शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

स्वतःसाठी जगायचय !

स्वतःसाठी जगायचय !

3 mins
475


  विभा लहानपणापासून अभ्यासात हूशार, समजदार मुलगी. परिस्थिती गरिबीची होती. अभ्यास करून चांगल्या गुणांनी परिक्षा पास व्हायची. हुशार असल्यामुळे कधी कुठला क्लास नाही लावला. परिस्थितीमुळे ती आई बाबांना कधी कुठल्या ड्रेस कींवा इतर गोष्टींसाठी तिने हट्ट केला. तिला खुप वाटायच हे घ्याव. मनाला वाटेल ते कराव. लहानपणी गाण शिकायच होत तर तेही राहून गेल. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागते. दोन वर्षांनी चांगला मुलगा, घरदार चांगल होत, माणसेही चांगली व समजदार आहेत म्हणून घरच्यांनी लग्नही जमवल. तिलाही काही तक्रार नव्हती. पुढे नोकरी आणि घर सांभाळत असताना लहान मुल असताना तिची तारांबळ व्हायची. तरी सासुबाईंच्या मुळे ती सगळ करायची. नवर्‍याचाही सपोर्ट होताच. पण हे सगळ करताना यातच वेळ जायचा. कधीही तिला स्वतःसाठी वेळ मिळायचा नाही. तिलाही हेच लाईफ, मुले आणि घरची जबाबदारी यातंच आनंद वाटत. ती सगळ निभवायची. तसेच मुलांच शिक्षण, त्यांच्या अभ्सासाकडे लक्ष द्याव लागायच. सुट्टिच्या दिवशी त्यांना घेऊन बाहेर जायची. त्यांच्यासोबत ती तिच बालपण जगायची. खूप व्यस्त लाईफ मध्ये ती जगायची. तिच्या सोबतच्या मैत्रिणी फिरायला, ट्रिपला जायच्या पण तिला मात्र मुले आणि सासु सासरे यांमुळे प्रत्येकवेळेस राहूनच जायच. तिने सगळी आपली जबाबदारी सगळी पार पाडली. भाऊ बहिण आणि आईसाठीही तिने खुप केल. ती मोठी होती म्हणून सगळी कर्तव्ये पार पाडली. एक मुलगी, आई, पत्नी, सुन, बहिण सगळ्या भुमिका तिने उत्तम निभावल्या.   


आज मुले शिकली अन् नोकरीला लागली. ती त्यांच्या लाईफ मध्ये सुखात आहेत. विभाही नोकरीतून निवृत्त झाली आहे.आता तिला वेळच वेळ असतो. तिने ठरवलय आता की राहीलेले दिवस स्वतःसाठी जगायचय आणि मनाला जे जे वाटेल ते सगळ करायच. जे जे करायच राहून गेलय आणि तिला जस मनाला वाटत होत तस विभा जगते. मैत्रिणीही तिच कौतुक करतात. मग ती मैत्रिणींना भेटते. त्यांच्यासोबत आता ट्रिपला जाते... फिरायला जाते... मुलेही तिला हे करअ ते कर सांगत असतात. ति ही आपले नवनवीन फोटो काढून मुलीला पाठवते. खुप आनंदी राहते. इतरांनाही आनंदी ठेवते. वाचन करते व लिहतेही. मुलांना, नातवंडांना वाॅट्सॲप वर बोलते. आपले व्हीडीओ पाठवते. ती स्वतः नव्याने जगायला लागली. प्रत्येक दिवस आलेला छान घालवायची. बर वाटत तिला तेवढच वेळ जातो. ती विचार करते एक काळ असा होता मला वेळच भेटत नव्हता. आणि आता तर वेळच वेळ आहे.पण मधल्या काळात बर्‍याच गोष्टी करू वाटत होत्या पण जमलच नाही कधी. मग आता करायला काय हरकत आहे.पण असो मी विचार करत नाही. हे केल नाही ते केल नाही म्हणून खंत करत नाही, उलट मी समाधानी आहे माझ्या आयुष्यात. पण काय राहून गेल... शाळेत, कॉलेजमध्ये होते तेव्हा खूप वाटायच मैत्रिणींना वाढदिवसाची पार्टी द्यावी पण पैसेच नसायचे. काॅलेजमध्ये होते तेव्हा खूप वाटायच मनाला, मस्त एन्जाॅय कराव पण तेव्हा उज्वल भविष्याची स्वने खूणावत होती, म्हणून त्या दिवसात ते करायला जमल नाही नोकरीला लागली आपल्या मैत्रिणींना भेटाव, त्यांच्यासाठी वेळ काढावा पण मलाच वेळ कमी मिळायचा. अस त्यावेळेस जे जे राहील ते मी आता ही करू शकते अस विभावरीने ठरवल होत आणि ती ते करतेही. स्वतःसाठी ती जगत होती. स्वतःला वेळ देत होती. एक नवीन ती तिला गवसली होती.       


ती म्हणते, आपल्याला आता वेळ आहे ना साठी पार केली म्हणून काय झाल ? आपण करू शकतो. आयुष्यात खूप काही करायच असत पण सगळ जमतच अस नाही. इतक्या दिवस तिने सर्वांसाठी खुप काही केल आता तिने ठरवल होत... आता स्वतःसाठी जगायच आहे. तिच्या मनाला वाटेल तस ती छान जगणार आहे. स्वतःवर प्रेम केलच पाहीजे. आता तिला खर स्वतःसाठीही जगल पाहीजे हे कळल होत. जीवन म्हणजे काय ? कधी स्वतःला फोन लावून बघा, लागणार नाही ते व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. तिने तिचे छंद जोपासायला सुरूवात केली. छान दिवस जात होता. छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. विभाला आता कुठलही ओझ डोक्यावर घेऊन जगायच नव्हत. ती म्हणते आता जेवढेही दिवस राहीलेत. परमेश्वराने भरभरून दिलय हो. तस सांगायच झाल तर खूप छान जगले मी. ती स्वतः रोज मैत्रिणींना भेटते... बोलते... छान वेळ घालवतात सगळ्याजणी. फिरायला जातात. मराठी नाटक ,सिनेमा बघतात. कट्ट्यावर सगळे जमतात, गप्पांची छान मैफिल रंगते... वाढदिवस साजरे करतात. अस विभाच मस्त आयुष्य आता छान तिच्या मनासारख जगत होती. मनात जे जे राहून गेल होत ते आता सगळ इन्जाॅय करते. तिने खूप जिवाभावाची माणसे जोडलीत हीच तिची श्रीमंती होती. विभावरी तिच्याच मित्रमैत्रिणींना सांगत होती. " तुम्ही वयाच मनावर घेऊ नका, हे आपले राहीलेल दिवस म्हणजे देवाने दिलेला बोनस आहे अस समजा. जोपर्यंत आपण आहोत तो पर्यंत मनाला जे जे वाटत ते करा. " स्वतःसाठी जगा... आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आपल्याला तस जगता यायला हव !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational