Nilesh Desai

Inspirational

3  

Nilesh Desai

Inspirational

"तो" की "ती" - भाग तिसरा

"तो" की "ती" - भाग तिसरा

5 mins
1.3K


नेहमीच पहील्या भेटीत माणूस ओळखता येत नाही. काही लपवून ठेवलेल्या भावना दुसर्याने जाणून घेणं खरंच खूप सुखावह असते.


...लाॅगआऊट करून नयन नेहमीप्रमाणे वाॅशरूमकडे गेला. पण आज रोजच्यासारखे रेंगाळत न बसता पटापट उरकून तो बाहेर आला. खाली मेन गेट वर पोहचण्यासाठी त्याला आणखी पाच मिनिटं गेली. गेटच्या बाहेर त्याची नजर गेली अन् डोक्यात प्रेशर आले. सीमा बाहेरच तिच्या ग्रुपसोबत नयनची वाट पाहत उभी होती. नयन थोडा जवळ येताच समोरून सीमा पुढे आली. सीमाकडे पाहून त्याने स्मितहास्य दिले. सीमाने त्याला "हाय" म्हटले. आपल्या ग्रुपचा निरोप नजरेनेच घेऊन सीमा नयनसोबत जाऊ लागली. शांत राहून दोघेही हळूहळू उगाचच कुठेतरी चालू लागले... 


"कुठे जायचं..?" नयनने प्रश्न केला. जो सीमाला अपेक्षित नव्हता. तिने एक क्षण त्याच्याकडे पाहीले अन् काहीतरी विचार करून बोलली.. "जिथे तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकशील, तिथे जाऊया.." प्रेमातल्या डावपेचामध्ये अगदीच अनुभवशून्य असलेल्या नयनने एखाद्या सिनेमातल्या सीनसारखे विचारले.. "काॅफी..?" .... किंचित हसून मानेनच सीमाने होकार देला. संध्याकाळी सहा वाजता ते दोघे काॅफीशाॅप मध्ये पोहोचले.


नयनने खाली मानेनेच घड्याळ पाहीले.. आठ वाजायला पाच मिनीटं बाकी होती. थंड झालेला काॅफीचा तिसरा कप संपवून नयनने खाली ठेवला. त्याची नजर सीमाच्या नजरेस नजर देत नव्हती. सीमाही कुठेतरी शून्यात हरवली होती. मागच्या दोन तासात तिने जे काही ऐकले होते, त्याबद्दल कधी कल्पनाही तिने कधी केली नव्हती. टेबलवर शांतता पसरली होती. या प्रसंगाला कसे सामोरं जायचं हा विषयच कधी आपण ऐकला नाही.... सीमा विचार करत होती. 

सीमा गप्प आहे हे पाहून नयनला कसेतरी वाटत होते. तिचे काहीच न बोलणे हा आपल्याला नकार आहे हे नयनच्या मनात आले होते. थोडा वेळ गेल्यावर नयनच शेवटी बोलला.. "तुम्हाला भेटून छान वाटले, मी निघतो.." 

"हं.., सीमा भानावर येऊन त्याला पाहू लागली अन् म्हणाली... "आपण काही दिवस असेच भेटूया का..? नाही म्हणजे सुरूवातीला मी असा काही विचार केला न्हवता पण आता माझ्या मनात तूला जाणून घ्यायची इच्छा आहे." नयनने होकार देतच म्हटलं "ठीक आहे पण आता निघायला हवं."


बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देऊन ते दोघे आपापल्या घरी निघून गेले. निघाल्यापासून सीमाच्या डोक्यात फक्त नयनच होता. हा असा कसा असू शकतो, कसाही वागू शकतो, मुलगा असूनही याच्या आवडीनिवडी मुलीसारख्या कश्या असू शकतात. या सर्व बाबींचे सीमाला आश्चर्य वाटत होते पण तितकेच कुतूहलदेखील होते. तसा त्याच्या वागण्याबोलण्यात एकप्रकारचा सभ्यपणा आहे आणि स्वतःचं मत व्यक्त करण्याआधी तो समोरच्याचं ऐकून घेतो.. इतरांना आदर देतो.. अरे.. हा तर मलाही 'तुम्ही' म्हणत होता. अन् मी त्याला अरेतूरे करत होती.. 


घरी येऊन रात्री जेवण उरकून सीमाने झोपायलाही घेतले पण अजून नयन काही तिच्या डोक्यातून जात नव्हता. इकडे नयनने मनाला पूर्ण समजावले होते की जे काही तिने ऐकलेय त्यावरून कोणीही मुलगी त्याच्या आयुष्यात येण्यास तयार होणार नाही. आज पहील्यांदाच आपण कोणापाशी व्यक्त झालो पण यातून जे काही निष्कर्ष समोर येत आहेत, ते पाहता यापुढे कोणाला काही सांगायलाच नको. तरीही तिला भेटायला भेटेल ही कल्पना सुखावह आहे.. माझ्याबद्दल जिला सर्वकाही माहीत आहे अशा व्यक्तीची सोबत थोडी का होईना पण भेटेल......


दूसर्या दिवसापासून सीमा आणि नयन रोज भेटू लागले. एक महीना गेला.. एव्हाना सीमा अन् नयन मध्ये छान दोस्ती झाली होती. त्याच्या स्वभावातले बरेचसे पैलू सीमापूढे आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यात मेलइगो जराही नव्हता. बाहेर फिरताना जाण्याच्या ठिकाणापासून ते इतर सर्व गोष्टींमध्ये डिसीजन मेकर सीमा होती. कोणीतरी आपल्यावर हक्क गाजवण्याऐवजी स्वतःला आपल्या हवाली करत आहे आणि त्याबदल्यात आपल्याकडून काही अपेक्षाही ठेवत नाही. आणि आॅटोरिक्शात माझ्या बाजूला अंग चोरून बसलेला नयन कधी माझ्याशी प्रतारणा करू शकनार नाही.


सारंच कसे अकल्पित आणि छान सुरू आहे. "बस्स.. आता जेव्हा नयन समोर येईल तेव्हा त्याच्यापूढे आपले मन मोकळे करायचे, हो प्रथम मी फक्त रीलेशन बद्दल विचार केला होता पण आता लग्नासाठीच बोलायचे. थोडा वेगळा आहे तो पण हाच तो वेगळेपणा आहे जो माझ्या होणार्या जोडीदारामध्ये असायला हवा. जर त्याच्या एवढ्याशा आनंदापुढे मला आयुष्यभर त्याच्याकडून हवा तो आदर हवी ती मोकळीक आणि माझे नंतरच्या आयुष्यातले स्वातंत्र्य मिळणार असेल तर हो मला ते मान्य आहे" सीमा मनातच बोलत होती.


नयनचे वागने, बोलने सीमाला भावले होते अन् तिच्या चावट विनोदांवर त्याचे लाजणे तर तिला वेगळाच आनंद देऊन गेले होते. जर अश्या माणसाच्या आयुष्यात फक्त काही क्षूल्लक गोष्टींमुळे कोणी आले नाही तर विनाकारण त्या माणसातील निर्विकार आणि खर्या भावना कधी कोणापुढं येऊ शकणार नाहीत. नाहीतरी कुठे असतात अशी माणसं जी कोणत्याही मुखवट्याविना समोर येतात.


त्यादिवशी नेहमीप्रमाणे तो तिला भेटायला आला. आज तो बराच शांत वाटत होता. समोर अथांग समुद्र होता. लाटा वेगाने पुढं येत होत्या पण त्या दोघांपासून थोड्या अंतर ठेवून मागे जात होत्या. नयनने सीमाकडे पाहून विचारले, "आपल्याला थांबवायला हवे हे, नाही का?" "असे किती दिवस आपण भेटायचे, बाकी काही नाही पण तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा त्रास होइल मला.." "मी नाही म्हणालो तरी नकळत तुमच्यात गुंतत चाललो आहे." जमेल तसे आसू लपवत नयनने जे मनात आले ते सांगून टाकले.


सीमाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला अन् हसू लागली... नयनला कळत नव्हते की हसतेय का.. शेवटी तीच हसत म्हणाली, "तू अगदी टिपीकल हीरोइनचा डायलॉग मारलास..." नयन लाजून उभा राहीला अन् दूसरीकडे पाहू लागला. सीमा याच संधीची वाट पाहत होती. "नयन..." सीमाचे शब्द कानावर पडताच त्याने मागे वळून पाहीले अन् आश्चर्याने तो सीमाकडे पाहत राहीला.. सीमा एक गुडघा खाली टेकवून हातात रींगची उघडलेली डबी त्याच्यापूढे करून बसली होती.. चेहर्यावर स्माईल आणत सीमा बोलू लागली.. 


"आठवड्यातून तीन दिवस तूझे असतील, चार माझे असतील.. आपल्याला घरात दोन वार्डरोब लागतील मी ते अरेंज करेन. ड्रेसींगटेबल शेअर करू.. तुझं प्रेम कधी कमी होणार नाही ठाऊक आहे मला. मीही तुझे सर्व हट्ट पुरवेन. टीफीन मीच बनवत जाइन दोघांचा, नाश्ता मात्र तुझ्या हातचाच खाईन.. लग्न करशील माझ्याशी..." डोळ्यात आलेल्या अश्रूंना न लपवता नयनचे दोन्ही हात स्वतःच्याच ओठांवर आले.. मनातल्या आनंदापुढं शब्दही जड होऊ लागले त्याने मानेनचं होकार दिला अन् खाली सीमाजवळ बसत तिचे हात हातात घेतले. सीमाच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. 


"या जगात प्रत्येक व्यक्तीसाठी कोणीतरी जन्माला आले आहे जसे माझ्यासाठी तू..." "आपण आपलेच वेगळे विश्व बनवूया जिथे तू तूझ्या मनासारख राहू शकशील, तेव्हा तेवढ्या वेळेपूरता आपला जगाशी काही संबंध राहणार नाही"- सीमा. तिच्या मनातलं ओळखून नयन म्हणाला, "हो, अन् आपल्याशिवाय ही गोष्ट कोणालाही कळणार नाही.." पूढचे काही क्षण शांततेत गेले. समोरून एक मोठी लाट येऊन त्या दोघांच्या नकळत त्यांना भिजवून गेली. सीमाने आपली ओढणी नयनच्या पाठीवरून पसरवत पुढे घेतली.. नयन शहारला.. या अन् असल्या भावनांची किंमत आजवर फक्त नयन जाणून होता. आज तीचे मोल सीमालाही दिसले होते नयनच्या नयनांत...


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational