Anuja Dhariya-Sheth

Romance

3  

Anuja Dhariya-Sheth

Romance

ते गुलाबी दिवस

ते गुलाबी दिवस

3 mins
97


मागच्या भागात आपण पाहिले... पसंतीचा दिवस....

आता या पुढे तिच्या जीवनात येणारी छटा म्हणजे लग्नाआधीचे ते गुलाबी दिवस....


होकार दिल्यावर सगळीकडे बातमी पसरते.... तिची अवस्था मात्र अजून थोडी धाकधूक होत असते... ती दिवसभर कंपनीमध्ये असते पण कामात लक्ष नसते... संध्याकाळी ऑफिस सुटले आणि बाबांचा फोन येतो... आणि ते सांगतात समीरने नंबर घेतला आहे तो कधी पण फोन करेल....


सोनमची धाकधूक अजूनच वाढते... फोन वाजला की तिला वाटतं त्याचाच फोन आला.... अन तेवढ्यात फेसबुकवर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट येते... ती ऍक्सेप्ट करते... दिवसभरात त्याच्या नातेवाइकांपैकी बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आलेल्या असतात.... त्यासुद्धा ती ऍक्सेप्ट करते... आणि वाट बघत बसते त्याच्या फोनची.... रिंग वाजते... तिकडून तो बोलत असतो... काल भरपूर गप्पा मारणारे ते आज मात्र त्यांना काय बोलावे काहीच कळत नव्हते....


बाहेर भरपूर पाऊस असतो त्यामुळे एका गल्लीत राहूनसुद्धा भेटू शकत नव्हते... फोन ठेवतो... हिची अगदी 'दिल की धडकन तेज होते....'


रात्री परत फोन येतो, जेवण झाले का?? नॉर्मल गप्पा मारुन फोन ठेवला जातो... अहो जाहो करताना तिला अवघडायला होत असते.... त्याला समजून तो म्हणतो अरे तुरे केलंस तरी चालेल.... आवडी निवडी जाणून घेताना हळूहळू ते जवळ येऊ लागतात....


तोपर्यंत घरचे, पुढची बोलणी, तारखा ठरवल्या जातात... त्याला काही कामानिमित्त परदेशी जायचे असते... अगदी ६ दिवसात तो येणार असतो....


पण समीर गेल्यापासून सोनमचे लक्षच लागत नाही कशात.... एका आठवड्यात तिच्यामध्ये हा झालेला बदल तिला जाणवत होता... एका आठवड्यातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते... त्याच्या आठवणीत हिला झोप येत नव्हती.... ६ दिवस संपले... समीर आला... त्यांनी छान डिनरला जायचं ठरवले... अन् नेमकी हिच्या ऑफिसमध्ये मीटिंग ठेवली बॉसने.... सोनमचे सर्व लक्ष समीरकडे असते... मीटिंग संपली आणि ती निघाली पण खूप ट्राफिक.... इकडे समीरची अवस्था... अगदी 'इन्तहा हो गयी इंतजार की' अशी झालेली असते...


गावी दोन्ही घरची मोठी माणसे पुढची बोलणी करायला जमले असतात... ते फोनसुद्धा अधून मधून येत असतात... अन् तेवढ्यात सोनमचा मेसेज येतो... रूमवर आले... १० मिनिटात येते...


लगेच समीर आवरून तयार होतो... ही धावत धावत फ्लॅटवर येते... आणि उशीर झाला म्हणून सॉरी म्हणते... समीर तिच्याकडे एकटक बघत बसलेला असतो... ती लाजून नजर चुकवून बोलते, निघायचं ना... समीर तिला जवळ ओढत मिठी मारतो... तिचं दिल धकधक करत असते... पहिला स्पर्श... खूप लाजत असते... समीर म्हणतो, खूप मिस केले तुला... ती म्हणते, मीसुद्धा... असे म्हटल्यावर... हळूच तिची मान वर करून ओठ ओठावर टेकवताच फोन येतो.... सोनम लाजत फोन उचलते... आई असते... बोलून फोन ठेवते... दोघांना काय बोलावं काहीच कळत नसते... शेवटी सोनम म्हणते, निघायचं ना... उशीर होतोय... त्यांची पहिली डेट... एकमेकांना झालेला पहिला स्पर्श.... खूप छान वाटत असते... खूप गप्पा होतात...


सोनम मनात म्हणते... खरंच आहे... स्वभाव महत्त्वाचा...


आता लग्नाला ५ महिने असतात.... साखरपुडा जवळ आलेला असतो... खरेदीच्या निमित्ताने दोन्ही घरचे येतात... भेटी गाठी होत असतात.... आणि ते अजून जवळ येतात.... त्यात दोघांचे ऑफिसपण जवळ जवळ असते... त्यामुळे रोज लंच ब्रेकमध्ये ते भेटू लागतात.. ती त्याला रोज डबा आणते... चिऊ काऊचा घास ते खात असतात...


साखरपुडा खूप थाटात होतो... नंतर ते दोघे परत शहरात येतात... मस्त पावसाळ्यात दोघे वीकएंडला धबधब्यावर जातात... पावसात ते एकमेकांच्या प्रेमात अगदी भिजून जातात..


दिवस पुढे पुढे जात असतात, लग्न जवळ येते... ते दोघे मनाने खूप जवळ आलेले असतात... एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलेले असतात..


दोघेही सुट्टी टाकून घरी येतात... दिवस मोजत असतात... हळूहळू लग्न घटीका जवळ येते... नातेवाईक येतात... आदल्या दिवशीचे विधी होतात... लग्न घटीका जवळ येते.... लग्न लागते... दोघेही अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा वाटत असतात.... अन् मग सुरुवात होते ती नवीन आयुष्याला.... मनाने ते जवळ आलेले असतातच अन् आता शरीरानेही....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance