komal Dagade.

Tragedy Classics Inspirational

4.5  

komal Dagade.

Tragedy Classics Inspirational

तिचा ध्यास

तिचा ध्यास

4 mins
284


आज पुन्हा उशीर....! गुरुजीच्या मोठया आवाजातील बॉसिंगने कल्पना खूप घाबरली.कल्पनाला काय बोलावे कळत नव्हते. साने गुरुजी रोजच्या तिच्या उशिरा शाळेत येण्याने वैतागले होतें.


कल्पना किती वेळा सांगितलं तुला वेळेवर शाळेत येत जा, "बघ बरं अर्धा तास उशीर झाला तुला. कसं समजेल तुला वर्गात काय शिकवलं ते....?


गुरुजींच्या बोलण्याने ती शांत उभी होती. एकही शब्द तिने तोंडातून काढला नाही. त्यामुळे साने गुरुजीनी तिला वर्गाच्या बाहेर राहण्याची शिक्षा केली.


रोजच ठरलेलं होतं कल्पना गुरुजींचा ओरडा खाऊन पहिला तास बाहेरच असायची. गुरुजी तिच्यावर खूप वैतागले होते. कारण तिला सांगून सुद्धा तिच्यात काहीच फरक पडत नव्हता. रोज शिक्षा खाणे तिच्यासाठी रोजचा दिनक्रम झाला होता.


साने गुरुजी अत्यंत कठोर स्वभावाचे शिक्षक. मुलांना अत्यंत तळमळीने शिकवायचे. शिक्षेला तर वर्गातील मुले खूप घाबरायचे. काहीही अभ्यास न येणारी मुले न चुकता त्यांच्या विषयाचा अभ्यास करायचे.


साने गुरुजीची परिस्थिती बेताचीच होती. त्यांचा मुलगा हुशार होता. त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज काढले. हुशार मुलाच भवितव्य घडवण्यासाठी ते खूप मेहनत घेत होतें.


आज घरातून ते जरा लवकरच निघाले. जाताना त्यांनी कल्पनाच्या घरून चक्कर मारून जावी असा विचार केला. तिचा रोजचा उशीर आणि बुडणारा अभ्यास याची कल्पना तिच्या घरच्यांना देण्यासाठी ते तिच्या घरी निघाले.


साने गुरुजी कल्पनाच्या घरी पोहचले. परिस्थिती तिची बेताचीच त्यांना वाटली. दारात त्यांना तिचे वडील माधवराव दिसले.


हे कल्पनाचेच घर ना...? गुरुजींनी विचारले.


हो....तिचे बाबा म्हणाले.


मी साने गुरुजी, कल्पनाला शिकवतो.


हो, याना आतमध्ये कल्पनाचे बाबा त्यांच्यासाठी पाणी घेऊन आले.


गुरुजी घर न्याहळत होतें, घर पत्र्याचच होते. एक स्त्री बाजेवर त्यांना झोपलेली दिसत होती. अंगावर पांघरून होतं तिच्या.कल्पना काही नजर पडत नव्हती.


हा बोला ना गुरुजी, काय काम काढलत आमच्याकडे...?


हो सांगतो,गुरुजी त्यांच्याकडे पाहत म्हणाले.


कल्पना अत्यंत वर्गातील हुशार मुलगी पण हल्ली तिचे अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही . वेळेवर वर्गामध्ये हजर नसते. रोज सांगून तिच्यात सुधारणा नाही. शेवटी तुमच्या कानावर घालावं तिचं वागणं, म्हणून आलो. शेवटी वेळेत मुलांची कानउघडणी केलेली चांगली नाही का....?


कल्पनाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गुरुजी पोरीची काही चूक नाही, चूक माझी आणि माझ्या या परिस्थितीची आहे. वर्ष होतं आलं माझ्या बायकोला अंथरुणावर खिळून, आजाराने ग्रासली आहे ती.


शेती करून काय होतं...?


कर्जाच ओझं आहे डोक्यावर. एवढ्या छोट्या माझ्या मुलीला माझी कळकळ येते हो. घरातलं सगळं आवरून चार घरची धुनी- भांडी करायला जाते मला हातभार लावायला. लहान वयातच खूप समजदार आहे. त्यामुळे तिचं दुर्लक्ष होतंय. त्याबद्दल मी माफी मागतो तुमची...!


गुरुजी निशब्द झाले ऐकून, आहो माफी नका मागू.तुमचीही यात काही चूक नाही.गुरुजींना छोट्या कल्पनाचं खूप वाईट वाटत होतं.


तोपर्यंत कल्पना आली समोर गुरुजींना बसलेलं पाहून जरा घाबरलीच.


कल्पना ये...! घाबरू नकोस बाळा...!तुझीच वाट पाहत होतो. यापुढे उशीर झाला तरी काळजी करू नकोस. मी तुझं एक्सट्रा तास घेत जाईन,आणि हो कोणत्याही गोष्टीची तुला गरज असेल, तर ते बाबाना न सांगता मला सांग. वही, पुस्तकं मी तुला देईन. कल्पनाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.


गुरुजी निघून गेले. त्या दिवसापासून कल्पनाच्या शाळेचा खर्च गुरुजी करत होतें.


यानंतर बराच काळ लोटला.गुरुजींचा मुलगा विवेक खूप शिकला. परदेशातून लग्न करून घरी परतला. गुरुजींना एका शब्दाने त्याने विचारले नाही.गुरुजी त्याच्या शिक्षणापायी कर्जबाजारी झाले होतें. त्या काळात गुरुजींची बायकोही अर्ध्यावर साथ सोडून गेली.


एक दिवस त्यांना बाहेर फिरायला चला म्हणून गुरुजींना फोरव्हिलर गाडीत घेऊन गेला, आणि वृद्धाश्रमाची पायरी चढायला लावली. "का तर नवरा बायकोला त्यांची अडचण होतं होती. त्यांचे कपडे परत घेऊन येईल अस म्हणाला त्यानंतर तो गुरुजींना तोंड दाखवायला गेला नाही.


गुरुजीचं हृदय तीळतीळ तुटत होतं. मुलाला जन्माला घालून खूप मोठी चूक केल्याचा पच्छाताप त्यांना होतं होता. रडून तरी काय उपयोग.....? वेळ निघून गेली होती.


कल्पना शिकून मोठी झाली. तिच्या आईने जगाचा निरोप घेतला होता. कल्पनाने स्वतःच्या हिमतीवर घर उभे केले. तिच्या बाबांबरोबर आनंदाने राहत होती. कल्पनाने स्वतःचे अस्तित्व उभे केले होतें. तिच्या गुरुजींनी दिलेली शिकवण तिला अजूनही आठवत होती. त्यामुळे तिच्यासारख्या गरजूना ती मदत करत. अनाथश्रम, वृद्धाश्रमात होईल तेवढी पैसे देऊन मदत करत असे. त्यातून तिला वेगळाच आनंद मिळे.


एके दिवशी ती नेहमीप्रमाणे वृद्धाश्रमात भेट देण्यासाठी गेली. वृद्धाश्रमात गेल्यावर सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत होती. तिला तिथं पाहून सगळे वृद्ध आजी-आजोबा आनंदीत झाले होतें. कारण मुलीसारखं प्रेम ती तेथील सगळ्यांना देत होती.


त्यात तिची नजर नवीन थकलेल्या चेहऱ्यावर गेली. तिने तो चेहरा ओळखला. चेहऱ्यावर सुरुकुत्या, निस्तेज भिरभीर करणारी नजर तिला पाहताच रडूच आले. ती त्यांच्याकडे गेली. गुरुजी तुम्ही इथे कसा ..?


हो मीच, परिस्थिती पुढे माणूस नेहमीच नतमस्तक होतो. रुबाबात, शिस्तीत राहणाऱ्या गुरुजीची अवस्था तिला पाहवत नव्हती.त्यांचे हातपाय लटपट कापत होतें.तू इथं कशी कल्पना....?


गुरुजी तुम्ही मला ओळखलत...?


हो शिक्षक कधीच विद्यार्थ्याना विसरत नाहीत. तू तशी माझी खूप लाडकी विद्यार्थिनी...!!


कल्पनाला खूप वर्षांनी गुरुजींना बघून आनंद झाला होता.


गुरुजी मी तुम्हाला इथं अस पाहू नाही शकत. माझ्या घरी चला मला मुलगी मानता ना...? मुलीलाही एवढं कोणी करत नाही, तेवढं तुम्ही माझ्यासाठी केलत. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहचले. तुम्ही हक्काने या मुलींसाठी केलत आता मीही करणार तुमच्यासाठी....?


गुरुजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतें. आज आपल्यानं परकं केलं, पण थोड्या मदतीने परकं आपलं झालं.


ते नको नको म्हणत असताना त्यांना हक्काने दर्डावून तिने घरी नेले. त्यांच्यावर बॉसिंग करत ती म्हणाली." गुरुजी तुम्ही जेवढं तुमच्या मुलासाठी केलत, तेवढंच माझ्यासाठी केलं. तुम्ही मुलीसारखं जपलंत. मी माझ्या बाबांना अस नाही सोडू शकत. तुम्हाला माझ्या बरोबर यावंच लागेल घरी . माझी शपथ तुम्हाला...! तिच्या बोलण्याने त्यांचं मन घायाळ झालं. ते स्वतःला अडवू नाही शकले. ते निशब्द होऊन तिच्या पाठोपाठ जाऊ लागले. कारण एका मुलीचा आदेश होता. तो त्यांना पाळावाच लागला. 


***********समाप्त ************


लेख काल्पनिक आहे.कसा वाटला नक्की कळवा. तुमचा अभिप्राय मोलाचा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy