स्वातंत्र सेनानींच्या आठवणी
स्वातंत्र सेनानींच्या आठवणी
एक दिवस असेच संध्याकाळी मी व माझे दोन भाऊ, लहान धाकटी बहीण व इतर शेजारील मुले घराच्या अंगणात बसलेलो होतो .घरात लाईट गेलेली होती त्यावेळेस बारा बारा तास लोडशेडिंग असायचे आज लाईट गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी यायची मग आम्ही करायचे काय... तर आजोबांबरोबर सर्वजण गप्पा मारायचो. त्यावेळेस आजोबा बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगायचे. आजोबा म्हणाले, 'मुलांनो,आज सर्व जणांना कोणाची गोष्ट ऐकायची. तेव्हा आम्ही एक सुरात बापूजी बापूजी असे ओरडायला सुरुवात केली.
आजूबाजूचे शेजारील मुलेही गोष्टी ऐकण्यासाठी येत. त्यावेळेस आजोबांनी छान गोष्टी सांगाव्या म्हणून मोनी ने पटकन पळत जाऊ घरातून आजोबांची आरामखुर्ची व चष्मा ,काठी आणून दिली आजोबाही खूप मोठ्याने हसायला लागले. फारच घाई आहे तुम्हाला गोष्टी ऐकायची मुलांनो... आम्ही सगळे एक सुरात मोठ्याने ओरडलो हो... आजोबा... प्रेमाने जवळ बोलावून पिंटूला एका मांडीवर चमीला दुसऱ्या मांडीवर बसवलं. आजोबांनी त्यांची व बापुजींची व त्या काळात घडलेल्या गोष्टी सांगावयला सुरुवात केली.
आजोबा म्हणाले, माझा जन्म १९२० साली छोट्याशा ब्राह्मणगाव गावात झाला. त्यानंतर मी वयाच्या बाविसाव्या वर्षी बापूजी व इतर स्वातंत्र्यसेनानी यांच्याबरोबर 'चले जाव,'मिठाचा सत्याग्रह, दांडी मार्च अशा वेगवेगळ्या आंदोलनात माझा व माझ्या मित्रांचा सहभाग होता. त्यावेळेस आम्हाला सर्वांना ब्रिटिशांच्या अनेक पिळवणुकीला सामोरे जावे लागले. त्यावेळेस इंग्रज आम्हाला सर्वांना काठ्यांनी चोप देत असत. वआम्ही पण त्यांना बापुजीच्या नेतृत्वाखाली शांततेने व संयमाने प्रत्युत्तर दिले.
त्या काळात इंग्रजांच्या जुलुमाला सर्व भारतीय जनता वैतागून गेली होती. शेत साऱा वरील जास्तीचा कर आकारणी, शेतकऱ्यांना विशिष्ट पिके घेण्यास जबरदस्ती करणे चहा, नील, कापूस यांसारखी उत्पादने घेण्यास जबरदस्ती करणे व ती उत्पादने आपल्या शेतकऱ्यांकडून कमी किमतीत खरेदी करून ब्रिटनमध्ये पक्क्या मालासाठी पाठवत असे. व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना दुप्पट किंमत मिळत असे. या सर्व गोष्टीमुळे जनता त्रस्त झाली होती. या सर्व गोष्टी दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक यांच्या लक्षात येत होत्या. या त्रासाला कंटाळून सर्व स्वातंत्र्यसेनानी उठाव करण्यास सुरुवात केली.
त्यादिवशी रात्री एक इंग्रज शिपाई व त्याच्या मागोमाग बाकीचे शोध घेत घरी आले. दरवाजे धडाधडा ठोकू लागले सगळ्यांच्याच दरवाज्यावर रात्रीचे जोरात पावलांचे व ठोकण्याचे आवाज.... ते ऐकून घरातले स्तब्ध झाले. आजोबा म्हणाले, माझ्या आईने दरवाजा उघडला म्हणाली, काय झालं, कोणाला धाड भरलीया एवढ्या रात्रीचा दरवाजा ठोकतयं जणू... त्यानंतर तो इंग्रज शिपाई मोठ्या आवाजात म्हणाला, घराची झडती घ्यायचा आदेश आहे. सकाळच्या आजच्या आंदोलनात कोण होतं हे माहीत आहे त्याचा शोध घेतोय आम्ही... आजोबा घरातून बाहेर आले व त्यांचे सहकारी मित्र ही यांना सगळ्यांना अटक केली व नंतर नऊ महिने तुरुंगात तसेच सर्वांना इंग्रजांनी डांबून ठेवले. ते पुण्याच्या येरवडा कारागृहात नऊ महिने होते.
इंग्रजांचा अत्याचार वाढतच होता जेवढ्यांना अटक केली तेवढ्यांना काठ्यांचा मार सुरूच होता. आजोबा म्हणाले, त्यातल्या माझ्या मित्राने त्यांच्या विरुद्ध बोलण्यास सुरुवात केली तर त्यातल्या काहींची बोटे, गुडघ्यापासून पाय, काहींचे कान कापायाला सुरुवात केली. कोणीही आम्ही त्यांना घाबरलो नाही. आमचा त्यांच्या विरुद्धचा लढा संपला नव्हता. आपल्या देशातून हुसकावून लावण्यात आम्ही सर्व स्वातंत्र्यसेनानी यशस्वी झालो. त्यासाठी मुलांनो, खूप त्रास काढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाचा अभिमान सर्वांनी बाळगा व आपल्या देशातल्या स्वदेशी वस्तू आपण वापराव्यात कारण आपल्या लोकांनी त्या फार कष्टाने बनवलेल्या आहेत. व तसेच परकीयांचे वर्चस्व आपल्यावर होणार नाही.
आपला देश सर्वांच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबापासून आज आपण स्वातंत्र्य झालेला पाहतोय. चला मुलांनो ,आता जेवणाची वेळ झाली. नंतर आम्ही सगळे आपापल्या घरात आलो.रात्रभर आजोबांच्या बोलण्याचा विचार डोक्यात चालू होता.
