rups suspense

Action Thriller

4.0  

rups suspense

Action Thriller

स्त्री चा रुबाब

स्त्री चा रुबाब

75 mins
871


ती.... कडक इस्त्रीचा आवडता फिकट निळा फॉर्मल शर्ट.... त्यावर काळी जीन्स.. तसच जॅकेट...पायात स्पोर्ट सूज... हातात HMTच स्लीवर बेल्टच घड्याळ...डोळ्यावर काळा गॉगल...

निश्चिन्त रिलॅक्स होऊन खुर्चीत बसलेली .... तितक्यात गणू धावत आला

भाई.. भाई... लोच्या झालाय...नवीन आलेल्या खाक्यान आपली माणसं आत मधी टाकलीत....

तर...मग ..

भाई ... आपली मानस आहेत ती ... त्यांला काही व्हायला नाय पाहिजे ना भाई

गण्या ... इथं भाई कोण... तू.. की मी..??

जी तुम्हीच भाई... घाबरून गण्यांन मान खाली घातली

तस थोडस स्मित हसत

तस थोडस स्मित हसत उठली

चल गण्या ... गाडी बाहेर तयार ठेवायला सांग ..

पण भाई मी येतो ना तुमच्या सोबत गण्याला कळलं होतं गाडी तयार ठेवायची म्हणजे भाई एकटाच जाणार

मी चल म्हणलं का तुला ... जा गाडी काढायला सांग ...आणि हो ... राजाला च तयार ठेव कळलं

जी भाई... म्हणून गण्या निघाला

राज्याला म्हणजेच तिच्या BMW बाईकला बाहेर काढायला

काय झालंय आज भाईला मला न घेता जातायत स्टेशन ला त्यात नवीन आलेला खाक्या एकदम इमानदार आहे ... अस तर भाई कधीच नाही करत ... मग आजच का चाललेत...

वर बघून गण्यानं देवाला आळवणी केली

देवा आता तूच वाचव रे बाबा त्या खाक्याला आणि पकडलेल्या समध्यासनी आज काय भाईचा मूड चांगला दिसत नाही रे बाबा

गाडी काढून गण्या वर्दी दायला पुन्हा मधी आला

भाईचा आवतार बघून गण्या हकाबक्का च झाला

साधा आणि जनटल बिजनेस वुमन च्या लुक मध्ये गण्या त्याच्या भाईला पहिल्यांदाच बघत होता

व्यवस्थित हाय पोनीत बांधलेलं शॉर्ट केस.. नेहमीच असलेला गॉगल काढून लेन्स घातलेले डोळे.. पांढराशुभ्र शर्ट.. काळी फॉर्मल पॅन्ट..तसाच कोट... पायात बूट ...

गण्याची तंद्री लागलेली बघून तीन गाडीची चावी घेऊन निघून गेली

गाडीच्या आवाजानं भानावर आलेल्या गण्याच्या डोळ्यात पाणी होत

खूप दिवसांनी त्यानं तिला तिच्या जुन्या गेटअप मधी बघितलं होत खुश होता आज गण्या

इकडं तिनं आपली गाडी पोलीस स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावली उतरून पुन्हा एकदा कोट नीट झाडून घेतला आणि डोळ्यावरच गॉगल काढून खिशात ठेवला

हवालदार जवळ येऊन सांगितलं

IPS साहेब असतील तर सांगा मी भेटायला आलेय

खाली बघून कामात व्यस्त असलेल्या हवालदार मानेनी तिचा आवाज लगेच ओळखला आणि उठून एक कडक सलाम ठोकून आत गेले

IPS साहेबांनी मानेला सलाम करताना बघितले होत

काय माने कोण आहे बाहेर जे सलाम ठोकून आलात

तुम्हीच भेटून घ्या साहेब तस पण ते तुमची भेट घ्याला आलेत

सरळ उत्तर न देता मानेन साहेबांना वर्दी देऊन बाहेर येऊन तिला आत जायला सांगितलं

धन्यवाद माने...

येऊ का आत IPS श्री राज सर तीन आत येत त्याची परवानगी घेतली

खुर्चीत बसलेला श्री तो स्त्रीतत्वाने भरलेला भारदस्त आवाज ऐकून मान वरकरून दाराकडे बघत म्हणला

या.. या.. आपली ओळख मिस....

मिस.. ??

आत येऊन खुर्चीत बसत तीन IPS साहेबांना एकदा पूर्ण निहारल हलकं हसत

म्हणली

मी.. मिस पुरोहित...

तस श्री न हसून तिच्या येण्याचं कारण विचारलं

स्मित करत तिनं बोलायला सुरुवात केली

माझी ओळख करून द्यायला आणि तुमची ओळख करून घ्यायला आलेय सर

का....? तुम्ही आमदार आहेत की खासदार... आणि मला कोणत्याही बिझनेस वर्ल्ड रिलेटेड व्यक्तीशी ओळख ना करायची आहे ना दाखवायची आहे

ठीक आहे सर मग माझं अजून एक नाव आहे त्या व्यक्तीला भेटण्यात तुम्ही नक्कीच इंटरेस्टड असाल

कोण तुम्ही

मी....मी तीच जी इथं भाई म्हणून प्रसिद्ध आहे

तिच्या ह्या उत्तरावर मात्र श्री खरच शॉक झाला कारण त्याला त्याच्या मित्राने इथली पोस्टिंग भेटल्यावर तिचा भाई म्हणून खास उल्लेख करून भेटून घे असा दिलेला सल्ला आठवला एका साखळी मर्डररच्या शोधा साठी श्रीच्या हातात ही केस आली होती आणि त्यासाठीच त्याला तिची भेट घ्यायचीही होती पण इतक्या लवकर होईल ह्याची अपेक्ष्या मात्र श्री ला नव्हती.

ओ ... तर तुम्ही आहेत इथले प्रसिद्ध भाई.. माझी फार निराशा केलीत तुम्ही ... मी भाई म्हणून कोणा दुसऱ्याला च इमॅजिन केलंत ... पण तुम्ही तर एका बिझनेस मॅनला लाजवेल अश्या राहतात

हम्म ... तस हा माझा गेटअप नक्कीच नाही IPS पण तुमच्या भेटीला येताना प्रोफेशल यावं असा विचार केला आणि तस पण माझं प्रोफेशनल काम आहे म्हणून मी आलेय

अरे बोला मिस पुरोहित मी आपली काय हेल्प करू

माझ्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून पार्टटाइम जॉब करायचा तुम्ही IPS इतकी मदत कराल का माझी

मिस पुरोहित मी माझी ड्युटी सोडून नाही राहू शकत

PSI मी पण तुम्हाला तुमची ड्युटी च करायला सांगतेय.. तुमची हरकत नसेल तर मला तुम्ही उद्या सकाळी 10ला सेंट्रल मॉल ला भेटू शकाल का ??

का??

कारण मी प्रत्येकगोष्ट ह्या तुमच्या स्टेशनात नाही सांगू शकत निघते ... आणि अजून एक माझी माणस मला पुढच्या 10मिनिटात बाहेर हवीत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्हाला भेटून जाईल त्याची जबाबदारी माझी ...निघते मी.. घड्याळ बघत उठून उभी राहिली श्री न तिला हातमिळवून आल्या बद्दल धन्यवाद दिले

दुसऱ्या दिवशी दिलेल्या वेळेत ती त्याच्या ही आधी येऊन कॅफेट एरिया मध्ये त्याची वाट बघत थांबली होती

ठीक 10ला श्री आला तस तीन त्याला आधीच टेबल नंबर मॅसेज केला होता म्हणून तो डायरेक्ट तिच्याकडं येत होता पण जेव्हा त्याच लक्ष्य तिच्याकडं गेलं तर दोन क्षण तो स्तब्ध च झाला आता त्याच्या लक्षात येत होतं की स्त्री असून ही तिला भाई का म्हणायचं

कालचाच लुक होता तिचा कडक इस्त्रीचा आवडता फिकट निळा फॉर्मल शर्ट.... त्यावर काळी जीन्स.. तसच जॅकेट...पायात स्पोर्ट सूज... हातात HMTच स्लीवर बेल्टच घड्याळ...डोळ्यावर काळा गॉगल...मोकळे सोडलेले खांद्यावर रुळणारे कुरुळे केस ... मस्त उजव्या गुडघ्यावर डावा पाय ठेवून मागे रेलून बसली होती खुर्चीत

पूर्ण टेबल बुक असल्यानं वेटर सोडता तेथे कोणीच नव्हते

तो आला आणि तिला ग्रीट करून तिच्या समोरच्या खुर्चीत बसला

काल सांगून पण त्याने तिच्या माणसांना सोडलं नव्हतं ती अजून ही लॉकअप मध्येच होती

बोला IPS साहेब आधी तुमचे प्रश्न संपू द्या मग मी माझा प्लॅन सांगते

नक्कीच मिस पुरोहित

मला सांगा तुमच्या माणसांना मी रंगेहाथ पकडून पण तुम्ही त्यांला सोडायला का सांगितलंत

मला तुमची जितकी हिस्ट्री कळली त्यावरून तुम्ही स्वतः कोणताच कायदा मोडत नाहीत आणि मोडू देत नाहीत हे तर मला कळलं मग हे काय होत

हम्म बरीच माहिती झालीय वाटत तुम्हाला माझ्या विषयी असो डायरेक्ट पॉईंट वर येते

माझा धंदा आणि माझं काम प्रत्येक गोष्ट मी लिगली करते हे मला तुम्हाला किंवा कोणालाच सांगायची गरज नाही

तुमचा मित्र विजय इथून बदली होऊन जायला पण मीच करणीभूत आहे कारण जे प्रकरण ते सोडवत होते ते त्यांच्या आवाक्या बाहेरच आहे तुम्हाला पण ते नाही सोडवता आलं तर तुमची बदली निश्चित होईल हे आधी लक्ष्यात घ्या सिरीयल मर्डरर कोण आहे त्यापर्यंत पोहचण्यासाठी मी तुमची पूर्ण मदत करेल .. हा पेन ड्राइव्ह ह्यात आतापर्यंत झालेल्या मर्डर ची पूर्ण माहिती आहे अजून एक ही माहिती तुमच्याच मित्रांन गोळा केलेली आहे तुमच्याकडे फक्त पुढचा एक आठवडा आहे त्यावेळात तुम्ही त्या गॅंगला पकडायचा नाही तर मग मी त्याचा पूर्ण नामोनिशाण मिटवून टाकेल...

एक लक्षात घ्या त्यांचं नेक्स्ट टार्गेट माझ्या कंपनीत आहे आणि मला माझ्या कंपनीत कोणताच राडाअस बोलताय मिस पुरोहित तुम्ही की तुम्हाला माहिती आहे ह्या मागे कोणाचा हात आहे ते नक्कीच मला माहिती आहे पण पुरावे त्याच काय करता IPS माझ्याकडे पुरावे नाहीत आणि ज्यावेळी माझ्याकडे पुरावे नसतात त्यावेळी मी समोरच्याचा पुरावाच नष्ट करत असते असो मग आता तुम्ही माझ्या कंपनीत काम करायला तयार आहेत का

त्याला ही अट तिचा नेमका अर्थ कळला होता

हो नक्कीच, पण तुमच्या माणसाचं काय , कारण मी त्यांना इतक्यात तरी सोडणार नाही

नका सोडू IPS साहेब तुम्हाला त्यांला सोडायला सांगितलंच कोणी आणि तस पण ते तिथं राहून ही काम करतीलच माहिती मला माझी मानस आहेत ती त्यांला कुठं आणि काय करायचं हे बरोबर कळत तुम्ही फक्त तुमचं काम करा IPS

हो मिस पुरोहित नक्कीच चला निघतो मी तो निघून गेल्यावर तीही निघाली


काय गणू कसा वाटला तुझा भावजी ..... तीन हसत गणू ला विचारलं

याच्या मायला ....म्हणजे भाई.... हा आहे तो ... ज्याला तुम्ही आवडला....अस म्हणून गणू पण दिल खुलास हसला

हीच तर तिची खासियत होती कितीही टेन्शन असो बस्स बिनधास्त राहायच तिची ही स्टाईल आता गणुला पण अंगवळणी पडली होती .........

घरी पोहचल्यावर तीन लगेच गण्याला कंपनीत पाठवून देऊन आपल्या सिक्रेट रूम मध्ये आली....

रिलॅक्स ...... स्वतःला च रिलॅक्स करून पुन्हा सोमरच्या लॅपीवर बोटांचा व्यायाम चालू केला ....

नेहमीपेक्षा आज जास्तच चिंतेत दिसत होती ती... थोड्यावेळाने तिच्या अपेक्षे प्रमाणे तिच्या मोबाईल वर एक मॅसेज आला

hii... मिस पुरोहित

तस तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य आलं आणि तीन उत्तर दिलं

बोला IPS साहेब

मला अजूनही काही गोष्टींची माहिती हवी आहे भेटू शकतात का?? ...एकट्याच

नक्कीच IPS का नाही .... तुम्ही वेळ आणि जागा सांगा मी पोहचते

ओके... एकट्याच याल ही अपेक्षा आहे ... पुढच्या 10 मी मध्ये आपण भेटुत माझ्याच घरी ..... घर तर तुम्हाला माहितीच आहे

ओके... पोहचते... बाय

तीन मोबाईल ठेऊन तयारी करते

पूर्ण ब्लॅक ड्रेस ... बाईकरचा लुक करून आरश्यात बघत हेल्मेट डोक्यावर घालून गण्याला कॉल करत ती दुसऱ्याच रस्त्याने बाहेर पडते चालत चालत ती गण्याला बोलत असते

देख गण्या मी आता बाहेर जातेय तू पटकन घरी येऊन सगळं हँडल करशील कोणाला माझ्या रूम मध्ये जाऊ देऊ नकोस...

.......

ते तुझ्यासाठी महत्ववाचा नाही ये , तु फक्त मी सांगत तितकं कर

..........

हो त्याच्या साठीच बाहेर जातेय ..... त्या खुन्याचा तपास आता संपल्यातच जमा आहे

......

हो आल्यावर बोलू सविस्तर ओके.... राज्याला घेऊन जातेय लक्ष ठेव पार्किंग मध्ये कोणाला फिरकू नको देऊस

........

नाही सांगू शकत मला किती वेळ लागेल ते... बस्स तू काही गडबड नको करूस म्हणजे झालं

......

ओके बाय बाय....

संभाषण संपलं तस कॉल कट केला आणि बाईक ढकलत दूर पर्यंत आणली

पटकन त्याच्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगानं तीन IPS च घर गाठलं....

त्याच्या घराच्या पाठी मागे गाडी लावून ती जरा कानोसा घेत उभी होती....

रस्त्यावर कोणी नाही बघून पटकन कंपाउंड च्या आत उडी घेतली पूर्ण घराला एक चक्कर मारून तिनं त्याच्या रूम चा अंदाज घेऊन पाईप वरून चढून त्याच्या रूमच्या गॅलरीत सावकाश उडी घेतली ....

त्याचीच रूम आहे कन्फर्म झाल्यावर आत जाऊन सोफ्यावर बसली...

इतक्यात तिला बाथरूम चा दरवाजा उघडल्याचा आवाज आला ....

तरीही ती जागेवरून न हलता तशीच बसून होती ....

अरे .... मिस पुरोहित ....आलात पण...अजून 3 मिनिट बाकी आहेत...हसत त्यानं तिला बोलला सोफ्यावर बसलेल्या तिला बघून तो पण येऊन तिच्या पुढ्यात उभा राहिला

ते सगळं ठीक आहे IPS पण आधी तुम्ही तयार व्हा मग आपण बोलू.. माझ्याकडे भरपूरवेळ आहे.... त्याला अस समोर बघून तिन त्याच्याकडं न बघताच उत्तर दिलं...

तस स्वतःवर एक नजर टाकत तो जरा गालात हसला तिला बोलायच्या गडबडीत साहेब बिना शर्ट चेच आलेले

बेडवर चा शर्ट घालून तिच्या समोर बसून त्यानं तिला येण्या बद्दल धन्यवाद दिले

आणि खाली चालण्याचा आग्रह केला

दोघे ही उठून खाली आले

तिला अस आपल्या मुला सोबत बघून सोफ्यावर बसलेले त्याचे वडील उठून तिच्या जवळ आले

काय आज आठवण आली का ह्या रिटायर्ड पत्रकाराची भाई... अस म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला

पटकन त्यांच्या पाया पडत ती म्हणली

काहीही काय वर्तमान कधी विसरू म्हणलं तरी विसरता येत नाही कळलं .....आणि दिलखुलास हसली

तो तस गोंधळून आपल्या बाबा कड आणि तिच्याकडं बघायला लागला

अस गोंधळू नको ... आम्ही दोघे ओळखतो एकमेकांना कळलं आणि तुला म्हणत असतो बघ माझं भूत आहे एक ... तेच माझं भूत दुसरं कोणी नसून ही द ग्रेट भाई आहे

हसत हसत त्याच्या वडिलांनी त्याच्या नजरेतल्या प्रश्नाला उत्तर दिलं

ये वर्तमान .... तुझ्यासाठी मी फक्त भूत आहे हा दुसर काहीही नाही...... काहीस चिडूनच म्हणून ती जाऊन सोफ्यावर बसली .....

तस त्याचे वडील दिसखुलास हसत तिच्या जवळ बसले

काय मग आज काय नवीन... आणि काय ग ती मर्डरर केस कुठपर्यंत आली...

कोणताही टाइमपास न करता डायरेक्ट विषयाला च हात घातला त्यांनी तस तीही गंभीर झाली

त्यांचं नेक्स्ट टार्गेट मी आहे वर्तमान... त्यांनी आपल्या गॅंग मधल्या दोन व्यक्ती संपल्या आणि कोणताही पुरावा मागे नाही ठेवला आश्चर्यकारक आहे हे माझ्यासाठी

काय.... तू.... नेक्स्ट.... अस म्हणून ते खूप मोठ्याने हसू लागले ... कसबस आपलं हसू सावरत बोलले

म्हणजे आता त्यांचे दिवस भरले म्हणायला हरकत नाही

... तुला हात लावणं म्हणजे साक्षात मृत्यू हे अजून कळलं नाही वाटत त्यांला....परत गंभीर होत ते बोलले

त्यांची ही वाक्य ऐकून त्याला काहीच कळत नव्हतं म्हणून अजून काही बोलायच्या आतच श्री बोलला

नेमकं काय बोलताय तुम्ही आणि हा नेमका मॅटर काय

तस दोघे ही थांबून त्याच्याकडे बघू लागले

तस तिनं इशारा केला

हो आता त्याला सगळं सांगावच लागेल तस पण आपल्या प्रत्येक परीक्षेत तो पास झालाय

हम्म .... मग तूच सगळं सांगावस त्याला वर्तमान .... मी तोपर्यंत आपल्या पूर्ण गॅंग ला बोलवून घेते ... आजच मला हा किस्सा खतम करायचा आहे....

अस बोलून ती तिथून उठली आणि आपल्या मोबाईलवर कोणाला तरी कॉल करत बाहेर गेली

श्री आता फक्त आपल्या वडिलांकडे बघत होता .....

तस त्याच्या वडिलांनी देखील सगळं सांगायची मनाची तयारीकेली आणि बोलू लागले.....

हे बघ श्री .... मी ...आणि माझ्यासारखे आणखी 5जण आम्ही आपल्या भारतासाठी सिक्रेट एजेंट म्हणून काम करतोय ह्यात ना रितारयमेन्ट असते ना वीर मरण असत तर फक्त देश सेवा... आमच्या 5 जणांचे काही खबरी आहेत त्यातल्याच 2 जणांचा खून झालाय .... ही भाई ही पण खबरीच आहे पण ती स्वतः एक एजेंट पण आहे हे मात्र कोणाला माहीत नाही.... आमचे खबरी हे कोणी गल्लीचे गुंड दादा नसतात तर ते राजकारणी, बिझनेस मॅन, असे मोठं मोठे लोक असतात ते आम्हाला त्यांच्या फिल्ड मधली माहिती सगळ्याच प्रकारची ती पोहचवतात .... आमची खरी नाव आम्हाला सोडलं तर कोणाला च माहीत नाहीत... ही जी भाई म्हणून फिरतीय तीच एक सरनेम सोडलं तर तिची कोणतीच कुंडली ती सोडता कोणालाच माहीत नाही ... अगदी मला पण... ही इतकी गुप्तता असते आमच्या फिल्ड मध्ये .... ज्या केस साठी तू इथं आहेस त्यासाठी खरतर मी तुला इथं बोलवलं आहे पण सगळ्यांना हेच वाटत की भाईन तुला बोलावलं... आमचे खूप वेगळे नियम आहेत ... आम्ही समोरच्याला साफ करताना कोणताच कायदा आम्हाला अडवत नाही... किंवा आम्हाला कोणालाच उत्तर द्यावी लागत नाहीत... आमची काम करण्याची स्वतःची पद्धत असते .... असो तर आता तुला तुझ्या पोस्टवर राहून एक हाईड ऑफिसर म्हणून पण काम बघायचं आहे .... तू IPS तर जगाला दाखवण्यासाठी नक्कीच आहेस पण ... आमच्या आर्मीत तुझं स्वागत आहे तू आमच्याकडे शाईन ह्या नावानेच ओळखला जाशील आणि शाईन च्या कोणत्याही गोळीला उत्तर द्यायची गरज लागणार नाही.... कळलं.... जे काम IPS श्री नाही करू शकत ते काम शाईन संपलवल

हे ऐकून अतिशय आनंदित होऊन त्यानं सॅल्युट ठोकला येस सर...

तितक्यात अजून 4 जण तिथं दाखल झाले

1... मला तर तू ओळ्खतोसच .... भाई, मिस पुरोहित उर्फ भूत हीच माझी ओळख आपली ओळख करून देत ती सोफ्यावर बसली

2.... मी भविष्य....डॉ. रोशनी.... त्या सुंदर मुलींन आपली ओळख सांगितली आणि तीही जाऊन तिच्या बाजूला बसली

3....मी वेळ... तस तू मला चोपटीवर बघितलं आहेस शंकर भेळ म्हणून त्याने आपली ओळख सांगितली आणि जाऊन दुसऱ्या सोफ्यावर बसला

4... मी टेली हा आपल्या खास शैलीत ओळख सांगत तो जाऊन सोफ्यावर बसला तस सगळेच त्याच्याकडे बघायला लागले

काय .... हा ठीक आहे नका बघू अस सांगतो मी त्याला मी इथला मोस्ट फेमस मेकॅनिक आहे जो गाड्या आणि माणसं दोन्ही तोडू जोडू शकतो आणि माझं नाव राजू

थोडस चिडून त्यानं सांगितलं तस सगळे हसायला लागले

5.. मी वर्तमान .... तुझा बाबा हे बघ हे आहेत आमचे मेम्बर तस तू ह्यातल्या रोशनीला सोडलं तर बाकी सगळ्यांना खूप वेळा भेटला आहेसच

काहीस हसून त्याच्या वडिलांनी सांगितलं

तितक्यात तिथं गण्या येऊन टपकला.... आणि गडबडीत बोलला सॉरी सॉरी उशीर झाला

है.... मी 7 मेम्बर स्वेहन माझं नाव स्टार तस सगळे मला गणू म्हणून ओळखतात

तस श्री अजून गोंधळून गेला ....

त्याला अस गोंधळात बघून रोशनी न गण्याला ओडून त्याच्या समोर उभा करत बोलली

हा चिरकूट मिळून आम्ही 7जण आहोत म्हणजेच सव्हेन स्टार फक्त आजपर्यंत आम्हाला आमचा 6 मेम्बर भेटत नव्हता तो तुझ्या रुपात भेटला ग्रेट

अरे व्वा .... थोडस हसत श्री बोलला त्याला आता सगळं कळलं होतं आज आपण अजून एका कर्तव्यात बांधले गेलो आहोत ही भावनाच त्याला खूप सुखावून टाकत होती

सगळे आपल्याला जागेवर बसले तस वर्तमान न साऊंड सिटीम ऑन केली आता ह्या घरातून हवा पण बाहेर जाणार नाही हे सगळयांना कळलं

जसे वर्तमान जागेवर आले तस भाई न उठून बोलायला सुरुवातकेली

तर आजच्या मिंटिंग चा उद्देश फक्त एकच आहे एकी जमलेल्या पुराव्यांना नष्ट करून टाकणं... कारण उद्या हे जग बघायला ते मारेकरी जीवन्त असणार नाहीत...

भविष्य तू ऑपरेशनची तयारी ठेव उद्या त्यासगळ्याचे शारीरिक पार्ट तुझ्याकडं वेळेत पोहचतील

तिच्या ह्या वाक्यावर श्रीन गोंधळून मध्येच विचारलं काय ऑर्गन तस्करी .....

त्याच्या ह्या वाक्यावर सगळेच हसले आणि मग गण्यानं सांगायला सुरुवात केली नाही शाईन तस नाही ते जे गरीब आहेत पण त्यांना काही प्रॉब्लेम आहे अश्याना जर ते अवयव मॅच होत असतील तर आम्ही ते त्यांना डोनेट करतोत .... अस पण त्याचं आपल्या देशाविषयी काही तरी कर्तव्य आहेच की जे ते जीवन्त असताना पार पाडत नाहीत तेच आम्ही मृत्यू नंतर त्यांच्या अवयव दानातुन पार पाडतोत

तेवढंच त्यांना पुण्य आणि कोणा एकाचा जीव ही सुरक्षित 


सगळ्यांनी आपली आपली जबाबदारीसमजून घेऊन निघून गेले.... आता तिथं फक्त श्री, वर्तमान आणि भूत च उरले होते आपली राहिलेली प्लॅनिंग पूर्ण करायला

सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेवर पोहचल्यावर मॅसेज टाकला तस ह्यांच्या कामाला गती आली ....

श्री ची पहिलीच वेळ होती तर भूत वर्तमान ह्यात मुरलेले खेळाडू होते 

काय करायचं वर्तमान..... तिनं तयार केलेल्या प्लॅन वर एक नजर टाकत अंदाज घेतला

हम्म... चल संपवून टाकू सगळं... तिच्याकडं बघत गूढ हसत वर्तमानन उत्तर दिलं

तस तीन एक नजर शाईन वर टाकली आणि आपल्या बाईकच्या कीज मधील विशिष्ट बटन दाबलं

पुढच्या काही सेकंद मध्ये राजा तिच्या समोर दिमाखात उभा होता ....

बाईक च मॉडल कानी रंग बघून तर शाईन चे डोळे फटायचेच बाकी होते

तस त्याला सावरत वर्तमान म्हणला हेय... माझ्याकडे सेम रेड कलरची आहे ....

आणि अविश्वासान त्याच्याकडं बघतच शाईन म्हणला मग मी काय पळत येऊ का.... माझा पण विचार करा

तस वर्तमान आणि भूत दोघांनी एकमेकांना स्मित दिल चल तू आज माझ्या सोबत बस तुझी गाडी टॅली तुला उद्या देईल ओके

ओके

हम्म

निघाले लगेच तर त्यांनी ठरवलेल्या टार्गेट वर

इकडं स्टार आणि टाईम नि मिळून पुढचा पूर्ण सापळा रचला त्यांना दिलेलं काम त्यांनी चोख पूर्ण केलं सगळी डिजिटल उपकरण वापरून त्यांनी गुन्हेगारांना ट्रॅप केलं

तर दुसरी कडे टॅली आणि भविष्य ने गरजू पेशन्टला हस्पिटलाईज करून ऑपरेशन ची पूर्ण तयारी केली..

दोन्ही ग्रुप ने आपली आपली काम पूर्ण केल्याचा सिग्नल दिला

तस इतका वेळ बाईक रायडिंग करत फिरणाऱ्या त्या दोन आलिशान बाईक लगेच त्यांच्या टार्गेटकडे रवाना झाल्या

तिथं पोहचल्यावर पुन्हा एकदा बाईकवरून उतरून तिला लांब नेऊन पार्क केली अर्थात हातातल्या रिमोटवरच हे काम केलं दोघांनी पण

आणि पटकन त्या बिल्डिंगच्या कंपाउंडवर चढले हे इतकं फास्ट झालं की शाईनला काही कळलंच नाही . ..

त्याला तसच खाली उभा बघून दोघांनी त्याला सेम टाईमला वर ये असा इशारा केला

वेळ न घालता तो पण पटकन त्यांच्या मध्ये उभा राहिला

आता त्यांला परत गाण्याच्या टीमचा सिग्नल भेटीस्तोवर तिथंच थांबन भाग होत ,

आणि अपेक्षे प्रमाणे त्याला पुढच्या 5सेकंड मध्येच सिग्नल भेटलं

ह्यावेळी मात्र शाईनच्या राईट साईडला भूत आणि लेफ्ट साईडला वर्तमान न पकडू सोबतच जंप केलं

आता आपण खाली उतरू या अपेक्षेत असलेल्या शाईनला काही कळायच्या आत ते वर खेचले जाऊ लागले हे सगळं बघून तर त्याला कळलं च नाही की नेमकं होतंय काय

पुढच्या 2मी मध्ये ते त्यांना अपेक्षित गॅलरीच्या समोर होते

तस भूत शाईनच्या जवळ जाऊन एकदम बोलली

पटकन गॅलरीत उडी टाक

कसलाच विचार न करता त्यानं गॅलरीत उडी टाकली त्याच्या पाठोपाठ भूत पण उतरली

तस वर्तमान त्याच्या कामासाठी निघून गेला

इकड दोघांनी पण त्यांच्या सायलेन्सर वाल्या गन काढल्या लोड केल्या

आणि त्या पूर्ण फ्लॅट च्या सगळ्याच लोकांना बेझुट गोळ्या झाडल्या सगळेच संपल्याची खात्री पटल्यावर लगेच स्टार आणि टाईम ला इशारा केला

तस ते दोघे लगेच त्यातल्या प्रत्येकाला गाडीत टाकत होते

अवघ्या 1तासात त्यांनी सगळं घर साफ करत त्या लोकांचा नामोनिशाण मिटवून टाकला

इकडं भविष्य आणि टॅली आपल्या पूर्ण मेडिकल टीम सोबत अट अ टाईम वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ची प्रोशेस अटेंड करत होते वेळेत त्यांच्या प्रत्येकाकडे पोहचण्यासाठी स्टार न आपली सगळी सिस्टीम कामाला लावली होती

सगळं झाल्यावर बाकीचे मेम्बर जस की शाईन , भूत, वर्तमान आणि टाईम आपल्या आपल्या जागेवर गेले बाकी राहिलेलं त्यांचं काम आटपत होते पण ऑपरेशनला लागणार वेळ त्यांना द्यावाच लागणार होता म्हणून ते ही निर्धास्त होते

काही झालंच नाही ह्या अविर्भावात श्री चे वडील बिनधास्त घरात आल्या आल्या झोपून गेले

पण श्री मात्र अजूनही मागच्या 3 तासात आपण नेमकं काय केलं आणि कोण होतो ह्यावरच विचारमग्न होता

त्याला अजूनही विश्वास वाटत नव्हता की आपण आता एक फोर्स मध्ये आहोत जीच अस्तित्व कोणत्याच ठिकाणी नोंदवलेले नाहीये

त्याच्या ह्या विचारांना ब्रेक लागला ते अचानक खांद्यावर पडलेल्या हाताने

त्यान चमकून हात ठेवणाऱ्या व्यक्ती कड बघितलं आणि स्तब्ध झाला

कारण समोर गण्या होता

चेहऱ्यावर कोणतेच भाव न ठेवता गण्या त्याच्याकडं बघत होता

काही सेकंद गेल्यावर श्री बोलला

बोल....

चल.... लवकर ... तुला आता IPS म्हणून पोलीस स्टेशनला हजर राहून टीप मिळाली आहे असं भासवत कामाला लागायचं आहे

कोणत्या .... म्हणजे आता जे गायब झालेत त्यांना शोधायच्या का?..

नाही रे ... टीप मिळेल तुला पुढच्या 5मी मध्ये जस्ट बघ तू

ओ.. ठीक आहे ... अस म्हणून टाईमला बाय करून आपल्या रूम मध्ये येऊन त्यानं युनिफॉर्म घातला आणि तयार होऊन खाली येऊ पर्यंत त्याच्या मोबाईल खणखणला

खुषीतच IPS साहेबांनी फोन उचलला

सर ... आज ड्रगस चा खूप मोठा सौदा हॉटेल सेव्हन स्टार ला होणार आहे

काही न म्हणता कॉल कट करून श्रीन आपली जीप काढली आणि निघून गेला

त्याला एकट्याला जाताना बघून गण्यांन तीच टीप स्टेशन मध्ये असलेल्या माणेंना दिली

तस माने लगेच बॅकअप घेऊन तिकडं निघून गेले

त्याच काम झाल्यावर पुन्हा गण्यांन दवाखाना गाठला

इकडं भाई मात्र आपल्या आलिशान बेडवर बिनधास्त घोरत पडली होती

दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या खेळाच्या मास्टर माईंड असलेल्या आबासच मात्र आपली माणसं रातोरात नेमकं गेली कुठं म्हणून हाल बेक्कार झाले होते की त्यातच

TVला ब्रेकिंग न्यूज होती

नवीन IPS ची गरुडझेप ड्रग्स कॅडलचा पर्दाफाश

सोबतच श्री चा हसरा वर्दीतला फोटो ही झळकत होता

ती न्यूज बघून तर आबास च्या अंगातील अवसानच गळून गेलं आणि तो डोक्याला हात लावून तिथंच खाली बसला

किती वेळचा त्याचा मोबाईल वाजत आहे हे पण त्याला लवकर कळलं नाही 

आबास ......

त्याच्या फँटर न त्याला आवाज दिला .... तस भानावर येऊन आबास न फोन उचलला

हॅलो.....

............

नाही साहेब , तुमचं काम होऊन जाईल मला थोडा वेळ तर द्या...... आबास कळवळून म्हणाला

............

पण ह्यात मैं क्या करू

...........

ठीक आहे.... म्हणून आबास न निराशेने फोन ठेऊन दिला आणि आपल्या फँटर कड बघितलं

काय झालं आबास....

संपलं रे सगळं... त्यांनी आपल्याकडून हे सगळं काढून दुसऱ्याला सुपारी दिलीय आणि आपल्याला त्याला मदत करायचा हुकूम दिलाय...

अस..... मग आता आपण काय करायचं ... भाई तर तस बी आपल्याला आता सोडणार नाही मग...

आता आपण.... अस म्हणून आबास न त्याच्याकडं सुचकतेंन बघितले ..... आणि तो बाहेर निघून आला

त्याच्या पाठोपाठ येत त्यानं आबास ला रोखलं

देख आबास अजून एकदा विचार कर... कारण भाईची ऑफर स्वीकारणं म्हणजे धंदे पे पाणी सोडणं ......

तस आबास त्याच्याकडं एकदम रोखून बघायला लागला

तुला काय वाटत फँटर .... मी हा विचार केला नसेल...केला रे... नुसता विचार नाही तर.... आधी ही ऑफर स्वीकारणाऱ्यांना मी स्वतः जाऊन भेटून आलोय... ह्यात नुसता जीव वाचत नाही...तर जो मार्ग भरकटला आहे तो पण सुधारून येतो कळलं.....

पण आबास तुला दिलेली ऑफर तुझा मार्ग संपवणारी आहे ह्याचा पण विचार कर....

देख फँटर .... मी संपलो तरी चालेल ... पण आता मला त्याला संपवायच आहे .... आणि तुला ही माहिती त्याच्याशी नडायला ह्या आबास पेक्ष्या कोणीच योग्य नाही .....

आबास ....तो भाई च्या हाताची मळ पन नाही रे.... भाई त्याला सहज संपलवल... तू का ऐकत नाहीस...

फँटर ....तो मरेल तर फक्त या हातानेच ..... नाही तर

आबास ..... सोड हा वेडेपणा ह्या गोष्टीला आता किती काळ लोटला...

बस्स.... मला काहीही बोलायच नाहीये .... तू येतो की मी एकटा जाऊ भाईला भेटायला हे आता तूच ठरव मी चाललो...

तावातावाने आबास निघून गेला

तो निघून जायची खात्री पटताच फँटर न आपला मोबाईल काढला आणि एक फोन केला

.....पंछी बनू उडता फिरू मस्त गगन मैं.....

आपल्या सुरेल आवाजात एक ओळ बोलून फोन कट केला

इकडं भाई मात्र लय खुश झाला आपल्याला हवी असलेली गाण्याची ओळ ऐकून

पटकन बेड वरून उठून आपली काम पटापट आवरली आणि गण्याला आवाज दिला

जी भाई....

चल IPS ला आज जॉइनिंग लेटर द्यायचा आहे तो येणार आहे ना कंपनीमध्ये ...

जी... तो येणार आहेच पण...

बोलत जा रे जरा घडाघडा माझा वेळ घेत जाऊ नको..

भाई ... आज तारीख काय आहे लक्ष्यात आहे ना..

तस भाईन चमकून गण्याकड बघितलं तर गण्या गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत होता

त्या हसण्याचा अर्थ लक्ष्यात आल्या बरोबर भाई किंचाळली

नोsssssss.... च्यामायला मी विसरू कस शकते .... नाही नाही नाही... मला नाही करायचं हे

काहीस वैतागत भाई गण्याकड बघत घाई घाईत बोलत होतीच की तितक्यात दारावर टकटक झाली

तस दोघे पण दाराकडे बघायला लागले

कोण.... गण्यानं विचारलं

जी..... भाईला भेटायला आबास आलाय... बाहेरूनच सांगून ती मुलगी निघून गेली

चल बाहेर .... बाकी नंतर बघू.... म्हणत भाई आपलं घड्याळ घालत हॉल मध्ये आली

तस आबास तिच्याकडं बघत च राहिला

त्याचा तरी बिचाऱ्याचा काय दोष? आपला भाई च इतका कडक दिसत होता की त्याला सुध राहीलच कशी

नेहमी प्रमाणे फिकट आकाशी रंगाचा कुर्ता आणि काळी पॅन्ट ..... आणि आपला नेहमीचाच गेटअप...

तेवढ्या टेन्शन मध्ये सुद्धा आबास च्या तोंडून निघूनच गेलं

भाई हा निळा आणि काळा सोडला तर दुसरा कोणताच रंग तुम्हाला दिसतच नाही का....

त्याच्या ह्या वाक्यावर हॉल मधले सगळेच त्याच्याकडं आणि भाई कड आलटून पालटून बघत होते....

नाही म्हणलं तरी आज भाईला प्रत्येकाच्या नजरेत तोच प्रश्न दिसत होता

करणार काय सगळ्यानाच हा प्रश्न पडला होता पण आजपर्यंत कोणी विचारायची हिम्मत नव्हती केली आणि आज आबास अनावधानाने का होईना पन सगळ्यांच्या मनातलं जोरात बोलून गेला होता

....

तस भाईन सगळ्यांकडे एक नजर फिरवून आबासला बोलायला सुरुवात केली

बोल आबास... कस काय येन केलंस..

घोर निराशा सगळ्यांना वाटलं भाई आज तरी उत्तर देईल पण विषयाला बगल द्यायची कशी हे कोणी भाईकडून शिकावं

....

अं..??

अजूनही तिच्या त्या रुपात अडकलेल्या आबास ला कळलं नव्हतं की तीन नेमकं काय विचारलं

अरे ये... त्याला जोरात हलवून गण्यानं जाग केलं..

तस ओसळत आबास खाली बघून च म्हणला ....

मला तुमची ऑफर मान्य आहे भाई.... पण माझी एक अट आहे....

आम्हाला माहिती तुझी अट आबास... पण त्यात तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही ती मान्य नाही करणार... भाई जरा जरबेनच म्हणली ....

पण... भाई ...

त्याच बोलणं पूर्ण व्हायच्या आतच भाईन त्याला हात दाखवत चूप राहायचा इशारा केला आणि गण्याकड बघितलं

भाईचा इशारा समजत गण्या म्हणला

देख .... रश्मी... ये अब अपना मेहमान है , इस को लेके जाओ आणि ध्यान ठेवा काही कमी नको पडायला .... आबास आज 3 तारीख आहे ... आणि तुला माहिती आज भाई काय काम करतात ... माफ कर पण आम्हाला जायला उशीर होतोय म्हणून आम्ही हे बोलणं अस अर्धवट ठेवून जातोय...

आबास खरचं आता भारावून गेलता त्यानं आजपर्यंत फक्त हुकूम सोडून जाणारे लोक बघितले होते पण फक्त आपलं बोलणं तोडलं म्हणून माफी मागून जाणारे हे दोघे बघून त्याला आता खात्री पटली की आपण इथं येऊन योग्य निर्णय घेतला आहे .... आबास आजपर्यंत माणस ओळखायला चुकला नव्हता म्हणून तर एकानजरेत त्यानं भाई सारख्या मुलीला मुलगी असून पण भाई म्हणूनच मान्य केलंत

आबास त्याच्या साठी दिलेल्या खोलीत निघून गेला तस भाईन आपल्या कोड वर्ड्स मध्ये सगळ्यांना च त्याच्या ऑफिसमध्ये यायची वेळ सांगितली आणि निघून गेली

भाई गेली तस गण्यानं आपलं काम आवरत घेतलं कारण त्याला ही जाणं भागच होत त्यानं पटकन आपल्या हमशकल असलेल्या सोमला मॅसेज टाकला

पुढच्या 10मि मध्ये सोम गण्याच्या खिडकीतून त्याच्या रूम मध्ये दाखल झाला .... गण्यानं त्याचे कपडे सोम ला दिले आणि सांगितलेल्या जागेवर निघून गेला

इकडं श्री आपल्या च ऑफिस मध्ये बसून काल झालेल्या रेडचा रिपोर्ट बनवत होता की तितक्यात तिथं एक 10वर्ष्याचा मुलगा चहा घेऊन आला

वर्तमान पत्रात असलेली फाईल श्री पुढे ठेवून चहा देताना इकडं तिकडं बघत तो म्हणला

चहा काळा की मसाला

त्याच समजून घेत श्री म्हणला

दे एक ब्लॅक

आणि ती फाईल घेऊन उठून कपाटात ठेवली आणि तिथून मानेना सांगून निघून गेला

आज सगळेच ठराविक अंतराने त्या पडक्या किल्ल्यात आले होते जिथं पोहचायचा इशारा भाईन दिला होता

नेहमी प्रमाने भाई आधी येऊन आत आला आणि तिथली फुटकी फारशीवर आपल्या हातच्या पंज्यान स्कॅनिंग केलं तस तिथंली भिंत बाजूला झाली आणि भाईन आत प्रवेश केला

दिलेल्या वेळात सगळेच जमा झाले आणि नेहमीप्रमाणे गण्यान शेवटी येऊन सगळ्यांना बघून हळूच सॉरी म्हणला

तस सगळेच हसायला लागले

सगळे त्यांच्या जागेवर बसल्यावर भाईन बोलायला सुरुवात केली

बघा ही आपली सिक्रेट जागा आहे इथं तुम्हाला प्रत्येकगोष्ट भेटलं अगदी कुठलीही ......

तस गण्यानं मध्येच विचारलं कोणतीही....

हम्म...

मग मला आता च्या आता कोक हवाय ...

त्याच्या ह्या उत्तरावर सगळेच त्याच्याकडे रोखून बघत होते

काय.... अरे आपलं मिशन सक्सेस झालंय मला त्याची पार्टी करायचीय तुम्हाला नाही वाटत का अस काही...

गण्या लेका सुधर नाहीतर फुकट मरशील..... आपल्या नेहमीच्याच टून मध्ये टॅली म्हणाला

तस सगळेच खळखळून हसले

नाही गण्या अजून मिशन संपलं नाही

.................

नाही गण्या अजून मिशन संपलं नाही ...... भाई बोलली आणि थोडा पॉज घेऊन

तस आपण आता पण सेलिब्रेशन नक्कीच करू शकतोत ..... कारण प्लॅन चा मेन व्हिलन आता आपल्या गळाला लागलाय.... आबास....

इतकं बोलून दिलखुलास मोठ्यांन हसायला सुरवात केली आणि बाकीचे पण तिच्या हास्यात सामील झाले एकटा श्री सोडून

बिचारा आल्यापासून फक्त तिच्यातच हरवला जे होता

सगळे शांत झाले तस गण्यानं पुन्हा आपली पिपाणी चालू केली

पार्टी पार्टी पार्टी.....

त्याच ते टेबलावर हात आपटून आनंद व्यक्त करणे बाकीच्यांसाठी नवीन नव्हतं पण श्री साठी सगळंच नवीन होत

ए... चला नेहमीप्रमाणे पार्टीच्या आधी आपण जो एक गेम खेळतो ते करूया ......रोशनी*(भविष्य)एक्ससाईटेड होऊन म्हणली

तस सगळेच खुश होऊन हॉल मधून उठून बाजूच्या रूम मध्ये पळाले

श्री अजून ही तिथंच थांबला होता तस त्याच्या जवळ येत भाई बोलली

चल शाईन.... तुला ह्या सगळ्यांना ओळखायला थोडा वेळ लागेल पण जेव्हा सगळे कळतील तेव्हा सगळ्यात जास्त खुश तूच असशील

तस तिला मध्येच तोडत श्री बोलला

मला फक्त तू कळली तरी मी लाईफ टाईम खुश राहील

आणि तिच्या उत्तराची वाट ही न बघता सगळ्या मध्ये निघून गेला

त्याच्या त्या वाक्यावर हसतच ती पण सगळ्यांना जॉईन झाली

तर मग आज काय गेम खेळणार हे आधी श्री ठरवणार आणि त्यानंतर उलट्या नंबर प्रमाणे प्रत्येकजण सांगणार ओके..... वर्तमान

ओके.... सगळेच आनंदाने ओरडले

हम्म... थोडा विचार करत श्री न सगळ्यांवरून एक नजर टाकली आणि बोलायला सुरुवात केली

आपण ..... खर खर खर आणि खर हा गेम खेळुत

तस सगळेच त्याच्याकडे गोंधळून बघायला लागले

जरासा हसून श्रीच म्हणला

अरे म्हणजे अस की आज कोणी पण ज्यांच्यावर टर्न येईल त्याला एक प्रश्न विचारणार आणि त्यानं उत्तर खर द्यायचं ओके

तस तोंड पाडून टॅली म्हणला ह्यात काय एंटरटेनमेंट .... श्या हे तर शाळेतली चिंटूकली खेळतात.

अरे थांब आधी पूर्ण ऐकून तरी घे त्याला समजवत श्री म्हणला

म्हणजे बघ ..... आपण इथं एक बास्केटबॉल मॅच भरवणार ...आपल्यातला प्रेत्येकान एकट एकट व्हायचं म्हणजे बघ सुरुवातीला मी ह्या साईडला एकटा आणि तुम्ही त्या साईडला सगळे ओके

तुमच्यापैकी जो कोणी माझा साईडला गोल करेल तो मला प्रश्न विचारणार आणि मी जर त्या साईडला गोल केला तर मला ज्याला प्रश्नविचारु वाटेल मी त्याला विचारणार चालेल का

हो चालेल की पण .... ह्याला काही टाईम लिमिट आहे की आपण फक्त गोल गोल च खेळत राहायचं...गण्यानं*(टाईम) विचारलं

हो .... ना शेवटी टाईम ची चिंता त्याला की हसत हसत रोशनी म्हणली

ओके प्रत्येकाला 60 सेकंड मिळतील माझी टर्न झाली की मग नेक्स्ट टाईम, टॅली, भविष्य,वर्तमान आणि लास्ट भूत ह्या सिरीज नि आपण करू ओके .... श्री

तस सगळेच खुश झाले चालेल बोलले

सुरू झाला गेम

आधी बॉल श्री कड होता .... सगळ्यांना चुकवत त्याने 3सेकंड मध्ये गोल केला मग बॉल दुसऱ्या टीमकडे सगळ्यांना चुकवत गोल करण्यापासून श्री एकटाच रोखत त्यांच्याकडून बॉल काढून पुन्हा गोल करतो आता सगळ्यांच्याच लक्ष्यात आलं होतं की श्री तर बास्केटबॉल चॅम्पियन आहे

त्यानं अस बॉल दोनदा गोल केलेला बघून भाई पेटून उठली आणि सगळ्यांना बाजूला सारून एकटीच त्याला भिडली तिच्या हातून बॉल काढून घेण्यासाठी आता श्री ला पण तगडी टक्कर द्यावी लागत होती पण इतक्यात शिट्टी वाजली आणि टाईम संपला ....

ब्रेक घेऊन सगळे बाजूला आले तस श्री म्हणला आता माझे दोन गोल चे प्रश्न मी फक्त भाईलाच विचारणार आणि ते पण जेव्हा मला हवं तेव्हा भाई न तस वचन द्यावं

तस सगळेच भाईकड एकदा आणि त्याच्याकडे एकदा बघत होते शेवटी हो म्हणून भाईन विषय कोलज केला

पुढच्या प्रत्येक गेम मध्ये दोन्ही टीमला 1 -1 च पॉईंट भेटत गेले शेवटी आता भाईची बारी होती

आपल्या फुल सलीव्ह चे बटन काढून सलीव्ह फोल्ड करून भाई तयार झाली खेळायला आणि रेकॉर्ड म्हणजे पूर्ण 60सेकंड मध्ये एकदा पण बॉल कोणाच्याच हाताला लागला नाही आणि भाईन 6गोल केले

तस श्री च्या लक्ष्यात आलं की आपण गोल केले नाहीत तर ते आपल्याला करू दिलेत

सगळे थोडी रेस्ट करून पुन्हा कामाला लागले

श्रीन भाई कडून नंतर विचारायचं घेतलेल वचन बघून प्रत्येकानं तसच केलंत

गणू न रोशनीला प्रश्न विचारण्यासाठी आपला गोल वापरला

तर रोशनीन भाई साठी राखीव ठेवला

टॅलीन आपला प्रश्न वर्तमान साठी ठेवला तर वर्तमान न श्री कड पण भाई न मात्र प्रत्येकाकड एक एक प्रश्न ठेवला होता

गेम संपली तस सगळ्यानाच फ्रेश आणि रिलीफ वाटायला लागलं

खरचं मैदानी खेळ हे कोणतंही टेन्शन दूर करून मनाला आणि शरीराला फ्रेश करण्याचं एक उत्तम साधन आहे आणि खेळण्यासाठी वयाची नाही तर मनाची मर्यादा आडवी येते हेच तर सिद्ध होत

सगळे पुन्हा आपल्या आपल्या जागेवर आले

तितक्यात तिथं नास्ता ऑर्डर करून येत भाई आपल्या खुर्चीवर बसली

काय यार किती भूख लागलीय अजून कितीवेळ भाई थोडस वैतागत च रोशनीन तक्रार केली

आणि तीच बोलणं पूर्ण व्हायच्या आत तिथं एक कूक चा ग्रुप येऊन सगळ्यांना जेवण सर्व्ह करून गेला

खेळून भुक्याजलेले सगळेच जेवणावर तुटून पडले पोटभर जेवण झाल्यावर मग आता काम करायला हरकत नाही असा ठराव पास झाल्यावर पुन्हा टेक्निकल रूम गाठली आणि आपल्या जागेवर बसून कोण विषय काढतो याची वाट बघू लागले......

तस शांततेचा भंग करत श्री न बोलायला सुरुवात केली

आधी आपण आढावा घेऊ कोण काय काम केलं आणि कश्या पद्धतीने केलं एक ही पॉईंट मिस न करता प्रत्येकजण आपलं आपलं कांम सांगेल

ओके... मी वर्तमान.. मी या केसच्या मेन इन्व्हेस्टीकेशला सुरुवात केली...मी आधी आपल्या खून झालेल्या खबऱ्यांच्या पूर्ण डिटेल्स चेक केल्या... त्यात अस समोर आलं की त्यांचा रेप करून त्यांची हत्या करण्यात आली पण मेन PMरिपोर्ट बदलण्यात आले आणि फक्त मर्डर आहे अशी केस तयार केली गेली...त्यात ही मला तपास करताना ह्या गोष्टी लक्षात आल्या की ..... त्यांच्यावर खूप आधीपासूनच नजर ठेवण्यात आली होती...आणि ह्या आधी ही त्यांना एकदोनदा किडण्याप करण्याचा प्रयत्न केला गेला होता..…..मी जमा केलेलं सगळे पुरावे भाईकड पाठवण्यासाठी टॅली कड पोच केले

इथून पुढचं मी सांगतो....जस मला ह्या केसच्या बाबतीत कळलं तस मी ही माझ्या पद्धतीने त्याचा तपास सुरू केला.... त्यात मला पण तेच दिसून आलं जे वर्तमानन शोधलं होत .....पण ह्यात अजून एक गोष्ट ऍड झाली इ म्हणजे त्या मुलींना फसवणारे कोणी साधे गुंड नसून आपल्या इथलं पुढारी आहेत .... मग मी आणि वर्तमान ने मिळून गुपचूप त्यांची हेरगिरी चालू केली.... त्यात अजून मोठा लोच्या समोर आला .... तस आम्ही हे प्रकरण सोडवण्यासाठी रोशनी आणि गण्याला पण ह्यात सामील करून घेतलं....

हो कारण त्यातले जवळ जवळ सगळेच माझे पेशन्ट आहेत आली मला हिप्नॉटाईज देखील करता येत म्हणून मग आम्ही त्यांला आमच्या पद्धतीने शॉर्ट आऊट करायचं ठरवलं ..... हिप्नॉटाईज करून मला त्यांच्या धंद्याची आणि इतर करनाम्याची बरीच माहिती मिळाली होती.... आणि त्यावर काम करायचं गण्यांन चालू केल.....

हो ..... रोशनीन दिलेली माहिती घेऊन मी सगळे पुरावे त्यांच्या विरोधातील ऑल मोस्ट गोळा केलेच होते की मला ह्यात आबास ची इंव्हॉल्मेंट दिसून आली... मग मी अजून कसून तपास केला तेव्हा मला हे कळलं की आबास यात फक्त त्या लोकल गुंडासाठी नाही तर इंटरनॅशनल डॉनसाठी आला आहे ...... तस मी आबास ची कुंडली काढली आणि मला सगळ्यात मोठा धक्का बसला.... हा आबास कोणी साधा गुंड नसून तो इंडियन आर्मीचा एक मेन आहे ..... आणि कहर म्हणजे आपल्या भाईचा बॉस आहे तो... ब्रिगेडियर सुर्या....उर्फ आबास.... ह्या माहिती नंतर मात्र मला भाई कड जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही...

मी भाईला हे सगळं सांगितल्यावर भाईन डायरेक्टर आबास ला ऑफर दिली.... तू मला ह्या नेत्यांना शॉर्ट करायला मदत करायची मी तुला इंटरनॅशनल डॉन देते....

हो ... ही ऑफर पूर्ण अंडरवर्ल्डमध्ये खूपच धुमाकूळ घालून गेली....आणि अपेक्षेप्रमाणे जिथं पाहिजे तिथंच ह्या लोकांनी चूक केली आणि बाजी आता आपल्या हातात आहे.... खुश होत भाई बोलली

हम्म ... मग आता पुढे काय ... अजून 20खबरी मुली त्यांच्या ताब्यात आहेत कस सोडवायचा त्यांला...कोणाकडे काही प्लॅन आहे का....

तस सगळेच एकमेकांना पाहू लागले....

नाही इथून पुढं त्या 20ची केस तू सोल्व्ह कर शाईन .... मला आता आबासला बॅकअप द्यायचा आहे मी नाही ह्या केस मध्ये राहू शकत...... थोडं गंभीर होत भाई बोलला

तस श्री न बाकीच्याकडे बघितलं.....

नाही श्री... तुला एकट्यालाच शाईन बनून ही केस सोडवायची आहे .... आम्ही कोणीही तुला मदत नाही करणार..... कारण आता आमचा वर्किंग हॉलिडे आहे.... थोडस हसतच वर्तमानन सांगितलं

वर्किंग हॉलिडे हा काय प्रकार....श्रीन गोंधळून विचारलं

अरे बाबा.... वर्किंग हॉलिडे म्हणजे आम्ही जे काम दुनिये समोर करतोय त्यात जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करायची आहेत ज्या कामात ब्रेक घेऊन कळलं......आपल्या खास शैलीत रोशनीन त्याला सांगितलं तस स्मित हसत च श्री न तिला कळलं अस सूचित केले

श्रीन राज कड बघून त्याला विचारलं माझी काही सोया केली का तुम्ही की मी अजून ही श्रीच्याच गाडीत फिरू सगळीकडे

तस राज हडबडून लगेच उठला आणि आतून एक चावी आणून त्याच्या हातावर टेकवली

त्याला चावी दिलेली बघून सगळेच आपल्या आपल्या चाव्या बाहेर काढून मोठ्या शटर कडे निघाले

जस शटर ओपन झालं तस श्रीचे डोळे खुलेच्या खुलेच राहिले समोर 7 स्टार जे होते त्यांच्या बाईक मस्त रेम्बो कलर शेड्स मध्ये आणि त्याच सिक्वेन्स मध्ये उभ्या होत्या

जांभळा रंग:- रोशनीच्या बाईकचा होता*(भविष्य).....

तांबडा रंग:- राज उर्फ टाईम च्या बाईक चा होता....

नारंगी रंग:-  गाण्याच्या बाईकचा होता...*(स्टार)

हिरवा रंग:-  वर्तमानाच्या बाईकचा होता

परवा रंग:-   श्री ला भेटला होता.....शाईन

निळा रंग:-  भाईच्या बाईकचा होता.....भूत

पिवळा रंग:- आपल्या टॅलीच्या बाईकचा होता *(शंकर भेळ)

त्या आलिशान बाईक आणि त्यांचे ते मटेलिक शेड बघून डोळे दिपून गेलेले श्री चे

का नाही जाणार त्याची ड्रीम बाईक त्याच्या आवडत्या रंगात त्याच्या समोर फक्त त्याच्यासाठी उभी होती .....

सगळेच गेले पटकन हेल्मेट चढवला आणि वेगवेगळ्या सात दरवाज्याने त्यांनी ती जागा सोडली आणि आपल्या कामाच्या जागेकडे प्रस्थान केले


श्री न तिकडून डायरेक्ट घर गाठलं ..... घरा मागच्या गॅरेज मध्ये बाईक पार्क केली आणि तीच मनापासून निरीक्षण करायला सुरुवात केली...…

बोल्ड लेडी बघून जश्या भावना अनावर होतात तस श्रीच झालं होतं किती ही बघितलं तरी त्याच मन समाधानच होत नव्हतं ......

जेव्हा त्याचा मोबाईल वाजला तेव्हा साहेब भानावर आले.... बघितलं तर भाईचा कॉल

बोला मिस पुरोहित.....काय सेवा करू

काही नको .... फक्त त्या बाईकला ताडून झालं असेल तर रूम मध्ये यायची कृपा करा ..... मागचा अर्धा तास इथं तुमची वाट बघून मी कंटाळून गेलंय.... इतकं म्हणून तिनं कॉल कट केला

तस हसतच श्री मनात बोलला आज नशीब जरा जास्तच जोरावर दिसतंय जे पुरोहित पुन्हा एकदा दिसतायत .……हाय बाबा श्री अवघड आहे आज तुझं... चला नाहीतर इथं येऊन ओढून नायच्या मॅडम.....

तर इकडं रूम मध्ये बसून बसुन वैतागून गेली ती

काय राव माणूस आहे.... जरा काळजी नाही ह्याला...ह्याच्यावर त्या 20ची जबाबदारी टाकून मी काही घोळ तर नाहीं ना घालत.... महादेवा वाचवा बाबा... काय द्यानं पाठवलंस नशिबात रे.....

अरे... मिस पुरोहित.... तुम्ही सांगितलं का नाही आल्या आल्या मी लगेच आलो असतो ....... रूम मध्ये येऊन फ्रेश व्हायला जाताजाता श्री तिला बोलला

तस तिनं वैतागत त्याच्याकडं बघितलं आणि काही बोलणार तितक्यात हा गेला बाथरूम मध्ये

तस थोडस चिडून च तिनं त्याच्या मागे जात बाथरूमचा दरवाजा पकडला

अय... टाईमपास .... एकतर माझा पूर्ण अर्धा तास वाया घातला आणि वरून तोंड धुत बसतो का आता...आधी माझं बोलणं ऐक नंतर काय करायचं ते कर....

रागावून श्रीच्या डोळ्यात बघत भाई बोलत होती आणि श्री महाशय जागेवरून गायब झालते

त्याच अस एकटक बघणं बघून भाईन डोक्यालाच हात मारून घेतला.... आणि जरा रागातच त्याला ओरडली

श्रीsssss

गडबडून श्री लगेच बाथरूम बाहेर आला आणि समोर जाऊन सोफ्यावर बसला

बोला मिस पुरोहित..... काही महत्त्वाचे आहे का???..

येऊन त्याच्या समोर बसत भाई बोलली

हे बघ श्री तुझ्याकडं पूर्ण48 तास आहेत.... कोणाचीही कशीही मदत घे पन मला माझ्या त्या 20 खबरी 48तासात माझ्या समोर पाहिजेत..........कळलं तुला

हम्म.... बर .....मी कोणाचीही मदत घेऊ शकतो ना....

हो नक्कीच.... बोल तुला कोणाची मदत हवी....

हम्म....मला भाईची मदत हवी.....

ओके.... मी तुला नक्की मदत करेल पण.... मी तुझ्या सोबत कुठंही येऊ शकत नाही.....आणि मी तुला फक्त टेक्निल मदतच देऊ शकते....

मला पण टेक्निल च मदत हवी..... मिस पुरोहित.... आणि जर भाई सोबत असेल तर मला तुमचे 48 तास पण नको... पुढच्या 8 तासात मी सगळ्या खबरी तुमच्या समोर हजर करेल ......पण.... माझी एक अट आहे....

चक्क.... देख श्री ..... तुझी जी काय अट असेल ती मी हे आबास प्रकरण संपल्या शिवाय नाही पूर्ण करू शकत....

वैतागत भाई बोलली

ओके.... मग माझे 40 तास मिस पुरोहित तुमच्याकडे उधार राहतील.....

ठीक आहे ..... प्लॅन काय आहे सांगशील आता.....

हम्म सुनो.... आता 6PM झालेत बरोबर 7ला तू मला त्या मुलीच लोकेशन असलेला टॅब मला भेटला पाहिजे... आता त्या तुझ्या खबरी आहेत म्हणल्यावर त्याना इतक्या सहजासहजी किडन्याप करणं म्हणजे साधी गोष्ट नक्कीच नाही .....मला माहिती तुला त्यांच्या विषयी पूर्ण माहिती आहे .....मी सोडवेन त्यांला बस्स तू मी तिथं पोहचल्यावर त्यांची पूर्ण सिस्टीम हॅक करायची आणि मला ऑल कॅलिएरचा सिग्नल द्यायचा ओके ....अजून एक त्या सगळ्या मुली ट्रेंड आहेत.... त्यामुळं त्यांना मी फक्त तिथून बाहेर आणेल पुढं कुठं जायचं ते ....त्यांचं त्या ठरवतील....अजून एक त्यांना मी सोडवलं आहे हे कळता कामानये.... मला ह्यात माझं नाव यायला नको आहे... मी तिथं शाईन बनून जाणार आहे तर मग शाईन हा सेव्हन स्टार शिवाय कोणालाच माहिती असणे गरजेचे नाही ..... शाईनच नाव सोडलं तर त्याची कोणतीच ओळख कोणालाच नको......

हम्म गुड प्लॅन चलो बाय..... मिळेल तुला सगळी हेल्प ऑन टाईम.... वेपन आहेत का.... की अजून काही हवं

तस श्री न आपल्या कपाटातील नवी कोरी स्टायलिश सायलेन्सर वाली लेझर गण तिला दाखवली

गण बघूनच तिला कळलं की ही ऑफिशवरची आहे तीन थोडं स्मित केलं

गुड .....चला मग मला ड्रॉप करा माझ्या कंपनी ऑफिस ला....

तस श्री तिच्याकडं रोखून बघायला लागला

बघू नको..... मी गाडी आणली नाही.... मला इथं गण्या ड्रॉप करून गेलाय... चल पटकन

तस आपल्या रॉयल ची चावी घेऊन.... श्री बॅक पॉकेट मध्ये गण ठेऊन तयारी करून खाली आला ..... त्याच्या पाठोपाठ भाई पण आली....

गॅरेज मधून बुलेट काढताना श्री गालातल्या गालात हसत विचार करत होता.....

व्वा बाप्पा...आज तर तू माझ्यावर अखंड कृपा बरसवत आहे .....क्या बात....

तो येउस्तर गेट मध्ये थांबून भाई विचार करत होती

काय देवा..... काय दिवस आलाय ..…. हे बेन अजून किती घोळ घालणार काय माहीत.... नशीब कामाच्या टाईमला ठिकान्यावर असतंय म्हणून.... नाय तर काय झालं असत काय माहीत....

श्री आला तस भाई पटकन बाईक वर बसली ......श्री न तिच्या समोर हेल्मेट धरलं...… ते घेऊन घातलं भाईन

बरोबर 15 पुरोहित ऑफिस खाली बाईक थांबली ..... भाई न हेल्मेट काढून त्याच्याकडं दिल आणि लगेच ऑफिस च्या बेसमेंट कढे निघून गेली....

श्री न घड्याळ बघितलं 7ला अजून 15मी बाकी होते म्हणून मग श्री थोडं पुढे नाक्यावर जाऊन टाईमपास करत थांबला....

बरोबर 7ला त्याच्या घड्यालावर ब्लु लाईट ब्लिनक झाली तस श्रीन गाडी काढली आणि सुसाट वेगाने घड्याळातला मॅप फोल्लो करायला सुरुवात केली .....

असलेल्या लोकेशन वर पोहचायला श्रीला बरोबर 2तास लागले होते ....

आपण पोहचल्याच सिग्नल त्यानं घड्याळातून भाईला पाठवलं

तस कॉम्प्युटर समोर बसलेल्या भाईन हॅकिंग सिस्टीम चालू केली ..... नृत्य करताना लय दार थिर्कणार्या पावलांना लाजवेल अश्याप्रकारे भाईची बोलत कीबोर्डवर चालत होती ..... अपेक्षे प्रमाण पुढच्या 20मिनिटात सिस्टीम हॅक झाली ..... तस तीन श्रीला कॉल केला

हॅलो....

हम्म.... सिस्टीम हॅक होई पर्यंत वाट न बघता महाशय त्या विला मध्ये घुसले देखील होते... म्हणून न बोलता फक्त ऐकतोय हे कळण्यासाठी हुंकार भरला.....

तस भाई न सांगायला सुरुवात केली

सिस्टीम फक्त पुढच्या 10 मिनिट साठीच हॅक केलीय जे करशील ते 10 मध्ये

पुढचं ऐकायला श्री थांबला च कुठं... कॉल तसाच चालू ठेवून आपल्या कामाला लागला ....

बॅक साईडची गण काढून दिसलत्याला उडवत श्री डायरेक्ट त्या मुलींना ठेवलेल्या ठिकाणी आला

कॉम्प्युटर लॉक च सेल बघूनच श्री च टाळक हललं

तस त्यानं गण पुन्हा पॉकेट मध्ये ठेऊन त्या लॉक ला खोलण्यासाठी त्याच्या कीपॅड जवळ आला ..... थोडा विचार करून बाजूची पाण्याची बाटली उचलली आणि डायरेक्ट त्या कीपॅड वर ओतायला सुरू केली ......

श्री च्या आत येण्याचा सिग्नल मुलींना पण गेला होताच लॉक जवळ कोणीतरी आहे असं जाणवताच पोरींनी आपले हातपाय सोडवून घेऊन सेल च्या जवळ येऊन श्रीच्या हालचाली टिपत होत्या.... त्याला त्या कीपॅड मध्ये पाणी ओतताना बघून लगेच बाकी पोरींनी त्या सेल च्या खाली असलेल्या फटीतून हात घालून सेल वर सरकवण्याचा प्रयत्न करायला लागल्या..... झोपून सहज बाहेर येता येईल इतका तो सेल उचलला गेला तस एकएक करून पोरी बाहेर यायला लागल्या.... श्री न पण त्या सेल ला पकडून ठेवलं होतं.... पण शेवटी सगळ्या बाहेर आल्या तस त्या सेल ला असच सोडून येन शक्य नव्हतं नाही तर हाताची बोटच कलम झाली असती... एक मुलगी आणि श्री दोघांनी मिळून तो सेल पकडून ठेवलाच होता की तिथं दुसऱ्या एका मुलीने एक रॉड खोचला.... काउन्ट करत दोघांनी पण सेम टाईमला हात हटवले आणि तो सेल धप्पकण बंद झाला... सगळ्या मुलींना घेऊन श्री विलाच्या बाहेर आला .... अजून 1मिनिट बाकीच होता... की तितक्यात त्यांला समोर एक गाडी दिसली सगळ्या मुली जाऊन गाडीत बसल्या .... गाडी निघून गेली आणि श्री न पण तिथून काढता पाय घेतला....


 इकडे भाई कॉम्प्युटरकडे बघतच त्यांच्या येण्याचा अंदाज घेत होती......

भरधाव वेगात आपली मिनी बस चालवत रोशनी सिटी हॉस्पिटल जवळ करत होती ......

मुलींना गाडीत घेऊन तिला तिची पुढची तयारी जी करायची होती....

पण तिची ती गाडी चालवन कमी आणि उडवणंच जास्त होतं

कितीही धिराच्या असल्या तरी सगळ्याजणी गाडीच्या सीटला घट्ट पकडूनच बसल्या होत्या ....

जस जसे शहर जवळ दिसू लागलं तस रोशनीन गाडीचा लुकच चेंज केला तिला एका अंबुलयन्स मध्ये चेंज केलं आणि चालू गाडीतच खिडकी तुन अर्धी बाहेर येऊन तीन वर सायरन चा दिवा लावला

तिचा हा स्पीड स्टंट बघून तर पोरी चक्कर येऊन पडायच्याच बाकी राहिल्या होत्या

पूर्ण ब्लॅक कपड्यात तोंड बांधून बसलेली रोशनी ह्याक्षणी त्यांना यम वाटत होती.

जस हॉस्पिटल जवळ आला तस स्पीड कमी करून तीन आपला लुक चेंज केला

घातलेला काळा कोट उलटा करून सफेद बाजू वर केल्या

पायातले मोठे बूट काढून गाडीतली कापडी बूट घातले एका हाताने स्टयरिंग धरत आपले केस मोकळे करून तिन साध्या पिन मध्ये अडकवले ..... तोंडावरचा मास्क काढून त्याजागी हिरवा मास्क लावला आणि बॅग मधला आप्रण आणि स्टेस्कोप लगेच गळ्यात अडकवून गाडी पार्क केली

हे सगळं इतक्या लवकर झालं की कोणाला तिचा चेहरा ही बघायला नाही भेटला

गाडी पार्क करून रोशनी लगेच दवाखान्यात निघून गेली ....

तितक्यात तिथं एक वोर्डबॉय **(आपला टॅली हो)

आला आणि सगळ्यांना खाली येऊन चेकअप साठी चालायला सांगितलं....

तरीही कोणीच खाली नाही उतरलं

तितक्यात गण्यानं फोन केला ....

टॅली न कॉल उचलला

हॅलो ....

हा... मी बोलतोय फोन स्पीकर वर टाक त्या मुली उतरतील....

ओके...

हा.... मी भाईचा राईट हॅन्ड बोलतोय ....पटकन ह्या च्या सोबत हॉस्पिटलमध्ये जा.... थोड्यावेळ.... मग भाई स्वतः भेटीला येईल....

तस सगळ्या जणी उतरून त्याच्या मागे आत गेल्या त्यांना ठरवलेल्या वार्ड मध्ये सोडून टॅली ही तिकडून निघून गेला....

पुढच्या 1मिनिटात भाई त्या वार्ड मध्ये इंटर झाली

सोबत 6 डॉक्टर ची टीम ही होती

भाईला बघून सगळ्याच रिलॅक्स झाल्या

सगळ्यांच योग्य चेकअप झाल्यानंतर भाई न त्यांना बाहेर जाऊन आतांच्याच गाडीत बसायला सांगितलं

सगळ्या गाडीत बसल्या तस भाईन स्वतः ड्रायव्हिंग सीट पकडली आणि पुन्हा गाडी शहरा बाहेर च्या रोडला आणली

आपल्या ठराविक धाब्यावर गाडी थांबवून भाईन मुलींना खाली उतरवून ढाब्याच्या तळघरात जायला सांगितलं

सगळ्या गेल्यावर भाईन एक कॉल केला

हॅलो...

........

लवकर ये.... मी पोहचले आहे...

......

आपल्या नेहमीच्या ठिकाणी .....

.........

नाही अजून वेळ नाही आली तुझी बाकी 6 मेम्बरला भेटायची ....

.........

कूल डाउन पुढच्या वेळी नक्की भेटशील तू सगळ्यांना

.........

ओके ठीक आहे.....आता तू इतका हट्ट करत आहे म्हणून मी तुला सगळ्यांशी आजच भेटवेल पण इथं नाही आपल्या अड्ड्यावर ओके

.........

गुड पुढच्या 5मिनिटात माझ्या समोर पाहिजे मला तू....

.....

भाईन फोन ठेवला आणि ढाब्याच्या तळ घराकडे निघून गेली

सगळ्या मुली तिथं आपली आपली जागा पकडून बसल्या होत्या ....

त्यांच्या साठी हे तळघर आणि ही जागा नेहमीचीच होती.....

भाई आत आली तस सगळ्याच उठून उभा राहिल्या...

सीट... तुम्हाला नायला आलेल्या गाडीची कोडिंग... अंबुलयन्स मधून उतरतानाची कोडिंग....

भाई .... आम्हाला नायला आलेल्या गाडीच स्टयरिंग गाडी चालू करायच्या आधी तुम्ही ज्या पद्धतीनेसांगितलं होतं त्या पध्दतीने राईट साईडला फिरलेलं नोटीस करून मग च आम्ही गाडीत बसलो

गुड....

आणि भाई उतरताना ..... तुमच्या राईटचा कॉल आलेला आणि बोलताना त्यानं मी भाईचा राईट बोलतोय हेच कोडवर्ड वापरलेलं

गुड.....

ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच विसरल्या नाही पाहिजेत कळलं

येस भाई....सगळ्याच एकदम बोलल्या

भाई पुढे काय....

आता तुमच्या वर एक मेम्बर असेल जो तुमची पूर्ण काळजी घेईल आणि तुम्हाला पूर्ण वोर्किंग प्रोसेस पण समजावुन सांगेल... मला माझ्या प्रत्येक खबरीची गरज आहे आणि प्रत्येक खबर मला सगळ्यात आधी पाहिजे ....इथून पुढे तुम्ही खूप अलर्ट राहायचं आणि माझं काम तुम्ही आता तुमच्या ट्रेनिंगचा वापर करून करायचं कळलं....

येस...

तितक्यात खट... खट...खट... बुटाच्या आवाजानं पूर्ण खोली भरून गेली...

तस भाई आपल्या जागेवरून उठून दारात गेली आणि कोणाला काही कळायच्या आत एकदम वेगात कोणी तरी भाईच्या मिठीत होत

सगळ्याच मुली समोरच दृश्य बघून थक्क झालेल्या होत्या

...........................................................

इकडं आपलं काम संपवून शाईन नि घर गाठलं

त्याला घरी यायला ठीक 12 वाजले...

दार उघडून आत आला तर समोर पप्पा बसलेले दिसले सोफ्यावर.....

....हेय...डॅड..झोपला नाहीत अजून...

..नाही ... तू पण ये बस..सोफ्यावर हात ठेवत त्यांनी श्रीला पण बोलवलं...

त्यावर श्री काही बोलत इतक्यात त्याच्या मागून येत गण्यानं विचारलं

क्या बात...वर्तमान आज जंगी पार्टी आहे की काय..

त्याला आलेलं बघून तर श्री अजूनच गोंधळला

तितक्यात त्याला पुढे ढकलत टॅली आणि टाईम पण आले आणि रोशनी ही

तस थोडस हसत च श्री पण येऊन त्यांच्यात सामील झाला

कोणालाच अशावेळी बोलवण्याच कारण कळत नव्हतं सगळेच गोंधळून गेलते.....

फक्त इतकंच कळलं होतं की मिंटिंग भाईन बोलावली आहे

तस भाई च नाव ऐकताच श्री पटकन उठला

त्याला उठलेले बघून गण्यांन त्याला हटकल

ओय...आता कुठं..

अरे.. जर फ्रेश होऊन येतो ना... गण्याकड बघत श्री न डोळा मारला

तस त्याच समजून घेत गण्या म्हणला

जा... जा बाबा तुझं काही नाही होऊ शकत..

तस श्री पळत रूम मध्ये गेला

इकडं टाईम न गण्याला विचारलं

क्यू भाई...श्री च काही का नाही होऊ शकत

तस गण्या मोठ्यांन हसला आणि म्हणला

हे बेन भाई च्या पाठी येड झालंय...आता ह्याला कोण समजवणार की.... बाबा रे तुम जीस के पिछे पागल हो... वो पहिले से ऍडपट खानेका सरताज है...

तस सगळेच हसू लागले

व्वा मानलं ... भारी चॉईस आहे हा माझ्या पोट्याची... वर्तमान खुश होऊन म्हणला

तस रोशनीन मध्ये च बोलली...

हा....वर्तमान .... पण भाई ... ह्याला पटलं का...

टॅली न मध्ये च उडी घेतली

का... का ..नाही पटणार..नक्कीच अरे अपना शेर च आहे भाई च्या टाईपचा...

तस गण्यानं पुन्हा विरोध केला... नो नाही नेव्हर... भाई कोणालाच नाही पटणार...

ह्या चोघांची न जमलेल्या लग्नाच्या जोड्यावरून चांगलीच जुंपली...

त्यात पण दोन गट झाले

एका बाजूला गण्या आणि रोशनी तर एका बाजूला टाईम आणि टॅली

तस वर्तमान न सगळ्यानाच ओरडून शांत केलं

बस्स.... लावा बेट... मग .... जर भाई शाईन ची झाली तर गण्या आणि रोशनी हरणार आणि भाई शाईन ची नाही झाली तर टॅली आणि टाईम हरणार

हो हो हो.... चालेल चालेल

चोघांनी पण वर्तमानच म्हणणं मान्य करून बेट लावली

पण

ह्या बेटचा जो कोणी विनर होईल त्यानं हरलेल्याला हवी ती शिक्षा द्यायची मंजूर

ये ये येस आम्हाला चोघांना पण मंजूर आहे

ह्यांच बोलणं होत होत तितक्यात लॉक ओपन व्हायचा आवाज आला

इकडं वरून श्री आणि डोर मधून भाई एकदमच हॉल मध्ये आले

आज भाई सोबत येताना अजून एक जण होत आणि त्याच मोस्ट हाईड पर्सन ची ओळख करून देण्यासाठी भाईन सगळ्यांना इथं बोलवलं होत


भाई नि एन्ट्री मारली अँड द सेम टाईम आपला श्री पण रूम मधून बाहेर आला ......

पुन्हा एकदा भाईला बघून श्री साहेब हवेतच .....

तितक्यात त्याला भाईच्या हातात कोणाचा तरी हात दिसला पायऱ्यांवर असल्यामुळे त्याला त्या व्यक्तीच तोंड दिसलं नाही ..... पण भाई ज्या उत्साहाने त्या व्यक्तीला पकडून उभी होती ते बघूनच आपल्या श्री चा चेहरा पडला.

खाली भाई सगळ्यांना उत्साहात सांगत होती

हे गाईज ..... ही आपली हेड ऑफ खबरी....

...है....

सो गाईज... आज मी तुम्हाला टायगर ची भेट घालून देणार आहे... रेडी...

ओ... येस... नक्कीच .... गण्यानं लगेच आपली उस्फुर्त प्रतिक्रिया दिली

हा...हा..माहिती मला गण्या तू किती उतावळा आहेस ते चिल... भाईन हसत हसत च त्याला टोकल

कम... टायगर... दाराकडे हात करत भाईन तिला आत बोलवलं

तस एकदम रुबाबात....सेम भाईची कॉपी वाटावी अश्या उंचीची आणि तसाच गेटअप केलेली व्यक्ती आत आली

गण्या सोडलं तर सगळेच त्यांच्याकडे आलटून पालटून बघत होते

सेम उंची... सारखेच कुरुळे केस... ड्रेसिंग पण सेमच फक्त भाईन नेहमी प्रमाण फिकट आकाशी रंगाचा शर्ट आणि काळी जीन्स ....ब्लॅक जॅकेट...पायात स्पोर्ट सूज घातले होते ते त्या व्यक्तीने पूर्णच ब्लॅक कपडे घातले होते...

भाई पेक्ष्या पण उजळ पांढरी शुभ्र होती ती...आणि आपला भाई सावळा ... बारी बारी दोघीकडे बघत असलेल्या सगळ्यांना बघून गण्यां हसला

अरे ओळख तर करून घ्या .... ही टायगर माझी बेटर हाफ... गण्यांन हसत हसत सांगितले

तस सगळेच डबल शॉक न गण्या कड बघायला लागले..

तस टायगर मधेच बोलली

अय....कल्लू चूप...

भाई न मग ओळख करून द्यायला सुरुवात केली

तिच्या बाजूलाच उभ्या असणाऱ्या श्री पासून

देख टायगर हा शाईन..., तो टॅली....,तो टाईम....ही रोशनी....आणि हे तर दोघांना तू ओळखतेच आहे वर्तमान आणि स्टार

हाय...गाईज...मी तुमच्या सगळ्यांच्या खबऱ्यांची हेड टायगर... तीन सगळ्यांना ग्रीट करत सांगितलं आणि जाऊन सोफ्यावर बसली...

तस सगलेच पुन्हा जाऊन बसले सोफ्यावर

बोल टायगी ..... कस काय इकडंचा रस्ता सापडला .....वर्तमान

बस्स काय बॉस.... मी नेहमी च भेटायला तयार असते .... ते तर भाई आहे जी नेहमी व्हिलन बनत असते....

अय....पण काय खरच तू गण्याची वाईफ आहेस का.... टाईम न मध्ये च विचारलं

हो.... आता करणार काय .... कटू असलं तरी सत्य आहे...

तिच्या ह्या वाक्यावर मात्र सगळेच दिलखुलास हसले

व्वा....असो बॅक टू वर्क....

भाईन पुन्हा ह्यांना कामाची आठवण दिली

तस सगळे पुन्हा गंभीर होऊन चर्चेत लागले...……

हम्म .... शाईन गुड वर्क... त्या 20पैकी एकाही पोरींन तुला थोडं सुद्धा ओळखलं नाही.... आणि विशेष म्हणजे मागच्या पूर्ण 1वर्ष्यासाठी त्यातल्या 2 मुली आम्ही तुझ्यावर पाळत ठेवलेल्या त्यांनी देखील तुला नाही ओळखलं जबरदस्त.... गण्या बोलून गेला तस सगळेच त्याच्याकडं खाऊ की गिळू नजरेनं बघायला लागले आणि शाईन मात्र गोंधळून बघत होता...

नेहमी प्रमाण बोलून गेल्यावर त्याला कळलं की आपण काय माती खाली आहे...

तो थोडा टेन्शन मध्ये टायगर कड बघत होता आणि टायगर त्याला टिपिकल बायकोवाला लुक देत होती.....घरी चल मग बघते तुला...

तिला मध्येच तोडत गण्यांन उठून तिला मिठी मारत सांगितले ......

माझी बेटर हाफ..टायगर ..... माय स्वीट वाईफ

अय....प्रेमाचा उतू जाणारा पूर....आवर जरा....रोशनी त्याला मागे ओढत म्हणली तस सगळेच हसायला लागले

गण्यानं हळूच श्री कडे कटाक्ष टाकला,वरून तोंड पाडून आलेल्या श्रीचा चेहरा गुलाबा सारख फुल्ला होता गण्याचं वाक्य ऐकून

जस गण्या बाजूला झाला तस टायगर न पुन्हा भाईचा हात पकडला ...... हात पकडला म्हणण्यापेक्षा हाताला मिठीच मारली म्हणावं.... लाजूनच गेलती बिचारी गण्यानं सगळ्या समोर तिला अशी मिठी मारलेली बघून

अरे...नाव टायगर...आणि लाजण तर बघा..... रोशनीन हसत च सगळ्यांच लक्ष तिकडं वळवलं

ये...अस काही नाही हा...पटकन भाईचा हात सोडून नीट उभं राहतं टायगर म्हणली.....

ओके...चला..सगळ्याची ओळख करून देते टायगर तुला... अस म्हणून भाईन तिला घेऊन सोफ्याकड आली...

सगळेच बसले येऊन सोफ्यावर...

एका बाजूला शाईन, टाईम, टॅली बसले होते.... तर त्याच्या समोरच्या सोफ्यावर रोशनी आणि गण्या.... वर्तमान एका खुर्चीत बसले होते.... तस गण्या शेजारी जाऊन टायगर बसली आणि भाई वर्तमानच्या खुर्चीच्या हातावर टेकत सगळ्यांची ओळख सांगायला सुरुवात केली

हा शाईन.. त्याच्या बाजूला टॅली...आणि टाईम... ही भविष्य.. आणि.... हा वर्तमान... आणि मी भूत.... आणि हा तुझा बेटर हाफ स्टार .... meet अव्हर रेम्बो आणि गाईज ही आहे ब्लॅक टायगर द फेमस हंटर

तीच नाव ऐकलं तस सगळेच एकदम शॉक नि तिच्याकडं आणि भाई कड आळीपाळीने बघत होते

गण्यानं न राहून विचारलंच शेवटी" ती ब्लॅक टायगर तू आहेस.

येस... ती मीच आहे...सिक्रेटस काय फक्त तुलाच ठेवता येतात का?... मला पण येतात ... थोडा भाव खात टायगर म्हणली

बाकीचे तर अजूनही तिच्याकडं रोखून बघत होते

तस भाईन बोलायला सुरुवात केली...

चिल गाईज... बस्स झालं इट्रो बॅक टू वर्क फास्ट....

तस सगळेच पुन्हा नॉर्मल होऊन आपल्या आपल्या कामाचा भाग सांगायला लागले

वर्तमान :-- भाई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे पुढच्या वेपन्न ची ऑर्डर पूर्ण केलीय ... जिथं जिथं अवैध शस्त्र साठा होता सगळा गोडाऊन ला जमा केलाय.... आणि प्रत्येक प्रकारची वेपन्न खास लक्ष देऊन गोळा केल्यात ग्रॅनाईड, आणि गण पावडर पण हव्या त्या प्रमाणात जमा केलीय..... नवीन अस काही इलेक्ट्रॉनिक आटोमॅटिक गन्स कलेक्शन पण वाढवलं आहे .......

भाई:- गुड,

टॅली :- भाई , एक झक्कास खबर , आपली धन्नो is बॅक ....आणि फुल फॉर्म मध्ये रेडी आहे ती आता... अजून एक प्रत्येक बाईकला काही न्यू आक्टिव्हिज जॉईन केल्यात एक दिवस ग्राउंड करून शिकून घ्या.... बाईक्स चे गियअर पण वाढवलेत .... पेट्रोल क्षमता आधी 20लिटर ची होती ती नाही वाढवली तितकीच आहे पण बॅटरी बॅकअप जॉईंट केलाय ... आणि त्याला सोलार सिस्टीम अटॅच केलीय त्यामुळं चार्जिंग चा इशू खतम....बस्स बाईक च सीट सोडून इतर कुठं म्हणजे चाकाकडे वैगेरे हात लावायच्या भानगडीत पडूनये... म्हणजे तुमचा अधिकार फक्त बाईकच्या हँडल आणि सीटवर आहे बाकी कोणत्याच पार्टला हात लावू नका कळलं....अजून एक तुमच्या बाईकच्या हेड मध्ये मी पूर्ण मॅप सेट केलाय तुम्ही कमांड दिली की बाईक तुम्हाला हवं ते लोकेशन दाखवेल... की सेट चेंज केलाय आता तुम्ही 100मीटरच्या बाहेर पण फक्त की कन्ट्रोल नि बाईक पळवू शकता .... अजून लय काय काय बदल केलेत पण हे मी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार केलेत... ते तुम्हाला बाईक बघितलं की लक्ष्यात येईलच

श्री..:- wow , झक्कास राव तू तर भारी आहेस ....

भाई :- गुड , अजून एक मी सांगितल्या प्रमाणे मोबाईल सोलर वर करता येईल का ते बघितलं का टॅली....

नो... बॉस...हे काम टाईम नि करायची जबाबदारी घेतली म्हणून मी त्यावर कोणतंच लक्ष नाही घातलं...-:टॅली

टाईम :- येस.... आणि हेअर तुमचे न्यू मोबाईल पीस... सगळ्यांना नवीन मोबाईल देत टाईम न सांगितलं....

गण्या:- काय हे आता काय मी ह्याला उघड झाप करत बसू का टाईम... मोबाईल च मॉडल बघून गण्यांन कुरकुर केली

टाईम :- चिल बॉस... देख .... हा ओपन केला की एक सेव्हिंग मोड चालू होतो ह्याच्यात ... ह्यात वेगवेगळे फिचर आहेत... जस की हा फक्त तुमच्या डोळ्यांच्या कमांड वर पण काम करू शकतो किंवा फक्त वाईस कमांड वर पण... नो मॅटर हवा तसा वापरू शकता... पाण्यात पडला तरी फरक नाही पडणार... फुटला तुटला तरी ह्यात तुम्ही इमर्जन्सी साठी शेवटचा एक कॉल नक्कीच करू शकता... जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा हा तुमच्या ऑर्डर नुसार टच पण न करता व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्ड करेल....आणि सगळ्यात पल्स पॉईंट म्हणजे हा सूर्यप्रकाशात चार्ज होतो....आणि चार्जर वर पण चार्ज होतो... बॅटरी बॅकअप पण ह्याच तगड आहे पूर्ण 2दिवस हा कोणत्याही चार्जिंग शिवाय फुल इंटरनेट वापरून पण झक्कास चालतो.... ह्यात कोणाचाच नंबर सेव्ह करायची गरज नाही .... आणि सगळ्यात क्लास म्हणजे हा खूप लो वेट आहे.... ब्लॅक बेरी च बॉडी वापरलीय मी ह्या साठी त्यामुळे हा कोणाला ही ओळखता येणार नाही की युनिक पीस आहे .... आणि हा चोरीला तर बिलकुल जाणार नाही.. कारण तुमच्या नकळत कोणी ह्याला हात लावला की तुम्हाला आपोआप झटका बसलं करंट हो.... मग कसा वाटला माझा शोध...

टॅली :- हॉरिबल ........

टायगर :- मला तर नको बाबा .….. मला माझा माझा डब्बाच बरा...

भाई :- गुड, अपेक्षित सगळंच आहे आवडला मला...

सगळेच आपला आपला मोबाईल हातात घेऊन बघत होते...

चला .... गाईज तुम्ही करा कॅन्टीनिव्ह मी चाललो झोपायला .... गुड नाईट... -:श्री सगळ्यांना विष करून निघून गेला झोपायला

तस सगळ्यांनीच चर्चा आटोपती घेतली....

भाई त्याच्या त्याच्या बाईक वर निघून गेली... गण्या आणि टायगर सोबत गेले .... टॅली आणि टाईम न नेहमी प्रमाण एकमेकांची सोबत केली...

रोशनी मात्र रिलॅक्स तिचं सोफ्यावर झोपून गेली .... वर्तमान न उठून तिच्यासाठी एक ब्लॅंकेट आणलं आणि तिच्यावर टाकलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन तेही आराम करायला लागले ....

इकडं भाई जशी बेडरूममध्ये पोहचली तस तिचा फोन वाजला..

काहीस वैतागत च भाईन कॉल रिसिव्ह केला..

हॅलो....

हाय... आज खूप मस्त दिसत होतात मिस पुरोहित...

ओ.. मिस्टर PSI झोप मुकट्या ....मला बिलकुल तुला बोलायच मूड नाहीये... तोंडावेंगडत भाईन त्याला सांगितलं

तस हसत हसत च श्री न फोन कडे बघितलं

ओके ...ओके... मिस पुरोहित... मी उद्या टाईमवर ड्युटी ला येतो... तेव्हा नक्कीच तुम्ही मला बोलाल... गुड नाईट मिस पुरोहित... इतकं म्हणून श्री न कॉल कट केला

देवा.... काय ध्यान पदरात पडलं माझ्या हुश्श....

चला बाबा लवकर आवरून झोपावं ... श्या राव आता फक्त 1तासच भेटलं

वैतागून लाईट बंद करून भाई तशीच बेडवर पडली आणि 5मिनिटात झोपून गेली....

.............................…..............................

ये....गण्या...त्या आबासला टाईमवर अड्ड्यावर पोहचायला सांग.....

सकाळी सकाळी जिन्यावरून उतरत उतरत ....भाईन गण्याला फोन करून सांगितलं....

आणि आपल्या बाकीच्या लोकांकडे वळत भाईन पुढच्या सूचना द्यायला सुरुवात केली...

'A' तू आणि तुमची पूर्ण टीम पुढच्या पूर्ण महिन्यासाठी आबासला सेक्युरिटी देणार... आणि मला त्याच्या केसाला पण धक्का लागलेला नको आहे...

ओके... भाई..

गुड....

इस्माईल.... सगळ्याच नेटवर्कला ऍक्टिव्ह कर.. मला ह्या वेळेस कोणतीच चूक नकोय... कळलं

जी..भाई...

गुड, शालिनी .... तुला माहिती तुला काय करायचं आहे ते... पुढचे पूर्ण 20 दिवस तू मला सावली सारखी त्या आबासच्या बायको सोबत हवी आहेस... तीन स्वास जरी घेतला तरी मला कळलं पाहिजे...

जी... भाई...

साली, दिसती तेव्हढी सोपी नाही ती.. भलतंच लच्यांड आहे तिच्या मागे...शालिनी अलर्ट राहायचं ... मला तुला ही काही झालेलं चालणार नाही....

जी.. भाई... मी निघू का??

निघा.. पण सोबत गण राहू द्या... कळलं

जी.. भाई...

निघा सगळेच .... आणि दिलेली काम चोख करा .. बस्स एकदा का.... क्यूविन हातात आली की मग मी गेम फिरवायला मोकळी.... सगळ्यांनाच काम वाटून देऊन भाई कंपनी कडे निघाली वाटेत तिनं ठरल्याप्रमाणे सगळ्यानाच आज काम पूर्ण झाल्याचा मॅसेज ड्रॉप केला

--------------------------------------------------------------

तिचा मॅसेज भेटताच लगेच गण्यान आबासला उचललं आणि त्याला माफिया भाईच्या अड्ड्यावर घेऊन जायला निघाला.....

जाताना गण्यान पूर्ण अंडरवर्ल्डच खबरी कनेक्शन ऍक्टिव्ह केलं

काहीस खुश झाला होता गण्या... इतक्या दिवसाच्या प्लॅन ला आता ऍक्शन सीन चा वेग जो भेटला होता...

त्याला आता क्यूविन चा कच्च्याचिठा बाहेर काढून तिला संपवण्याचा गेम खेळायचा होता....

त्यांनी क्यूविन च्या राईट हॅन्डला आपल्या बाजूने केलं होतं... आणि आता त्यात त्याला अजून एक खेळी खेळायचा चान्स भेटला होता.... त्यानं राईट हॅन्ड ची ओळख आबास सी करून दिली .... आणि परिणाम गण्याच्या अपेक्षेप्रमाणे होता....

आता आबास साठी क्यूविनचा राईट हॅन्ड स्वतःला पण विकायला तयार होईल ह्याची सेटिंग पूर्ण झाली होती...

------------------------------------------------------------

AT the same time

श्री महाशय पोलीस स्टेशनात सेक्स कॅन्डल मोहीम चालू केली होती....

काम कोणत्या स्पीड व्हायला हवं ह्याचा नमुना म्हणजे PSI श्री राजे....

रात्र च गेली होती आणि सकाळ अख्ख्या पोलीस स्टेशनसाठी एक नवी लढाई घेऊन आलती....

इतके सारे पुरावे समोर पडले होते की त्यावरून अरेस्ट वॉरन्ट ज्यारी करण्यासाठी टाईप करून कॉन्स्टेबल ची बोट हँग झाली होती... पण आता श्री थांबणार नव्हता आणि थांबू देणार ही नव्हता....

माने ना तर आपण आज पहिल्यांदा ड्युटी करतोय असा फील येत होता... आणि हीच गत सगळ्याच इनामदार ऑफिसर्स ची होती.... पोलिसांना चढल होत स्फुरण .... जितकं शक्य होईल तितकी घाण साफ करण्याचं....

--------------------------------------------------------

वर्तमान....

आज आपल्या जेष्ठ पत्रकाराला बघून सगळेच जण त्यांच्या भोवती गोळा झाले होते.....

संपादक... बोला राज राजे... काय मसाला आहे आज की ......

नक्कीच .... नक्कीच ....संपादक साहेब... मसाला तर आहेच.... पण आता राजकारणात त्याचा ठसका उठला पाहिजे.... तरच मसाला तुम्हाला मिळलं.... नाही तर.... ह्याची फोडणी मी दुसऱ्या भाजीला ही देऊ शकतोच....

त्याची काही गरज नाही राजे साहेब... आम्ही असा ठसका उठवू की राजकीय लोक नाका तोंडातून धूर सोडतील .... तेवढा विश्वास तर तुम्ही ठेवूच शकता की...

संपादकाला ही माहीत होतं .... राज राजे हे पत्रकारिता साठी फक्त नाव नाही तर अख्ख फ्रंट पेज आहे... ह्यांच्या बातम्या किती खात्रीलायक असतात हे आता पूर्ण सोशल जगताला माहीत होतं...

त्यात रिटायर्ड असून ही तरुणांना लाजवेल इतक्या स्फूर्तीने काम करण्याची लकब....

वर्तमान न त्याच्या अखत्यारीत असलेल्या बातम्यांना चांगलाच तडका दिला …..

---------------------------------------------------------

टॅली

बाप...ही भाई आहे की टाईम मशीन

आयला मी अजून हतूरणातून उठलो नाही ....आणि ही तर मिसाईल सारखी सुटली पण.... देवा वाचीव बाबा आजच्या दिवस... काहीस बडबडत च टॅलीन उठून आपला लॅपटॉप हातात घेतला...

आणि मग त्याच्या बोटांची कमाल सुरू झाली.... जिथं जिथं हवं तिथं तिथं त्यानं आबासला सेट केलं... त्याच्या बॉडी ची ट्रॅकर चिप ऍक्टिव्ह केली .... आणि सोबतच त्याच्या साठी खबरी म्हणून अंडरवर्ल्ड मध्ये घुसवलेल्या 20 डायनामाईट च्या मोबाईल वर पण त्याने ऍक्टिव्हचा मॅसेज पोहचवला....

टायगर नी दिलेल्या सगळ्या हॅकर च्या ट्रिक्स वापरून एक नवी कोडिंग बनवली आणि सगळ्या ट्रॅकर च्या चिप स्कॅनिंग च्या कोणत्याही प्रोसेस मध्ये सापडणार नाहीत ह्याची खात्री करून घेतली...

पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने त्यानं टायगरची बाईक पण ऍक्टिव्हेट केली आणि त्याचा मॅसेज तिच्या मोबाईल वर पाठवला....

हातरुणातच बसून 3तासात त्यानं पुढची सगळी सेटिंग लावली आणि ऑल क्लिअर चा मॅसेज सगळ्यांना पाठवला

--------------------- ------------------------------

टाईम

भाईच्या मॅसेज ची वाट न बघता कामाला लागणार एकमेव गडी...

वेळ म्हणजे त्याच्यासाठी त्याची प्रियसी च होती... एक सेकंड पण वेस्ट करणं त्याला जीवावर यायचं...

सांगितलेल्या लोकांना उचलून आपल्या खास घरात कैद करायचं काम टाईम न झपाट्याने सुरू केलंत....

तो आणि त्याचे कमांडो सगळ्यांनी मिळून मॉर्निंग वॉक ला आलेल्या टार्गेट ला गायब करण्याचं काम एकदम शिताफीने केलंत....

ह्या सगळ्यात भाई आणि टॅलीचा मॅसेज कधी आला हे ही त्याला नाही कळलं

जेव्हा त्यानं मोबाईल बघितला तेव्हा त्याला कळलं भाई, श्री,वर्तमान, आणि स्टार नि त्यांची काम शॉर्ट आऊट केलीत

आपलं पण काम ऑल डन चा मॅसेज ग्रुप वर टाकला

-----------------------------------------------------

भविष्य.......

मॅडम मात्र आरामात लोळत पडलेल्या सोफ्यावर...

तस पण हीच काम म्हणजे सगळ्यानाच धडकी भरायची ....

पोरगी काम कमी आणि राडाच जास्त करायची.... निवांत 10ला उठून आवरून आपल्या घरी निघून गेली ...

दार उघडलं तस तिला जाणवलं कुछ तो गडबड है भाई... घर काही तरी सांगतंय....

दाराच्या हॅन्डलला पकडलेला हाथ तिनं हळूच मागे घेतला .... थोडी लांब आली आणि झाडावरून चढून डायरेक्ट गच्ची गाठली ....

पायांचा आवाज न करता घरात आली... आणि बघितलं तर काही लोक तिच्या बेडरूममध्ये शोधा शोध करत होते....

ते बघून आपली डेव्हिड स्माईल करत तिनं सावकाश रूम मध्ये प्रवेश केला आणि हाताच्या सफाईन प्रत्येकाला बेशुद्ध केलं.... त्या चोघांना एकाच सोफ्यावर बांधून त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणून त्यांच्या पुढं बसली....

जस ते शुद्धीवर आले आणि समोर तिला बसलेला बघितलं तस ते शॉक च झाले...

डॉ..डॉ ...क्ट...र ते...ते.. आम्ही

बोबडीच वळली त्यांची ... काय सांगणार होते ते की इथं का आलेत ते....

फास्ट..... फास्ट.. बोलायचं... त्याच रुबाबात तिनं त्यांला अजून मध्ये च टोकल

तस सगळेच घाबरून एकमेकांना बघायला लागले... त्यांनी रोशनीला ऑपरेशन थेटर मध्ये खुप जवळून बघितलं होत की ती किती सराईत पणे एखाद्याची कटिंग करते ते .....

घाबरून त्यांनी लगेच सगळं सांगायला सुरुवात केली...

पहिला... ते आम्हाला रिपोर्ट हवे होते..

दुसरा.... तुम्ही हिप्नॉटाईज करून माहिती काढता ते आम्ही चोघांनी पाहिलं होतं ...

आणि त्यात आम्हाला .... एक फोन आलेला की तुमची सगळी कुंडली दिली तर आम्हाला 10लाख मिळतील म्हणून...

तिसरा .... तुमचा कुठलाच बकराऊंड कोणत्याही ठिकाणी भेटत नाही म्हणून आम्हाला इथं तुमच्या घरात यावं लागलं

गुड... फोन वर कोण होत...? तिनं नजर रोखत विचारलं

ते ... ते....ते... नाही माहीत डॉक्टर..

नंबर ... मला हवा तो नंबर बघू... आपला हात त्यांच्या पुढे करत तीन त्यांचा मोबाईल मागितला...

तस एकान लगेच आपला मोबाईल तिच्या हातात ठेवला...

मोबाईल बघून तीन लगेच मागची गन काढली आणि त्या चोघावर एक नजर टाकली.. आणि गनला सायलेन्सर लावत त्यांच्याकडे बघत होती...

गुड... बाय.... तोंडातल्या तोंडात पुटपुटत तीन त्या चोघांना शूट केलं आणि त्यांचा बंदोबस्त करून टाकला...

फ्रेश होऊन पूर्ण घर पुन्हा एकदा सेट केलं .... आणि निघून गेली दवाखान्यात.....

----------------------------------------------------------

ब्लॅक टायगर

टिपिकल गृहिणी.... घर आवरा स्वयंपाक करा ... हे असलं काम करणं ..... आणि ढाराढुर झोप घ्यायचं काम चालू होतं .....

हीचा दिवाच रात्री 10नंतर चालू व्हायचा...

दिवसभर सगळ्यांच्या कामाचा आढावा ... आणि ट्रक लोकेशन वर नजर ठेवत आराम करायची आता तिला ही आदत झाली होती...

ठीक 8ला गण्या घरी आला.. जेवण करून गप्पा मारत असतानाच झोपून गेला... तो झोपला तस ...

तिनं आपला टायगर शूट बाहेर काढला...

पूर्ण ब्लॅक ड्रेस मध्ये .... तयार होऊन आता तीही शिकारीला निघाली ....

आपल्या बाईक वर बसून तीन श्रीला लोकेशन शेअर केल आणि पुढच्या 10मिनिट मध्ये तिथं रेड टाकून ड्रग्स जमा करायचे हे सांगितलं आणि निघून गेली...

आपल्या इच्छितस्थळी पोहचल्यावर मात्र तीन आपला आवडत हाफ फेस मास्क काढला आणि चेहर्यावर लावला. डेव्हील स्माईल करून तीन बार मध्ये एन्ट्री मारली...

तिला जी व्यक्ती हवी होती ती दिसली ... तस तीन बार च काउंटर पकडलं आणि जाऊन कुणाला काही कळायच्या आत त्या व्यक्तीला बेहोष करून आपल्या मिठीत घेतले....

रंगेल स्वभाव माहीत असल्यामुळे... त्याचे बॉडीगार्ड तसेच मागे उभे होते...

तीन त्याला उचललं आणि हॉटेल च्या बुक केलेल्या रूमच्या खिडकीतून खाली टाकून दिल...

खाली उभ्या श्रीन त्याला पकडलं आणि तिथून निघून गेला....


भाई.... भाई.....


तस झोपत असलेल्या भाईन डोळे उघडून बघितलं.... तर टायगर आणि शाईन तिच्या बेड समोरच्या सोफ्यावर बसले होते... थोडी मान वळवून बघितलं तर रोशनी भाईला उठवत होती...

डोळ्यावर आलेली झोप आवरता आवरत नव्हती...

कस बस उठून जाऊन तोंड धुवून आली आणि त्यांच्या सोबत निघाली ......

शेवटी इच्छित स्थळी पोहचल्यावर सगळेच आपल्या तोंडावर मास्क घालू त्या रूम मध्ये गेले जिथं शाईन आणि टायगर नि त्यांची शिकार ठेवली होती ..

समोरील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून द मोस्ट फेमस कलेक्टर साहेब होते त्यांच्या जिल्ह्याचे....

कित्येक निष्पाप मुलींची आयुष्य बरबाद झाली होती त्यांच्या वासनेच्या खेळात...

चुकून एकदा एक केस भाईच्या नजरेत भरली आणि तिथून ह्या कलेक्टरचे दिवस च फिरले त्यात कहर म्हणजे ह्याचा हाथ त्या इंटरनॅशनल डॉनला आपल्या शहरात आणण्यात ही आहे हे कळल्यावर तर भाईन त्याच्यावर पूर्ण ट्रॅप च बसवला होता....

कालच फिरोज आणि त्याचा महिन्या आधी आलेला ताफा ... ह्याची कुंडली भाईन सेट केलती आणि आज त्याची साफसफाई ह्या कलेक्टर पासून सुरू केलती... शेवटी आता कोणताही अडथळा नको होता म्हणून सगळ्यात मोठा काटा असलेल्या कलेक्टरला च उचललं ....

त्याला खुर्चीला बांधून ठेवलं होतं... आणि ही जागा म्हणजे त्याच कलेक्टरच स्वतःच फार्म हाऊस होत...

इतक्या दिवसाच्या अविरत ... दौडीत भाईला उमगलेले गुपित म्हणजे .... लोक स्वतः च घर सोडून अख्खी दुनिया चा शोध घेत फिरतेत... आणि शेवटी थकून घरी येऊन बघतात तर तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते...

भाईन कलेक्टरला दोन थोबीडत देऊन शुद्धीत आणलं... आणि आपल्या तोंडावरचा मास्क काढून त्याच्याकडं बघितलं

तस कलेक्टरला समोर साक्षात यम उभारल्याचा भास झाला ... फ्लॅशबॅक सारख त्याच्या समोर त्याची आणि भाईची पहिली ठिणगी आठवली

##

भाई सोबत मुलीला बघून देखील कलेक्टर न आपला गुन्हा नाकारला होता...

म्हणून भाईन डायरेक्ट कलेक्टरची कॉलर धरून च सांगितलं होतं.... ज्या दिवशी मला तुझ्या विरोधात.. फक्त एक पुरावा भेटलं तो दिवस तुझा शेवटचा असेल... आणि त्याच दिवशी तुला माझं हे तोंड दिसलं तोपर्यंत मी तुझ्या समोर पण नाही येणार ..

मनातच देवाला आठवून नसलेली हिंमत गोळा करून त्यानं भाईला विचारलं

मला...मला इथे का आणलंय

..…

हा..हा..हा... तू काय झक मारायला बांधला का हे फॉर्म हाऊस..... गण्यांन त्याला विचारलं

तस... त्यान नीट सगळीकडे बघितलं तर त्याला तो त्याच्याच नव्या फार्म हाऊस वर दिसला जे त्यानं काही दिवसात......

त्यानं घाबरून भाई कड बघितलं

काय....काय पाहिजे तुम्हाला.... थरथरत विचारलं त्यानं

तुझा जीव पाहिजे.... आणि मी तो घेणारच... भाईन एकदम रागात त्याच्या मुस्काटात मारत त्याला उत्तर दिलं

ता सगळेच 2पावलं माग सरकले .... आज भाई च राग सातव्या आस्मानात पोहचला होता...

प..पण... लुडकली मान

काही बोलायला तोंड उघडलेल्या कलेक्टरच्या घशात दोन बोट भाईन खुपसली आणि पुढचे शब्द बाहेर पडायच्या आधीच त्यानं शेवट चा स्वास घेतला

चला ..... निघा इकडून सगळं साफ करून निघा... एक ही खून भेटली नाही पाहिजे... भाईन आपल्या हातातले गोल्ज काढत सगळ्यानाच बाहेर जायची सूचना केली...

तस सगळेच बाहेर निघून गेले साफ करायची तस पण गरज नव्हतीच सगळ्यांनीच आधीच हातात गोल्ज आणि बुटांना पेपर स्टिक लावलेला त्यामुळं त्यांचं कोणतंच निशाण तिथं नव्हतं...

कलेक्टर त्या खुर्चीत च गार झालेला...

आता मात्र कोणाला ही स्वास घ्यायची ही उसंत नव्हती कलेक्टरच्या बातमी वाऱ्यावर पसरायच्या आधी त्यांना त्यांचं काम करायच होत....

तिकडून निघून सगळे पुन्हा त्यांच्या कॉमन केबिन ला आले

सगळ्याच ट्रॅकर चिप च लोकेशन चेक केलं....

चला निघा .... शुभ रात्री.... भाईन सगळ्यांना जायला सांगून तीही निघाली

आज मन पुन्हा अशांत होत आणि का होऊ नये

इतक्या मोठ्या पदावरचे लोक जर जनतेवर अन्याय करत असतील तर सामान्य न्याय मागणार कोणाकडे...

अश्याच एका अन्यायन तिला ह्या मार्गावर उतरायला भाग जे पाडलं होत...

खरचं भूतकाळ किती छोटा शब्द पण आशय आणि वेदना खूप होती त्यात

आपलं सर्वच गमावून जगण्याचा निर्णय घेणाऱ्या तिला भूतकाळ हाच एकमेव कारण होत जगण्याच...

सूडान पेटलेली स्त्री सगळ्यांवरच भारी पडते आणि जवा त्या स्त्रीच शस्त्र बनत तेव्हा ते सगळ्याच दुष्ट प्रवृत्तीवर भारी पडत...

आई.. वडील... बहीण.. भाऊ सगळेच गमावले होते तिनं एका हल्ल्यात आणि तिची चूक काय होती की तिनं एका अपंग मुलीला मदत केली...

इतक्या चुकीची इतकी मोठी शिक्षा मिळायचं मेन कारण भ्रष्टाचारी कर्मचारी...

म्हणूनच तर तेव्हा जे ठरवलं ते पूर्ण करण्यासाठी एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात गण घेऊन उभी टाकलेली ती आता भाई ह्या नावापर्यंत पोहचली होती....

आपल्याच विचारात गाडी चालवत असताना डोळ्यात जमा झालेल्या पाण्यामुळे पुढचं सगळंच धुरसर दिसायला लागलं..

काहि कळायच्या आत गाडी स्लिप झाली खाली भाई आणि वर गाडी.. अस घसरत फूट भर अंतर तर पार पडलंच...

डाव्या पूर्ण अंगाला चांगलंच खरचटलं होत... सुदैवाने गाडी ठीकठाक होती... उठून गाडी उभी केली .... लोकेशन चेक केलं तर श्री च तिच्या पासून जवळ अंतरावर होता... तिने लगेच त्याला कॉल केला

हॅलो...

.......

हा.. मी लोकेशन टाकते..लगेच मला पीक कर

.....

नाही काही प्रॉब्लेम नाही.. बस्स लवकर ये...

इतकं बोलून फोन ठेवला आणि गाडीच्या सीटवर बसली..

पाच मिनिटात श्री पोहोचला....

तिला बघून शॉक च झाला...

का नाही होणार

तिची हालत तशी झाली होती.... पूर्ण कपडे धुळीने माखले होते.... डाव्या हाताला आणि पायाला चांगलंच खरचटलं होतं ....शर्टावर रक्ताचे डाग दिसत होते... फरपटत गेल्यामुळे शर्ट पण फाटला होता...

तिला बघून श्री चांगलाच पॅनिक झाला...

त्यांनी पटकन आपले जॅकेट काढून तिच्या हातात दिले.....

बाईक च्या डिकी मधून पाण्याची बॉटल आणून तिला दिली ....

थोडा पाणी पिल्यानंतर जरासं बरं वाटलं ....

कपडे वगैरे झटकून त्याने तिला विचारलं आता

ठीक वाटते ....

...हो

गुड.... चला बसा मागे जाऊ घरी.. आणि आता तरी माझ्याच घरी जातोय आपण... आणि मिस पुरोहित तुम्हाला आजचा पूर्ण दिवस माझ्या सोबतच घालवावा लागेल... ते पण घरातच....

त्याला कोणतंही उत्तर न देता ती गुपचूप त्याच्या गाडीवर बसली आणि की रिमोट ने आपली गाडी त्याच्या गाडीच्या मागे घेतली....

पुढच्या 5 मिनिटात ते श्रीच्या शहरा बाहेर असलेल्या छोट्या वन रूम किचन घरात होते....

छोटं असलं तरी खूप छान सजवलं होत घर श्री न अगदी रसिक माणसाला भुरळ पडेल अस.....

आणि नाव ही साजेस च स्वप्नवत घरावर मेटल मधली अक्षर पहाटेच्या संधी प्रकश्यात खूप सुंदर दिसत होती...

पहाटेच्या धुक्यानी गेटवर सोडलेला गणेशवेल चिंब भिजून गेलता.... गेटच्या आत असलेल्या नुकत्याच उमललेल्या गुलाब आणि गुलछडीच्या फुलांवर दव बिंदू मोत्यां सारखे चकाकत होते... पायाखाली असणार लॉन पावला गणीच छोटी कुरकुर सूनवत होत.... हवेतील गारवा आणि वेगवेगळ्या फुलांचा एकत्रित सुगधं .... मनात असलेली सगळी मरगळ मिटवून टाकत होता... मध्येच चिमण्यांचा प्रसन्न चिवचिवाट .... सजीवतेची जाणीव करून देत होता... कळणार ही नाही अश्या अनेक पक्ष्यांची हाक कानी येऊन कान आणि मन दोन्हीही सुखांनी भरून टाकत होते...

गेट मध्येच थांबून हे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवताना भाईला जाणवून गेलं

किती दिस झाले... आपण जगत च नाहीये... बस्स मशीन करून घेतलीय स्वतः ची.... खरचं जगणं म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी अस एक ठिकाण नक्कीच असावं माणसाकडे...

तिची विचारशृंखला तुटली ती श्री च्या बोलण्याने

मिस पुरोहित .... चला...आज तरी असच या...पण पुढच्या वेळी तुमच्या स्वागताची पूर्ण तयारी झालेली असेल...

तिच्याकडं बघत थोडं गोड हसतच श्री म्हणला...

तस त्याच्याकडं वैतागून बघत भाईन नकारार्थी मान हलवली आणि घरात गेली....

घरात आल्यावर तर अजूनच आश्चर्यचकित झाली... साधेपणाचा उत्तम नमुना होता तिथं....

हॉल अटॅच किचन आणि बाजूला बाथरूम आणि एक बेडरूम.... हॉल किचन आणि बाथरूम बघितलं तर एकत्र च होत पन तस वाटत नव्हतं इतकी सुंदर रचना केलेली घराची

नकळत तिच्या तोंडून निघून गेल

परफेक्ट....

नेमकं ते मागून आलेल्या श्री न ऐकलं

धन्यवाद... नशीब... तुम्हाला फक्त बाग नाही तर घर ही आवडल..... बसा मी आलोच....

म्हणून तो बेडरूममध्ये गेला...

घराच मनापासून निरीक्षण करत भाई सोफ्यावर बसली...

रूम मधून कपडे घेऊन श्री लगेच बाथरूम मध्ये गेला...

अंघोळ उरकून .... आल्यावर बघितलं तर

सोफ्यावर बसल्या बसल्याच तिला झोप लागली होती..

तीलट्स अवघडून झोपलेलं बघून श्री लगेच आवरून आला आणि तिच्या जवळ येऊन तिला उठवावा की नको ह्याचा विचार करत थांबला

पण त्याच्या जवळ येण्याने ... तिची झोप चाळवली गेली पर्फ्युम चा मंद सुगंध आल्याने तिनं लगेच डोळे उघडून त्याच्याकडं बघितलं...

हा मात्र अजून ही एक बोट हनुवटी वर ठेवून डोळे मिटून विचार करत होता उठवू की नको..


अहं.... हेय.....  त्याला अस जवळ उभा बघून आपण उठलोय हे कळावं म्हणून हळूच आवाज दिला

तस श्री न तिच्याकडं बघितलं...

आज पहिल्यांदा तो तिला इतकं जवळून बघत होता... गोल चेहरा.. खोल गहिरे डोळे.. कॉपी सारखे ओठ...आणि इतुस नाक... किती नाजूक आहे हीचा चेहरा... आणि हे भुरभुरणारे कुरळे काळे दाट केस... रंगाने सावली आली तरी रेखीव होती.... डोळ्यात असलेली एक प्रकारची आग ... ती शांत असून ही धगधग असताना दिसते... असच वाटत होतं त्याला... मन लावून तो तिच्या चेहऱ्याच निरीक्षण करत होता... धगधगणारे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होता... पण असफल ....

त्याच अस आपल्या डोळ्यात एकटक बघणं बघून ही गोधळून गेलती .... आधीच हात आणि पाय भयानक दुखत होता.... आल्या पासून त्याच अवस्थेत होती....

त्याच बघणं इग्नोर करून ... तिनं त्याची समाधी भंग केली....

अ...तुझं माझे डोळे बघून झाले असतील तर मला सांग मी फ्रेश होऊ इच्छिते....

तिच्या अस बोलण्याने लगेच भानावर येऊन तो बाजूला झाला

ओहह प्लिज... जा ना... रूम मध्ये कपाटात माझ्या आईचे काही कपडे आहेत बघ तू त्यातलं काही नक्कीच घालू शकतेस... हे आमचं जून घर आहे... आईच्या खूप आठवणी आहेत इथं... जा .. तू जाऊन फ्रेश हो... मी नाष्ट्याच बघतो .... काही तरी बनवतो.... अस म्हणून तो पटकन किचन ओट्याकड पळाला....

काय होणारे राव माझं.... हिला कितीही बघा परिणाम शून्य... आणि एक ही आहे जे मला तिच्या मनात शिरायला थोडी जागा ही देत नाहीये.... हे आबास प्रकरण जोपर्यंत संपत नाही... तोपर्यंत मी गप्पच बसतो... एकदा का हे संपलं की मग... आपला लव्हगुरू आहेच की त्याला बोलवून घेतो ... हम्म हेच योग्य होईल... बी रेडी मिस पुरोहित... आता तुम्हाला ह्या श्रीची होण्यापासून ... तुम्ही स्वतः ही रोखू शकणार नाही... पण त्या आधी मला त्या हरू ला सांगावं लागेल ना की लव्ह बाबा आमचा मोठा प्रॉब्लेम आहे करून... हम्म... चला आताच त्याला कॉल करतो ... मग बघू बाकीच... येस...

Calling......... hरu the ruh.....

उचल उचल... उचल लेका.... कुठं कोलमडले साहेब काय माहीत... साला टाईमवर फोन उचलला तर शपथ जाऊदे उद्या जाऊन भेटूनच बोलतो...... काहीस कटकट तच श्री न मोबाईल सोफ्यावर फेकला आणि पुन्हा किचन मध्ये येऊन कामाला लागला.....

इकडं रूममध्ये भाई......

आयला घालू काय....इथं तर फक्त साड्याच आहेत.

हम्म ह्याच्या कबड मध्ये बघूत काहीतरी भेटलच की...नाही भेटलं तर लास्ट ऑप्शन आहेच साडी चा....

त्याच्या कब्ड मधून एक आकाशी टीशर्ट आणि काळी ट्राउजर घेतली...बघितली तर नवी च होती बस्स थोडी मोठी होईल अशी होती....

चला साडी पेक्ष्या तरी बेटर आहे... हा विचार करून भाईन बाथरूम गाठलं.. फ्रेश होऊन आली ...

इकडं श्री न नाश्त्याला उपमा बनवला होता... तिला बाहेर आलेले बघून डायरेक्ट डायनिंग टेबलवर बोलवलं

या... मिस पुरोहित... आपण नाष्टा करून घेऊ....

तस गपचूप येऊन दोघांनी ही नाष्टा केला. ....

नंतर निवांत किचन मधील आवरून श्री येऊन तिच्या समोर खुर्चीवर बसला...

बघितलं तर ती तशीच सोफ्यावर झोपून गेलेली....

तिला अवघडून झोपलेलं बघून त्यानं अलगद तिला उचललं आणि बेडवर नेऊन झोपवलं.....

छान 5 पर्यंत झोप खाऊन उठल्यावर तिनं श्रीला आवाज दिला....

ओ IPS साहेब...

हा...बोला मिस पुरोहित...झाली का झोप... श्री न आत येत विचारलं....

हो...धन्यवाद... पण आता मला जायचं आहे...

नाही तुम्ही 10वाजेपर्यंत कुठंही जाऊ शकत नाहीत इथून...

अरे...पण.... का.... थोडस वैतागत तीन विचारलं....

कारण.... तिच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत श्री न हलकेच स्माईल केली .... तो तर डोळ्यातून सांगत होता मला तुझ्या सोबत वेळ घालवायचा आहे...

कारण काय...सांगा IPS साहेब...

कळून पण नकळल्याच ऍक्ट केला तिनं...

तुमच्या जखमा .... मिस पुरोहित...त्याला ही माहीत होतं ती विचारणार म्हणून .... त्यानं लगेच उत्तर दिलं...

त्या ठीक आहेत.... तस पण मला नुसतं बसून कंटाळा आलाय...

ओके मग मला एका प्रश्नच उत्तर द्या...

विचारा...

पूर्ण कब्ड मध्ये तुम्हाला फक्त हाच रंग भेटला का तुम्ही कधीच दुसरा कोणताच रंग वापरत नाहीत का मिस पुरोहित.....

ओहह .... तुमचा हा आवडता होता का??...

नाही...नाही.... तस काहीही नाही... पण तुम्ही दुसरा कोणता रंग घातलेला मी पाहिलंच नाही म्हणून विचारलं बस्स...

अस... काही नाही... आवडतात मला दुसरे पण रंग पण हा माझा सगळ्यात जास्त आवडता आहे म्हणून बस्स....

ओके....मिस पुरोहित...तुमचं प्रेमाविषयी काय मत आहे... म्हणजे प्रेम चांगलं की वाईट....

चेहऱ्यावर सुंदर स्माईल आणत तिनं त्यावरच आपलं मत सांगायला सुरुवात केली

प्रेम.... ना ही चांगलं...आणि ना ही वाईट... प्रेम तर फक्त प्रेम असत.... ती फक्त एक निस्वार्थ भावना आहे जी जगायची असते... अनुभवायची असते....ती ना कोणावर लादता येते..... नाही कोणा कडून हिसकावून घेता येते... बस्स फक्त जगता येते.. तुम्हाला काय वाटत काय असावे प्रेम.....

श्या...मी काय सांगू नाही शकत....

का.....

कारण माझ्यासाठी.....प्रेम म्हणजे फक्त तुम्ही आहेत.... बाकी काहीही नाही....

असो... मला फ्रेश व्हायचंय... विषय टाळून ती निघून तर गेली...

पण श्री मात्र खुश होता ... की कमीतकमी तिला मी सांगू तरी शकलो की माझं तुझ्यावर प्रेम आहे...

----------------------------------------------------------

कुठेतरी त्याच शहरात

फिरोज सर...

हा...बोल...

सर....आपला एक मोहरा गेला....

कोण....

कलेक्टर ..... बॉस...

शॉक होऊन हे झालंच कस ह्याची कसून चौकशी करण्याचे आदेध देऊन फिरोज त्याच्या रंगरलीयेत मग्न झाला....

स्विमिंग टॅंक मध्ये पाच सहा नवयुवती मध्ये फिरोज रंगेल दिवस साजरा करत होता....

सगळ्यांना तिथून निघून जाण्याचा आदेश दिला... तस सगळ्यांच्या लक्ष्यात आलं... आता फिरोज उद्याच आपल्याला भेटलं... टॉप चे बिझनेस मॅन... त्याच्या एका भेटी साठी तिष्ठत होते...

होता कोण हा फिरोज.... कधी काळी मुंबईच्या धारावीत जन्मलेला ....आणि गुन्हेगारीच्या कुशीत वाढलेला एकके काळीचा नामचेन सुपारी किल्लर ..... फारूक आता इंटरनॅशनल डॉन फिरोज म्हणून पुन्हा एकदा मुंबई उध्वस्त करायला आलता.....

पण ह्यावेळेस .... फक्त एक मस्तावेल मुलगी आपल्याला नडतेय हे सहन न होऊन तिला आपल्या बेडवर कुस्करायच्या इर्षेन आलेल्या फिरोज ला हे ही कळत नव्हतं की त्याच्या गळ्यात आता मृत्यू चा फास बसला आहे ....

------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे आपल्या आपल्या पोजिशन वर तैनात झाले जो तो आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडत होता...

श्री न पुन्हा एक दिवसाच्या रजेनंतर ड्युटी जॉईन केली होती....

भाईन आपला गेटअप चेंज करून अंडरग्राऊंड झाली... कारण तिला ही आता कळलं होतं..... फिरोज च इथं पर्यंत येण्याचं कारण फक्त आपण आहोत......

दुसरीकडे पूर्ण टीम फिरोजला त्याच्या सगळ्या माणसा सहित नेस्तनाबूत करायच्या तयारी लागली होती....

टाईम टॅली आणि स्टार न मिळून जिथं जिथं फिरोज ची माणसं आहेत तिथं तिथं आपल्या कमांडोजला त्यांच्या गॅंग मध्ये सामील व्हयचा आदेश दिलेला...

पूर्ण फिरोज भोवती फक्त भाईचीच माणसं असली पाहिजेत ह्या गोष्टीवर भर देत त्याची माणसं फिरवत आपल्या बाजूला मजबूत करायचं काम चालू होतं.... तर वर्तमान आणि रोशनीन मिळून कडक बातम्यांनी पूर्ण टीव्ही स्क्रीन च लक्ष कलेक्टर सीन वर खिळवून ठेवलं होतं....

आणि ब्लॅक टायगर पुन्हा एकदा मैदानात स्वतः उतरायची तयारी केली....


भाई न सगळ्यांना एकत्रित बोलवलं....

नेहमी प्रमाणे ह्यावेळेस पण जागा नवीन च होती.....

10मिनिट मध्ये सगळे जमा झाले....

सगळे आले तस भाई न बोलायला सुरुवात केली....

बस्स ....पुढच्या 10 तारखेला तो फारूक उर्फ फिरोज ह्याच मुंबईत शेवटचा श्वास घेईल.... टीम तुम्हाला माहिती तुमची काम काय आहेत ते... मी आज शेवटचं भेटतेय...ह्यानंतर आपण डायरेक्ट 11 तारखेलाच भेटुत... कोणतीही अडचण असली तर ती तुम्ही तुमच्या लेव्हल वर सोडवा... एकमेकांना अजिबात भेटू ही नका.... आणि ओळख पण नका दाखवू .....इथून पुढे 10 दिवस प्रत्येकजण स्वतः कमांडर असेल...आणि तुम्ही स्वतःच टीम पण असाल.... आता दाखवुनच देऊत की one man armmy कश्यासी खातात ते.... जे हवं ते सगळं बॅकअप सहित तयार ठेवा ... कोणत्याही परिस्थितीत मला आता फक्त शेवट हवाय....फिरोज नावाचा... अजून एक समोर मी जरी असले तरी बिनधास्त आपलं कर्तव्य पूर्ण करा... तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही काय करणार आहात ते... पण मी काय करणार आहे ते तुम्हाला कोणाला नाही माहीत... म्हणून सांगतेय ..... गरज पडली तर शूट at that टाईम नो मॅटर की समोर कोण आहे.... कळलं....

येस.. बॉस... सगळ्यांनी च कडक सॅल्युट ठोकून तिथून निघून गेले....

रूल होता .... की निरोप असाच हवा... हे त्याक्षणी कोणीही ठरवू नाही शकलं... पण आता मात्र वेगवेगळ्या स्थितीत सगळ्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न साकार होत होत.... ध्येय वेडे होते ते....

----------------------------------------------------------------

इकडं फिरोज न भाईची हिस्ट्री काढायला नवा मोहरा गाठला होता....

दुर्दैव म्हणावं की लाचारी ..... जेव्हा आपलेच माती खातात तेव्हा .... सावरण खरचं कठीण असत .…

पुन्हा एकदा ... आपलेच होते जे पाठीत खंजिर खुपसायला तयार होते.....

नामचेन बिझनेस मॅन... आणि पुरोहित कंपनीचा सर्वेसर्वा असलेला... निकम खाल्लेल्या मिठाला जगायचं सोडून फेकलेल्या तुकड्या साठी लाळ घोटत गेला ..... त्यानं फिरोज च्या तुकड्यासाठी इमान विकायचीही तयारी ठेवली....

भाई ची सगळी माहिती देण्याचा आश्वासन दिलं....

तस फिरोज निश्चित झाला... कसाही असला तरी दुखती नस आणि लागलेली कीड ओळखण्यात नक्कीच फिरोज नजरबाज होता .... त्याला आता फक्त भाईच्या भूतकाळातून तिच्या दुखत्या नसा शोधायच्या होत्या... आजपर्यंत आपल्याला कोणी अस नडलं च नाही....

आणि आज जी नडतेय ती एक स्त्री आहे ही भावनाच फिरोजला सहन होत नव्हती ....... त्याच्या लेखी स्त्रीने फक्त त्याच उभोग्य वस्तू म्हणून जीवन कंठाव.... आजपर्यंत ज्या स्त्रीवर त्यानं बोट ठेवले ती त्याच्या बेडवर पोहचली च होती म्हणून तर आता त्याला भाई च्या पर्वाचा अंत करायचा होता..... सगळ्या अंडरवर्ल्ड ला ह्याच गोष्टीच आश्चर्य वाटत होतं की .... छोट्या गोष्टी साठी स्वतः फिरोज भारतात आलाच कसा.... पण जी नजर फिरोज कड होती ती बाकीच्याकडे नक्कीच नव्हती ..... म्हणून तर जखमेच नाशूर व्हायच्या आधी तिचा इलाज करायला फिरोज आलता.... पण त्याच्या दुर्दैवाने.... आणि फितूर माणसांनी.... त्याची जखम चिघळून तीच नाशूर होऊन गेल्यावर त्याला भाई ची खबर लागली होती.... अजून ही फिरोज सत्यापासून कोसो दूर होता.... त्याला तर हे ही नव्हतं माहीत की आपण जे समजतोय तस आता काहीच राहिलेलं नाहीये.... आणि त्याच्या ह्याच गाफील पणाचा फायदा भाईला घ्यायचा होता.... फिरोज कितीही रंगेल असला तरी त्यानं लक्ष घातल्यावर त्याला दोनच दिवसात कळेल की तो हित आले ला नाही तर त्याला यायला भाग पाडलंय.... आणि तेच फिरोज च्या लक्ष्यात येऊन न देण्यासाठी भाईन एक हसीन चाल खेळली होती....

फिरोज काय एकटाच नव्हता ..... पण आता त्याचा मुकाबला त्याला माहित नव्हतं नेमकं कोणा सोबत आहे ते... त्यानं मुंबईत ऐकटच येऊन सगळ्यात मोठी चूक केली होती.... ज्या फिरोजची कोणतीच माहिती कोणाला ही नव्हती त्या फिरोज चा भूगोल भाईन शोधून काढला होता.... आणि ह्यातच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी भाईच्या हाताला लागली होती.... जी चाल फिरोज भाई साठी टाकायला सज्ज झालता... त्या चालीची सुरुवातच भाईन रोखून धरली होती... बाईल येडा फिरोज.... त्याच्या ह्याच वेडात त्याच सगळ्यात मोठा नुकसान करून घेणार होता... किंवा ते करायला त्याला भाग पडायला आता भाई सज्ज झाली होती....फिरोज ची दुखती नस म्हणजे त्याला नकारणारी स्त्री होती... जी फिरोज ला नाही म्हणेल तिला हर हालत मध्ये मिळवायला फिरोज पेटून उठत होता.... आणि त्याच्या ह्याच वेडेपणाचा फायदा करून घेण्यासाठी आता भाई सज्ज होती......

फिरोज जरा निर्धास्त झालता .... येत्या दोन दिवसात त्याला भाईची कुंडली जे भेटणार होती.....

पण एकदा का भाईची कुंडली हातात पडली की मग मात्र फिरोज ला रोखणे मुश्कील होत....

---------------------------------------------------------------

निकम...…....

जसा फिरोज कडून आला तसा अस्वस्थ होता..... राहून राहून त्याला आपला कोणीतरी पाठलाग करतोय हे जाणवत होतं....

तरीही काही झालं च नाही ह्या अविर्भावात त्यानं त्याची केबिन गाठली....

येऊन धपक्कन स्वतः ला खुर्चीत लोटून त्यानं पाण्याचा ग्लास घटघट रिकामा केला....

काय हे निकम... तुम्ही जर इतकं घाबरलात तर आपल्या सगळ्या च चाली उलट्या पडतील....

अचानक आलेल्या आवाजानं निकम ताडकन खुर्चीतून उठुनच उभा राहिला...

भ भ भाई.... अहो.... तू तू तू तुम्ही.... इथं क .…क .. काय करताय.... जॅम घाबरून निकम ची त त प प च चालू झाली.....

तस त्याच्या केबिन मध्ये सोफ्यावर बसलेली भाई रिलॅक्स होऊन म्हणली

शांत...... निकम ..... रिलॅक्स..... असही हे माझंच ऑफिस आहे.... आता मी इथं पण तुम्हाला विचारून यायचं का....

त त त तस नाही काही भाई.... पण मला सतत अस वाटतय की कोणी तरी माझा पाठलाग करतंय.... आणि अजून आपलं काम पूर्ण झालं नाही अश्यात मी सापडणं.... तुमच्या साठी खूप धोखा दायक आहे...... थोडं स्वतःला नॉर्मल करत निकम पुन्हा खुर्चीत बसत भाईला म्हणाला....

तुमचा पाठलाग.... नाही हो ..... तो तर तुमचा बॉडीगार्ड आहे निकम.... तुमच्या सुरक्षे साठी.....

तस निकम पुन्हा नाराज झाला.... श्या काय हे भाई.... कितीवेळा सांगू की मला बॉडीगार्ड नकोय भाई....मी स्वतः च रक्षण कोणत्याही परिस्थितीत नक्कीच करेल भाई.... मी वचन दिलंय तुम्हाला....

हो.... निकम .... पण तुम्हाला गमवन मला तरी नाही परवडणार.... म्हणून तुम्हाला आवडू नाय तर न आवडू ते तुमच्या नेहमी सोबत असतील......

ठीक आहे ..... आता मी काय सांगू त्याला......

हम्म.... तुम्हाला ही माहिती आहे निकम तुम्हाला फिरोजला कोणती माहिती द्यायची आहे ते.....

हो भाई...... ते काम होऊन जाईल....

पण ह्यावेळेस त्याच्याकडं तुम्ही नाही जायचं.... मी पाठवेल एका मुलीला.... तीच फिरोज कडे पोहचली पायजे...कळलं....

जी.... नक्कीच....

आता तुम्ही फिरोज च्या समोर कधीच जायचं नाही निकम... शक्य तितक आणि शक्य तस त्याला टाळा....

जी भाई... नक्कीच मी त्याला टाळायला सज्ज आहे....

गुड... चला.... आता तुमची आणि माझी भेट 11व्या दिवशीच होईल..... तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते चांगलंच माहिती,.....

हो भाई.....

अजून एक.... आपल्या ह्या प्लॅन विषयी कोणालाच भणक नाही लागली पाहिजे..... सोफ्यावरून उठत भाईन निकमला समज दिली....

नाही कळणार भाई.... गुड लक.., भाई..... निकम भाईला सोडायला केबिनच्या दारात आला..….

-------------------------------------------------------------------

आता धगधगणार होत एक अग्निकुंड ...... देशाच्या नराधमाच्या आहुत्या घेण्यासाठी..... रणांगण पेटणार होत.... काळ्या साम्राज्या विरुद्ध देश भक्तीच..... प्रत्येकजण आपल्या आपल्या आघाड्या सांभाळण्यासाठी सज्ज होता.... आपली अस्त्र आणि बुद्धी च्या जोरावर पुन्हा एकदा मुंबा देवीला रुधिरा अभिषेक करायला.... सप्त तारे सज्ज झाले होते... सामान्यांच्या जीवनात इंद्रधनूचे सप्त रंग उधळण्यासाठी.... काळ रात्रीच्या वाघिणीच्या सोबतीने युद्ध मैदानात उतरत होते ... जगाला ही माहीत नसलेले सप्त सितारे... करायला खांडोळी वाईटाची....उतरले होते मुंबईच्या करुक्षेत्रात

----------------------------------------------------------------

फारूक उर्फ फिरोज

आपल्या असलेल्या विश्वासू लोकांच्या गराड्यात ..... मुंबईच्या त्याच्या अभेद असलेल्या धारावीत होता....

त्याला बाहेर काढणे शक्य नव्हतं.... म्हणून आता धारावीत शिरून त्याची खांडोळी करायचं शिवधनुष्य उचललं होत ब्लॅक टायगरने...

वाघीण आता शिकारीला निघाली होती ती ही एकटी

अख्ख्या धारावीची रेघ ना रेघ असलेला नकाशाचा अभ्यास गेल्या 2वर्ष्यात रात्री अपरात्री कितीतरी वेळा वाऱ्याच्या वेगाने एकटीनेच केला होता... आता त्याच्याच उपयोग करून घ्यायची वेळ आली होती .......

पेरलेले मोहरे ..... विखुरलेले खबरी.... आणि पेटलेल्या कित्येक चिता.... डोळ्यात असलेली विखाऱ्याची आग ..... आणि उरात असलेली चीड आणि देशाभिमान..... ह्याच असीम शक्तीच्या जोरावर ..... फिरोज ला नामोहरम करायला सज्ज झालेली ब्लॅक टायगर.....

नियोजना नुसार .... 9 दिवसात तिला तिच्या वाटणीला आलेले फिरोज चे कडवे धुरंधर साफ करून 10व्या दिवशी फिरोजची गेम करायची होती.....

आज पहिला दिवस पहिला मोहरा....

फिरोज चा दलाल..…. इसुफ..... नावाला च इसुफ बाकी काम मात्र सगळेच गैर ..... उत्कृष्ट बॉक्सर.... ह्याला मारायला बस्स दोन क्षण काफी होते टायगर साठी... पण तिला त्याला फक्त फ्री फायटिंगच्या मैदानात आणून सोडायच होत.... बाकी पुढचं काम उरकण्याची जबाबदारी.... टॅली वर होती.... टॅली भाऊ पण बॉक्सिंग लव्हर ना.... मग काय मज्जा येणार आज ह्यांचा सामना बघायला....

ठरल्या प्रमाणे इसुफ च्या अड्ड्यावर जाऊन टायगर न त्याला ओपन चॅलेंज केलं.....

टायगर.... फुल्ल ऑन हॉट मूड....

हेय.... इसुफ..... तिच्या त्या नाजूक पण रुबाबदार आवाजानं.... आपल्या कामात धुत असलेल्या इसुफ न तिच्याकडं बघितलं आणि बस्स बघतच राहिला.... आखे फटी की फटी रहेगी भाई इसकी ..... का म्हणून काय .....

टायगरचा किल्लर लुक तिथं असलेल्या प्रत्येक पुरुषाला वेड करायला काफी होता ..... आणि अशा लुक ला इसुफ सारखा लांडगा नाही भुलला म्हणजे शक्यच नाही....

फिटेड जीन्स.... शॉर्ट टॉप.... मोकळे केस... फुल्ल गडद मेकअप... लालचुटुक लिप्स... काजलने भरलेले बेधुंद करणारे नशिले डोळे.... गळ्यात फिट चैन.... हातात ब्रँडेड घड्याळ.... पायात हायहिल्स.... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे डोळ्यात असलेला जबरदस्त टेरर रुबाब.... परफेक्ट DM *(दुष्मन मटेरियल। हा माझ्या शब्द कोशातला प्रिय शब्द)

इसुफ तिला बघूनच क्लिन बोल्ड....

पटकन उठून तिच्या समोर येऊन थांबला....

आणि अदबीने विचारले......

बोलो....

फाईट करेगा क्या.... आपल्या बिनधास्त आवाजात तीन विचारलं....

मुझे क्या मिलेगा....

पैसा.... बारीश कर दुंगी.....

नहीं... मुझे कुछ.... और चाहीये.... तिच्याकडं खालून वर पर्यंत बघत त्यानं सांगितलं....

बोल.... क्या मांगता.... आता कुठं पंछी पिंजरे मैं आ रहा है....

तू.....

चल ... मंजूर.... जगा .... टाईम तेरा..... बस्स .. खिलाडी मेरा होगा.... बोल है मंजूर....

मंजूर.... त्यानेही लगेच मंजूर केला सौदा.... आपल्याच मौत च....

बोल फिर... कब...कहा...

आज श्याम 8बजे.... मेरे शटर मैं आजना.... हा लेकींन सोच के आणा.... आओगी तुम अपनी मर्जीसे लेकीन जाओ गी मेरे मर्जी से ही .......

देख ते है.... किस की मर्जी चलती है... तयार रहे ना.... नहीं तो भाग जाओ गे....

जाता जाता पण त्याला उसकवायला विसरली नाही ती .... तिथून लगेच बाहेर येत तीन टीमला जागा आणि टाईम मॅसेज केला.... आणि पुन्हा धारावीत गायब झाली....

धारावी.....

इथं जस वाईट होत तस चांगलं ही होतच की.... म्हणून तर इथले कित्येक.... छोटे उस्ताद.... तिचे मोठे खबरी होते.... 5वर्षाचा पोर भी अफलातून काम करत होता....

तिन दाखवलेली आपुलकी माया ..... ह्या बदल्यात तिला आज करोडोंच काळीज देणारे चिल्लेपिल्ले भेटले होते....

--------------------------------------------------------------------

इकडं तिचा मॅसेज मोबाईलवर आलेला बघून प्रत्येकजण आपापल्या कामगिरीला निघाला.....

भाईला जसा मॅसेज भेटला तस भाईन आपला गेटअप चेंज करून....... मस्त लाल चुटुक फरारीची ड्रायव्हिंग सीट पकडली ..... साईड मिरर ऍडजस्ट केला..... आणि झुप करून निघाली आपल्या टार्गेट कडे.....


-----------------------------------------------------------------

श्री न आपलं स्टेशन मधील काम आटपून हाफ डे सुट्टी टाकली..... आणि शहराच्या बाहेर स्वप्नवत मध्ये निघून गेला....

******

वर्तमान नी गुपचूप निनावी बातमी मीडिया मध्ये पसरवली होणाऱ्या फाईट ची......

****

रोशनी.. गण्या.... आणि टाईम नि टॅली ला पूर्ण रेडी केलं फाईट साठी..... टाईम आणि ब्लॅक टायगर दोघांनी आपला गेटअप चेंज केला आणि टॅली सोबत जायला रेडी झाले....

त्यांची तयारी झाली तस रोशनी हॉस्पिटल ला आणि गण्या त्याच्या उद्याच्या टार्गेट कडे निघून गेले......

------------------------------------------------------------------

टाईमवर तिघे ही फाईट च्या जागी पोहचले....

रिंग मध्ये इसुफ माजलेल्या सांडा सारखा गुरगुरत होता....

वेळ घालवण्यात अर्थ ही नव्हता....

आपला शर्ट काढून.... हॅन्ड ग्लोव्हज घालून तयारी करून टॅली पण उतरला रिंग मध्ये....

फाईट चालू होण्या आधी दोघे ही प्रतिस्पर्धी एकमेकांना तोलून बघत त्या रिंग मध्ये गोल गोल फिरत होते....

रेफरी ने येऊन दोघांना ही नियम सांगितला...

नियम एकच

जो जीवन्त असेल तो ह्या लॉकप बाहेर येईल......

दोघांनी ही शर्त मंजूर केली...

लॉकप लावून रेफरी बाहेर गेला... दोघांच्या अनुमतीने फाईटची बेल वाजली....

आणि दोन बेधडक शक्ती एकमेकांना टक्करल्या...

किक आणि पंचेस चा सटासट मारा चालू केला होता टॅली न...

त्याला ही कळलं होतं इसुफ ला हरवायच असेल तर वेगवान हालचाल आणि पहिलं आक्रमण हेच सगळ्यात मोठा शस्त्र आहे.....

वेगवान हालचाली आणि सतत च्या माराने टॅली न इसुफ ला चांगलं च ब्लॉक केलं होतं....

पण इसुफ पण कोणी कच्चा खिलाडी नव्हता... रिंग मध्ये मुरलेला आणि मोकाट सुटलेला सांड होता... बेकायदेशीर आणि बेमालूम फाईटचा बेताज बादशहा होता इसुफ...

सतत 1तास चालू असलेल्या मारामारीने दोघे ही थकले होते... घामाच्या धारात निथळत होते...

ब्रेक ची बेल वाजली तसे दोघे ही जाऊन छोट्या बाकड्यावर बसले .....

तस पटकण त्याच्या जवळ येऊन टायगर न त्याला गेम ओव्हर करायचा इशारा केला ....

आणि गेम स्टार्ट ची बेल होते न होते तोच आपल्या ग्लोव्हज च्या पट्टीत अडकवलेली ब्लेड काढून सपासप वार इसुफ च्या गळ्यावर करायला चालू केलं...

इसुफ चीच टेक्निक त्याच्याच विरोधात वापरून त्याचा काटा काढला होता....

गेम वर लागलेला पैशाची बॅग उचलून .... टॅली आणि टायगर तिकडून निघून गेले.....

इसुफ ची मान कायम साठीच लूडकवून.....

--------------------------------------–------------------

इकडं भाई सेम ऑन टाईम फिरोज च्या समोर एका नामचेन क्लब मध्ये रुबाबात बसून होती .....

लुक ऑफ हाईट्स..... दिसण्याची उंची किंवा एकदम कताई झेहर दिसत होती भाई.....

अंगाला चिपकुन नेसलेली फिकट स्काय ब्लु कलर ची शिफॉन ची साडी ..... फुल्ल सलीव्ह चा ब्लाउज..…. आयमेकअप ची तर बातच निराळी होती ..… ते सावळे मूर्तिमंत सौंदर्य ...… आणि डार्क कॉफी गत असलेले ओठ.... बघणारा पण वळून बघायचा मोह आवरुच शकणार नाही इतकं कॅल्सी लुक....

पूर्ण क्लब च्या नजरा फक्त attitude मध्ये बसलेल्या भाईवर खिळल्या होत्या... अगदी फिरोज ची सुद्धा....

त्याच क्लब च्या एका कोपऱ्यात मस्त गेटअप चेंज करून बसलेला श्री मात्र भाईचा हा लुक बघून पार पिघळून गेलता...

कितीही ठरवलं तरीही तो स्वतः वर आज कन्ट्रोल करूच नाही शकला....

आपल्या बुटाचा टक टक आवाज करत तिच्या समोर येऊन उभा राहत अदबीने विचारलं

मे आय डान्स विथ यु ..... मिस... ब्युटी....

आणि नकळत कमरेत झुकून तिच्या अजून जवळ आला...

इतकावेळ तिला दुरून बघणारा फिरोज आता मात्र खवळला....

का नाही रागावणार सेंटर ऑफ अटेन्शन राहायची सवय असलेल्या त्याला आल्या पासून भाईन एक नजर पण बघून घेतलं नव्हतं....तोच काय पण पूर्ण क्लब मध्ये एक ड्रिंक सोडली तर इतर कोणाला ही तिने बघितलंच नव्हतं...


.........

......

...

..

.

.

.

...

..

.

.

खल्लास

रूप बघून .....

काही सी अस्पष्ट अशी स्माईल देत भाईन त्याच डान्स च एनविटेशन स्वीकारलं

आता सगळे उतरले होते खाली फक्त हेच दोघे होते डान्स स्टेजवर ....

तस DJ विशिष्ट इशारा करून फिरोज ही उठला त्याच्या पार्टनरचा हात धरून आणि स्टेजवर येऊन आपल्यातली डांसिंग स्किल दाखवू लागला

न बोलताच एक जुगलबंदी चालू होती स्टेजवर

अर्धा तास .... एक तास..... झाला आणि अचानक भाईन श्री चा हात सोडून पुन्हा ड्रिंक टेबलावर येऊन आपली पर्स उचलली आणि कोणाकडे ही न बघता निघून गेली.... पण जाताना जाणून बुजून घाईत आपला मोबाईल विसरल्याची अकटिंग केली आणि नेमकं हेच फिरोज न बघितलं ...

त्याला तर वाटलं मोबाईल विसरला आहे म्हणून त्याने वेटर ला सांगून मोबाईल मागवून घेतला....

आणि तिथून निघून गेला....

त्याच्याकडं मोबाईल पोहचल्याची खात्री होताच श्री न आपल्या घड्याळातून ठराविक msg भाईला पाठवला आणि तो ही तिकडून सटकला

--------------------------------------------------------------

गण्यांन आपल्याला दिलेल्या टार्गेटला एकदमच उडवायचा बेत आखला ....

त्याला दिलेले 10 लोक हे कोणत्याही राजकीय किंवा लोकांच्या नजरेत येणारे नक्कीच नव्हते ....

सर्व सामान्य लोकांत राहणारे पण सगळ्यात खतरनाक लोकांना त्याला संपवायचं होत...

आपल्या वरची जबाबदारी लवकर आणि योग्य पध्दतीने संपवण्यासाठी गण्यांन एक टुरिस्ट कंपनीची मदत घेतली

आणि ह्या लोकांना गिफ्ट वाऊचर देण्यासाठी कंपनीच्या मालकाला गुंडाळून घेतलं....

गण्याच्या नशिबाने सगळे एकाच ठिकाणी काम करणारे होते त्यामुळे त्यांना बाहेर काढणे त्याला खूप सोपं गेलं....

फिरोज मुंबई मध्ये असताना त्यांना मुंबई बाहेर काढणे तस तर खूप रिक्सि होत पण बाई आणि बाटली कोणाला ही हरवू शकते हेच खरं....

लोणावळ्याच्या 2 दिवसाच्या बिझनेस ट्रिप च्या बहाण्याने पुरोहित कंपनीत लागलेली ही कीड बेमालूम पणे गण्यानं बाहेर काढली ..... कोणाला सहज ही संशय येणार नाही ह्याप्रमाणे....

दोन दिवसांची काम आवरून वापस येताना आपला ड्रायव्हर चेंज झाल्याचं ही ह्या लोकांना नशेच्या भरात कळलं देखील नाही ....

गाडी जशी घाटात आली तशी गण्यानं फुल्ल स्पीड मध्ये त्या गाडीचा कडेलोट तर केलाच पण आधीच त्यांच्या दारू सोबत विशाच काम करणारा चाकना पण त्यांच्या पोटात घातला होता....

आपली मोहीम संपवून गण्यानं सगळ्यांना

काम डन चा msg केला आणि पुन्हा मुंबई गाठली

--------------------------------------------------------------

रोशनीन आपल्या हातात असलेल्या इंजेक्शन कड एकदा पाहिलं .... आणि लगेच मुख्यमंत्री साहेबांच्या दंडात ते टोचल.....

थोड्यावेळाने त्यांना शुद्ध आल्यावर वेगवेगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगून डॉ रोशनी तिथून बाहेर पडल्या

जे. जे. हॉस्पिटलच्या मेन डॉ . कृष्णमूर्ती च्या कॉटेज मध्ये येऊन रोशनीन डॉ, ला होशवर आणलं... आणि तिथुन निघून पुन्हा गेटअप चेंज करून आपल्या सिटी हॉस्पिटलमध्ये आली तिला आलेलं बघून तिच्या जागी असलेल्या रेश्मान लगेच पेशन्टची कपडे घालून आपल्या जागेवर झोपून घेतलं..

आणि इडक जे.जे.मध्ये डॉ.कृष्णमूर्तीला अटक झाली मुख्यमंत्रीच्या हत्तेच्या आरोपा खाली...

Tv ची बॉम्बलास्टिंग खबर मुख्यमंत्री नहीं रहे .... मुख्यमंत्रीचा खूण......

रोशनीन राजकारण अस काही पेटवून दिलं होत की आता बाकीच्या बातम्या आणि बाकीचे खून ह्याच मथळ्याखाली गडप .....

--------------------------------------------------------------

टॅली आणि टायगर नि मिळून शिकार करायची जी ठरवली होती त्याची सुरुवात इसुफ ला मारून केलेलीच होती ......

पण त्यांची पुढची पायरी तितकीच महत्वाचे आणि कठीण होती ती म्हणजे गर्ल्स स्मगलिंग ची बेताज क्यूविन चांदणी ....

......चांदणी .....

हुस्न की मलिका बेहिसाहब सौंदर्यची खान नावाप्रमाणेच चांदणी होती चांदणी

पण नुसतं रूप नाही तर तिची बुद्धी पण तितकीच शार्प होती......

चांदणी सुरुवातीला एक बार बाला असणारी आता कुख्यात गर्ल्स समग्लर होती खूप दिवसापासून पोलीस हिला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचत होते .....

आणि आता ह्याच धूर्त चांदणीला पकडण्यासाठी पोलिसांना टीप देऊन चांदणीला अडकण्याचं काम टायगर आणि टॅली केलं होतं

टीप मिळाल्या मिळाल्या श्री आपल्या फोर्स सहित तिथं पोहचला गोळीबार आणि चकमकीत चांदणी पळून जायला लागली तस तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या टायगरने आपल्या गोळीन तिला उडवलं.... श्री ला कॉल केला आणि तिथून सगळ्याच टीमला साफ करायला सांगितलं

तस श्रीन डायरेक्ट एन्काऊंटरची ऑर्डर दिली आणि दिसेल त्या प्रत्येकला ठोकायला सुरुवात केली ....

चांदनीच संपूर्ण साम्राज्य अवघ्या तीन तासात धुरळा करून मेलेल्या लोकांना pm साठी पाठवायची सुरुवात करून दिली.....

कित्येक मुलीचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या चांदणीला ठार करून टीम तिकडून पुढच्या खेळी साठी निघाली...…

----------------------------------------------------------------

फिरोज ........

क्लब मधून आल्यापासून त्याच्या डोळ्यांपुढून ते मूर्तिमंत सावळ सौंदर्य काही हलत नव्हतं....

आपल्या हातात असलेला तिचा मोबाईल त्यानं चालू केला त्यात फक्त फॅमिलीचेच नंबर दिसत होते त्याला ... तितक्यात निकम काका या नावंने त्याची नजर ओढून घेतली... ते निकम च्या असलेल्या फोटो मुळे....

तस फिरोज न निकमच्या मोबाईलवर तिचा आज क्लब मध्ये काढलेला फोटो पाठवला आणि त्याखाली msg टाकला

** I want this girl at any cost**

सेंड करून फिरोज निकमच्या उत्तराची वाट बघत होता की तितक्यात त्याला tv वर हेडलाईन दिसली

माननीय मुखमंत्रांचा खून.…. की ह्रदय विकाराने झटका.....

ये हे कोई सजीश या, भगवान का केहर...

त्या हेडलाईन बघून फिरोज जागेवरून ताडकन उठुनच बसला...

त्याला आता कोणीतरी आपल्या गळ्याला फास लावला की काय अस वाटायला लागलं होतं... 


..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

Tv ची हेडलाईन बघून फिरोज खाडकन जागा झाला आणि आपल्या सगळ्या सूत्राला कामाला लावलं

मुख्यमंत्री म्हणजे त्याचा सगळ्यात मेन मोहरा होता ....

त्यांच्या खुनाचा आरोप जरी डॉक्टर वर आला असला तरी फिरोजला कळायला वेळ नाही लागला की ह्या मागे हाथ भाईचा आहे

फिरोजला स्वतःचाच राग येत होता ........ आपण इतकं कसे गाफील राहिलो....

सगळ्यांना तिथून बाहेर हकळवून फिरोज न एकट्यातच त्याची प्लॅनिंग करायला सुरुवात केली......

त्यानं पहिला कॉल पुरोहित कंपनीत कामाला असलेल्या त्याच्या माणसांना केला पण कोणाचच उत्तर नाही हे बघून त्याला कळून चुकलं की आता आपण पुरत फसलोय ह्याची जाणीव झाली....

त्यानं पहिल्यांदा मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि लगेच त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली...

ह्या सगळ्या गडबडीत त्यानं सगळ्यात मोठी चूक केली ती म्हणजे क्लब मधला मोबाईल चालूच ठेवला......

---------------------------------------------------------------------

क्लब मधून निघून भाईन घाईन रूम गाठली आणि सगळ्यांना इमर्जन्सी चा सिग्नल दिला ......

आणि चेंज करून आपल्या नेहमीच्या गेटअप मध्ये येऊन पटकन राज्यावर स्वार होऊन पडका वाडा गाठला.....

इकडं जसा msg भेटला तस सगळेच हातातील काम टाकून पडक्या वाड्याकडे निघाले....

सगळेच जमा झाल्यावर भाईन गण्याला आणि रोशनीला समोर उभा केला.....

भाईचा राग बघून सगळेच चुपचाप उभे होते .....

टायगर चा अजून पत्ता नव्हता आणि ती आल्या शिवाय बोलणं चालू होणार नाही हे सगळ्यांना समजलं होत .....

सगळे गप्प बसून टायगर ची वाट बघत होते ...

आणि भाई आतापर्यंत झालेल्या प्रत्येक घटनेची उजळणी करत होती.....

जशी टायगर आली तसे सगळेच जागेवर उठून उभे राहिले

रक्तात चिंब भिजलेली टायगर बघून सगळ्यांचेच डोळे विस्फारले होते.....

टायगर मात्र हाफत हाफत स्वतःला नॉर्मल करायचा प्रयत्न करत होती,.....

आपला श्वास नियंत्रण मध्ये आणत तीन भाईला tv लावायचा इशारा केला....

तस गण्यानं पटकन tv लावला...

आणि tv वरची न्यूज बघून सगळेच हादरले...

आणि अशाही स्थितीत भाई स्थिर होऊन फक्त टायगर कड बघत होती

"ख्यातनाम समग्लर फिरोज खान चा ब्लॅक हांतरच्या हातून खात्मा"

स्थिर झाल्यावर टायगर न भाईकड बघितलं आणि बोलायला सुरुवात केली...

तुझा इमर्जन्सी चा msg आलता तेव्हा मी त्याच्या अड्ड्यावरच होते...

आणि मला तुमच्या msg च्या आधीच श्री चा msg भेटला होता की तुझा मोबाईल फिरोजकडे पोहचला आहे म्हणून ... मग तिथून खाली हात येन मला आवडलं नाही म्हणून मी त्याला संपवून सगळ्या मुलींना आणि आबासला अंडरग्राऊंड करून मगच मीडियाला खबर करून इकडे आलेय... आणि तो फिरोज त्याला मी नाही तर आबास न च मारलं आहे...… पण मला हे कळतच नाहीये तो तिथं पोहचला च कसा....

टायगर च बोलणं ऐकून सगळेच चूप बसले आणि भाई च्या बोलण्याची वाट बघायला लागले

......

......

.........

काही वेळ शांतते गेल्यावर भाईन बोलायला सुरुवात केली....

गण्या आणि रोशनी....

आता तुम्ही दोघांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे तो पुढच्या दोन दिवसात कसा ही करून निस्तरायचा....

निघा इडकून .... आणि राहिलेल्या सगळ्यांना संपवूनच पुन्हा तोंड दाखवायला या... काहीशा रागातच भाईन त्यांना ऑर्डर सोडली....

तस दोघांनी पण मान हलवून संमती दर्शवली आणि त्याबरोबर सगळेच तिकडून निघून गेले ....

सगळे गेल्यावर भाईन .... शांततेत डोळे मिटून खुर्चीवरबसून घेतलं.....

खूप काही घटना अवघ्या चार तासात घडून गेल्या होत्या....

रोशनीच्या आणि गण्याच्या msg भेटल्यावरच तिने आबासला फिरोजची खबर देऊन सावध केलं होतं...

त्यामुळे आबास कडून फिरोज तर संपला होता.. पण फिरोजच सगळं साम्राज्य उध्वस्त करायचं जे ठरलं होतं ते पूर्ण न झाल्याने भाईच्या तळपायाची आग मस्तकात भिनली होती

------------------------------------------------------------------

इकडे सगळेच बाहेर आल्यावर ...

सगळ्यांनीच गण्याला आणि रोशनीला मदत करायची ठरवून दिलेली टार्गेट आपली आपण संपण्याचं आश्वासन देऊन लगेच कामाला लागले.....

टायगर आणि रोशनीन फिरोजची राईट हॅन्ड असेलेली गर्लफ्रेंड डायना ला खतम करन्यासाठी गेले....

डायना ........

एक उत्कृष्ट फायटर होती...

फिरोजवर तीच मनापासून प्रेम होतं म्हणून तर त्याचा मृत्यून डिवचले होती....

तीही

टायगरचा शोध घेत होती...

मुंबईच्या सगळ्यात मोठ्या फाईट क्लब मध्ये च टायगर आणि डायना ची भेट झाली...

रिकाम्या रिंग मध्ये जिथं रोज मेन फाईट व्हायची तिथं आज दोन लेडीज समोरासमोर आलेल्या....

पूर्ण रिकाम्या फाईट क्लब मध्ये दोन संतप्त शक्ती एकमेकांना संपण्याच्या उद्देशाने भिडल्या होत्या....

डायना एकट्या टायगरला आवरणार नाही हे माहीत होतं सगळ्याला .... रोशनीन लगेच भाईच्या मोबाईलवर डायना आणि टायगरचा फाईटचा लाईव्ह व्हिडीओ शेअर केला.....

आणि तिथून निघून डायनाच्या हाताखाली असणाऱ्या बेन आणि कार्ला ला शूट करायला निघून गेली....

तिला ही माहीत होतं जर कार्ला डायनाला भेटली तर ही फाईट टायगर आणि भाईच्या पण डोईजड होईल....

वाऱ्याच्या वेगानं टॅली न शेअर केलेल्या कार्लाच्या लोकेशन वर रोशनी गेली......

रोशनीन बघितलं तर कार्ला ..... निवांत तिच्या हॉटेल च्या स्विमिंग पूल मध्ये पहुडली होती....

तिला बघून रोशनीन एक डेव्हील स्माईल केली आणि आपली सायलेन्सर वाली गण काढून काही कळायच्या आत एका झाडामागून तिच्या ह्रदयात शूट केलं .....

शांत आणि निळाशार दिसणार पाणी कार्लाच्या रक्ताने लाल रंगाच होत होत....

पाण्यावर तरंगणारी कार्ला .... शेवटच्या श्वासा सोबत पाण्याखाली जात होती.... पण तिला बघायला तिथं कोणीही नव्हतं... कार्ला .... जिला एकांत प्रिय होता.... त्याच एकांतात आज तिचा शेवट झाला होता...

-------------------------------------------------------------

इकडे भाईन आलेल्या लाईव्ह msg ला ओपन करून बघायला सुरुवात केली.....

टायगर आणि डायना दोघीच्या फाईट मूव्ह आणि स्पीड बघता भाईला लक्ष्यात आलं की टायगर फार फार एक तास च हिच्या समोर टिकू शकेल.....

त्या व्हिडीओ ला बघत तसच रिलॅक्स बसून घेतलं भाईन....

----------------------------------------------------------------

गण्या आणि टीम न बाकी राहिलेले मोहरे टीपायच काम चालू केला....

कोणालाही वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळच नव्हता....

मीडियाने फिरोजची खबर जितक्यावेगात पसरवली नसेल त्यापेक्षाही वेगात ह्या सगळ्यांनी राजकीय नेताना शूट करायला सुरुवात केली....

आणि सगळ्यानाच माहीत होतं जे जे फिरोजला स्पोर्ट करतायत त्यांचा खात्मा होणार हे फिक्स होत....

मीडिया तर मुख्यमंत्रीच्या आणि फिरोजच्याच खुनाच्या बातम्यांना मीठ मिरची चोळत होती....

आणि ह्याचाच फायदा सेव्हन स्टार उचलत होते....

बघता बघता फिरोजची सगळी माणसं त्याच्या सोबतच पुढचा प्रवास करायला पाठवण्यात हे यशस्वी झाले....

-- ------------------------------------------------------

टायगर ची स्पीड कमी कमी होत जायलेली दिसली तशी भाई उठली आणि बाईकची चावी घेऊन फाईट क्लब ची वाट धरली....

इकडं डायना आणि टायगर दोघी ही घामान चिंब झालेल्या होत्या.... डायनाच्या मॉव्ह्ज टायगर साठी खूप अनोळखी होत्या तरीही मागच्या एक तासा पासून ती फाईट करत होती कोणात्याही विश्रांती शिवाय.....

हे बघून डायना खूपच प्रभावी झाली होती....

अचानक आलेल्या बाईकच्या आवाजानं दोघीनी फाईट थांबवून तिकडं बघायला लागल्या....

एका बाजूने भाई तर दुसऱ्या बाजूने बेन अस दोन नव्या दमाचे खिलाडी आता ह्या फाईट मध्ये येताना दिसत होते....

बेन ला बघून डायनाच्या चेहर्यावर एक डेव्हील स्माईल आली...

तर भाईला बघून टायगर न एक चिडका लुक दिला.....

दोघीही नकळत मागे सरकल्या .... भाई जशी रिंग मध्ये आली तसच सेम टाईम बेन पण आला ....

पण बेन रिंग मध्ये येऊन सेट व्हायच्या आतच टायगरने एक हाय जंप घेऊन त्याच्यावर आक्रमक हल्ला चढवला....

टायगरचा तो जोश बघून डायनाच्या लक्षात आलं ही तर आपल्या समोर नाटक करत होती.....

तस बेन ला वाचवण्यासाठी डायना पुढं आली पण तितक्यात तिच्या गालावर एक राऊंड किक बसली.....

सेम तीच मूव्ह जी तिचा खास वार होती.....

त्यातून सवरण्या आधीच भाईन जागेवरच फिरत तिच्यावर लगातार राऊंड किक चा मारा करायला सुरुवात केली .....

डायना फक्त राईट साईड राऊंड किक ची क्यूविन होती पण भाई दोन्ही बाजूने किक करून डायनाच्या प्रत्येक मूव्हज ब्लॉक करत होती.....

एकीकडे बेन आणि टायगरची जुंपली होती ..... बेन तर फक्त वार हुकवायच्याच प्रयत्नात होता....

टायगरचा स्पीड बघता त्याला स्वतःचा बचाव करणं पण शक्य होत नव्हतं.... तिथं अटॅक करणं त्याला नामुनकीन वाटत होतं......

टायगर फास्ट आहे हे बघून त्यानं तिला तसच डायना च्या अंगावर ढकलून दिलं..... त्यामुळं डायना आणि टायगर पुन्हा एकदा समोरासमोर आल्या.....

बेन न भाईच्या पाठीत एक जोरदार किक केली.....

पाठीमागून केलेल्या वारामुळे भाई एकदम चिडली आणि बेफाम होऊन बेन वर तुटून पडली किक आणि बॉक्सिंग चे हाथ जस जसे पडत होते तस तसे बेन चा जीव जात होता.....

बेन ची स्थिती बघून डायना एकटीच भाई आणि टायगर च्या समोर आली... बेन खूप जास्त थकल्यामुळे डायनाच्या मागे थांबला.....

तस भाई आणि टायगर ने एकमेकांना बघून एक डेव्हील लुक दिला ....

थोडं पुढं येऊन टायगर गुडघ्यावर बसली तस भाईन हाय जम्प घेतली आणि टायगरच्या खांद्यावर दोन्ही हात टेकवून दोन्ही पायांनी डायनाच्या छातीत किक घातली.....

सगळा जोर छातीवर इतक्या जोरात पडला की डायना च्या तोंडातून रक्ताचा फवारा च उडाला...... ह्यातून सावरायच्या आधीच टायगरची सेम किक पुन्हा बसली डायनाच्या छातीत.....

ऑलमोस्ट खात्मा च झाला होता ..... पण डायना होती ती फ्री स्टाईल फाईटची बेताज क्यूविन.... एवढा जबर मार तिला आजपर्यंतच्या कोणत्याच फाईट मध्ये बसला नव्हता....

बेन आणि डायना पुन्हा उभे राहिले होते टायगर आणि भाईच्या समोर..... डायना जखमी आणि थकलेली होती व बेन अजून बराच ठीक होता.....

पुन्हा फाईट सुरू झाली पण ह्यावेळेस भाई आणि टायगर एकमेकांना पाठ लावूनच लढत होत्या..... त्यामुळे ना बेन ला त्यांला ब्लॉक करता येत होतं ...... ना डायना ला....

अर्धातासाच्या सतत च्या फाईट मध्ये शेवटी डायना आणि बेन रक्ताच्या उलट्या करत करत जमिनीला टेकले होते....

त्यांच्या शरीरातील प्रत्येक हाड अस काही मोडलं होत की पुन्हा जोडणं शक्यच नव्हतं.....

शेवटी शेवटचा श्वास त्याच फायटिंगच्या रिंग मध्ये घेतला .......

तस गण्याला फोन करून त्या दोघांना ठिकान्यावर लावायला लावून भाई आणि टायगर रोशनिकडे गेले हॉस्पिटलमध्ये.....

नाही म्हणल तरी त्या दोघींना पण भरपूर मार बसला होता....

टायगरचा तर चेहरा ठीक होता पण भाईच्या चेहऱ्यावर सूज खूप आली होती....

---------------------------------------------------------------------

सहा दिवसांनी पुन्हा एकदा सगळे त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर होते....

आणि त्यांच्या समोर त्यांचे कमांडर सुर्या सिंग ...... रुबाबात युनिफॉर्म मध्ये होते......

सगळेच त्यांच्या त्या रुपाला बघून खूप प्राउड फील करत होते......

सगळ्यांनीच त्यांना एक कडक सॅल्युट मारला....

....... जय हिंद सर......

..... कॅप्टन.. पुरोहित..

... येस सर....

रिलॅक्स कॅप्टन... चला आता पुन्हा ब्रिगेडियरच्या रोल मध्ये जायचय.... आबास चा रोल संपला आणि आबास पण...

गुड बाय टीम....

गुड बाय सर.... हॅपी जर्णी सर.....

सगळ्यांनीच सूर्याला बाय करून पुन्हा आपल्या जागेवर आले

तस गण्यानं

एकदम जोशात नारा लावला

ये ये ये ये पार्टी..........

चलो....

तस सगळेच त्याच्या ह्या जलोशात शामिल झाले...

भाई आणि टायगर मात्र खुर्चीवर बसून त्यांच्या ह्या गोंधळाकडे हसत हसत बघत होते...

.....

....



सहा महिन्यांनी


आजचा बेस्ट पत्रकार अवॉर्ड आपल्या सिनियर पत्रकार (आपल्या स्टोरीतील वर्तमान ह्यांच नाव राज राजे ह्यांना जाहीर करत मी त्यांना हा अवॉर्ड घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो....

सगळेच त्यांच्या आयुष्यात पुन्हा सुरळीत झाले होते मुंबईच्या नव्या हालचालींची वाट बघत.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Action