नासा येवतीकर

Inspirational

5.0  

नासा येवतीकर

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

3 mins
1.6K


श्यामला खुप शिकलेली आणि राहुल देखील चांगला शिकल्यामुळेच त्याला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तसे दोघे पण पुरोगामी विचारांचे. एकमेकाला समजून घेणारे. मात्र घरात तसे वातावरण नव्हते. परिवारातील इतर सर्व जण त्याच्या वागण्याला नावे ठेवायाची. पण तो काही बोलत नव्हता. एके दिवशी व्हायचे तेच झाले. शेवटी दोघे स्वतंत्र राहण्याचा विचार केला. आई-बाबा आणि परिवारातील सर्व नातलगापासून विभक्त होऊन ते दोघी राजा राणी सारखे जीवन जगु लागले. त्याला बऱ्यापैकी पगार मिळत असल्यामुळे सर्व काही आनंदात होते. तो ऑफिसला गेला की तिला दिवसभर घर खायला उठत असे. टीव्ही तरी किती बघणार. तिचे शिक्षण चांगले झाले होते. मग या शिक्षणाचा काय फायदा ? त्या रात्री दोघे खुप चर्चा आणि विचारविमर्श केले. पण तीने आपला हट्ट सोडलीच नाही. कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी करण्याचा तिचा विचार पक्का होता. त्यामुळे घराला आर्थिक मदत तर होईलच शिवाय माझा वेळ देखील निघुन जाईल. अखेर हो नाही म्हणता म्हणता तीने एक कंपनी जॉइन केली. चार आठ दिवस खुप मजेत आणि वेगळ्या अनुभवामध्ये संपले. काही महिन्यानंतर तिच्या कंपनीने बाहेर गावी दोन दिवस थांबण्याचे नियोजन केले. त्याला सोडून ती दोन दिवस घराबाहेर राहण्याची पहिली वेळ होती. त्या दिवशी रात्री खुप शांतता होती. दोघे एकमेकाला काही बोलत नव्हते. अशीच रात्र सरली. सकाळी दोघे आपाआपल्या ऑफिस मध्ये गेले. सायंकाळी तो एकटाच घरी परतला. आज ती घरी येणार नव्हती. ते दोन रात्र त्याला खुप जड आणि कठीण गेले. तुझ्या नोकरीमुळे हे सर्व होत आहे असे तिला बोलता ही येत नव्हते. काय करावे त्याला काही कळेना. पुढील महिन्यात अशीच बाहेरगावी जाण्याची तिच्यावर वेळ आली. परत मागील दिवस आठवण करून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. मात्र त्याच्या ऑफिसमधील मित्राने खुप दिलासा दिला. एकट्याने रात्र संपविण्याचे औषध त्याला मिळाले. सायंकाळी त्या दोघांची तास दीड तासाची बैठक जमली. डोके सुन्न पडले आणि सकाळ कधी झाले हेच त्याला कळले नाही. त्याला ते औषध खुप चांगले वाटू लागले. तिचे बाहेरगावी जाणे आणि ह्याचे औषध घेण्याचे सूत्र चांगले जुळले. त्याला औषधाची इतकी सवय जडली की आत्ता ती बाहेरगावी जरी गेली नाही तरी तो औषध घेऊन घरी येऊ लागला. चांगला युवराजासारखा दिसणारा तो दिवसेंदिवस कमजोर होत चालला होता. ती याविषयी खुप बोलत होती. तेंव्हा तो रागात येऊन एकच म्हणायचा तु नोकरी सोड मी औषध घेणे सोडतो. अश्या बोलण्याचा मात्र त्याचा काही परिणाम होत नव्हता. एके दिवशी त्याला खुप ताप आले म्हणून दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरानी सर्व तपासणी केली आणि औषध न पिण्याचा मोलाचा सल्ला दिला. जर त्यान हे असेच चालू ठेवले तर जास्त काळ आपल्या सोबत राहू शकणार नाही. पण तो औषधाशिवाय राहूच शकत नव्हता. या औषधामुळे त्याची नोकरी गेली, त्याचे शरीर कमजोर झाले. कोणतेही काम त्याच्याने करवत नव्हते. आत्ता तिच्यावर डबल जबाबदारी पडली. अखेर एके दिवशी याच औषधामुळे त्या राहुलचा अंत झाला. यात चूक कोणाची होती, त्याची की तिची ? हे दोघेही शेवटपर्यंत विचार करीत राहिले. खरोखरच आपले स्वातंत्र्य म्हणजे हेच आहे काय ? असा ही प्रश्न कधी कधी मनात येतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational