ती एक वेडी
ती एक वेडी
रात्रीचा काळाकभिन्न अंधार आणि त्यात पावसाची रिपरिप सुरुच होती. रस्त्यावर सगळी सामसुम होती.एखाद दूसरी गाड़ी जात येत होती. ती आपल्या अंगाच मुटकुळ करून फुटपाथ वर एका टपरी च्या आडोश्याला बसली होती. एक जीर्ण झालेले पोते बसायला होते. अंगात तिच्या फाटलेली साड़ी कशी बशी गुंडाळली होती. त्या अंधारात एकटीच ती बड़बड़ करत होती. केस कधी ही न धुतलेले आणि एकदम रुक्ष असे पण ती मात्र शरीराने हवी तिथे भरलेली काळी सावळी पण रेखीव. भिकारीन नव्हती पण ठार वेडी होती. कोणी काही खायला दिले तर खाणारी नाहीतर दिवसभर भटकत असायची.गरीब भिकारीन समजून लोक खायला द्यायची. पावसा कड़े बघत ती अखण्ड बड़बड़ करत होती. तेवढ्यात तिथे एक कार आली. तशी ती शांत झाली आणि घाबरून कार कड़े बघू लागली. त्यातून एक बाई खाली उतरली . छान गुलाबी हिरवी अशी सिल्क ची साड़ी ,केसात गजरा माळलेला,भड़क मेकअप ,खांद्यावर शाल अशी ती गान गुणगुणत चालू लागली आणि त्या टपरी जवळ आली . तिचे लक्ष त्या भिकारीन कड़े गेले कोण ग तू आणि इथ का बसलीस तिने विचारले पण ती काही बोलली नाही. त्या बाई ने ओळखले कि ही भिकारीन असेल म्हणुन इथे बसली आहे. ये येणार काय माझ्या बरोबर तिने परत विचारले तरी ती गप्प होती. तिच्या अंगा वरच्या फाटक्या साडी कड़े तिचे लक्ष गेले तसे तिने आपल्या खांद्या वरची शाल तिच्या अंगावर टाकली. पुन्हा एक कार तिथे आली तशी ती बाई त्या भिकारीन च्या हातात थोड़े पैसे ठेवून त्या कार कड़े निघुन गेली . ती एक वेश्या होती . ती वेडी त्या पैशा कड़े नूसतेच बघत राहिली आणि काही बाही बोलू लागली.
आता पाऊस जरा कमी झाला होता. तिने ती उबदार शाल आपल्या कुड़कुड़णाऱ्या अंगाला घट्ट लपेटुन घेतली. शाल अंगावर असल्या मुळे तिला जरा झोप लागली. टपरीला डोक टेकवून ती झोपी गेली. अचानक जोर जोरात तिला कोणी तरी हलवत होते त्यामुळे ती जागी झाली. तिच्या समोर तीन पुरुष उभे होते . त्यांनी ख़ुप दारू प्यायली होती. ती जागी झाली . त्यातला एक जण म्हणाला,कोण ग तू आणि इथे काय करतीस? पण ती काही बोलली नाही कारण तिला लोकांचे बोलने समजत नव्हते वेडी होती ना ती. तीच मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे कोण काय बोलते काय करते तिला समजत नव्हते. त्यातला दूसरा म्हणाला, मुकी हाये ही बोलता येत नाही हिला वाटत. तीची शाल त्यांनी तिला हलवल्या मुळे अंगावरुन खाली पडली होती. फाटलेला ब्लॉउज त्यातून तिच्या छातीचा उभार दिसत होता. हे तिघे पिलेले तिला अस बघुन तिच्या अंगाला हात लावू लागले. फाटलेला ब्लाऊज एका ने आपला हात घालून अजुनच तो फाडला तिला समजले की लोक तिच्या सोबत काही तरी विचित्र करत आहेत म्हणून तिने त्याला ढकलन्याच्या प्रयत्न केला मग दुसऱ्याने तिचे दोन्ही हात पकड़ले. तिचा ब्लाउज आता पूर्णपणे फाटला होता. तिची उघड़ी वक्षःस्थळ बघुन त्यांच्यातला राक्षस जागा झाला होता. त्यात तीची साड़ी पण जागोजागी फाटलेली होती त्यातून ते अधाशा सारखे तिच्या शरीरावर नजर फिरवत होते. आता तर त्यांनी तीची साड़ी ही फेडली होती. एकाने तिचे हात धरले आणि दुसऱ्याने पाय पकड़ले . पिसाळलेल्या लांडगया सारखे ते एका मागून एक तिच्या शरीरा वर अत्याचार करत राहिले. मन भरे पर्यंत त्यांनी तिच्या वर बलात्कार केला. बलात्कार करणाऱ्याला फ़क्त बाई चे शरीर दिसत असते मग ती बाई कोणी ही असो त्याला फरक नाही पड़त. ख़ुप वेळ त्या अंधाऱ्या रात्रीत हा वासनेचा खेळ सुरु होता. तिला तशीच आहे त्या स्थितित टाकून ते तिघे निघुन गेले. जाताना तिच्या जवळ पडलेले ते पैसे ही ते नराधम घेवून गेले.
तिचे अंग ठणकत होते आपल्या सोबत काय झाले याची तिला कल्पना ही नव्हती. थंडी वाजु लागली म्हणुन तिने तीच साड़ी कशी बशी अंगावर लपेटली. ये बाई कोन तू उठ इथे का झोपलीस सकाळी तो टपरी चा मालक आला होता आणि तिला आवाज देत होता. तिने डोळे उघडले त्याच्या कड़े बघितले. ये बाई उठ लवकर मला माझ दुकान उघडू दे तो पुन्हा बोलला. तशी ती बाजूला पडलेली शाल घेऊन तिथुन निघाली. रस्त्यावरुन बड़बड़ करत निघाली. आजुबाजुचे लोक आणि बायका ही तिच्या कड़े बघुन न बघितल्या सारखे करत जात होते.कोणी तिला बघुन हसत होते पण तिच्या अंगावर फ़ाटकी साड़ी आहे तिला निदान चांगले कपड़े तरी द्यावेत हे कोणाच्या ध्यानिमनी ही येत नव्हते. असच ती रस्त्यावर फिरत असे आणि रात्र झाली की कुठे भूयारी मार्गा जवळ नाहीतर उड्डान पुला खाली ती झोपत असे. रात्री,अपरात्री भुरटे चोर,दारुडे तिच्या उघड्या शरीराचा उपभोग घ्यायचे ,तिला काहीच समजत नसायचे.
सरीता सकाळची तीची कामे उरकत होती. बाई ला सूचना देत होती. नेहा कड़े नीट लक्ष दे सांगत होती. अचानक बाहेरुन कॉलनी तुन लोकांचे आवाज येवू लागले होते. काहीतरी गोंधळ चालला होता . सरिता ला ऑलरेडी हॉस्पिटल ला जायला उशीर होत होता त्यामुळे बाहेर काय चाललय हे बघायला तिला अजिबात वेळ नव्हता . सरिता झाले का तुझे सागर किचन मध्ये येत म्हणाला. हो हो झालेच सरिता हात धुवून आपले अवरायला निघाली सागर नाष्टा करत बसला. सागर आणि सरिता डॉक्टर होते त्यांचे स्व: ताचे हॉस्पिटल होते. गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार ते करायचे . अनेक अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही त्यांनी उचलला होता. डॉक्टरी पेशा मधले ते देवच होते. सरिता विधवा आणि घटस्फोटीत महिलां साठी ही काम करत होती. त्यांचे पुनर्वसन करन्याचे मोलाचे काम ती करत होती. रूम मध्ये अवरायला आलेली ती सहज बघू तरी बाहेर काय गोंधळ सुरू आहे म्हणून तिने खिडकीतून पाहिले तर रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत एक वेडसर दिसणारी बाई उभी होती. ती चार पाच महिन्यांची गरोदर दिसत होती . जागोजागी फाटलेली साडी तीच अंग प्रदर्शन करत होती आणि जाणारे येणारे लोक तिच्या कडे बघून हसत पुढे निघून जात होती तर काही लहान मुले तिला दगड मारून ये वेडी अस बोलत होते. काही बायका आणि पुरुष तिथे उभे राहून चाललेला तमाशा बघण्यात मग्न होते. सारिताला हे बघून भयानक राग आला तिने हातात येईल ती चादर घेतली आणि बाहेर पडली. सागर ने तिला तसे जाताना बघितले म्हणून तो ही तिच्या मागे गेला. सरिता त्या गर्दी जवळ गेली. तिने पटकन त्या वेड्या बाई च्या अंगावर चादर गुंडाळली आणि लोकां कडे बघून म्हणाली,अरे तुम्ही माणसे आहात की राक्षस एक वेडी बाई भर रस्त्यात अशी अर्धनग्न फिरते आहे आणि तुम्ही तिला मदत न करता उलट मजा बघत आहात? लहान मुलांना नाही समजत पण तुम्हाला अक्कल आहे की नाही? इथे उभ्या असलेल्या बायानो मला सांगा तुम्हाला हिला अशी बघून काहीच कसे नाही वाटले तुम्ही पण एक स्त्रीच आहात ना? मग तुमच्या समोर अश्या एका बाईची खिल्ली उडवली जातेय आणि तुम्ही मुकाट बघत उभ्या आहात? माणुसकी विकून खाल्ली का सगळयांनी? माणुसकी म्हणून तरी एखादा कपडा हिच्या अंगावर घालायचा ना? सरिता खूप बोलत होती तसे तिथे जमलेले लोक लाजून शरमेने निघून जाऊ लागली. सागर ही आता तिथे आला होता. सरिता हिला आपल्या सोबत घे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ हिची पूर्ण तपासणी करू मग पुढे हिला पुनर्वसन केंद्रात भरती करू. हो सागर म्हणत सरिता त्या बाई च्या हाताला धरून त्यांच्या कार मध्ये तिला बसवले आणि ते हॉस्पिटल कडे निघाले.त्या वेडीला त्यांनी पुनर्जन्म द्यायचा ठरवले होते.
(समाप्त)
