STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

संतती हीच खरी संपत्ती..

संतती हीच खरी संपत्ती..

3 mins
4

हिशोब आयुष्याचा....


लेकरं सुखात राहावी ही एकच इच्छा प्रत्येक आईबापाची असते.मला माझ्या आईवडिलांचे शेवटचे शब्द आठवतात तेव्हा कंठ दाटून येतो नी डोळ्याला धारा लागतात... भिंतीवरील त्यांचे फोटो पाहून डोळे आपोआप पाझरतात नी आठवतात त्यानी आयुभर केलेलें कष्ट.काय केलेलं नसतं त्यांनी आपल्यासाठी आणि काय करायचं राहिलं आहे जे त्यांनी करायला हवं... सर्व सर्व काही आईबाप आपल्या लेकरांसाठी करतात... माझं लेकरु मोठं व्हावं, त्याला यश मिळावं, त्याचं नाव मोठं व्हावं नी सर्व सुख त्याला मिळावं ही एकच इच्छा प्रत्येक आईबापाची असते... ह्या एका इच्छे साठी आपलं लेकरु मोठं व्हावं... त्याचं नाव मोठं व्हावं... सर्व सुख त्याला मिळावं यासाठी सारं.. सारं काही त्यांना करावं लागतं... आपलं लेकरु फार चांगलं वाटतं त्यांना कारण तो जीव असतो त्यांचा... त्याला कसलं च काही कमी पडू नये यासाठी त्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात.आपलं लेकरु कधीच कुठं चुकू नये आपणाला त्यांच्यामुळे मान खाली घालायची वेळ येऊ नये उलट आपली मान ताठ राहीली पाहिजे आपला मान सन्मान वाढला पाहिजे.नाव मोठं झालं पाहिजे त्यासाठी योग्य संस्कार, शिक्षण नी जे हवं ते पुरवण्याचं काम आई बाप करतात नी यातच त्यांचे आयुष्य निघून जाते... सर्व काही करतात ते त्यांच्या लेकरासाठी... या लेकरांसाठी सारं काही करणं... जगणं नी मरणं ही असतं... त्यांचें एकच स्वप्न असते आपल्या लेकरांना सुख मिळाले पाहिजे...तो नीट जगला पाहिजे..नाव झाले पाहिजे... मोठा झाला पाहिजे...

       माझ्या आईवडिलांचे शेवटचे शब्द... त्यांचें मन... डोळ्यांतील भाव मला आठवतात नी खरंच डोळ्याला धारा लागतात..कंठ दाटून येतो नी वाटतं... आपल्यासाठी आयुष्य वेचून... आयुष्य भर खस्ता खाऊन.. आपल्याला सोडून आईवडील कसे गेले... देवाने एवढे दुःख आपल्याला का म्हणून दिले...आपले आईवडील हवे होते... त्यांचं जाणं म्हणजे आपलं सर्वात मोठे दुःख आहे...
         लेकरांच्या सुखा शिवाय त्यांच्या भल्या शिवाय, त्यांच्या यशा शिवाय आईवडीलाचं दुसरं कोणतंच स्वप्न नसतं... कोणतीच इच्छा नसते एकच इच्छा नी स्वप्न असतं ते म्हणजे आपली लेकरं सुखात राहावी, सुखाने जगावी नी त्यांचं नाव मोठं व्हावं...अशा प्रकारे आईबापाचे नाव करणारे सुसंस्कारीत ज्ञानवंत, यशवंत, गुणवंत, किर्तीवंत लेकरं निघाली की आईवडिलांच्या कष्टाचं, जीवनाचे सार्थक होते...याची जाण ठेवून लेकरानी जिद्द, चिकाटी, मेहनत करून मोठं यश संपादन करावे.. आई बापाचे नाव करावे... उध्दार करावा.. त्यासाठी चांगले संस्कार,चांगला सहवास नी सद्सद्विवेक बुद्धी त्यांना लाभावी...नाव नी आदर्श निर्माण व्हावा...छाती फुगावी.. अभिमान वाटावा असेच करुन दाखवावे..
खऱ्या अर्थाने जीवन सार्थक व्हावे...

त्यामुळे च संतती हीच खरी संपत्ती असे म्हटले जाते...कारण सोबत काहीच येत नाही...उरते ते फक्त नाव, किर्ती आणि किर्ती, नाव जे उरते ते आपल्या संतती च्या रुपाने... बाकी सर्व इथे च सोडून रिकाम्या हाताने जसं आलं तसंच जाणं आहे प्रत्येकाला.आपण काय कमावलं, कसं कमावलं आपली श्रीमंती, धनदौलत, सर्व काही सोडून जाणं आहे.पण मागं जे उरतं आपलं नाव, किर्ती ती फक्त आणि फक्त आपल्या संतती च्या रुपाने.. आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या रुपाने त्याची पावती म्हणजे आपली लेकरं... त्याचं चारित्र्य, संस्कार, शिक्षण,नी त्यांचे सामाजिक, राष्ट्रीय योगदान म्हणून आपलं नाव मोठं करणारी संतती हीच आपली खरी संपत्ती आहे.. आपली श्रीमंती आहे...आपली दौलत आहे..
जिद्द, चिकाटी, मेहनतीने शून्यातून विश्व घडवणारे..मोठे यश संपादन करून आईवडील यांचे नाव मोठं करणारी लेकरं जन्माला येणं हेच आपले भाग्य म्हणावे लागेल...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड 
९८३४२९८३१५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract