Author Sangieta Devkar

Tragedy Others

4.0  

Author Sangieta Devkar

Tragedy Others

तिचं जगणं मर्यादेतच!

तिचं जगणं मर्यादेतच!

4 mins
291


अहो,पण अस कस करू शकता तुम्ही,सगळी बोलणी झाली आहेत. लोक नाव ठेवतील प्लीज ".सीमा फोनवर कोणाला तरी विनवणी करत होती. पण समोरची व्यक्ती तीच काही ही ऐकून घ्यायला तयार नवहती.

सीमा च्या डोळयातुन अश्रू वाहू लागले. नेमके तेव्हाच शरयू घरात आली. "आई काय झाले? तू का रडतेस?कोणी काही बोलले का?

शरु,अमोल च्या आई चा फोन होता. त्यांना हे लग्न मान्य नाही.

व्हॉट? मान्य नाही म्हणजे ? मग सगळी बोलणी का केली त्यांनी आणि टिळा सुद्धा केला ना? मग प्रॉब्लेम काय आहे? हुंडा वैगरे पाहिजे का त्यांना? तस असेल तर सांग नाही जमणार आम्हाला.

शरु त्यांना काही ही नको आहे.

आई मग लग्न का मोडत आहेत ते ? मी अमोल ला विचारते थांब. शरयू ने आपला मोबाईल पर्स मधून काढला.

नको कॉल करू शरु.अमोल तुझ्याशी बोलणार नाही.

आई कारण सांग का ते लग्नाला नको म्हणतात?

शरु त्यांना माझ्या आणि सचिन ची मैत्री बद्दल खटकत आहे. ते म्हणाले ज्या बाई चे पर पुरुषाशी संबंध आहेत त्या बाईची मुलगी आम्हाला सून म्हणून नको आहे.


आई,हे तर होणारच होत ग. तुला किती वेळा सांगितले की त्या सचिन काका सोबत जास्त उठबस नको करू,लोकांच्या नजरा असतात आपल्यावर.

शरयू तू अस कस बोलू शकतेस? तुला माहीत आहे सचिन फक्त माझा चांगला मित्र आहे.

आई मला काय वाटते याचे जगाला काही घेणं देणं नसते,मुळात एका विधवा बाईचा मित्र असणे अजून आपल्या समाजात स्वीकारले जात नाही त्याला विवाह बाह्यसंबंध असच मानले जाते.

शरु बास कर निदान तू तरी मला समजून घेशील अस वाटले होते पण तुझ्या मनात पण तीच घाण असेल हे नवहते माहीत.

आई फक्त तुला माहीत आहे की सचिन तुझा मित्र आहे,जगाला तो तुझा बॉयफ्रेंडच वाटणार.अमोल मला खूप आवडला होता आई. प्रेम करू लागले होते त्याच्यावर आता काहीच नाही उरले. त्याला माझं तोंड तरी कसं दाखवू? आता एका मुलाने मला नकार दिला उद्या दुसरा,मग तिसरा हे असंच होणार फक्त तुझ्या मुळे! इतकं बोलून शरयू रूम मध्ये गेली आणि बेडवर स्वतःला झोकून देऊन ती हुंदके देऊ लागली.

सीमा विचार करत राहिली. मी विधवा माझ्या मर्जीने झाले काय? माझं मन मोकळे करायला,मला समजून घेणारा एखाद्या माझा मित्र असू शकत नाही का? का म्हणून हा समाज स्त्री पुरुष मैत्रीला बाह्य संबंधाच नाव देतो,सगळीच नाती तशी नसतात आणि पुरुषाला मैत्रीण असेल तर तो दिमाखात सांगतो आणि बाई ने आपल्या मित्रा बद्दल वाच्यता पण नाही करायची? विचार करून सीमाच डोकं दुखू लागले. माझी मुलगी सुद्धा तीच लग्न मोडण्यास मला जबाबदार धरते. या सारखे दुर्दैव काय असू शकते? ती तर आजच्या मॉडर्न जमान्यात जगते ना तरी ,तिने ही मलाच दोषी ठरवले?

बरेच दिवस झाले सीमा सचिन शी बोलत नवहती एक दोनदा त्याचा कॉल आला तेव्हा नॉर्मल बोलली पण शरयू चे लग्न मोडले या बद्दल नाही सांगितले त्याला. सचिन तिच्याच ऑफिस मध्ये काम करत होता. त्याचे लग्न झाले होते त्याला ही दोन मोठी मुले होती. सीमा चा नवरा अनिकेत हार्ट फेल ने गेला .पाच वर्षे झाली त्याला जाऊन. सचिन सोबत सीमा ची चांगली मैत्री होती सुरवाती पासूनच पण अनिकेत गेला त्या नंतर सचिन एक चांगला मित्र म्हणून सीमाची हर प्रकारे काळजी घ्यायचा,तिला मदत ही करायचा . सगळ्याना या दोघां मध्ये काहीतरी आहे असेच वाटत होते. त्यामुळे अमोल च्या घरच्यांनी ही सीमा चे एका विवाहित पुरुषा शी संबंध आहे असाच समज करून घेतला.

काही दिवसांनी सचिन ने ऑफिस मध्ये त्याच्या मुलीचे लग्न ठरले ची बातमी दिली. सीमा ने त्याचे अभिनंदन केले. अलीकडे सीमा आपल्याशी जास्त बोलत नाही हे त्याला समजले होते पण आपल्या मुलीचे लग्न ठरते आहे त्यात तो बिझी होता म्हणून त्याने सीमा ला इग्नोर केले.

सीमा घरी आली आणि खूप रडली. सचिन पुरुष आहे त्याला कोणी ही नावे ठेवली नाहीत . त्याची आणि माझी मैत्री त्याच्या मुली च्या लग्नात आड नाही आली. पुरुषाने विवाह बाह्य संबंध ठेवले तरी त्याच्या मुलांची लग्ने निर्विघ्नपणे पार पडतात पण तेच त्याच जागी बाई असेल तर मात्र तिच्या सोबत तिच्या मुली ला ही बोल लावले जातात. हीच आपल्या कडची समाजाची मानसिकता! एका बाई ने बाई च्या ठरवून दिलेल्या मर्यादेतच राहायचे, विधवा,घटस्फोटीत असेल तर पर पुरुषांशी कसलेच संबंध नाही ठेवायचे ,ठेवले तर जग तिलाच नावे ठेवतो. बाई ने एकदा का "आईपण" स्वीकारले तर आयुष्यभर ते निभावत रहायचे. आई पण सोडून इतर गोष्टी तिला वर्ज्य! सुरवातीला" पत्नी" म्हणून नंतर मुलांची "आई" म्हणून तिने सांभालळूनच राहायचे. "आईपणाच्या" साच्यात स्वतःला जखडून ठेवायचे. तिला माणूस म्हणून मन, भावना, इच्छा, अपेक्षा असतात हे समाज पूर्णतः विसरून जातो. आई ने आईच बनून राहायचे ,कधी ही न संपणारे "पालकत्व" नवऱ्याच्या माघारी ही निभावत राहायचे. का? तिला तीच स्वतंत्र अवकाश नसते का? आयुष्य संपे पर्यंत तिने "फक्त आणि फक्त "आईपण "हे बिरुद लावून जगायचे.

प्रश्न खूप होती पण सीमा कडे एकाचे ही उत्तर नवहते. तिच्या आई पणावर समाजाने चिखलफेक केली होती.

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy