स्पर्धेसाठी. सण आणि आपण ,
स्पर्धेसाठी. सण आणि आपण ,
भारत संस्कृतीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना खुप महत्त्व आहे . कारण प्रत्येक सण उत्सवामागे एक हेतू आहे एक संकल्पना आहे.मुख्य तीन ऋतू ऊन्हाळा, पावसाळा, हिवाळा या प्रत्येक ऋतूत येणारा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.
आपण प्रत्येक सणामागील हेतू समजून घ्यायला हवा .मराठी महिन्यात येणारे सण त्या त्या ऋतूमानाप्रमाने साजरे होतात. होळीचा सण दृष्ट प्रवृत्ती सृष्टीवर फोफावली तर तिचा अंत राखेतचं होतो हे लक्षात आणून देणारा,गुडीपाडवा वृक्षांना नवी पालवी फुटते तिच्या स्वागतासाठी ,
अक्षयतृतीया पितरांचे स्मरण कराकेळी पूजून करुन व त्यांच्या नावाने प्रात्याधिक स्वरूपात जोडपं जेवू घालतात त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो.
श्रावणात तर सणांची रेलचेलचं असते . पाऊस पडलेला असतो निसर्ग छान बहरलेला मन ही आनंदी नागपंचमीच्या सणाला शेतक-याचा पिकांचे नुकसान करणा-या उंदिर घुशींना साप नष्ट करतो त्याच्याप्रती मित्रत्वाची भावना ठेऊन पूजा केली जाते ,सण रक्षाबंधनाचा भावाबहिणच नातं दृढ करणारा , नारळीपोर्णिमेचा सण सागराची पूजा वरूणराजाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी कोळीबांधव सुवर्णनारळ अर्पण करतात. पोळा सण बैल पुजनाचा वर्षभर शेतात राबतो त्यांच्या कष्टाने पिकलेल्या धनधान्य ज्यावर आपले जीवन चालते त्या उपकारतून उतराई होण्याचा . नवरात्र ,दसरा सृष्टीवर जेव्हा जेव्हा विकृत विध्वंसक प्रवृत्ती फोफावतात तेव्हा दैवी शक्तींचा जन्म होतो पार्वतीने अनेक रूप घेऊन त्यांचा नाश केलेला तिचे स्मरण, पूजन, जागरण करून श्रध्देने नतमस्तक होण्यासाठी .दिपावली वर्षभर केलेल्या कष्टातून मिळालेल्या धनाची लक्ष्मीरुपात पूजन करुन सन्मान करणयाचा .
येतो मग गणपती खर तर हा सण नाही उत्सव आहे . सण घरोघरी साजरा होतो तर उत्सव सार्वजनिक गणेशोत्सव रंगारी , लोकमान्य टिळक यांची संकल्पना . जेव्हा देश पारतंत्र्यात होता तेव्हा भोळ्याभाबड्या जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवण्यासाठी सुरू केलेला उत्सव त्यामागचा हेतू खुपच चांगला होता जनजागृती होऊन लोकांना अन्यायाविरुद्ध बंड करून ऊठले पाहिजे व समाज एकसंघ झाला तर कुठलाही विध्वंसक सत्ता मोडून काढू शकतो हे सिद्ध केले इंग्रजांना आपला देश सोडून जावे लागले .
पूर्वीपासून चालत आलेल्या रुढीपंरपरा आजही सुरु आहेत पण काळानुसार व सोयीनुसार त्यात बदल झाले .काही बदल चांगलेही आहेत तर काहींचा अतिरेक करून मूळ हेतूचं बाजूला गेला .ऊदा. गणपती उत्सवाचे बाजारीकरण झाले असे वाटते कारण गल्लीगल्लीत अनेक मंडळ उदयास आले आपला बडेजाव मिरवण्यासाठी जनतेकडून वर्गणी रुपात खंडणीच वसूल करतात व चढोओढीत भडक नृत्य , कर्णकर्कश डीजे , मादक गाणी , बाप्पाच्या मंडपात जुगार पत्त्यांचा डाव रंगतो खूपचं खेदजनक गोष्टी घडत असतात अन आपन फक्त बघत असतो . मग मला सांगा आपल्याला रंगारी, टिळकांचा या उत्सवामागील उद्देश समजला का ??? व आपन ह्या गोष्टी समाजासाठी घातक आहेत हे समजत असूनही काय उपाययोजना करतो.???
पूर्वी लोकं श्रध्देनं निर्मळ भावना शुद्ध आचरण पवित्र विचार करून सणवार साजरे करत होते . पण आता दिखाव्यासाठी , स्वतःच्या मौजमजेसाठी , श्रीमंतीचे प्रदर्शन ,दडपशाही हुकूमशाही स्वताची वाहवा करण्यासाठी करतात.
सणामागील हेतू ,उद्देश हरवला हे मात्र नक्की.....