Neelima Deshpande

Inspirational Children

3  

Neelima Deshpande

Inspirational Children

संवाद

संवाद

2 mins
304


"बाबा, तुम्ही आज प्रसिद्धीच्या झोतात असुनही खुप साधे राहणे पसंत करता. जपून आणि विचारपूर्वक पैसा खर्च करता असे का? आवश्यक असेल तेवढ्याच गोष्टीची खरेदी करणे इतपत सुद्धा समजू शकतो पण स्वत:ची कामे स्वत:च करणे हे अती झाले!निदान आतातरी बदला. कुणाला तरी तुमच्या छोट्या छोट्या कामासाठी नोकरीला ठेवा. तसही भरपूर पैसा आहे आपल्याकडे ठावूक आहे ना तुम्हाला?"


सुजयने वडीलांना असे सगळे प्रश्न विचारले तेंव्हा त्यांना हसू आले.आपला मुलगा आपल्या काळजीपोटी आणि प्रेमाखातर बोलतोय हे त्यांना माहित होते त्यामूळे त्यांनी असे करण्या मागचा त्यांचा ऊद्देश त्याला समजावला. अतिशय शांतपणे त्यांनी त्याला उत्तर दिले,


"राघव, मला माहिती आहे की, देवाच्या कृपेने आणि आपण घेतलेल्या मेहनतीने आपल्याकडे भरपूर पैसा आहे.पण मला अजुनही आठवण येते त्या सगळ्या दिवसांची जेंव्हा हाच सगळा पैसा कमावण्याकरता मला रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागली होती. तेंव्हा गरजेच्या गोष्टींसाठी देखील तो माझ्याकडे पुरेसा नव्हता.त्यामूळे आजही गरज नसताना अवास्तव खर्च करणे जमत नाही रे! स्वत:ची जास्तीत जास्त कामे करणे हा तर सवयीचा भाग झाला आणि मुळात त्यामूळे माझा व्यायाम होतो. शरीराची हालचाल थांबवली तर नसती दुखणी मागे लागतात हे तर जाणतोच ना तू? जोवर शक्य आहे तोवर स्वत:ची कामे करण्यात कसला आला कमीपणा ? आपले आयुष्य खूप कमीत कमी गरजांमधे घालवण्याची सवय लगलेली असल्याने मला याचा कधी त्रास जाणवत नाही. शेवटी समाधान महत्वाचे. ते आजवर सतत लाभल्याने ह्या सगळ्याची सवय लागली मला."


वडिलांचे विचार ऐकून त्याला त्यांचा अधिकच अभिमान वाटला आणि आपणही ह्यातील जे जे शक्य आहे ते अंगीकारावे असे वाटले.


योग्य संवाद साधला गेला की अपेक्षित फळ मिळतेच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational