Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

ती एक सौदामिनी

ती एक सौदामिनी

12 mins
1.0K


तिची माझी पहिली ओळख एका कार्यक्रमात झाली आमच्या काव्य मंडळाचा कार्यक्रम होता त्यात ही मुलगी मला नवीनच वाटत होती. कविते ऐवजी तिने एक सुरेल गाणे म्हटले,पण तिच्याकडे बघताना एक गोष्ट मला सारखी खटकत होती ती म्हणजे तिच्या पंजाबी ड्रेसचे वरचं बटन निघालं होतं ओढणी विस्कळीत झालेली होती आणि त्यातून छातीचा वरचा भाग दिसत होता मी ते बघून अस्वस्थ झाले. माझ्या शेजारी बसलेल्या एका महिलेला बोलले, की ही अशी काय वागते आवाज तेवढा छान आहे, पण ही स्वतःच्या ग्रूमिंग कडे अजिबात लक्ष देत नाही तिला वरचे बटन लावायचे कळत नाही का? त्या शेजारी बसलेल्या बाईचे उत्तर ऐकून मी हादरूनच गेले अहो ती आंधळी आहे, तिला दिसत नाही त्या उद्गागरल्या त्यांच्या या उत्तराने मी हादरून गेले.

व्यवस्थित नीट कापलेले केस ,केसांचा बॉबकट छानसा पंजाबी ड्रेस, गोड सुरेल गळा, चेहऱ्यावरचे भाव, व तिची नजर पाहता ती कुठेही आंधळी आहे असे वाटतच नव्हते मी पटकन तिच्या जवळ जाऊन तिची ओढणी सारखी केली आणि त्या दिवसापासून आज तागायत आमची मैत्री घट्ट झाली तिचे नाव अश्विनी देशपांडे

ईयत्ता नववीत जाईपर्यंत म्हणजे जवळजवळ वयाच्या 13 ,14 व्या वर्षापर्यंत तिला नॉर्मल व्यक्ती प्रमाणेच सर्व काही दिसत होते. पण तिचे नववीचे वर्ष संपता- संपता अचानक दिसेनासे झाले त्यावर तिच्या आई-वडिलांनी खूप खर्च केला डॉक्टरांना दाखवले काही नाही शेवटी काही उपयोग झाला नाही व अंधत्वाचा शिक्का तिच्या कपाळी बसला. त्यातूनही ती डगमगली नाही एवढ्या लहान वयात पण ती खंबीर होती. रायटर्स रिडर्स, आणि रेकॉर्डिंग याच्या आधाराने तिने पुढील दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. मुळात ती हुशार होती दहावी व बारावी या दोन्ही वर्षात अपंगांच्या मेरिट लिस्ट मध्ये आली दहावीला दुसरा नंबर तर बारावीला मेरिट लिस्ट तसेच इयत्ता बारावी मध्ये ती नॉर्मल मुलांमध्ये हे हिंदी या विषयात प्रथम आली अभ्यासात हुशार, मनाने खंबीर मुलगी मात्र जगाच्या व्यवहारात अगदी साधी आणि सरळ मार्गी होती

अभिजीत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती.


असे पण स्त्रियां वडिलांनंतर नवऱ्याकडे केअर टेकर या नात्याने, बापाच्या नात्याने जास्त बघतात. त्यांना बारा महिने प्रणयाराधन करणारा नवरा नको असतो त्यापेक्षा तिची काळजी घेणारा तिच्या मनातल्या भावभावना समजून घेणारा पुरुष आवडतो. गोड गळा, सर्वांशी प्रेमाने वागणे त्यामुळे ती सर्व कॉलेजची आवडती होती. सर्वजण तिला मदत करीत असत. गॅदरिंग मध्ये अश्विनी चे गाणे पाहिजे म्हणजे पाहिजेच अशा कार्यक्रमाचा कॉर्डिनेटर अभिजीत सोळंकी तो तिला व्यवस्थित स्टेजवर सांभाळून नेई, खाली आणून सोडी, रिहर्सल ला उशीर झाला तर तो घरापर्यंत सोडायला जाई, त्यातच हे मैत्रीचे धागे कधी प्रेमात बांधले गेले हे त्या दोघांना देखील कळले नाही.

अभिजीत आयुष्यात आला आणि अश्विनी मनातून मोहरली, हसू बागडू लागली. खुशीचे थुई थुई कारंजे तिच्या डोळ्यात दिसू लागले. स्वतःला स्वतःचा चेहरा चेहरा जरी दिसत नसला तरी ती आरशापुढे उभे राहू लागली. स्वतःला जरा नीट व्यवस्थित प्रेझेंट करू लागली. आईकडून छान सा हलकाफुलका मेकअप, कॉलेजला येताना करू लागली. आपल्यावर कोणी प्रेम करेल हा विचारच तिने कधी केला नव्हता त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला.

"क्षुधीता पुढे क्षिराब्धि ये धावुनी"

 अशी तिची अवस्था झाली.

"आशु तू आज फार गोड दिसतेस हा गुलाबी पंजाबी ड्रेस तुला खूपच शोभून दिसतोय"

"अरे मला कुठे दिसतय की मी कशी दिसतेय? पण तु म्हणतोस म्हणजे नक्कीच छान दिसत असणार"

"आशु तू काहीच काळजी करू नको मी होईन तुझे डोळे!

 माझ्या नजरेने सारे जग तुला मी दाखवीन फेकून दे ही तुझी काठी!"

... असे म्हणून त्याने तिच्या हातातील काठी लांब भिरकावून दिली क्षणभर ती थरारली कारण गेल्या कित्येक वर्षात ही काठी तिची सखी होती पण नंतर तिने मोठ्या विश्वासाने त्याच्या खांद्यावर मान टाकली.

अभी देशील ना मला तू आयुष्यभर साथ तिने अधीरपणे विचारले

त्याने पण तितक्याच तत्परतेने हो म्हणून उत्तर दिले

काश! त्याच्या डोळ्यातील बेरकी भाव तिला बघता आले असते.

अश्विनी ला तिच्या मित्र-मैत्रिणींनी सावध करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा ती त्याच्या प्रेमामध्ये मदहोश झालेली होती. सारे जग तिला खोटारडे वाटत होते.

तुला पाहते रे तुला पाहते तेव्हा किंवा वो क्या है एक मंदिर है अशासारखी गाणी मनातल्या मनात व एकटी असतानादेखील गुणगुणत होती.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाले व ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली. 

तिच्या आई-वडिलांना तर आणि जावई म्हणजे देव माणूसच वाटला आपली मुलगी आंधळी असून देखील हा मुलगा तिच्याशी लग्न करायला निघाला त्यातचं त्यांना सारे काही मिळाले अगदी जावयाच्या पायाचे तीर्थ धुवून प्याले तरी ते कमीच वाटणार होते

त्याच्या घरातून मात्र पुर्ण विरोध झाला त्यांनी दारातूनच हाकलून दिले, असली आंधळी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती म्हातारपणी सुनेने सासू ची सेवा करण्याऐवजी सासूलाच-सुनेची सेवा करावी लागली असती असे त्यांचे म्हणणे पडले. शेवटी आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता अभिजीत ने अश्विनी शी लग्न केले आता राहण्याचा प्रश्न होता. सासरी शिरकाव होणारच नव्हता मग त्यांनी अश्विनीच्या आई बापाच्या शेजारी भाड्याने फ्लॅट घेऊन राहू लागले दोघांचे देखील ठोस असे काही उत्पन्न नसल्यामुळे घर भाडे तिच्या वडिलांना द्यावे लागत होते शेवटी त्यांनी असा विचार केला की दरमहा भाडे भरण्यापेक्षा एक फ्लॅटच विकत घेऊन द्यावा व त्याचा हप्ता भरावा फ्लॅट घेताना त्याच्या सोयीनुसार त्याच्या नोकरीच्या जवळ घेण्यात आला.

 आता खरी आशु सासरी निघाली वडिलांनी फ्लॅट घेताना मात्र तिच्या आणि स्वतःच्या नावाने घेतला होता तेवढी हुशारी त्यांनी दाखवली होती.


अश्विनी व अभिजीत दोघेपण आपल्या संसारात खुश होते मात्र तिकडे राहायला गेल्यापासून अश्विनीला घरात छोटे-मोठे अपघात होऊ लागले. तिला एकटीला घराचा अंदाज घेत वावरण्याची सवय होती मात्र फर्निचर चा रचनेत थोडा जरी बदल केला तर ती अडखळून पडत असे. तिच्या माहेरी तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी वर्षानुवर्षे घराची रचना जैसे थे ठेवली होती, पण इकडे अभिजीत मात्र दररोजच काहीतरी गोंधळ घालून ठेवायचा. घरातली एखादी वस्तू ईकडची तिकडे करून ठेवली कि ती अडखळून पडत असे, लागल्यावर ती कळवळून बोलायची, अभि नको रे अशा वस्तू हलवत जाऊ, मला लागते ना !

त्यावर तो सॉरी डार्लिंग तुला दिसत नाही हे माझ्या लक्षातच राहत नाही असे उत्तर देऊन मोकळा व्हायचा.

त्यातच एक दिवस ती जोरदार पडलीं डोक्याला खोक पडली व हात पण फ्रॅक्चर झाला आई-वडील धावत आले दवाखान्यात ऍडमिट केले असता सर्व टेस्ट करताना ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले सर्वांनाच खूप आनंद झाला.

आईबाप पोरीच्या काळजीने तिथेच राहिले कसं का होईना पण गंगेत घोडं न्हालं एक मूल झालं म्हणजे मुलीची चिंता मिटली तिचा संसार मार्गी लागला या विचाराने त्यांनी मोकळा श्वास घेतला

एक दिवस जावई पॉवर ऑफ अॅटर्नी घेऊन आला "आई-बाबा तुमचे वय झाले व तिचा असा प्रॉब्लेम उगाच कोठे बाहेर गेली, व या अशा अवस्थेत पडली धडपडली तर काय करणार तुम्ही मला याच्यावर सह्या द्या "जर तुमचा विश्वास असेल तरच द्या ,जर तुम्ही सह्या केल्या तर सर्व व्यवहार मला बघता येतील तुम्हाला पण दगदग नको तो अगदी नम्र होऊन गोड बोलला, "अहो विश्वास न ठेवायला काय झालं" तुम्ही का कोणी परके आहात आमचे जावईच तर आहात ना अहो ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय एकच तर आहे!"

सासुबाई बोलल्या आणि तिच्या बाबांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता पॉवर ऑफ अॅटर्नी वर सह्या करून दिल्या मुलीचा संसार मार्गी लागला यातच त्यांना समाधान होतं.

आशु ला मुलगा झाला सिजर करावे लागले रीवाजा प्रमाणे सर्व खर्च माहेरच्या मंडळींनी केला बाळ बाळंतीण सुखरूप होते आता बारशासाठी म्हणून त्याने तिला माहेरी आणले शिवाय बाळाची शी -शु तुला काही कळणार नाही लहान मुलाला सांभाळता येणार नाही या हेतूने तिला वर्षभर माहेरीच ठेवण्याचे ठरले . माझ्या नातवाला ट्रेन किंवा टॅक्सी मधून मी देणार नाही म्हणून त्यांनी नातवाच्या नावाने क्वाँलिस गाडी खरेदी केली व त्या गाडीतूनच पहिल्यांदा सुमितला घेऊन ती माहेरी आली बाळाने पहिला प्रवास स्वतःच्या गाडी मध्येच केला

अभिजीत आता येऊन जाऊन राहत होता शनिवार रविवार अशू च्या घरी व इतर दिवशी स्वतःच्या फ्लॅटमध्ये. मध्यंतरी बँकेच्या लॉकरची किल्ली तो तिच्याकडून घेऊन गेला पण मुलांच्या संगोपनात गुंतलेले असल्यामुळे तीने कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही शेवटी आहे ते आपल्या दोघांच आहे हा विचार तिच्या मनात होता. आई-वडील तर बिचारे एकदमच साधे भोळे आता एक मुल झाले म्हणजे मुलीचे पाय त्या घरात स्थिर झाले असे त्यांना वाटले. राजा-राणीचा संसार सासरचे कोणी येत जात नव्हते नाही म्हणायला बारशाला सासुबाई येऊन गेल्या. लेकीची सासू पहिल्यांदाच आपल्या घरी आली म्हणून तिचा चांगला मानपान केला, भारीतली साडी घेतली जाताना त्यांनी सहज म्हणून अश्विनी चे दागिने बघायला मागितले.

काय ग किती जुन्या पद्धतीचे हे दागिने? द्या माझ्याकडे मी माझ्या सोनाराकडून चांगले नव्या फॅशनचे घडवून देते... असे म्हणून त्या जवळजवळ 25 तोळे सोनं येऊन गेल्या. येताना नातवाला मात्र हलक्या दर्जाचं झबल व टोपड घेऊन आल्या होत्या. नातवाच्या अंगावर एक ग्राम सोन देखील त्यांनी घातलं नव्हतं, खरेतर सोळंकी फॅमिली यांना हळूहळू लुटत होती पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं

सुमित आता दोन वर्षाचा झाला अश्विनीने मी सासरी जाते असा हट्ट घेतला अग तुला एकटीला त्या घराची सवय नाही तू एकटीन बाळाचं कसं करशील? आई-बाबांनी खूप समजावलं व शेवटी लेकीच्या हट्टापुढे मान तुकवली

सोबत 24 तास घर कामासाठी राहणारी मुलगी तिच्याबरोबर दिली तिचा पगार देखील आशु चे बाबाच देणार होते.

सगळं काही सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच एक गोष्ट घडली जरी आशूला दिसत नसले तरी अशा वेळी देवाने सिक्स सेन्स गेलेला असतो आपल्या नवऱ्याचं आणि या कामवाली चं काहीतरी चाललंय हे तिला कळत होतं. खुसूर -फुसूर बोलण्याचे आवाज येत असत, पण तिला काही करता येत नसे. आता तिला त्याच्यातल्या उणिवा दिसू लागल्या त्याचे वेळी अवेळी घरी येणे, घरखर्चाला पैसे न देणे तिच्या परावलंबीत्वाचा गैरफायदा घेणे कधी येऊन कोणत्याही कागदपत्रावर तिच्या सह्या घेणे

एक दिवस ती कामवालीला ओरडली

काय ग ? मी आवाज दिला तर येत नाहीस, ओ पण देत नाहीस कुठे असतेस? बाबांनी तुला माझ्यासाठी कामावर ठेवलय त्यासाठी तुला तीन महिन्याचा ॲडव्हान्स देखील दिलेला आहे आणि तू फक्त त्यांच्यामागे घोटाळत राहतेस.


ताई जास्त बोलू नका एक तर तुम्हाला दिसत नाही आणि माझ्यावर काय पण संशय घेताय तुमचं काम आणि साहेबांचा काम काही वेगळ आहे का? आपल्या मनातली खदखद तिने बोलून दाखवली मला अशी 56 कामे मिळतील पण तुम्ही गरजवंत आहे म्हणून मी तुमच्याकडे राहिले ती सातवी शिकलेली मोलकरीन तिच्यासारख्या ग्रॅज्युएट संगीत विशारद उच्चशिक्षित मुलीला ऐकवत होती.

मला नको तुमचं काम मी आपली जातेच कशी असे म्हणून अश्विनीने अग , अग म्हणेपर्यंत ती दरवाजा धाडकन बंद करून निघून गेली आशु सुन्नपणे बसून राहिली. नवऱ्याला फोन करून सांगाव म्हणून गेली तर बिल न भरल्याने फोन कट झाला होता. तिचे आई-वडील मुलीला रोज एक फोन करून तिचे ख्यालीखुशाली विचारत असत पण आता फोनच कट झाल्यामुळे त्यांना पण सांगता येणार नव्हते

असे पण आपल्या तोंडून काही कमी-जास्त बाहेर पडू नये म्हणून ती फोनवर मोजकच बोलत असे व सगळे छान चालले असल्याचं भासवत असे घरात अंदाजाने चाचपडत चाचपडत तिने फ्रिज उघडला फ्रिजमध्ये काहीच भरलेले नव्हते फक्त दुधाचे पातेले उगाच तळाशी थोडे दूध त्यामध्ये होते त्यात तिने पाणी घातलं व छोट्या सुमितला पुढे तीन दिवस जगवलं उपासमारीने व ग्लानीने ती तशीच पडून राहिली गेले तीन दिवस तिचा नवरा घरी आलाच नव्हता. कामवाली पण गेली ती गेलीच एकतर नवऱ्याची काळजी त्याला काही झाले की काय पण बाहेर जाऊन कोणाची बेल मारणे तिला जमले नसते. स्वतःच्या जीवाला कंटाळली होती सोबत असणाऱ्या त्या लहानग्या जीवासाठी ती तग धरून होती. काही वेळा मनात आत्महत्येचा विचार देखील येत होता किंवा आपण आणि आपला मुलगा उपासमारीने या फ्लॅटमध्ये स्मरून जाऊ असे तिला वाटत होते फक्त एक अंधुकशी आशा तिला आई-वडिलांकडून होती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दरवाज्यावर थाप पडली तिने कसेबसे जाऊन दरवाजा उघडला आणि दारात आई बाबांचा आवाज ऐकून ती उभ्याउभ्याच कोसळली.

शुद्धीवर आले तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. हॉस्पिटल च्या विविध प्रकारच्या वासाने तिला जाणीव दिली कि ती हॉस्पिटलमध्ये आहे घडला प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला त्यांनी पण तीन दिवसात फोन लागला नाही  म्हणून लेकीच्या काळजीपोटी तिचे घर गाठले त्यातून जावई कुठे गायब झाला? त्याचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? असा कसा न सांगता गायब झाला? ही काळजी पण त्यांना होतीच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या गायब होण्याची तक्रार नोंदवली सगळीकडे त्याचे फोटो पण पाठवले पण तो काळ इंटरनेट किंवा मोबाईल चा नव्हता त्यामुळे लगेच सगळीकडे संदेश जात नव्हते

जावई खरेच गायब झाला का त्याचे आणि कामवाली चे काही संधान होते का? का मुद्दामच तिला व तिच्या बाळाला मरण्यासाठी एकटे सोडून तो निघून गेला असे कित्येक अनुत्तरीत प्रश्न मध्ये ठेवून जगणे सुरू झाले आता तिला कधीच एकटे सोडायचे नाही त्यादिवशी मुलगी हाताला लागली म्हणून लागली असा विचार करून त्यांनी भरल्या घराला टाळे ठोकले व तिला परत आपल्या घरी घेऊन आले.

काळ पुढे पुढे धावत होता बघता बघता पाच वर्षे झाली एकदा एका पोलीस स्टेशनला काही कारणा निमित्ताने गुजरात मधील एक जण आला व अभिजीतचा फोटो पाहून हा माणूस तर चंदन भाई आहे तिकडे सुरतेला माझ्या शेजारी राहतो याचा फोटो इकडे कसा ? असे विचारले. सुदैवाने ड्युटीवर चा पोलीस चांगला होता त्याने फाईल उघडली कारण ज्यावेळी केस नोंद झाली तेव्हाचे सर्व पोलीस आता बदलून गेले होते फाईल पण "व्यक्ती सापडत नाही" ही असा शेरा मारून बंद करण्यात आली होती पण शो केस मध्ये हरवला आहे या सदराखालील त्याचा फोटो न काढल्यामुळे आज त्याचा शोध लागला

पोलिसांनी पुन्हा ती फाईल ओपन केली. तिच्या घरी फोन आला पाच वर्षांनी पुन्हा एकदा तिच्या आशा पल्लवित झाल्या. उत्सुकतेपोटी आशु व तिचे आई-वडील छोट्या सुमितला घेऊन पोलिसांना समवेत गुजरातला गेले. तो कपड्याचे दुकान थाटून बसलेला होता. प्रथम तर त्याने" तो मी नव्हेच" असा पवित्रा घेतला व आपण चंदन पटेल असल्याचे तो ठासून सांगत होता. अश्विनीला तर त्याने ओळख देखील नाकारली पण हाच अभिजीत असल्याचे तिच्या आई-वडिलांनी ठासून सांगितले व त्यांच्या लग्नातले फोटो देखील दाखवले तेव्हा कुठे पोलिसांना पटले. पोलिसांनी त्याला आत घेतल्यानंतर तो काही कबूल करीना पण पोलिसी हिसका दाखवल्यावर पोपटासारखा घडाघडा बोलू लागला पुन्हा एकदा "कुसुम मनोहर लेले "ची आवृत्ती घडली होती ते कुसुम मनोहर लेले स्वतःच्या रक्ताच्या मुलासाठी झाले तर हे कुसुम मनोहर लेले पैशांसाठी झाले होते. त्याने तिला प्लॅनिंग करूनच आपल्या जाळ्यात ओढले होते तिच्या आंधळेपणाचा व तिच्या आई-वडिलांच्या सरळमार्गी पणाचा त्याने फायदा घेण्याचे ठरवले सर्व काही त्याच्या प्लॅनिंग प्रमाणे झाले देखील पॉवर ऑफ अॅटर्नी चा वापर करून त्याने तो फ्लॅट परस्पर विकून टाकला. बँकेत तिच्या नावाने ठेवलेले सतरा लाख त्याने परस्पर काढून घेतले दागिने आईच्या मदतीने आधीच लंपास केले होते. फक्त एकाच गोष्टीत तो सापडला होता ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने पासिंग केलेली क्वाँलिस गाडी त्याने तशीच ठेवली होती. ही मंडळी मला शोधत गुजरात पर्यंत येतील असा त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. त्याचे मोलकरणीशी संधान तर होतेच, तिचा संशय खराच होता पण तितक्या पुरतेच होते. त्यानेच त्या सुनिता नावाच्या मोलकरणीला पाच हजार रुपये देऊन काम सोडून जायला सांगितले. घरात काही खायच्या वस्तू देऊ नकोस तुझे आणि तिचे भांडण झाले असे दाखवून तू निघून जा त्याच्या सांगण्याप्रमाणे मोलकरणीने केले. त्याने फोनचे बिल न भरल्याने फोन कट झाला होता खरे तर त्याने लाईट बिल देखील भरलेले नव्हते पण सुदैवाने अजून लाईट कापलेली नव्हती, त्यामुळे फ्रिज मध्ये दूध राहिले. त्याने तिला आणि बाळाला तडफडून उपाशी मारण्याचा व्यवस्थित प्लॅन केला होता. तो तिला तिकडे सोडून इकडे गुजरात मध्ये येऊन राहायला तिकडे गुजरातमध्ये त्याने आपल्या जातीतली मुलगी केली आशुचा लुबाडलेला पैसा गाठीशी होताच त्या पैशात त्याने सुरतेला घर घेतले. दुकान घेतले धंदा सुरू केला पाच वर्षात एक मुलगी पण झाली त्याने एक हुशारी मात्र केली होती आपली सर्व प्रॉपर्टी त्याने बायकोच्या नावाने दाखवली.

कोर्टात केस उभी राहिली मोलकरणीची साक्ष तिच्या बाजूने झाली शिवाय क्वालीस गाडीचा पुरावा होता ज्याला घर विकले त्याने पण मी अभिजीत सोळंकी नावाच्या व्यक्तीकडून घर घेतले हे कबूल केले व सर्व कागदपत्रे दाखवली सर्व काही कबूल केले पण पैशाला मात्र त्यांनी हात वर केले सगळे पैसे खर्च झाले असेच निर्लज्जपणे कोर्टात बोलला आता आहे ती मालमत्ता मला तिकडच्या सरांनी दिलेली आहे ती त्यांच्या मुलीच्या नावाने आहे त्यामुळे मी की विकू शकत नाही असे नमूद करायला तो विसरला नाही आशुची मालमत्ता मात्र त्याने परस्पर विकली होती 420 च्या कलमाखाली त्याला सजा झाली पण पैसा मात्र मिळाला नाही.

आपल्या मुलीची व आपली फसवणूक झाली आपण एवढे हुशार असून असे कसे फसलो आता आपल्या मुलीचे भविष्य काय या विचाराने आणि बसलेल्या मानसिक धक्क्याने तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांचा अंत झाला आता एकमेव वडिलांचा आधार होता तो पण गेला. आई बिचारी एकदम साधी होती आपली मुलगी आणि नवरा एवढेच तिचे विश्व होते. आता मात्र खंबीरपणे उभे राहण्याची गरज अश्विनी लाच होती तिला इयत्ता नववीत असताना चे दिवस आठवले. आलेल्या अंधत्वावर त्यावेळी पण तिने अशीच खंबीरपणे मात केली होती पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे तिने राखेतून भरारी घेता येईल, त्यानंतर तिने इतिहास घडवला. आता तिने त्या नंतर काय काय केले त्याची एक छोटीशी झलक खाली देत आहे.

स्वतःचा एक म्युझिक ग्रुप तयार केला त्याचे आजपर्यंत पूर्ण भारतात 2411 प्रयोग केलेले आहेत

२) विविध कंपन्यात टाटा इंडिकॉम सारख्या कंपनीत टेली कॉलर म्हणून जॉब केला मोबाईल इन्शुरन्स लोन इत्यादी सर्व डिपारमेंट ला काम केले

३) पाच वर्ष शाळेमध्ये पाचवी ते बारावी नॉर्मल मुलांना शिकवण्याचे काम केले

४)स्वतःचे गाणे स्वतः कंपोस्ट केले व रेकॉर्डिंग केले

५) हिंदी मराठी गुजराती गाण्यांचे विविध कार्यक्रम देते तिच्या ग्रुपमध्ये नॉर्मल व ब्लाइंड दोन्ही पद्धतीचे आर्टिस्ट आहेत

ती सामाजिक भान विसरलेली नाही

तिने स्वयंसिद्धा सामाजिक संस्था काढलेली आहे त्याची ती फाउंडर अध्यक्ष आहे त्यात ऑर्फन मुलांसाठी काम करते 

पीडित स्त्रिया व मुलांना कौन्सिलिंग करते

तिला विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केलेले आहे

2012 13 या वर्षाचा तिला युवक बिरादरी कडून पुरस्कार मिळालेला आहे

2016 17 मी पुरस्कार मिळालेला आहे

ती कविता करते गाणी म्हणते.

स्वतःच्या मुलाला तिने इंजीनियरिंगला घातलेला आहे

आपल्या आई आणि मुलांसमवेत ही सौदामिनी एक सुंदर साधासुध आयुष्य आता जगत आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational