स्वप्न पहायची भीती वाटते...
स्वप्न पहायची भीती वाटते...


अंकिता एक चांगल्या घरातली मुलगी पण... नशीब नसते म्हणतात ना तसेच काहीस....
लहानपणापासून ती स्वप्न बघत गेली....पण पूर्ण कधी झालीच नाहीत....कोणत्या ही मुलीचे स्वप्न असते तें म्हणजे तिचे लग्न.....
तिचे स्वप्न होते अभ्यास सोडून इतर क्षेत्रांमध्ये काही तरी करायचे पण नाही चालले आई बाबां पुढे....इथून सुरवात झाली.... हळू हळू मोठी झाली बाबांना आवड म्हणून इंजिनीरिंग करून मोठ्या आयटी कंपनी मध्ये कामाला लागली....लग्नाचे वय झाले,स्वप्न रंगवत गेली....पण जोडीदार निवडताना पण तिच्या मनाचा विचार न करता ती आमच्या शब्दा बाहेर नाही म्हणून साध मत विचारलं पण नाही तिला....तिचा नकार नव्हता पण तिला विचार करायला थोडा वेळ हवा होता.... पण नाहीच दिला...
हळू हळू बोलणे सुरू झाले, अनुप आवडू लागला तिला, परत तिने समजावले स्वतः ला होते तें चांगल्या साठीच दोघे प्रेमात पडत होते.... एकमेकांच्या.... दिवस सरत होते....साखरपुडा झाला....पण तो हि न विचारता तारिख ठरवली.... खुप् स्वप्न होती ती म्हणाली असुदे लग्न तर नाही ना झाले ते करू आपल्याला हवे तसे सर्व हौस करू.... पण नियतीला मान्य नव्हते.... लग्न जवळ आले आणि तीच्या बाबांचा अपघात झाला....लग्न अगदी दहा दिवसांनी होते...आई बाबा असून पण येऊ शकले नाहीत....मामा, काका, आत्या यांनीं मिळून कार्य उठवल.... सगळी स्वप्न तशीच राहिली...
तो मात्र तिला हसवत, आग परत करू आपण लग्न त्यात काय एवढे...?? सुरू झाला राजा राणी चा संसार.... दोघ मिळून स्वप्न पाहत होते.... गुलाबी दिवस संपले..... आणि गुड न्युज आली....त्याला तर तिला अगदी कुठे ठेऊ असं झालं होते.... त्याला मुलगी हवी होती तर तिला मुलगा....
मुलगी झाली.... खुप् छान सुरू होते आणि त्याची कंपनी बंद पडली.....ती माहेरी होती....
आई तयारी करत होती दिवाळी ची त्याची आणि तिची लग्न झाल्यावर पहिली दिवाळी...स्वप्न बघत होती चला लग्न नाहि झाले मना सारखे...हौस राहिली आता दिवाळी मध्ये पूर्ण करू.....आणि तिला येऊन तो सांगतो सर्व....आता गावी रहाव लागेल...तिची सगळी स्वप्न एका क्षणात संपून जातात....
ती खूप रडते...आता नाही बघणार मी स्वप्न....कारण गावात काहीच सोय नसते.....
माझे शिक्षण, माझी नोकरी.....माझी स्वप्न सगळी संपली....मला नाही बघायची स्वप्न आता...काहीच करायचे नाही....तो म्हणतो आग वेडा बाई असे कुठे असते का???शहरात राहून स्वप्न पूर्ण होतात.... गावात नाही होत....तुझी साथ असेल तर इथे पण आपल्या आयुष्या चे सोन करू आपण.....ती हसली आणि म्हणाली करू मी आहे सोबत....पण आता कोणते स्वप्न नाही बघणार मी....
त्याला जाणवत असते तिच्या मनात असलेली खंत....पण तो हार मानत नाही....ती त्याला साथ देते....पण मनात कोपर्यात स्वप्न असतात दाबून ठेवलेली....
काळ पुढे जातो....अनुप तिला सतत प्रोत्साहन देतो....गावात राहून पण खूप activity करत असते ती...तो तिला कधीच अडवत नाही....
आज ती समाज सेवा करते, खेड्यात जाऊन शिकवते...,तिला असलेली आवड ती जपते त्याच्या साथीने....आज ती एक उद्योजीका, समाज सेवीका म्हणून खूप प्रसिद्ध आहे....पण स्वप्न या शब्दा पासून लांब आहे....
कारण त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतः ची स्वप्ने मात्र मनाच्या कोपर्यात बंद केली....त्याने ती स्वप्ने जागी करण्याचा प्रयत्न केला पण नेहमीच तो असफल ठरला.....याची त्याला जाण होती.....
त्यांच्या लग्नाला २५ वर्ष झाली आणि सर्वानी मिळून तीचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केले तें म्हणजे त्या दोघांचं लग्न परत लावून दिले.... खूप रडली ती मोकळी झाली...आणि त्याने पण सर्वांसमोर सांगितलं आता माझे स्वप्न आहे तिच्या स्वप्नांना पूर्ती द्यायची.... आयुष्यभर माझ्यासाठी तिने स्वतःला आणि स्वतःच्या स्वप्नांना मागे ठेवले....आता तिचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार आहे... तिचे डोळे भरून आले....स्वप्न तर नाही ना हे ती विचार करत असताना अनुपने मिठीत घेतले आणि म्हणाला राणी सरकार खरं आहे हे...
आता तरी नव्याने स्वप्न बघा.....हसत तिने मिठी घट्ट केली.....