STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

माणूस घडतो बिघडतो...

माणूस घडतो बिघडतो...

3 mins
0

माणूस घडतो बिघडतो..

 सगळेच काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाहीत, कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे काही कुणाच्या हातात नाही.पण गरीबी आणि श्रीमंती कधी कुणाच्या वाट्याला कशी येईल हे काही सांगता येत नाही... शून्यातून विश्व घडवणारे किती तरी उदाहरणे सांगता येतील... पोटाला पोटभर अन्न न मिळणारे जीवन भर खस्ता खाऊन खूप श्रीमंत झालेले कितीतरी उदाहरणे आहेत.. फुटपाथवर झोपून, हॉटेलात काम करुन, घरदार नसलेले, मायबाप नसलेले, मोलमजुरी करून आयुष्यात यशस्वी झालेले कितीतरी उदाहरणे आहेत.. शंभर, दिडशे एकरचे मालक ,नोकर,चाकर असलेले गावभर मिरवणारे तोंड दाखवायच्या लायक न राहीलेले, दळभद्री नशीबी आलेले असे ही उदाहरणे आहेत... ज्याचा त्याचा आयुष्याचा खेळ त्यालाच माहीत असतो..पण एवढे नक्की गरीबी हा फार मोठा शाप आहे..ती कुणाच्या वाट्याला येऊ नये... गरीबी माणसाला लाचार बनवते.प्रतेकाला किमान पोटाला पोटभर मिळायलाच पाहिजे.. पण फुकट कसं मिळेल.. मेहनत, बुद्धी, शिक्षण, तंत्रज्ञान, जिद्द याच्या बळावर माणूस जीवनाला दिशा देवू शकतो.. जीवनांतील सुख दुःख हे निश्चित च आपल्या कर्मावर अवलंबून आहे... आत्मविश्वास नी सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला सुखी होण्यासाठी जीवनभर मेहनत, नियोजन आणि ज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे... शिक्षण, मेहनत, जिद्द आणि संस्कार हे माणसाला आवश्यक आहेत... मला हे देवानं दिले म्हणून दुःख मानत बसण्यापेक्षा,दोष दैवाला देत बसण्यापेक्षा परीस्थितीवर मात करून कायापालट करण्याची ताकद, तयारी आपली असली पाहिजे... हवं ते हवं तेव्हा नाही मिळालं तरी येणाऱ्या अनुभवातून स्वतःला घडवलं पाहिजे नी हम भी कुछ कम नहीं हे जगाला दाखवून दिले पाहिजे... तुम्हाला नाव ठेवणारे, तुमच्या वर जळणारे नी तुमच्या भल्यापेक्षा वाईटासाठी प्रार्थना करणारे, आनंद मानणारे जगात कमी नसले तरी.. वेळ प्रसंगी धावून येणारे, मदतीचा हात देणारे, चुकल्यास मार्ग दाखवणारे ही या जगात सापडतातच सांगायचं एवढंच की तुम्ही सुधारावे की बिघडावे ह्यासाठी कोणी कितीही नवस केले तरी, तुमचं भलं चांगलं कसं होईल याचा विचार तुम्ही प्रथम केला पाहिजे..आपण कुठे चुकतो, योग्य, अयोग्य, काय करावे, काय करू नये,कसे वागावे,कसे जगावे याचा विचार तुम्ही प्रत्येक वेळी करणे आवश्यक आहे.. तुमचे जीवन तुमच्या हातात असून नशीब लिहीणारा , घडवणारा दुसरा कोणी नसतो, योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन कोणतीच चूक न होऊ देता, योग्य मार्गाने यश मिळवत गेल्यास तुमची प्रगती कोणी रोखू शकत नाही, तुमचं सुख कोणी हिरावू शकत नाही.. फक्त मेहनत, ज्ञान, नियोजन, शिक्षण, बुद्धी, पैसा व संधी यांचा योग्य मेळ तुम्हाला जुळला पाहिजे... जीवनात आनंद आहे तो तुम्हाला घेता आला पाहिजे... वाटेल ते , वाटेल तसं करुन , चुकीच्या मार्गाने जावून आनंद कधीच मिळणार नाही... फुकटचे स्वप्न कधीच बघू नये..फुकट कधीच कुणाला काही मिळत नाही नी जे फुकट मिळतं ते आनंद देत नाही.. त्यासाठी सुख आणि दुःख याची जाण ठेवायला हवी.. स्वतःला कसं बनवायचं, घडवायचं हे निश्चितच आपल्या हाती असून आपण केलेल्या छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकते, दुःखी बनू शकते तर योग्य वेळी योग्य नियोजन, निर्णय न मेहनत करून, आयुष्याला दिशा देणे,घडवणे नी शून्यातून विश्व घडवून आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे... म्हणजे यश,आपयश,सुख, दुःख हे आपल्या हातची गोष्ट असून एखाद्या चुकीमुळे स्वतःला बरबाद करायचे का योग्य अयोग्य याचा विचार करून योग्य निर्णय नी संधी शोधून जीवन सुखी बनवायचे, घडायचे की बिघडायचे याचा विचार जर केला तर जीवनाला कलाटणी देता येते, कोणीतरी आपल्या जीवनात देवदूत बनून यावे यापेक्षा आपण देवदूत बनून एखाद्याला माणूस बनवू शकतो, दुःख दूर करुन, डोळे पुसून जगण्याचं बळ, दिशा, मार्ग आपण निश्चितपणे देऊ शकतो.. स्वतःला बिघडवण्यापेक्षा लायक घडवा जगा आणि जगवा, मूल्ये रुजवा आणि हे जीवन सार्थकी लावा, जगाला तुमचा हेवा वाटेल एवढे महान, लायक तुम्ही बना. अजून माणसाला काय हवे... स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतोच पण एखाद्याच्या जीवनात उजेड निर्माण करणारा दिपक तुम्ही बना.. सुख निर्माण करुन ते वाटायला शिका..घडणे नी बिघडणे आपल्याच हाती आहे... आपल्या च हाती आहे यश अपयश,सुख आणि दुःख... गायकवाड आर.जी.दापकेकर..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract