STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

तेजस्विनी

तेजस्विनी

8 mins
418

  'तेजस्विनी' ही एक प्रेरणा देणार्‍या मुलीची कथा... तिने लहानपणापासून आपल ध्येय निश्चित करून जिद्दीने, मेहनतीने यश संपादन करणार्‍या तेजस्विनीची ही प्रेरणादायी कथा....        


एक लहानस खेडगाव होत. गावात घरेही ​कमीच, सगळी शेतावर आपला उदर्निवाकरणारी कुटुंबे राहत होती. त्याच गावात सदाशिवच एक कुटुंब राहत होत. सदाशिवला एकच मुलगी होती, तिच नाव तेजस्विनी. ती लहानपणापासुन खुपच हुशार होती. तेजस्विनीची आईस्वरूपा ही पाटलांच्या शेतात काम करायची आणिवडीलही तिथेच काम करायचे. गाव म्हटल्यावरथोडीच घरे होती. गावात जाण्यासाठी अजुनहीकच्चा रस्ता होता. उन्हाळ्यात पाण्याची टंचाईजाणवत असे. दुसर्‍या गावात जायच म्हटल कीसायकल कींवा पायीच जाव लागे. गावाच्याआजुबाजुला सगळी शेतेच होती. गावाची बरीचलोक ज्यांचा उदनिर्वाह शेतीवरच होता. याच गावात तेजस्विनी राहायची. ती प्राथमिक शाळेतशिकत होती. गावात फक्त चौथीपर्यंत शाळा होती.ती अभ्यासात हुशार होती. एकच मुलगी म्हटल्यावरती आईवडीलांची लाडकी होती. परिस्थिती तशीबेताचीच होती. पण सदा आणि स्वरूपा आपल्यामुलीसाठी खुप कष्ट करायचे. ते एक दिवसहीघरी राहत नव्हते. तेजस्विनीला सुट्टी होती. तीआपल्या आईसोबत पाटलांच्या घरी आली.तेव्हा तिथे पाटलांच्या वाड्यासमोर तिने वर्दीतल्यापोलिसाला पाहीले. तिला त्यांना पाहून खुपचअभिमान वाटला. तेव्हा लहान वय ते सहजचआपल्या वडीलांना म्हणाली..." दादा , मला पण मोठ होऊन असच पोलीस व्हायचय.... तिचे वडीलही म्हटले , ' हो बेटा, तु खुप शिक आणि मोठी हो... त्या पोलीसकाकांसारखी....'


तेजस्विनीची परिस्थिती गरिबीची होती, जमिननाही, फक्त गावाकडे लहान छप्पर होत, त्यागावात तर कामधंदा नाही म्हणून ते या गावातआले आणि नवराबायको दोघेही पाटलांच्याइथे शेतात काम करू लागले. तेजस्विनी शाळेत खुप हुशार होती. अभ्यासाततर वर्गात सगळ्यांत पुढे असायची. तेवढीच समजदार होती, एवढीशी शाळेत जाणारी मुलगीपण सगळ घरच काम करुन शाळेचा अभ्यासहीकरायची. सदा आणि स्वरूपाला आपल्या यापोरीची खुप कौतुक होत. तिला संध्याकाळीअभ्यास करताना पाहील की या दोघांचा दिवसभरकाम केल्याचा थकवा दुर व्हायचा. त्यांना मुलगानव्हता पण त्यांना तेजुवर खुप विश्वास होता. हिच आपली उद्याची परिस्थिती बदलू शकतेअस त्या दोघांना वाटायच. तेजु ही अत्यंत गुणीआणि आज्ञाधारक होती. ति शिक्षकांना आवडायची.सोनाली म्हणून तिच्या आवडत्या शिक्षिका त्यांचीतर खुप लाडकी होती. शेजार्‍यांना देखील मदतकरायची. कुणाच पत्र, एखादा कागद काहीवाचायच लिहायच काम असेल तर शेजारीपाजारीतेजुकडे येत, ती पण ते काम करुन द्यायची. तेजुच चौथीपर्यंच गावातल शिक्षण पूर्ण झालआता तिच्या वडीलांना तिला पुढे शिक्षणासाठीदुसर्‍या गावात आणि तेही आठ कि. मी. पाठवणेम्हणजे, भितीच वाटत होती. ग्रामीण भाग असल्याने दिवसातुन एकदाच बस गावात यायची.काही काम असेल तरच लोक तिकडे जात. त्यातमुलीची जात म्हटल्यावर लोकांच्या वाईट नजरामुलींच्या बाबतीत घडणारे प्रकार यामुळे तेजुलापुढे शिकवाव की नाही या विचारांत तिचे बाबाहोते. त्यांच मन तर मुलीच्या काळजीपोटी नाहीचम्हणत होत, पण तिची आवड, हुशारी यांच कायउपयोग मग .... तेजुला पण शिकायच आहे.     


नेहमीप्रमाणे सदा कामावर गेला, त्याच कामात लक्ष नाही, तो कुठल्यातरी विचारांत आहे.हे पाटलांना जाणवल त्यांनी त्याला काय झाल ?अस विचारल्यावर त्याने आपल्या मुलीच्या पुढील शिक्षणाची चिंता बोलून दाखवली. मग पाटीलम्हणाले.... हे बघ सदा, तेजु खुप हुशार आहे.तिला शिकव, ती पुढील शिक्षणाला जाईल.त्यांनी तेजुला सायकल घेऊन दिली. आणि तिचेशिक्षकही त्यांनीही तिच्या वडीलांना तिला पुढे शिकवा अस सांगितल. सदाशिवने तेजुला पुढे शिकायला पाठवल. तेजुलाही पाचवीच्या पुढे आपण शिक्षण घेऊ शकु याचा खुप आनंद झाला.ती रोज आठ किमी प्रवास करुन शाळेत जायची आणि बरोबर यायची. तिथल्या मुली फक्त चौथीपर्यंत शिकत आणि पुढे शेतीच काम करत.पण तेजुचे विचार वेगळे होते. ती खुप जिद्दी होती.आपली मुलगी पुढे शिकते, पैसा लागेल तिलाम्हणुन तिचे आईबाबा खुप कष्ट करायचे. तेजुला काहीही कमी पडू देत नव्हते. तेजुही इतक्या लांब शाळेत जाऊन कधीदमायची नाही, मन लावून अभ्यास करायची.तिचा नेहमी प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक येतो.तिच एक स्वप्न होत. मोठ होऊन तिला पोलीस अधिकारी बनायच होत. शिक्षकही तिला चांगल मार्गदर्शन करायचे. ती पण खुप मेहनत घ्यायची.तिला आपल्या आईवडीलांच आणि गावाच नाव मोठ करायच होत.


तिला शाळेत चांगल्या मैत्रिणी आणि चांगले शिक्षक मिळाले. तिला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेल. खुप काहि शिकायला मिळाल. तिने दहावीपर्यंत आपले शिक्षण पुर्ण केले. दहावीला मन लावून आणि चांगला अभ्यास केला. रात्री कमी वेळ मिळायचा परंतु सकाळी लवकर ऊठुन तिने अभ्यास केला. तिला कुठलेही क्लास लावले नव्हते. कारण तेवढेपैसे क्लासला भरण्याएवढी ऐपत नव्हती. तिने आईबाबांना कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट धरला नाही. आईवडील करीत असलेल्या कष्टाची तिला जाणीव होती. शाळेतुन येईपर्यंत सायकलच्या प्रवासाने दमुन जायची, पण तरीही आई शेतातुन उशीरा यायची म्हणुन स्वयंपाक करणे, बाकी सगळ आवरायची. मग यात तिचा वेळजायचा. जनावरांचचाही चार्‍याच तिला बघावलागे. आईवडील संध्याकाळी दमुन आल्यावरत्यांना चहा द्यायची... आपल्या मुलीच्या हातचा चहा पिउन त्यांना छान वाटायच... थकवा तर दुर पळून जायचा. इतक सगळ करुन मिळालेल्या वेळेत ती रात्री आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायची. तिची हीच मेहनत आणि मनापासुन केलेल्या कष्टाच चीज झाल होत. दहावीच्या पेपरचा चांगला अभ्यास केल्यामुळेति चांगल्या गुणांनी उत्तीर्णच नाही झाली तर जिल्ह्यात ती पहिली आली होती. ही बातमी कळली तेव्हा तिच्या आईबाबांना, शिक्षकांना आणि गावातील सर्वांना तिचा खुप अभिमान वाटला, तिच खुप कौतुक झाल. पेपरला नाव आलं. शाळेचं आणि आईवडीलांचही नाव झाल. तिच्या वडीलांना तर खुप आनंद झाला. तिच्या यशाने ती खुप आनंदात होती. पण तिला अजुन पुढे झेप घ्यायची होती. पुढे अजुन शिकायच होत. हा तर पहिला टप्पा तिने यशस्वीपणे पार पाडला.


इतक मोठ यश मिळवूनदेखील तेजस्विनी हुरळून गेली नाही. तिने तिच ध्येय निश्चीत केलं होत. दहावीपर्यंत शिकणारी गरिब, मजुर कुटुंबातुन शिकलेली ती पहीलीच मुलगी होती.त्यांच्या गावात, शेजार्‍यांनादेखील खुप आनंदझाला. सगळीकडे तिच्या यशाची चर्चा होत होती.पाटील साहेबांना तर खुप अभिमान वाटला. त्यांनी गावाच्या वतीने तेजुचा सत्कार केला आणि पुढील शिक्षणास प्रोत्साहन दिले. काही लागल्यास ' मी मदत करेन तुला ' अस आश्वासनदिल. शाळेच्या वतीने तिचा सत्कार झाला.आपल्या मुलीच्या यशाने आईवडीलांच्या डोळ्यांतुन आनंदाश्रु वाहू लागले. आणि त्यांचा विश्वास पटला की याच शिक्षणाने आपली मुलगी शिकुन खुप पुढे जाईल. चांगल काहि करायच म्हटल की अडथळे येतातच तसच झाल तेजुच्या बाबतीत... तिच्याच गावातील एका मुलीला ती शिक्षणासाठी बाहेर होती, म्हणून तिला मुलांनी त्रास दिलावगैरे अस तिच्या वडीलांच्या कानी आल. त्यांना लोकांनी सांगितल की ' तेजुलाही बाहेर शिकायला पाठवू नको, कितीही केल तरी ती अडाणी माणस, त्यांनी अस सांगितल्यामुळे सदालाही आपल्या मुलीच्या काळजीपोटी त्याने तेजुला सांगितले की ' पोरी, आता जवळ होती शाळा म्हणून तुला शिकवल, आता पुढे खुप दुर जाऊनतुला शिक्षण घ्याव लागत असेल, तर ते जमणार नाही. त्यामुळे तु पुढे शिकू नको. त्यांच्याच नातेवाईकांकडून तिला लग्नासाठी स्थळ आलं होत. पण तेजुला शिकायच होत, काय करावसमजत नव्हत. वडील तर तिच ऐकायला तयारनव्हते. तेव्हा सोनाली मॅडम तिच्या आवडत्या टीचरला तिने हे सगळ सांगितल. त्यांनी घरी येऊन तिच्या वडीलांना समजावून सांगितल.त्यांची अडचण, त्यांचे विचार सगळ ऐकून घेतल.तेव्हा पुढील तेजुचा शिक्षणाचा खर्च मी करेलअस त्या टीचरने सांगितल. तुम्ही फक्त तिलासाथ द्या.... तेव्हा तिच्या वडीलांची काळजी दुर झाली.


सोनाली मॅडममुळे तेजुच्या शिक्षणाचा प्रवास परत सुरू झाला. आईबाबांना आता शिक्षणाच महत्व समजल होत. ते तेजुसाठी काहीही करायला तयार होते. तेजुने शेतात, घरी मदतकरुन बारावीच्या परीक्षेत चांगल यश संपादन केल. ती काॅलेजमध्ये प्रथम आली होती. आईवडीलांना या वेळेस खुप आनंद झाला.तिच्या बाबाने तर सगळ्या गावात पेढे वाटले.तेजुलाही आईबाबा आपल्याला सपोर्ट करतातयाच खुप छान वाटत होत. ती बारावी पास झाली. तेव्हा सदा आपल्या बायकोला म्हणाला...स्वरूपा, आपण तेजुला शिकू द्यायच, आपणनाय शिकलो, पर आपली पोरगी शिकून खुपमोठी होईल, अन् बाकीच्या लोकांनाबी पुढेनेईल. ती खुप हुशार आहे. आपल्या वडीलांचेहे कौतुकाचे शब्द ऐकुन तेजुलाही भरुन आल.त्याच दिवसापासुन तेजुने अजुन पुढे जायचठरवल. तेजुची बारावी पूर्ण झाली होती. आता पुढेतिला काॅलेज आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परिक्षेची तयारी सुरू केली आणि पुढचकाॅलेजमध्ये प्रवेश मिळवल. तेजुची परिस्थिती गरिबीची होती, तिला परिस्थितीच भांडवलकरायला आवडत नव्हत. पुढे तीन शिकायचम्हटल्यावर पैसे तर लागणार होते. म्हणुन तीसुट्टीच्या दिवशी काम करायची. त्यातुन मिळणारेपैसेतुन ती पुस्तक घ्यायची. तिला जास्त गुणमिळाल्यामुळे तिला चांगल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन मिळाल होत. सोनाली मॅडमने तरतिला आपली बहीण समजुन काॅलेजसाठी लागणारी सर्व मदत केली. ती तिथेच हाॅस्टेलालाराहू लागली. आईवडील तिला पैसे पाठवत होते.कारण काॅलेज गावापासुन लांब तालुक्याच्या ठिकाणी होत. ती काॅलेजमध्ये गेल्यावर खुपपहील्यासारखा अभ्यास करू लागली. तिनेशिक्षकांकडुन राज्यसेवा परिक्षेविषयी सर्व माहीतीमिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा अभ्याससुरु होता. काॅलेजमध्ये इतर मुलींसारखी तीवेळ वाया घालवत नव्हती. ती तिच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती. स्पर्धापरिक्षेचा आणि काॅलजचा दोन्ही अभ्यास ती करत होती.हे चालु असताना ग्रॅज्युएशन देखील पूर्ण करतहोती. तिने स्पर्धापरीक्षेसाठी क्लास वगैरे जाॅईन ती करू शकत नव्हती, कारण त्यांची फितिला परवडण्यासारखी नव्हती. पण तिलामार्गदर्शक शिक्षक चांगले मिळाले. अभ्यास तर चालू होता, करत होती. तिने पहीलीराज्यसेवेची प्रिलीअमची परिक्षा दिली, त्यातती नापास झाली. तिला थोड वाईट वाटल.आपण कुठे कमी पडतो, काय चुकल ते परतत्या चुका नाही करायच्या, तिला अनुभव मिळाला.तीने परत मन लावून आणि पुर्ण एकाग्रतेनेअभ्यास सुरू केला. पहिल्या अपयशामुळे तिखचुन गेली गेली. तिला अजुन जास्त अभ्यासकरण्याची प्रेरणा मिळाली. पहील वर्ष गेल. दुसर्‍या वर्षी तर्यंत चांगला अभ्यास केल्यामुळेतिला पूर्वपरीक्षेत यश मिळाल. तिला खुपआनंद झाला. ही यशस्वी होण्याच्या टप्प्यातीलपहीली पायरी तर ती चढली होती. त्याच जिद्दीनेती अभ्यास करत राहीली, ग्रॅज्युएशन पुर्ण झाल्यावर तिने मुख्य परिक्षा दिली. त्यातहीती पास झाली. तिच्यात जिद्द होती आणि मेहनतकरण्याची तयारी होती. आईवडीलांपासुन दुरराहुन तिने हाॅस्टेलला राहुन, काॅलेज लाईफ असुनही एवढ enjoy न करता तिने अभ्यासालाप्राधान्य दिल. कारण तिला तिच्या ध्येयापर्यंतपोहचायच होत. एक दिवस ति ती मुलाखतीमध्येही पास होते. तिची आयपीएस पदी निवड होते.तिला आणि आईवडीलांना, सर्व गावकर्‍यांनाआनंद झाला आणि सगळ्या गावाला तिचाअभिमान वाटला. एवढ्या गरिब परिस्थितीततिने जिद्दीने शिक्षण घेऊन हे यश मिळवल.


तिला मदत करणार्‍या आणि आपल्या बहिणीसारख नेहमी पाठीशी असणार्‍या सोनाली टीचरला तर खुप आनंद झाला. त्यांना खुप अभिमानआणि तिच्यावर विश्वास होते. तेजस्विनी त्यांनाजाऊन भेटली आणि त्यांचे आर्शिवाद घेतले.  एक गरिब कुटुंबातील मुलगी, आणि तिलाशिकवणारे , साथ देणारे तिचे आईवडील यांच्यासपोर्टमुळे तेजस्विनीने आयपीएस परीक्षा पासकेली. तिच्या यशाबद्दल , प्रवासाविषयी सर्वचवर्तमानपत्रांतुन तिच्याविषयी छापण्यात आल होत. तेजस्विनीच स्वप्न खुप कष्टाने पूर्ण झालहोत. जेव्हा ती तिच ट्रेनिंग पूर्ण करुन तिच्यागावात परत येते तेव्हा तर सगळा गाव तिच्यास्वागतासाठी सज्ज झाला होता. गावाच्या वतीनेतिचा सत्कार करण्यात आला. आता ति अधिकारीझाली होती. त्यामुळे सगळीकडुनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. आईबाबांना तरखुप छान वाटत होत. गावात खुपच बदल झाला.तेजस्विनी ने शिकुन आयपीएस होउन स्वतःचशाळेच, आणि गावाच नाव मोठ केल. तिच्याआईवडीलांचही सर्व स्तरातुन कौतुक झाल.गावातील मुलींनी तेजस्विनीपासुन प्रेरणा घेतली.सर्वच मुली आता शिकु लागल्या आणि त्यांचेघरचेही त्यांना सपोर्ट करू लागले. गावातीललोकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.आयपीएस म्हणुन सगळा गाव, जिल्हा तिलाओळखु लागला. सगळे तिला आता बघितल्यावरसलाम करतात. गावात जाणारे पक्के रस्तेतयार झाले. तिच्यामुळे गावाला एक नवी ओळखमिळाली. गावात शाळा तयार झाली आणिकाॅलेजचही काम सुरू झाल. तिच्याच गावातबायका, मुलींना त्रास देणारे दारू पिणारे आणिटपोरी मुल सुध्दा तेजस्विनीला वर्दीत पाहूनघाबरतात. महीलांना त्रास देणार्‍यांना वचक बसला. तेजस्विनीमुळे गावात खुप चांगल्या गोष्टी झाल्या. एक मुलगी शिकली तर गावएवढ पुढे गेल. आपण इतर मुलींना शिकवलपाहीजे, आणि त्यांना शिकवणे आपली जबाबदारीआहे, अस प्रत्येक वडीलांना समजल. सर्वांसाठीआयपीएस तेजस्विनी आदर्श होती. तेजस्वीनीनेआपल्या यशाच श्रेय आईवडील, तिला मदतकरणार्‍या टिचर सोनाली मॅडम यांना दिल..." तुमच्यामुळे मी माझे हे स्वप्न पुर्ण करू शकले."मला तुमच्या सर्वांची साथ आणि आर्शिवादामुळेमी हे यश मिळवू शकले.             


या गोष्टीवरुन एवढच सांगायच आहे की आपण कुठलही यश मिळवण्यासाठी मेहनत, जिद्द आणि सातत्य असेल आपल स्वप्न नक्कीच पूर्ण होत. अस म्हणतात ना ' कोशिश करनेवालोकी कभी हार नहीं होती. ' आपल ध्येय निश्चितकेल्यास आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्नकरत राहील्यास यश आपल्याला मिळतेच.स्पप्न नुसत पाहायच नसत तर ते सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. शेवटी कस आहे, स्पर्धेत हजार लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करावं लागत. प्रयत्न करत राहील्यास एक ना एक दिवस आपला येतोच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational