामागे एक मॅसेज टाकत होती. शेवटी रीमा ने व्हिडीओ कॉल लावला. भास्कर रावांनी व्हिडीओ कॉल सुद्धा कट केला. 

" जरा बोलता येत नाहीये, घसा जरा जास्तच दुखतोय थोडा अशक्त पणा ही जाणवतोय " - असा मॅसेज भास्कर रावांनी रीमाला केला.  

त्यावर - " ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या." असे म्हणून रीमाने सुद्धा मोबाईल बाजूला ठेवला. भास्करराव आणि रीमा चा तीस वर्षाचा सुखाचा संसार एक मेहनती मुलगा, सुशील सुनबाई, आणि गोंडस नातू अस संपन्न आणि नजर लागण्यासारखं रीमा च कुटुंब होत. 

तीस वर्ष झाले होते लग्नाला परंतु ह्या काळात एकमेकांना सोडून रीमा आणि भास्कर राव कधीच राहिलेले नव्हते. सर्व नातेवाईकांना रीमा भास्करराव हे कुतूहलचा आणि कौतुकाचा विषय होता. परंतु चार दिवसा आधीच भास्कररावांचे कोविड चे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते. आणि त्यांना शहरातल्या मोठ्या दवाखान्यात कोरंटाईन केल होत. घरातल्यांचे देखील नमुने घेतले. मुलगा, सुनबाई आणि नातू निगेटिव्ह आलेत पण रीमा मात्र पॉजिटीव्ह निघाली. भास्कररावांना ज्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं होत त्यामध्ये बेड उपलब्ध नव्हते त्यामुळे रीमाला दुसऱ्या दवाखान्यात ठेवण्यात आलं होत.

आता सुनबाई आईची काळजी घ्यायला इकडच्या अन मुलगा भास्कररावांची काळजी घ्यायला तिकडच्या हॉस्पिटल ला असा दिनक्रम चालू लागला.

  दुरावा असूनही रोज फोनवर, मॅसेज वर बोलणारे भास्करराव आज शांत शांत होते त्यामुळे रीमाला काही केल्या चैन पडेना त्यावर भास्कररावांची तब्येत ठीक नाही या मॅसेज ने तर रीमाला अधिकच अस्वस्थ वाटू लागले होते.

 न राहवून शेवटी रीमाने तिच्या मुलाला फोन लावला - "आई थोडा कामात आहे नंतर बोलतो." असे म्हणून त्याने पण फोन ठेवून दिला. त्यालाही जास्त त्रास देण रीमाला योग्य वाटले नाही कारण आई वडिलांची दोघांची तब्येत बिघडलेली यामुळे तिला मुलाची फरपड स्पष्ट दिसत होती आणि सुनबाई सुद्धा थोडी टेन्शन्न मध्ये हरवल्या हरवल्या सारखी राहत होती. 

जेवणाची वेळ झाली सुनबाई रीमासाठी डबा घेऊन आली होती. हॉस्पिटल प्रायव्हेट असल्या कारणाने कोविड सेंटर मध्ये पेशंट सोबत एक व्यक्ती थांबणायची मूभा होती. रीमाचा पडलेला चेहरा पाहून सुनबाई ला पण खुप त्रास झाला. पण तरीही "आई चला बर जेवून घ्या परत गोळया ही घ्यायच्या आहेत ना" - असे म्हणून सुनबाई जेवणाचे कंटेनर काढू लागली. पण काही केल्या रीमा जेवायला तयार नव्हती कंटेनर बंद करून तिने बाजूला ठेवून दिले. सुनबाईने रीमाला जेवून घेण्याचा खुप आग्रह केला पण - " भास्कररावांना बोलल्याशिवाय जेवणार नाही" असा बालिश हट्ट रीमा करू लागली. आईंना कस समजवावं, आईंची तब्येत पण नाजूक आहे, त्यांना वेळेवर जेवून गोळया घेणे गरजेचे आहे. अश्या विचाराने सुनबाई काळजीत पडली होती. इतक्यात सुनबाई ला मुलाचा कॉल येतो. सुनबाई बोलत बोलत बाहेर जाते. अन काहीवेळाने आनंदाने येऊन म्हणते - " आई एक आनंदाची बातमी आहे बाबांची प्रकृती आता चांगली आहे अन उद्या त्यांना सुट्टी होणार आहे." यावर रीमा बुचकळ्यात पडली आनंदी व्हाव की शंका घ्यावी कारण थोड्यावेळ आधीच भास्कररावांचा मॅसेज आला होता की तब्येत खालवली आहे अन आज सुनबाई सुट्टी होणार सांगते. परंतु रीमाच्या शंकेवर भास्करावांच्या प्रेमाने विजय मिळवला आणि रीमा आनंदी झाली तिने दोन्ही हात जोडून डोळ्यातून अश्रू वाहत देवाचे आभार मानले. नंतर मुलगा ही वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये न जाता आपल्या कडे येतोय हे पाहिल्यावर तर रीमाची भास्कराव बरे झाल्याची खात्री पटली.

रात्र झाली, रीमा ह्या कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना रिमाचा डोळा उघडला. तर चक्क भास्करराव समोर बसलेले अचानक भास्कर रावांना पाहिल्यावर

- " आहो..... तुम्ही इथे...? " (आश्यऱ्याने ओरडून).

- " शु ~~ हळू बोल नर्स येईल.. ( भास्करराव दपक्या स्वरात म्हणाले)

- " आहो... पण तुम्ही इथे? इतक्या रात्री? अन ते सुद्धा कोविड वोर्ड मध्ये..? "

- " सांगतो सांगतो सगळं सांगतो.. किती दिवस झाले आपण भेटलो नाही तुझ्याशी मी नीट बोललो पण नाही.. मग मला राहवलं नाही. कस बस आपली पोर झोपली तेव्हा मी हॉस्पिटल वाल्यांची नजर चुकवून गुपचूप आलो."

- " आहो सांगताय काय..? पण हा कोविड वोर्ड आहे, तुम्ही आताच बरे झाला आहात परत तुम्हाला काही झालं म्हणजे.. ".

- "अग चिंता नको करू मी घेतोय माझी काळजी, हा पण मी रात्री इथे तुला भेटायला येतोय हे कोणाला सांगू नको हा.. कोणाला सांगितलस तर मी निघून जाईल."

- " निघून जाईल??? " (रीमाने अचंबित होऊन प्रश्न विचारला)

- " अग, म्हणजे तुला भेटायला येणार नाही. "

- " नाही नाही अजिबात सांगणार नाही " ( रीमाने भास्कररावांना वचन दिले.)

     त्यानंतर शामरावांचा रोजचा रात्रक्रम सुरु झाला. रीमा भास्करराव येणार म्हणून जागण्याचा खुप प्रयत्न करत होती परंतु गोळया घेलेल्या असल्यामुले रीमाला झोप लागून जायची अन अचानक जाग आल्यावर भास्कराव तिथे हजर असत. नंतर रीमा अन भास्करराव खुप गप्पा मारीत असत आधीचे दिवस आठवून त्यात राममान होत असत आणि गप्पा गप्पंमनाध्ये रीमाला कधी परत झोप लागयची ते तिलाही समजत नसत रीमा उठायची तेव्हाच भास्करराव तिच्या अंगावर पांघरून घालून कधीच निघून गेलेले असत.

 सात आठ दिवस निघून गेले. रीमा आनंदी राहत असल्या कारनाणे तिच्या प्रकृतीत भरपूर सुधारना झाली होती. अन उद्या रीमाला सुट्टी होणार होती. नेहमी प्रमाणे जेव्हा रीमाचा डोळा उघडला तेव्हा भास्करराव रूम च्या बालकनीत उभे होते. त्या दिवशी पौर्णिमा असल्या करणाने चंद्र सुधा मोठा अन ठळक जिवंत भासत होता. शिवाय भास्कररावांनी आज त्यांचं सर्वात आवडतीच गाणं -" शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी" हे गाणं कमी आवाजात लावलेलं होत. आज एक भास्कर चंद्र न्याहाळत होता आणि मनाशीच संवाद साधात होता.

इतक्यात तिकडून रीमा आली.

- "आहो हे काय आलात तुम्ही ?"

- "हो."

- " उठवायच तरी मला. "

- " मी गाण्यात अन चंद्रात अगदीच हरवून गेलो होतो. "

- " आहो उद्या मला सुट्टी होणार आहे."

- " हो मलापण. "

- " हाँ..?? "

- " अग म्हणजे मला उद्यापासून इथे अस लपून छापून यायची गरज नाहीये ना. "

-" हा ते आहे"

- " मला उद्या थोडं प्रवासाला निघायचं आहे प्रवास थोडा लांबचा आहे लवकर निघावं लागेल. "

-" नाही हा अजिबात नाही, आताच आजारपानातून उठलात आणि लगेच प्रवास अजिबात नाही. पूर्ण बरे झाल्याशिवाय मी नाही बाई कुठे जाऊ द्यायची तुम्हाला."

-" अग असेल काय करते जान गरजेचे आहे गेल्या शिवाय पर्याय नाही. "

   भास्कर रावांनी खुप वेळ समजूत काढल्या नंतर रीमा तयार झाली.

-" बर ठीक आहे, पण मी सुट्टी होऊन घरी आल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही. "

- (खुप वेळ विचार करून ) "बरं बाई ठीक आहे. तू म्हणशील तस."

- "बघा बरं मला सोडून गेलात तर तुम्ही जासाल तिकडे तुमच्या मागे मागे येईल."

  दोघेही खळखळून हसले. अन दोघेही चंद्राच्या मंद प्रकाशात शीतल वाऱ्यात रात्रभर गप्पा मारत बसले.

      " आज तू डोळ्यात माझ्या

       मिसळूनी डोळे पहा...

       तू अशी जवळी राहा.. ".

खरं तर पाडगावकरांनी हे गाणं ह्यांच्यासाठीच लिहिलंय आणि अरुण दातेंनी केवळ यांच्यासाठीच गायले कां असा प्रश्न त्या चंद्रालादेखील पडला असावा यात शंका नाही.

    दुसरा दिवस उजाडला. रीमा लगबगने तयार होत होती. एखाद्या लहान मुलाप्रमाणे तयार होत होती, घाई करत होती. घाईघाईत सर्व कपडे तिने पिशवीत कोंबले. आणि सुनेची वाट पाहू लागली. सुनबाई अन मुलगा तिथे आले. " आलात तुम्ही.. अरे किती वेळ?.. यांना जायचं आहे निघायचं आहे.. तयारी करावी लागेल... यांना यांच्या गोळया पथ्य सगळे सांगावे लागेल. "

रीमाच बोलण अर्धवट तोडत तिचा मुलगा म्हणाला -" आई.... आई.... शांत हो... बाबांना "

- " अरे तेच तर सांगते न बाबांना निघायचं आहे लवकर चल.. मलाही तयारी करायची रे बाबा. "

- " आई बाबा आपल्याला सोडून केव्हाच गेलेत.. आज त्यांचं तेरावं आहे.. तुझी प्रकृती ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांनी तुला बातमी सांगण्यास मनाई केली होती.. तू एकत नव्हतीस जेवत नव्हतीस म्हणून हिने तुला खोटं सांगितलं की बाबांना सुट्टी झालीये " मुलगा रडून रडून रीमा ला सांगत होता.

रीमाच्या हातातली पिशवी निसटली. रीमा ला जबरदस्त धक्का बसलेला होता. काय खरं काय खोटं तिला काहीच समजत नव्हतं नंतर नंतर आपला मुलगा आपल्याला काय बोलतोय हे सुद्धा तिला ऐकू येत नव्हतं. तेव्हड्यात अंधुक अंधुक दृष्टीने रीमाला भास्करराव दिसले. मुलगा संगतो ते खरं मानव की भास्करराव दिसताय त्याला खरं मानव रीमा चा पुरता गोंधळ उडालेला होता. कसलाही विचार ना करता ती जागेवरून उठली तिने भास्कररावांना हात दिला.

- " शेवटी आलीसच न माझ्या बरोबर " भास्करराव स्मित हास्य करून म्हणाले. शेवटी हातात हात घालून रीमा अन भास्करराव निघून गेले.

इकडे रीमाचा देह सुनबाई च्या कुशीत कोसळला. सुनबाई आक्रोश करू लागली हातात पायांना उब यावी म्हणून चोळू लागली. मुलगा सैरभैर होऊन पूर्ण दवाखान्यात डॉक्टर शोधत पळत होता. डॉक्टर ही आलेत परंतु - " तुम्ही जर मला न सांगता गेलात तर मी ही तुमच्या मागे मागे येईल. " वचनाला खरी ठरलेल्या रीमाला आणि त्यांच्या सोबतच्या प्रवासातून आता डॉक्टरही रीमाला परत आणू शकत नव्हते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance