प्रेम रंग 💖
प्रेम रंग 💖
मस्त हा
आज तुला अस मिठीत सामावून घेताना खूप छान वाटतंय ....
खरंच तूच माझं पहिलं प्रेम आहेस ...
तुला माहिती तुझ्यामूळे दोन वेळा हात फॅक्चर झालाय माझा
हो तुला हे माहीतच आहे तू तेव्हा पण किती बरसला होता.. मला तर आई पेक्ष्या जास्त तुझीच भीती वाटली रे इतका रागावला होतास तू की 2 दिवस अविरत बरसत होतास.
आज पण आपलं प्रेम खूप घट्ट झालंय ... आधी फक्त मी तुझ्यावर करत होते पण आता तुही माझ्यावर तितकेच प्रेम करतोयस हे पाहून मन भरून आलं रे
येड्या आई बाबांनी लांब ठेवलं शिक्षणा साठी पण तू मात्र मला तिथं ही भेटायला यायचास ते ही इतकं रोमँटिक होऊन की बस्स तुझ्या रंगात मी कधी न्हाऊन जायचे मला ही कळायचं नाही
तुला आठवत एकदा तू मला भर रात्री माझ्या रूमवर येऊन माझा वाढदिवस साजरा केलास , काय सांगू तुला सगळ्या माझ्या मैत्रिणी किती किती रागवत होत्या मला की अग रात्रीच्या 1 वाजता तू अस कस करू शकतेस
पण त्या वेड्यानं काय माहीत की तू तर फक्त मला शुभेच्छा दयायला आलास म्हणून
किती चिंब केलं होतंस तू मला तुझ्या प्रेमाच्या वर्षात
तुझं हे अस येन आणि येताना माझ्यासाठी तू किती वेडा आहेस हे दाखवणं बघून मला तुझ्यावर अजून प्रेम करावंसं वाटत
तुझी प्रत्येक आठवण मी माझ्या ह्रदयात मोरपिसा सारखी अलगद जपलीय रे .....
त्या मोराला ही ईर्ष्या व्हावी इतके रंग तू माझ्या जीवनात भरून भरून टाकले
तुला माहिती तुझं असंच येणं आणि मला तुझ्या सोबत दूर घेऊन जाण मला खूप आवडतं
पण तू ही बघ किती हट्टी होतास रे .....
मी अगदी पहिल्यांदा तुला पहिल्या पासून माझ्या प्रेमाची कबुली देत आले आणि तुम्हनजे उपवर झाल्यावर माझं प्रेम स्वीकारलं
तू तस पण तर स्वार्थी म्हणून खूपच प्रसिद्ध आहेस
पण अस कोणी आपल्याच प्रिये सोबत स्वार्थ करत का ??
तू नेहमी माझ्याकडे तक्रार करायचा की सगळ्यांना त्यांची प्रेमी जास्त आवडते करून पण तू बघ
तुही तर मला तितकाच आवडतोस रे
जितकी पृथ्वी आवडते आकाशाला
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितका सागराला किनारा
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितकी नर मादी ला
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितकी सती शिवाला
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितकं उन्ह सावलीला
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितकं काव्य कवीला
तू ही मला तितकाच आवडतोस रे
जितकं मी तुला
तुला खर च माझं म्हणणं ही गोष्ट माझ्यासाठी सौभाग्य लेण्या इतकी पवित्र आहे
आज ही तुला तुझ्या प्रेमात चिंब भिजलेली मी पाहिले की खोडी काढावीशी वाटतेच ना
हो वाटतेच तुला तस म्हणून तर चिंब भिजलेले मी आणि तू थंड हवेची झुळूक होऊन शहारून टाकतोस
तुला ही माहिती तुझं प्रत्येक रूप मला खूप प्रिय आहे म्हणून तर कितीही रौद्ररूप तू धारण केलंस तरी तुला पाहायचा माझा मोह सुटत नाही
तुला खरंच पूर्ण अधिकार आहे मला रागवण्याचा, हसवण्याचा , राडवण्याचा , प्रेम करण्याचा आणि त्याच प्रेमात वाहून नेण्याचा...
प्रेम बरसवून गेलास
खरच मी दुसऱ्या कोणाची होतेय हे माहीत झाल्यावर तू घेतलेलं भयानक रूप आणि हेच सत्य आहे कळल्यानंतर गाळलेले अश्रू तुझ्या आणि माझ्या शिवाय कोणालाच नाही कळणार रे .....
पण मी तेव्ह ही तुला वचन दिले आहे आणि अजूनही ते निभावते आहे की मी फक्त मनाने शेवटपर्यंत तुझीच आहे ...
मानवी शरीर म्हणून मला कर्तव्ये करणे अनिवार्य आहे हे ही तर तूच शिकवलं आहेस
खूपच बाबा तू तर नेहमी माझ्यासाठी काही तरी करतो
किती खुश होतास तू जेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी आई होणार आहे म्हणून
म्हणून तर तू मला आवडत तस तयार होऊन रिमझिम प्रेमाचा वर्षाव केला होतास किती अलगद येऊन माझ्या पोटावर तुझे प्रेम सांडून गेलास किती गुलाबी झाला होतास तू मला पण तुझा आनंद बघून खूप छान वाटलं
मला तू आवडतोस
आणि तुला
तुझ्यात चिंब झालेली मी
खरंच आपलं अस्तित्व वेगळं अस नाहीच रे
तू किती निस्वार्थ प्रेम करतोस माझ्यावर
आणि किती ती तुझी रूपे
अगदीच सुंदर
तुला आठवत तू मला मार पण दिलास
कस??? काय म्हणतोयस??
मी नाही का रस्त्यावर एका भेकण्या बरोबर भांडत होते आणि तू मला घरी जा म्हणून मागे ओढत होतास काय रे इतकी जोरात फुंक मारत होतास की मी खरंच मागे ढकलले जात होते तरीही ऐकत नाही बघून तू किती जोरात गारा मारलेल्या दोन दिवस पाठ दुखत होती आणि तू मात्र मला मारून माझ्यावरच रुसून बसला होतास
तुला आठवत तू तुझ्या प्रेमाची कबुली देताना किती येडेपणा केलता
हो आठवत असेल म्हणून तर अस भुरभुर करून हसतोयस
सांगू सगळ्याला
सांगतेय
माझा गणिताचा तास आणि तुझा प्रेमाचं पास एकदाच तर बुडाला आधीच तुझ्यामुळे मला उशीर झालेला ....
कधी नाही ते त्या दिवशी तू किती नखरे करत होतास ....
किती छान हवा उडवत होतास ....की मला ना माझी ओढणी सांभाळता येत होती... ना केस ...एकदम भेदरून सोडल होतंस ....
पण मी नाराज होते ...म्हणून तुझ्या ह्या सगळ्या मस्तीला बाजूला सारून शाळा जवळ करत होते ...आणि तू सूर्याला पण कामाला लावलस ...तो ही तर मधेच तप्त होत होता तर मधेच शीतल ... आणि मी हा नेमका उन्ह सावलीचा खेळ बघण्यासाठी वर मन केली आणि तू मात्र लगेच संधी साधून घेतलीस तुझ्या टपोऱ्या थेंबांच्या ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतलास किती तो बेशरम पणा मला तर एकदम शहारून च आलं तुझ्या असल्या चावट पणामूळे मला पूर्ण ओलाचिंब होऊन वर्गात जावं लागलं किती तू खुश झालेला आणि मी लाजून पाणीपाणी
बस्स बाबा तुझी माझी अजून काही गुपित आहेत ते मात्र मी कोणाला नाही सांगणार
तूच तर शिकवलस
फक्त आनंद वाटायला
तूच तर शिकवलस
फक्त मदत करायला
तूच तर शिकवलस
फक्त प्रेम करायला
म्हणून आपण आपले राडके क्षण नको कोणाला सांगायला
तू च तर शिकवलस
पाणी लपवायला
जेव्हा गरज होती तेव्हा प्रत्येक वेळी तू माझे डोळे ओले झालेले लपवलेस ह्या सगळ्या पासून
कोणाला नसली तरी तुला मात्र माझ्या प्रत्येक अश्रूंची किती काळजी की ते डोळ्यातून बाहेर फक्त तुझ्यातच समावतात
तुला पाहताना मी विसरते मला
तुला भेटताना मी भेटते मला
तुला सोडताना मी सोडते मला
तुला बघताना मी बघते मला
मला तर प्रत्येक गाण्यात तूच तर फील होतोस
तुझ्यासवे तुझ्यासाठी
I Hardly Love You My Love Rain
म्हणून तर तू च तू आहेस माझं जीवन

