*समर्पण*
*समर्पण*
भक्तीची पहिली पायरी म्हणजे समर्पण पण मी ज्या समर्पण बद्दल आज इथे बोलणार आहे ते म्हणजे नात्यातील आणि मैत्रीतील समर्पण भाव . समर्पण करताना आपलं सर्वस्व आपण त्या विषयाला देतो , पण अज्ञानवंश हेच समर्पण आपल्यला कुठेतरी अधोगती कडे नेतो . समर्पण हे देवाप्रती असेल तर नक्कीच त्याचा उद्धार होतो पण हेच समर्पण जर एखाद्या व्यक्तीबद्दल असेल तर ते काळजीपूर्वक केलेलं कधीही चांगलं . उदाहरण बघायचं झाल्यास महाभारतात अर्जुनाचं कृष्णाबद्दल या समर्पणात मैत्री च अतूट नातं होत ,या नात्यात अर्जुनाला कृष्णाबद्दल जो भाव प्रगट झाला आणि त्याचा उद्धार झाला . दुसरीकडे महाभारतातच कर्णाचा दुर्योधनाप्रती समर्पण भाव , दोन्हीकडे मैत्रीचं अतूट नातं आहे पण या मैत्रीत दुर्योधन कर्णप्रति का जुळला हे इथे सांगण्याची आवशक्यता भासत नाही , कर्णाच्या ह्या समर्पण भावनेने त्याला अधोगतीला समोर जावं लागलं . असं काहीस आपलं दैनंदिन आयुष्यात अश्या प्रसंगांना समोर जाऊन कित्येक तरुण , तरुणी आपलं आयुष्य अधोगतीला नेऊन ठेवतात . आपण हे करताना आपल्यातील ज्ञानानी समोरच्या व्यक्तीचा भाव आपल्याप्रती काय आहे याची जाणीव केल्याशिवाय हे समर्पण करू नये , अन्यथा आपल आयुष्य ह्या ज्ञानाअभावी कुठेतरी अंधारमय व्हायला वेळ लागणार नाही .
अज्ञानवंश कुणालाही समर्पण भाव जागृत करण्याआधी त्या व्यक्तीप्रती तसा भाव प्रगट होत नसेल तर निव्वळ आकर्षण आणि भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी हे केव्हाही न केलेलं योग्य . आजच्या या इंटरनेट च्या आणि social मीडिया च्या काळात अशे कितीतरी तरुण तरुणी अद्यानवश ह्या मोहाच्या जाळ्यात अडकून स्वतःची हानी करतात . आधी त्या विषयांबद्दल पूर्ण जाणून घेतल्याशिवाय हे समर्पण अतिशय चुकीच्या वळणावर आपल्याला नेऊन ठेवतो आणि आपण स्वताच पापाचे भागीदार बनतो . म्हणून मित्रांनो आ बैल मुझे मार या वाक्प्रचानुसार हि कृती आपल्याकडून न होण्यापेक्षा हेच समर्पण आपल्याला आई बद्दल वडिलांबद्दल आपल्या गुरूबद्दल असू द्या आणि अर्जुनासारखा तुमचा उद्धार व्हायला किंचितही वेळ लागणार नाही .
किरणकुमार उरकुडे
