अपयशाची निराशा
अपयशाची निराशा
मी रोजच्या प्रमाणेच मैदानावर खेळायला निघालो रोजच्यापेक्षा उशीर झाला होता शूज घातले, पॅड लावला हॅन्ड ग्लोज घातले, बॅट घेतली इतर सर्व साहित्य घेऊन मैदानाकडे निघालो रोज खेळणाऱ्या मुलांमध्ये एक नवीन मुलगा खेळायला आलेला होता मी त्याला त्याचे नाव विचारले व त्यालाही माझे नाव सांगितले त्याचे नाव बबलू होते दोघांची विचारपूस झाली त्याने बी .इ पूर्ण करून एम.पी .एस.सी चे पेपर देत होता.
तो मुळचा सातारा जिल्ह्यातील छोट्याशा कडव गावचा मूळचा राहणारा होता. तो घरातील मोठा मुलगा होता व त्याला लहान छोटा भाऊ व त्याहून दोन वर्षांनी लहान छोटी बहिण असं त्याचं कुटुंब होतं त्याच्या आजोळी सुट्टी साठी आला होता त्याचे राहणीमान बोलणे स्वभाव गुण सर्व खूपच चांगले होते. म्हणून तू लगेच सगळ्यांमध्ये एकत्रित होतं. पण त्याचे स्वप्न होते क्लास वन अधिकारी होण्याचे त्यासाठी तो रात्रंदिवस खूप मेहनत करत होता. त्यासाठी त्यांनी खूप क्लासेस लावलेले होते.
तो रोज सकाळी क्लास करून एका कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करत असे. व अर्ध्या रात्रीपर्यंत उशिरा पर्यंत अभ्यास करत असे. त्याचे डोळे जणू काळे वर्तुळचं झालेले होते. मी त्याला एकदा माझ्या घरी बरोबर आणलं व व तो पण माझ्या शब्दाला मान देऊन आला. स्वयंपाक घरात आईने नुकतेच पोहे बनवलेले होते. आम्ही दोघांनी ते पोहे खाल्ले. घरातल्यांनी त्याच्याबरोबर गप्पा मारल्या. घरातल्या न बरोबर बोलल्यावर त्यालाही बरे वाटले. तसं आमच्या घरात मोकळं असलेलं वातावरण, कोणाची भांडण-तंटा नाही, कोणावरही कसल्या प्रकारचा दबाव नाही. तो म्हणाला, तुझ्या घरातले वातावरण खूपच छान आहे रे...
मला तुझ्या घरातलं वातावरण खूपच आवडलं. तुझ्या घरी येऊन छान वाटलं. व नंतर तो निघून गेला. काही दिवस तो खेळायला आला व त्याची सुट्टी संपली व तो निघून गेला. काही दिवस गेल्यानंतर मी एकदा असंच किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेलो. त्यावेळी त्याच्या मामाचा मुलगा तेथे सामान घेण्यासाठी आला होता. तो माझ्याकडे बघून हसला मी पण स्मित हास्य करत त्याला विचारले, कसा आहेस तू.. काय चाललंय तुझं आता?? सध्या तू काय करतोयस??
त्यांच्याजवळ असलेला किराणामाल पिशवीत भरत तो म्हणाला, काही नाही रे सध्या शेतीचं करतो कधी परवडतंय कधी परवडतही नाही शेतात.. पण अरे वा छान... मी म्हणालो. विषयावर न विषय काढत मी विचारलं बबलू चं काय चाललंय.. तो कसा आहे त्याचा काही फोन बिन. नाही रे तो रडक्या स्वरात म्हणाला. त्याचे डोळे लाल होऊन पाणावले होते. पण रडू आवरत तो म्हणाला, आता तो जिवंत नाही रे, अरे काय बोलतोयस तू , येड बीड लागलाय का तुला, नाही रे खरंच आज दोन महिन्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. का? पण काय झाले होते. त्याला असे तो वागला.
काही नाही तो परत तिसऱ्यांदा एम.पी.एस.सी नापास झाला. म्हणून तो नाराज झाला होता जणू.. ते ऐकून मी स्तब्ध झालो. मला काहीच कळेना. मी पूर्ण सामानही घेतले नाही. व तसाच घरी निघून आलो. कोणाशीच घरात काही बोललो नाही. तेव्हा घरातले म्हणाले, काय झालं.. तू शांत का बसला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मागे माझा घरी आलेला तो बबलू मित्र आता जिवंत नाही. तेव्हा सगळ्या घरातल्यांना ही हळहळ वाटली. घरातले हि म्हणाले, नापास झाला तर झाला होता पुन्हा प्रयत्न करायला हवा होता.असं टोकाचं पाऊल नव्हतं उचलायचं. पण अरे हेच काही सर्वस्व आहे का?इतर काही गोष्टी ही जगण्यासाठी आपण करू शकतो. तशी कला सगळ्या मध्येच देवाने दिलेली आहे. त्या कलाचा आपण जीवनात वापर करू शकतो. जग हे खूप सुंदर आहे
