Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nilesh Desai

Inspirational


0.3  

Nilesh Desai

Inspirational


"तो" की "ती" - भाग पहीला

"तो" की "ती" - भाग पहीला

3 mins 2.3K 3 mins 2.3K

नेहमीप्रमाणेच आजही तो लवकरच बेडवरून उठला. भरभर अंघोळ करून त्याच्या आवडत्या जागी गेला. ड्रेसींग टेबल, होय त्याची ही फेवरेट जागा होती.


समोरच्या आरशात स्वतःला न्याहाळत त्याने पाऊडर, फाऊंडेशन इत्यादी उरकले. निघताना होठांवर हलकीशी फीकट रंगाची लिपस्टिक पसरवली. आरशात पाहून स्वतःला स्मितहास्य देत पींक रंगाचा स्कार्फ डोक्यावर घेऊन पाहीले. लगेच तो स्कार्फ काढून पून्हा बॅगेत ठेऊन आणि बॅग पूढे छातिशी घेऊन तो निघाला ऑफिसमध्ये जायला. इतके सर्व करूनही आपले स्त्रीरूप जगासमोर येऊ नये याची थोडीफार काळजी त्याने घेतली होती.


'नयन' - दिसायला स्मार्ट, गोरापान.. बारीक सडपातळ शरीरयष्टी. चेहर्यावर समोर येणारे लांब मऊ केस... त्याची पर्सनालीटी एकदम चाॅकलेट हिरोला साजिशी अशी होती. ऑफिसमध्ये म्हनुनच जेव्हा तो जाॅईन झाला तेव्हापासून अनेक मुलींच्या नजरा त्याच्यावर होत्या. काहींनी प्रयत्न करूनही पाहीले पण जितके आकर्षण त्याच्या दिसन्यात होते, तितक्याच काही बाबी रहस्यमय वाटत होत्या.


नयन मात्र कोणाच्याही अध्यात मध्यात राहायचा नाही. बोलण्याबद्दल फक्त दोन चार मित्र. बाकी त्याचे आयुष्य फारसे स्वतःमध्येच होते. यामागे कारण तसेच होते. नयनचे मन, गूण जरी वरवर पुरूषी दिसत असले तरी त्याच्या आत एक स्त्री दडलेली होती. नटने, मूरडने, लाजने, आरशात स्वतःला सारखे न्याहाळत बसने या गोष्टींनी नयनचे अंग मोहरून यायचे. त्याला सजायला, नटायला खुप आवडायचे. साडी, ओढणी या गोष्टीबद्दल त्याला विलक्षण आवड होती. घरी कोणी नसताना तो आपली आवड बर्याचदा पूर्ण करून घ्यायचा. पण या बाबतीत त्याने कोणालाही कधीही काहीही सांगितले नाही. समाज, आईवडील-बहीण, नातेवाईक काय सांगणार आणि कसे समजावे सर्वांना. 


बरेच प्रश्न नयन समोर होते. शेवटी त्याने ठरवले कोणालाही काही सांगायचं नाही. आपण आपली आवड आपल्यापर्यंत ठेवून आपल्यामध्येच खुश राहायचे. म्हणूनच तो रोज हलकासा मेकअप् जो इतरांना सहजासहजी कळून येणार नाही अशाप्रकारे करून ऑफीसला जायचा. घरी कोणी नसले की साडी, ड्रेसेस घालून हौसेने कॅटवाॅक करायचा. जेवण बनवणे हा देखील त्याचा आवडता छंद. पण तोही त्याने घरात कधी समोर येऊ दिला न्हवता. अश्याच सर्व काही गोष्टी असूनही त्याने अजून पूढच्या आयुष्याचा विचार केला होता. स्वतः स्त्री मनाचा असल्यामुळे साहजिकच त्याच्यात भिती, दया, करुणा, लाज या गोष्टी जरा जास्तच सामावलेल्या होत्या. त्यामुळे आयुष्य कसे जगायचे याबाबतीत त्याने पूर्ण खोलवर जाऊन विचार केला होता. यासर्वात एक गोष्ट मात्र नयनला माहीती होती की जरी त्याच्या आत एक स्त्री असली तरी तो एक पुरूष होता..


आणि त्यामूळे जेंडरचेंज वगैरे असल्या भानगडीत न पडता व कोणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये या बाबींचा नयनने विचार केला होता. तसेही सेक्स या विषयात त्याला तितकासा इंटरेस्ट नव्ह्ता. मुलांसोबत रीलेशन त्याच्या विचारांत अजिबात नव्हते. आणि आकर्षण त्याला मूलींमध्येच होते. पण त्यात अजूनतरी त्याने लक्ष घातले नव्हते. आपल्या जीवनात येणारे मग ते कोणीही असो त्याला आपल्याबाबत सर्व काही सांगायचं हे नयन ने ठरवले होते.


स्त्री मनाचा नयन मुलगी समोर आली की ईतर मुलांसारखा बावरून जायचा पण खर्या मनातल्या भावना तो कधीच समोर येऊन द्यायचा नाही, कारण मग सर्व कथा समोर मांडावी लागली असती. या विचारांनी नयन कोणा मुलीच्या मागे लागला नाही. स्त्रीयांबद्दल त्याच्या मनात प्रचंड आदर होता. रोजच्या जीवनात आसपासच्या परिसरात स्त्रीयांना जरूर तेथे मदतीला धावणे, कोणाला अभ्यासाला मदत करणे, इथपासून ते शेअर ऑटोमध्ये एखादी मुलगी बाजूला येऊन बसली तरी नयन अंग चोरून बसायचा. समोरून कोणी आकर्षक मुलगी येत असेल तर कितीही पाहायची ईच्छा असूनही नयनची नजर खाली जायची. मुलींमध्ये पाहायचेच तर फारफार त्यांचे ड्रेस, मेकअप, सॅंडल यापलिकडे त्याची नजर जायची नाही. टिव्ही, वर्तमानपत्रमधील बलात्कार, विनयभंग अश्या बातम्या नयनला विचलीत करायच्या. आणि कोणी इतके निष्ठूर कसे असू शकते इतके ती गोष्ट नयनला लागायची.


नयन हा असा आहे. कदाचीत तुमच्या आमच्यातलाच किंवा थोडा वेगळा. आज नेहमीप्रमाणेच ऑफिसला गेला. इथे काॅलसेंटर मध्ये नयनला जाॅईन होऊन चार महीने झाले होते. तसे नयन चोवीस वर्षांचा होत अन् सोबतचे सर्व वीस-बावीसचे. पण आपल्या देखणेपणा मुळे नयनचे वय कमीच वाटायचे. 


इथपर्यंतची कथा फक्त नयनची होती. अजून बर्याच गोष्टी घडायच्या बाकी आहेत. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवाव्यात.


क्रमशःRate this content
Log in

More marathi story from Nilesh Desai

Similar marathi story from Inspirational