समय बलवान
समय बलवान


कधी आला स्वाइन फ्लू
कधी आला बर्ड फ्लू
कोण रे मोठा टिकोजी
लागून गेला कोरोना तू
भले भले आले गेले
आम्ही सर्वांवर केली मात
जोपर्यंत आहेत आमचे हातात हात
आणि एकशे तीस कोटी लोकांची साथ
मानलं तुला तू भल्याभल्या
महा सत्तांना नमवलं
कित्येकांनी आपलं आयुष्य
तुझ्या पायात गमावलं
सॅनीटायजर'च्या करून तलवारी
मास्कच्या केल्या ढाली
पाळून सोशल डिस्टन्सींग
अर्धी लढाई आम्ही जिंकली
आज जरी सारे जग
तुझ्यामुळे झाले ठप्प
भल्याभल्या महासत्ता
तुझ्यापुढे झाल्या गप्प
कधीतरी जाशीलच ना तू
अमर थोडाच आहेस?
फक्त सध्याचा काळ तुला जराअनुकूल आहे
आम्ही आहोत ते फिनिक्स पक्षी
जे राखेतून घेतात भरारी
या सृष्टीचे लाल आम्ही
कळीकाळाला देखील पडू भारी