समानता माझा हक्क भाग -पहिला
समानता माझा हक्क भाग -पहिला


नीता आणि अंजली दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी. अगदी बालवाडीपासून ते बारावीपर्यंत सोबत शिकलेल्या, बालमीत्रिणीच त्या. याच वर्षी दोघींनी बारावीची परीक्षा दिली, दोघीही खूप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या. दोघींचेही एकच स्वप्न मेडिकल ला जाण्याचे. खूप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळे नीता आणि तिचे आईवडील अंजलीच अभिनंदन करण्यासाठी पेढे घेऊन तीच्या घरी गेले.... पण हे काय? अंजलीच्या घरी आनंदावर विरजण पडलेलं होत. दिखाव्याच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, जणू काही खूप मोठं टेंशन आलंय त्यांना... नीता-काका, आता आम्ही दोघी पण मेडिकलला एकाच कॉलेजला ऍडमिशन घेऊ... अंजलीचे बाबा-हो.....हो....बघू बघू... नीताच्या घरचे वातावरण खूप मोकळे आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा खुप सधन. मुलींनी शिकून आपल्या पायावर उभं राहावं, हीच त्यांची सदिच्छा.
याउलट अंजलीच्या घरचं थोडं स्ट्रिक्ट वातावरण, घरचे ते सुध्दा सधनच...पण आजची मुलींच्या बाबतीतली परिस्थिती बघता थोडे घाबरणारे. रोज वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहता मुलीच्या बाबतीत त्यांचा जीव वरखाली होई.एकप्रकारे त्यांनी थोडा मुलगा मुलगी यात भेदभाव केल्यासारखं त्यांची घरातली वर्तणूक झाली होती.अत्त्याचार समाजात घडत होते.... पण त्याची सजा मात्र एक होतकरू आणि हुशार मुलगी अंजली हिला भोगावी लागत होती. अंजलीचा मोठा भाऊ अनुज याने विदेशातून एम.एस. ची पदवी घेऊन, आता तो एक एमएनसीमध्ये उच्चपदावर नोकरीला होता.अंजली पण भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन उत्तरोत्तर प्रगती करत होती. तिने आपल्या परीने आईला विश्वासात घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला. अंजली-आई, अग मला पण पुढं शिकून डॉक्टर व्हायचं ग....प्लीज.... तू सांग ना बाबांना.... तुझं ऐकतील ते . आई- अग, काय करणार आहेस तू पुढं शिकून.....शेवटी सासरी जाऊन धुनी, भांडी, स्वयंपाक तर करायचंय ना... आणि तसही ना...बायको कितीही कमावणारी असली ना , तरी नवऱ्याला जेवण मात्र बायकोच्याच हातचं लागत हं... त्यामुळे ना तू सरळ होम-सायन्स घे बाई....बाहेरगावी पण जायची आवश्यकता नाही....आपल्या गावी आहेच कॉलेज ची व्यवस्था... अंजली- आई दादाला तर तू विदेशात पाठवायला तयार झालीस...आणि मला मेट्रो सिटीला सुद्धा नाही... का गं आई?? हा असला भेदभाव.. तेवढ्यात अंजलीचे बाबा ऑफिसमधून येतात... आणि मायलेकीचा संवाद त्यांच्या कानावर पडतो.