Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy

3  

Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy

सुपरहिरो

सुपरहिरो

7 mins
335


आज कॉलेजचा पहिला दिवस कॉलेज मध्ये एंट्री केली ते नवीन वातावरन :नवनवीन प्रकारचे विद्यार्थी . सारे काही अनोळखी होते . बाहेर नोटीस बोर्ड वर रोल नंबर , रूम नंबर, व डिव्हिजन बघून सेकण्ड फ्लोर वर माझा क्लास शोधण्यासाठी मी पायऱ्या चढत वर निघालो .अचानक जिण्यामध्ये पायऱ्या चढत असताना माझं लक्ष नसताना एका मुलींचा ग्रुप खाली उतरत असताना माझा चुकून धक्का एका मूलीला लागला . मी मनाने घाबरलो मात्र त्या मुलीने मी सॉरी म्हटल्यामूळे ओके . स्माईल करून त्या मुलीने आपली पुस्तकं उचलली वाट चालू लागली . मी मात्र वरती पायऱ्या चढत असताना हळूच मागे वळून बघितले त्याच वेळी मुलीने सुद्धा मागे वळून बघितले नजरानजर झाली पून्हा स्माइल मिळाले !मला दोन बोट स्वर्ग असल्या चा आनंद झाला . पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश ! माझ्या वर्गामध्ये मी प्रवेश केला . मात्र या तारुण्याच्या . स्वप्नांच्या दुनियेत माझ्या ह्यदयात . नजरेतून ते स्माईल कधी कोरले गेले . हे मलाही कळले नाही . मी वर्गातील एट्री केली . लेक्चर चालू होते . आत जाऊन बसलो . दोन लेक्चर अखेर संपली आणि बाहेर पडलो सारी मुलं कॅन्टीनमध्ये ; गार्डनमध्ये , प्रत्येकांच ओळखींचा ग्रुप मध्ये सामील झाली . माझ्या ओळखीतले दोन मित्र भेटले त्यांच्याशी ओळख निघाली आणि आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर बाहेर बसलो . कारण दोन तासा नंतर दोन लेक्चर होते . सर्व वह्या पुस्तके मी घेऊन बसलो होतो . मात्र माझ्या मित्रांन कडे वही-पेन या व्यतिरिक्त काहीही नव्हते . मात्र इतर गोष्टी त्यांच्याकडे भरपूर दिसत होत्या उच्च दर्जाचे स्मार्टफोन ,हेडफोन , अति उंची कापड . कॉलेज स्टाइल प्रमाणे त्यांचे जवळ असणाऱ्या गोष्टी बघून मला थोडं वेगळं वाटले मात्र या स्वप्नांच्या तारुण्याच्या दुनियेत त्या सार्‍या तारुण्यात मुलांना जणू स्वर्गात आल्याचा भास होत आणि आजूबाजूला फिरणाऱ्या मुली जणू पऱ्या वाटत होत्या प्रत्येकाला वाटत होत्या . आपल्याला कोणीतरी मुलींनी स्माईल द्यावे .मैत्री करावी . आई वडिलांनी घेऊन दिलेल्या मोठमोठ्या जास्त किमंतीच्या बाईकवर बसवंत फेरफटका मारावेत . बाईक वर उगाच मुलींचा ग्रुप दिसला ग्रुप समोरून हॉर्न वाजवत बाईक जोरात न्यावी .उगाच शर्टाची वरील दोन बटन काढून छाती दाखवण्याची जणू स्पर्धा लागलेली दिसत असे . अभ्यासाव्यतिरिक्त व प्राध्यापकांच्या विषयी चर्चा करणे बोर वाटत व इतर गोष्टींचा चर्चा रंगात की लेक्चर्स संपून जात परंतु या मैत्रीची मैफिल कशी रंगत ? संपल्याचा भास बेल झाल्यानंतर होतअसे .त्यामुळे वाटेल तेव्हा एखादं लेक्चर करणे व मनसोक्त तारुण्याचा आनंद लुटने . कॉलेज म्हणजे आईवडिलांनी पाठवलेले मजा करण्याचे ठिकाण ? असं सारे मुलांना वाटत . मी मात्र मनोमनी आपण उच्च प्रकारची . उत्तम गुणांनी व इतर अवांतर गोष्टींकडे लक्ष न देता पदवी घ्यावी असे मनोमनी ठरवून प्रवेश घेतला . कारण घरी आईवडिलांची स्वप्न ! व त्यांनी घेतलेली कष्ट मी माझ्या डोळ्यासमोर दिसत असल्याने इतर गोष्टींकडे मी दुर्लक्ष करू लागलो . मात्र पहिल्याच दिवशी मिळालेला तो स्मायली चेहरा ! माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता .आणि मनातही ;चेहऱ्यावर स्माईल उमटत असे . त्यामुळे रोज दिवस केव्हा उजाडेल आणि कॉलेजला केंव्हा पोहोचेल अशी घाई होत असे . रोज माझे डोळे कॉलेजच्या आवारात आल्यापासून सुटेपर्यंत फक्त तीला शोधण्याचे काम डोळे करत होती . व रोज त्याच वेळेत त्याच जिन्याने चढतांना पायऱ्यांवर मी लेक्चर दुसऱ्या मजल्यावर जात असे . त्याच वेळी त्यांचे लेक्चर सुटून त्या मुलींचा ग्रुप खाली येत असे .त्या ग्रुपमध्ये तो असलेला स्मायली चेहरा ! मला रोज स्माईल करून घायाळ करत असे. मात्र फक्त डोळ्यांनी एकमेकांकडे बघणे. भाष्य करणे . याच्यापुढे काही हिम्मत होत नव्हती . असाच एके दिवशी परीक्षेचे वेळापत्रक लागले होते . तेव्हा अभ्यासाला सुरुवात करावी म्हणून मी गार्डन मध्ये बसलो होतो . कॉलेजला सुट्टी असल्याने फक्त लायब्री साठी मी अभ्यासाठी मी कॉलेजला येत असे . मात्र लायब्ररीमध्ये बसल्यानंतर सारी मित्र डिस्टर्ब करीत होते .त्यामुळे मी नेहमी गार्डन मध्ये एका कोपऱ्यात असणाऱ्या झाडाखाली बसून अभ्यास करत असे . गार्डनच्या कोपर्‍यात असल्यामुळे इतर विद्यार्थी फारसे फिरकत नसत . मात्र समोर हिरवळीवर त्या मुलींचा ग्रुप बसलेला दिसायचा माझे सारे लक्ष अभ्यासाकडे असल्यामुळे लक्ष नसायचं एक दिवस नोट्स काढत असताना शेजारी सावली पडल्याचा भास झाला . सावली कडे बघून मी उंच वर मान केली ते बघुन माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता .ते स्माईल करणारी मुलगी माझ्यासमोर ? मला काय बोलावे ते सुचत नव्हते . हृदयाची धडधड वाढली ! अंगामध्ये एक विशिष्ट प्रकारची लहर निर्माण झाली .मी फक्त स्माईल करू शकलो मात्र ती मुलगी जवळ येऊन म्हणाली हॅलो ! आदित्य अरे मी तुला शाळेत असल्यापासून ओळखते . तुमच्या बिल्डिंगच्या समोर आम्ही राहायला आलो होतो .माझ्या कडे तुमच्या घराची सारी माहिती मिळत होती . कारण माझ्या आईची मैत्रीण तुझी आई या मैत्रिणी होत्या नंतर वडिलांची बदली झाल्यानंतर आम्ही एका वर्षात शेजारच्या गावी गेल्यामुळे मध्ये भेटी कमी झाल्या . व जेव्हां कॉलेजला आले त्या दिवशी तू मला दिसला . तेव्हाचं मी बोलणार होते . पण? मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये असल्यामुळे हिम्मत झाली नाही . आज मोठ्या हिमतीने मला बोलावसं वाटलं . मी सायन्सला ऍडमिशन घेतले होते .व तीने आर्ट साईट ला ऍडमिशन घेतले होते .भाषेचे पेपर सारखे असल्यामुळे हो माझ्या नोट्स गहाळ झाल्यामुळे मला तुझी मदत हवी आहे . मी होय म्हटले का नाही ? आणि माझ्या हातातल्या नोट्स तिला दिल्या . तिने नाव सांगितले .हाय मी वसुंधरा ! छान होते .नावाला शोभेल असे शरीर ; शरीराचा बांधा . कमनीय बांधा .घारे घारे डोळे नाजूक कोमल अशी काया . डोळ्यावर आलेल्या बटा व केसांची बॉबकट ! आणि हसरा चेहरा बघून परि काय असते गोष्टीमध्ये . परी आकाशातून येणारी परी आणि सुंदर प-या कशा असतात .हे वाचले होते परंतु आज प्रत्यक्ष माझ्यासमोर परी असल्याचा भास झाला . तिचे सुंदर बोलणे . सुंदर असणे व बोलण्यामध्ये नम्रपणा !त्यामुळे दोघांचा हृदयामध्ये एक विशिष्ट प्रकारची स्पंदणे निर्माण झाले . हृदयाचे ठोके व धडधड वाढल्याचा भास होत होता. मी हळूच म्हटले कॉफी घेणार का ? हो का नाही ? आम्ही कॅन्टीन कडे गेलो आयुष्यात प्रथम कुणाबरोबर तरी मी कॉफी पिण्यासाठी जात होतो . कॉफी ऑर्डर केली एकमेकांच्या कौटुंबिक चौकशी केली आणि उद्या तुझ्या नोट्स परत देते असे म्हणून बाय-बाय करत एक स्माईल असे हास्य करून बाय-बाय करत पाठमोरी चालू लागली .मी मात्र पुरता घायाळ झालो . जणु स्वर्गातून फेरफटका मारून घरी पोहोचण्याचा आनंद घेत होतो . आणि नकळत आनंदाने गाणे गात घरात प्रवेश केला .आईने टोमणा मारला आज स्वारी फार खुश दिसते ?अभ्यास झाला वाटतं .कारण उद्या तुझा इंग्रजी विषयाचा पेपर . होय आई असे म्हणून घरात शिरलो आणि स्वप्नांच्या दुनियेत रंगू लागलो एक दोन पेपर संपली . आमच्या रोज भेटी होत होत्या .मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले . पहिल वर्ष संपलं दुसऱ्या वर्षी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी मध्ये सुट्टीचा कालावधी आमच्यासाठी जणू काही वनवास वाटू लागला . प्रेमात वाटेल ते प्रेमासाठी मनुष्य काही करू शकतो .त्याप्रमाणे माझे मन शांत बसू देत नव्हते .फोन नंबर असल्याने मोबाईल वर मॅसेज चालू होते . रात्री वातावरण शांत झाले की घरात कोणी नाही तेंव्हा फोनवर चॅटिंग चालू होते कारण फोनवर बोललेल इतरांना आवाज जाणार व ते चौकशी करणार शेवटी मला एक कल्पना सुचली आईला गप्पांमारत आनंदामध्ये विचारले आई ? तुला मैत्रिणी नव्हत्या का ?आईला आश्चर्य वाटले का आज तुला आठवल्या ? काही नाही गं असंच !मला शाळेतील मित्रांची आठवण आली . तुझ्या मैत्रिणी असतील ना ?हो 1 /2 आठवतात पण त्यांची नाव . वर्णन सांगू लागली . योगायोगानेच मैत्रिणी च्या आईचे नाव तिने घेतले . मग मी म्हटले भेटत का नाहीस .अरे सध्या पत्ता माझ्याकडे नाही . भेटावसं वाटतं आई मी शोधून आणीन म्हणून एक-दोन दिवसांनी हळूच तिकडंचा आईचा नंबर दिला . एकमेकांशी बोलणं झालं भेटीचे आमंत्रण दिले.व एक दिवस आली अरे मैत्रिणीने मला भेटायला बोलवले आहे . मला घेऊन चालशील का ? माझा प्लॅन सफल झाला होता .मला जणू आभाळ दोन बोट ठेगंण असे वाटले होते .मन खुश होत . कारण सुट्ट्या लागून दोन आठवडे झाले होते . प्रत्यक्ष भेट बाकी होती . आई पेक्षा मीच भेटीसाठी उत्साही होतो .आईचे निमित्त करून दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी भेटण्यासाठी निघालो मी म्हटले आई मी परत घ्यायला येऊ का ? आई म्हणाली नाही . काही वेळ थांब आणि आपण येताना बरोबर येऊ मलाही तेच हवे होते . तेथे पोचलो दारावरची बेल वाजवली तेंव्हा मैत्रिणीच्या आईने दार उघडले आम्ही आत गेलो .हळूहळू गप्पा मारता मारता मैत्रिणीचे मंदाकिनी चे वडील दिसले . काका नीं काय करतोस चौकशी केली . काही वेळाने चहा घेऊन मंदाकिनी आली . मला जणू स्वप्नातील परी भेटल्याचा आंनद झाला . आम्ही केलेला प्लॅन यशस्वी झाला . चहा घेतला काका म्हणाले मंदाकिनी त्याला घर दाखवा . आम्हाला तेच पाहिजे होते . गप्या मारत आम्ही गॅलरीत गेलो गप्पा मारता मारता स्टडी रूम मध्ये गेलो . चालताना डायरी वर पडलेली दिसली . मी आलगत तीची नजर चुकवून पहिले पान उघडले ! त्यावर लिहिले होते "सुपरहिरो "आणि खाली बदामाच्या चिन्हांमध्ये नाव लिहिलेले होते 'आदित्य ' फक्त ए व इतर अक्षरा हे फक्त इतरांना दिसत नव्हती .आता मात्र मनोमनी मी शहारलो .प्रेमाच्या उकळया फुटू लागल्या जणू काही स्वर्गात आल्याचा पुन्हा आनंद वाटू लागला . तिकडे आईची मैत्रीणींच्या गप्पा रंगात आल्या जाण्याच्या तयारीत असतांना त्यांनी घरी निघण्याच्या तयारीत असताना . आम्हाला जेवणासाठी थांबवल ते रुचकर जेवण तिरप्या नजरेने पहाणे .आम्ही निघण्याच्या तयारीत होतो तेव्हा आई म्हणाली अरे तुझ्याच कॉलेजला आहे .हो का ? आम्ही एकमेकांना जणु ओळखत नाही या प्रमाणे चालले होते . आमच्या घरी निघालो येताना आईने पण त्यांना येण्याचे आमंत्रण दिले . आम्हाला मनोमनी मला माझ्या स्वप्नातील परी ही डोळ्यासमोरून नेहमी फिरत असे तिच्याशिवाय मला काही गोष्टी सुचत नव्हत्या व तीच्या मनातील व जीवनातील स्वप्नातील 'सुपरहिरो ' मीच होतो .जीवनातील सुपरहिरो ' आदित्य


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance