* कायापालट *
* कायापालट *
आयुष्यात खूप अश्या घटना घडतात ज्यांनी व्यक्ती तिथून काहीतरी बोध घेतो अथवा त्याचा पक्षाताप करीत आपलं आयुष्य त्या घटनेबद्दल अनावश्यक स्वतःला त्रास देतो . असच काही मनोज च्या आयुष्यतही घडलं , त्याला आधीपासूनच दारूचं व्यसन , आधी स्मॉल पेग पासून सुरुवात होऊन तो कधी बंपर वर पोहचला त्याच त्यालाच कळलं नाही . या व्यसनात त्यांनी स्वतःची प्रकुती , सुखी संसार आणि चांगल्या पगाराची नौकरी सगळं काही गमावून बसला . जे मित्र त्याच्या सोबत रात्र दिवस दारू साठी सोबत बसायचे त्यांनी सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली , परिवाराने सुद्धा त्याची साथ सोडली , मनोज ला सावरण्यासाठी कुणाची सोबत असणं आवश्यक होत . पण व्यसन त्याला रोज काहीतरी चुका करण्यास भाग पाडत होती , अशीच एक चूक त्या रात्रीला त्याच्या हातून घडली आणि त्याची रवानगी पोलीस स्टेशन ला झाली , मला रात्रीला पोलीस स्टेशन मधून कॉल आला आणि मी थोडा स्थब्धच झालो , मनोज हा माझा जुना वर्गमित्र अतिशय हुशार , आणि कर्तबगार अशी त्याची ओळख , त्याचा आणि माझा इतका फारसा संपर्क रहायला काहीही कारण नव्हतं पण Social Media वर आम्ही एकमेकांचे मोबाइल नंबर share केले होते . मी लागलीच पोलीस स्टेशन मधून त्याला सोडवून त्याची सुटका करून घेतली , हातावर आणि गालावर त्याच्या जखमा होत्या आणि दारूचा घाणेरडा वास सुटला होता , मी एकटाच राहत असल्यानी त्याला घरी आणल , आणि त्याला घडलेल्या घटनेबद्दल काहीही न विचारता ती रात्र तशीच जाऊ दिली . दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मधून सुट्टी घेतली आणि त्याच्याशी काही बोलावं म्हणून मी त्याच्याजवळ बसलो , अतिशय गंभीर आणि घाबरलेला मनोज मी त्याला धीर देत जणू काही त्यांनी कुठलंही गुन्हा केला नाही याची साक्ष मी त्याला द्यायला लागलो , हळूहळू तो स्थिरावत त्यांनी आपला वृत्तांत सांगितला , आणि मला सगळं त्याची झालेली चूक कळली , का तो व्यसनाच्या आहारी गेला आणि सगळं कस तो गमावून बसला हे मला उमजून गेलं . मी त्याला वेगळ्या पद्धतींनी मदत करण्याचं ठरवलं , मी त्याला कुठलंही उपदेश न करता त्याच्या सोयीनी माझ्याकडेच राहायला जागा दिली , आणि त्याच्या आयुष्याचा कायापालट इथूनच सुरु झाला . आधी मी थोडा घाबरलो होतो कारण व्यसनाच्या सोबत माझं कुठलंही नातं नव्हतं आणि याला व्यसनातून बाहेर आणण्याचा मी संकल्प केला होता . माझ्या खोलीतील वातावरण म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं स्वरूप होत म्हणून कदाचित ह्याचा फायदा मनोज ला पण झाला , मी २ खोलीची जागा न मानता हे माझ्यासाठी मंदिर होत . १ ला दिवस त्याचा कुठलंही ब्रेन वॉश न करता आपण याला कृतीतून बाहेर कस काढता येईल याच विचारात दिवसभर होतो , माझं त्याच्या सगळया कृतीकडे लक्ष होत , त्याच्याकडे फोन आणि पैसे नव्हते त्यामुळे त्याचा जगाशी संपर्क तुटलेला होता , रोज दारू पिणारा मनोज आज त्या stress मध्ये जाणवला , तो हि मला निरीक्षण करत होता , माझं routine सकाळी ४ ला सुरु व्हायचं मी आधीच आध्यत्मिक असल्यानी त्याला कदाचित ह्या गोष्टीची सवय नसावी , मी ध्यान , साधना आणि आपली नौकरी आणि आता मनोज असा प्रवास सुरु झाला , त्याला करायला काहीही नव्हतं म्हणून मुद्दम मी काही पुस्तके समोरच्या खोलीत ठेवली , त्यांनी त्यातलं स्वामी विवेकानंदाचे आत्मचरित्र च पुस्तक हातात घेतलं आणि मला आतून आनंद झाला , कि चला मनोज नि हि तर एक सकारात्मक पाऊल उचलेल लक्षात आलं . पट्ठ्यानी मी ऑफिस मधून आल्यावर त्या पुस्तकातील काही विचार मला वाचून दाखवलेत , आणि अंगावर शहारा आला . मी त्याची सगळी मद्त करीत त्याला कुठंतरी गुंतवण्याचा विचार करत होतो . त्याला काही पैसे देऊ केलेत त्याच्याकडे असो म्हणून . पण त्याच दिवशी मनोज खोली वर आढळला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरु केली पण सगळं व्यर्थ कुठेही तो सापडला नाही , शेवटी निराशेने खोलीकडे जात असताना बाजूच्या मंदिरात लक्ष दिल , तेव्हा मनोज मला बसलेला आढळला , जवळ त्याच्या पाठीवर थाप दिली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होत पण सोबत दारूचा सुद्धा वास आला , मी काहीहि बोललो नाही , मला माहिती होत इतकं सहज हि गोस्ट त्याला सोडता येण्यासारखी नव्हती . मी समझून घेतलं पण काहीही त्याला बोललॊ नाही त्यामुळे कदाचित तो हि जरा त्याला पच्छाताप होत असावा . मी सकाळी ४ ला नियमित उठलो आणि मनोज आपल्या खोलीत नव्हता , आतल्या खोलीत बघितल्यावर दिसलं तो माझ्या ध्यान कक्षेत ध्यानाला बसलेला दिसला . मी आनंदित होतो पण संध्याकाळी च काय हा पुन्हा दारू घेईल या प्रश्नचिन्हात होतो , मी त्यादिवशी ध्यान न करताच ऑफिस ला निघालो आणि संध्याकाळी आपल्या परत वेळेस घरी आलो तेव्हा मनोज मला त्याच ध्यान कक्षेत दिसला . मी खूप समाधानी वृत्तीने त्याच्याकडून बघून त्याला शुभेच्छा दिल्या , तो दिवस माझ्यासाठी सकारात्मक होता , मनोज जवळपास रोजच ध्यान आणि त्याच वाचन yachayt रमून गेला जवळपास त्यांनी दारूला आता ७ दिवसापासून हात लावलेला नव्हता ,मी त्याला पुन्हा काही पैसे देऊ केलेत खर तर हे त्याची परीक्षा होती , पण मनोज त्याही दिवशी संध्याकाळी खोलीवर नव्हता पुन्हा मला तोच विषय यांनी सुरु केला असावा म्हणून आज मी त्याची खबर घेण्याच ठरवलं , मनोज मला दुरूनच दिसला आणि माझा राग आतून मला त्याला विचारण्यासाठी समोर जाणारच तितक्यात त्यांनी माझ्या हातात स्वामी चे नवीन कोरी पुस्तके हातात ठेवली . मी त्याला आनंदानी मिठी मारली , आणि डोळ्यातून माझ्या आनंदाश्रू सुरु झालेत . कदाचित मनोजचा समर्पित भाव ध्यानाप्रती जागा झाला. काही दिवसातच मनोज ला त्याच क्षेत्रात नौकरी लागली , तो रोज मला ध्यानात आलेले अनुभव आणि त्याची प्रगती याबद्दल चर्चा करायचा . तो आता पूर्णपणे निर्व्यसनी आणि एक चांगलं आयुष्य जगत आहे. मी त्याला कुठलेही समुपदेशन न करता फक्त त्याला कृतीतून , adhytmik pustkatun आणि सकारात्मक ऊर्जेतून त्याचा कायापालट बघितला.
किरणकुमार उरकुडे
