शब्दसखी सुनिता

Inspirational Others

2  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

सुवर्णकन्या - हिमा दास

सुवर्णकन्या - हिमा दास

5 mins
118


    आपण आज भारताची  'सुवर्णकन्या हिमा दास' हिच्या प्रवासाविषयी बघणार आहोत... आपणा सर्वांना माहीतच असेल भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास सद्या तिची आसाम पोलिस दलात डीएसपीपदावर रूजु झाली. इतक्या लहान वयात तिनेही पोस्ट आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवली.जेव्हा तिने या पदाची सुत्रे हाती घेतली तेव्हामैदान गाजवणारी हीमा दास पोलीस यूनिफाॅर्ममध्येखुपच रूबाबदार दिसत होती... तिच्यावर सर्वस्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव झाला... हा तिचाइथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तरी आपल्या जिद्दीने, मेहनतीने हे यश मिळवले... आपले स्वप्न तिने पूर्ण केले याचा आनंद त्या दिवशी तिच्या चेहर्‍यावर झळकत होता... बघु या कसा होता तिचा इथपर्यंतचा प्रवास...हिमान आयएएफ च्या वर्ल्ड अंडर 20 च्या चँम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.अशी कामगिरी करणारी ती पहीली धावपटू आहे. हिमाच्या नावावर 400 मीटर धावण्याचा विक्रमदेखील तिच्या नावावर आहे. तिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले होतेकी, शाळेत असल्यापासून तिची पोलिस दलात अधिकारी होण्याची तिची आणि तिच्या आईचीइच्छा होती... तिची ही इच्छा आणि स्वप्नपूर्ण झाल्याच समाधान तिने व्यक्त केल....    


भारताची  ' सुवर्णकन्या हिमा दास देशालाजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पंधरा दिवसांतचार सुवर्णपदक जिंकल्याचा पराक्रम तिनेकेलेला आहे. फक्त दोन वर्षांपूर्वी रेसिंग ट्रॅकवरउतरलेल्या हिमाने भारतासाठी मिळवलेलहे यश कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयाचीमान अभिमानन उंचावणारी आहे. आपल्याला या ' गोल्डन गर्ल हिमा दास ' चसोनेरी यश आणि तिने जगात देशाच नाव सुवर्णअक्षरात कोरल आपल्याला तिच हे यशदिसत असल तरी त्या मागे तिच्या कष्टाची,आणि संघर्षाची कहाणी आहे.     


हिमा दास आसाममधील एका छोट्याशाखेड्यात या उडनपरीचा एका शेतकरी कुटुंबातजन्म झाला.... तिला खुप संघर्ष करावा लागलासूरूवातीला आणि आताही जेव्हा तिनेभारतासाठी पहील जागतिक ॲथलेटीक्स चँम्पियनशिपच सुवर्णपदक पटकावल तरीतिचा संघर्ष संपलेला नव्हता... एवढ्याशाछोट्याशा गावातुन आलेल्या हिमाने आपल्यावेगाच्या जोरावर तिने जग जिंकल आहे.हिमाने तिच्या धावण्याच्या करिअरची सुरूवातखुप उशीराने केली. तिचे वडील शेती करायचे.कुटुंबाचा उदरर्निवाह शेतीवरच चालायचा...आणि परिस्थितीही बेताचीच होती. मात्र अश्याही परिस्थितीत सुध्दा हिमाने खुप मोठीस्वप्न पाहण्याच तिने सोडल नाही. स्पप्न नुसतीपाहीलीच नाहीतर ती पूर्ण करण्यासाठी लागणारीजिद्द आणि मेहनत या पोरीत होती. ती सुरूवातीला शेतात फुटबाॅल खेळायची. तीलहान असताना ही पळायची. एकदम जवळूनजर एखादी कार गेली ना... तर त्या चालत्यागाडीशी स्पर्धा करणारी ही मुलगी... कधीशेतांतुन... रानांतुन... चिखलातुन अनवाणीधावणारी हिमा... असच एकदा भाताच्याखचरात एका शिक्षकाने तिला फुटबाॅल खेळताना पाहील. ते गावातच राहायचे. तेव्हावार्‍याच्या वेगाने धावणार्‍या हिमाची क्षमतापाहुन त्यांनी तिला ॲथलॅटीक्समध्ये जाण्याचाआणि त्यासाठी गुवाहटीला पाठवण्याबाबततिच्या वडीलांना विचारले असता सूरूवातीलापहिल्यांदा त्यांनी नकार दिला. परिस्थितीचतशी होती. तिचे वडील रंजीत दास यांच्याकडेकेवळ दोन एकर जमीन होती. त्यावरच सहाजणांच्या कुटुंबाचा उदरर्निवाह चालत असे.तिला स्पर्धेसाठी चांगले बुट घेउन देणेहीघरच्यांना त्यावेळी शक्य नव्हते. हिमा जेव्हाशर्यतीसाठी ट्रॅकवर उतरली तेव्हा तिच्याकडेचांगले स्पोर्टशुज नव्हते. आज त्याच हिमाच्यानावाचा ब्रँड झाला आहे.         


तिच्या वडीलांनी नकार दिला असलातरी हिमा काय कमाल करू शकते हे प्रशिक्षकांनी ओळखले होते. मोठ्या शहरातपाठवायला ते तयार नव्हते, परंतु प्रशिक्षकांनीत्यांची समजुत काढली... तेव्हा तिने आपल्यानवीन प्रवासाची सुरूवात केली.... शेतातफुटबाॅल खेळणार्‍या या हिमाने घेतलेली भरारीने हिमालयाची उँची गाठली आहे.                 


कुणी ' गोल्डन गर्ल ' म्हणत तर कुणी' Dhing expressम्हणून ओळखल्याजाणार्‍या हिमाला आंतरजिल्हा स्पर्धेसाठीती खेळत होती तेव्हा तीने स्वस्तातले बुट घेतले होते... पण तिने स्पर्धेत भाग घेणे सोडलेनाही. खुप मेहनत घेतली होती त्यासाठीतिने... त्याच स्पर्धेत तिने 100 मीटर आणि200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकपटकावल होत. ॲथलेटीक्समध्ये येण्यासाठीतिने खुप कष्ट घेतले. तिच्यासाठी हे सोप नव्हत.तिला कुटुंबाला दुरवर सोडून राहाव लागत असे.त्यानंतर तिने आपल्या करीअरची सुरूवातआणि पुढील वाटचालीसाठी तिला प्रशीक्षकनिपुण दास यांनी गुवाहटीला प्रशिक्षणासाठीपाठवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळूनपाहील नाही.         


2014 मध्ये शालेय स्पर्धेत तिने चमकदाखविली होती. त्यानंतर तिने तालुका आणिजिल्हा स्तरावरील स्पर्धा गाजवल्या. त्यामध्येहीतिने आपली उत्तम कामगीरी करत यशमिळवल. तिचे प्रशीक्षक निपुण दास आणिनवोजित कौर यांनी तिच्या वेगावर विश्वासठेवला. नेहमी तिला प्रोत्साहन द्यायचे. ते फक्त ट्रेनींगच देत नव्हते तर त्यांचा तिच्यावरविश्वास होता की हिमा नक्की एक दिवसदेशाच नाव उज्वल करेल, ते नेहमी सपोर्टकरायचे. 2017 मध्ये नैराबीत झालेल्या' युथ वर्ल्ड चँम्पियनशिपस्पर्धेत हिमाने सहभागीव्हाव यासाठी त्यांनी स्वतः कर्ज काढल.हिमाने 2018 झालेल्या ' जागतिक ॲथलेटीक्सचँम्पियनशीप ' मध्ये सुवर्णपदक मिळवल.हे यश मिळवण सोप नव्हत... तेव्हा सर्वांनाआर्श्चयाचा धक्का बसला. कारण पहिल्या35 सेकंदात ती पहिल्या तीन मध्येही नव्हती.मात्र त्यानंतर तिने आपला वेग वाढवला निसर्वांनाच मागे टाकले... ही स्पर्धा तिनेच जिंकली आणि सुवर्णपदकावर आपल नावकोरल. भारतासाठी तिने सुवर्णपदक पटकावल.हा क्षण तिच्यासाठी खुप महत्वाचा होता...या विजयानंतर जेव्हा देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यातआले तेव्हा भावनिक झालेल्या हिमाला तिचेअश्रु रोखता आले नव्हते.     


आतापर्यंत ' वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटीक्समध्येभारताला तीनच पदके मिळाली आहेत.धावपटू म्हणुन सुवर्णपदक मिळवणारी पुरूष आणि महीला दोन्हीमध्ये ती एकमेवआहे. 2018 या वर्षी हिमाला दुखापतीने' आशियाई ॲथलेटीक्स ' स्पर्धेत सहभागी होता आल नव्हत. 2 019 मध्ये पहिल्यांदाततिने जुलै महीन्यातील दोन तारखेला पहीलपाऊल ठेवल खेळायला सूरूवात केली,आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तिनेसुवर्णपदक मिळवल. त्यानंतर 19 दिवसांततिने 200 मीटरमध्ये 4 सुवर्णपदक आणि400 मीटरमध्ये एक सुवर्णपदक पटकावल.अशा सुवर्णपदकांची तिने कामगिरी केली.नि आपल्या देशाच भारताच नाव जगातमोठ केल. तेव्हापासुन हिमाला दासला' सुवर्णकन्या, गोल्डनगर्ल , धिंग एक्स्रप्रेस,तर कुणी उडनपरी म्हणुन ओळखतात...तिच्या या यशाच जगात सगळीकडे कौतुकहोत असताना... त्याचवेळेस आसाममध्ये पुरपरिस्थिती उद्धभवली होती. एकीकडेती जगभरात देशाची मान उंचावतेय तर दुसरीकडे या यशाद्वारे ती जगाच लक्ष आपल्यापुरग्रस्त राज्याकडे वेधल होत. आसाममध्येतेव्हा भयंकर पूर आला होता. अनेक गावआणि जिल्हे पाण्याखाली गेली होती, काहीलोकांचा पुरामध्ये बळी गेला होता तर हजारोलोक विस्थापित झाले होते... अनेकांचे संसारपाण्यात वाहून गेले होते... तेव्हा याचगोल्डनगर्लने तिच मनही गोल्डन आणि मोठअसल्याच दाखवुन दिल. तेव्हा हिमानेआपल्या अर्धा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठीदेऊ केला. तिने मदतीचा हात पुढे केला.एवढ नाहीतर सर्वांनाही तिने मदत करण्याचआव्हान केल होत....एवढ्याशा वयात केवढी समज या मुलीलाखरच तिच कौतुक कराव तेवढ कमीच आहे.आणि एवढ यश मिळवूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. हिमा सामाजिक कार्यहीकरत असते. त्यातही तिचा सहभाग आहे." ती आसाममधील ' ऑल आसाम युनिअनस्टुडंट स्पोर्ट ' ची सेक्रेटरी आहे. एवढच नाहीतर तिने तिच्या भागात अवैद्य दारू विरूध्दही मोहीम चालविली होती. जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत देशाला पहीलेसूवर्णपदक मिळवून दिल्यानंतर प्रतिक्रियादेताना ती म्हणाली होती की " मला माझ्यापरिस्थितीची जाणीव आहे. कशा पध्दतीनेसंघर्ष करावा लागला हे माहीती आहे. मलामाझ्या आईवडीलांसाठी आणि देशासाठीकाहीतरी करायचे आहे..." तिचा आपापर्यंतचा प्रवास तिला एखाद्या स्पप्नासारखाच वाटतो.तिने एकदा प्रतिक्रिया देतानाच एक किस्सासांगितला होता. " ती शाळेला जात असतानाएका व्यक्तीने गावात कार आणली होती.तेव्हा त्या व्यक्तीने तुम्हांला शाळेत सोडतो अससांगितल आणि गाडीने त्याने अर्ध्या वाटेतचउतरवल तेव्हा तिला ही गोष्ट मनाला लागली.त्यानंतर गाडीसोबत 100 मीटरची शर्यत लावुनतिने गाडीलाही मागे टाकल होत.        


अशी ही 'भारतीयांच्या गळ्यातील ताईत ',भारताची नवीन सुवर्णकन्या हिमा दास.देशासाठी गोल्ड मेडल मिळवूनही देणारीआणि दुसरीकडे आपल्या राज्यातील लोकांनामदतीचा हात पुढे करणारी सुवर्णकन्या...तीची सोनेरी घौडदौड दिसत असली तरी तिनेखुप मेहनतीने, जिद्दीने आणि कष्टाने यशमिळवल आहे. तिच्या वेगाची एक्र्स्पेस जागतिक पातळीवर धावायला सुरूवात झालीआहे. या स्पर्धेतील यशामुळे ती सर्वांपर्यंत पोहचली. आता तर तिने डीएसपी या पदाचापदभार स्वीकारला असला तरी तिने आपणयापुढेही स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचसांगितल.... अशी ही भारताची सुवर्णकन्याहिमा दास एका छोट्याशा खेड्यातुन शेतकरीकुटुंबात वाढलेली मुलगी परिस्थितिच भांडवलन करता आपल्या कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या देशाच नाव मोठ केल...खरच तिचा हा प्रवास... तिच हे यश भारतीयांठीअभिमानास्पद आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational