Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Lata Rathi

Inspirational


3  

Lata Rathi

Inspirational


समानता माझा हक्क - भाग दुसरा

समानता माझा हक्क - भाग दुसरा

3 mins 263 3 mins 263

आतापर्यंत आपण वाचलं.... अंजली आणि तिच्या आईमध्ये संवाद चालू होता... आणि तेवढयात अंजलीचे बाबा घरी येतात....आता पुढे...   


बाबा-- बस झालं शिक्षण!!! शिकून काय करायचंय... घरी रहा...घरची काम बघा...एवढं शिकलीस ना ...हेच खूप झालं. तसही... मुलींना कुठं पाठवायचं...काय---काय ऐकायला येत आजकाल... आजच तर ऐकलंय...काय ? तर त्या पोरानं म्हणे पेट्रोल टाकून पोरीला भर वस्तीत जाळलं😱 अंजली--अहो...पण बाबा सर्वच तसे नसतात हो. आता आई आणि बाबा दोघेही एकदमच ओरडले!!! एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? नीता ने पण तिच्या आईवडिलांना समजविण्याचा प्रयत्न केला... नीता--काका, आम्ही राहू ना दोघी सोबत... नका तुम्ही काळजी करू. पण....अंजलीचे बाबा समजण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. त्यांच्या मानगुटीवर फक्त एकच वाक्य बसलेलं होत..."बाहेर मुली सुरक्षित नसतात. " आजची परिस्थिती बघता एक पालक,वडील म्हनून त्यांनी त्यांच्या दृष्टीने केलेला विचार असावा तो.... पण खरं पाहता, बाहेर होणारे असले विध्वंसक प्रसंग पाहून ...घाबरून मुलींना घरात पडद्याच्या आत डांबून ठेवण म्हणजे.....वासनेने बरबटलेल्या राक्षसांना परत एक संधी देणेच होय.  त्यापेक्षा त्याना वेळप्रसंगी चार हात करत लढण्याची संधी द्या.  


अंजलीने आता शेवटचा पर्याय म्हणून आपला दादा अनुज ला याबाबत सांगितलं. खर तर त्याला घरी काय चालू आहे, हे माहीतच नव्हतं. खूप रडत होती अंजली. अनुज--अग, वेडाबाई, रडतेस कशाला.... मी आहे ना...तुला तुझ्या भावावर विश्वास नाही का?? त्याच दिवशी अनुज ने आपल्या आईवडिलांना काँफेरेन्स कॉल वर घेतलं... अनुज--आई, बाबा...हे काय ऐकतोय मी!!आपली अंजु मेरिटची स्टुडंट ना....मग फक्त एक मुलगी म्हणून का तिच्यातल्या गुणांवर बंधनं घालायची!! जाऊ द्या तिला मेडिकल ला, मला पूर्ण विश्वास आहे माझ्या बहिणीवर.... बाबा, तुम्ही आजपर्यंत तुम्ही इतके छान संस्कार दिले.... मग??आताच हे अस का? मला समजतंय बाबा, आई तुमचं मन... पण.....खरच का घरात डांबून ठेवल्याने आपल्या मुली सुरक्षित राहतील! नाही ना... बाबा--खर तर आजही स्त्रीची समानता फक्त दसखवण्यापूर्तीच आहे का... स्त्री स्वातंत्र्य मिळल्यामुळेच तर ती आज प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहे,कदाचित हेच राक्षसी वृत्तीच्या मानवाला भावत नसेल...म्हणूनही कदाचित तो एकतर्फी प्रेमाच्या माध्यमातून म्हणा किंवा वासनेतून म्हणा असली कर्मकांड करतोय. आई, असं जर असतं ना...,तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, रेल्वे चालक-सुरेखा यादव, महिला पायलट-वीणा सहारण, डॉक्टर-आनंदीबाई जोशी ...अश्या अनेक थोर स्त्रिया घडल्याचं नसत्या गं.


तुम्ही दोघेही उच्चशिक्षित, मग हा असला बुरसटलेले विचार आलेच कसे हो मनात. वासनेने बरबटलेले पुरूष आपले वर्चस्व स्त्रियांवर लादून बलात्कार, हिंसाचार, जोळपोळ ऍसिड हल्ला, निर्भया प्रकरण, खैरलांजी अत्याचार..... असल्या कृती करतात.त्यांना घाबरून , नकारात्मक विचार करून मुलींना उच्च शिक्षनासाठी घराबाहेर न पाठवण्याचा निर्णय घेऊन आपण त्यांच्यावर अत्याचाराच् करतोय. बाबा मला माहितेय, यामुळे वातावरण खूप दूषित बनलंय, पण मुली जर बाहेर निघणारच नाहीत, तर नारी शक्ती बनणार कशी? जेव्हा त्या समाजात वावरतील,तेव्हाच तर त्यांना कायदा, कायद्याचे अधिकार कळतील. आणि तेव्हाच त्या आपल्या रक्षणासाठी लढण्यास समर्थ बनतील. आई, तू एकदा म्हणाली होतीस," आपलं आयुष्य आपण घेतलेल्या निर्णयांनी आकार घेत". किती गहन अर्थ लपलेला होता गं यात....👌 बाबा--कुटुंबात आपल्या अंजु सारख्या मुलींना मोलाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांना घेऊ द्या भरारी उंच आकाशात... अंजलीच्या आईबाबांना अनुजचं म्हणणं पटलं,"खरंच बेटा आम्हीं चुकतोय,"तू आमची चूक आमच्या लक्षात आणून दिलीस....,असे म्हणत त्यांनी अंजलीला आपल्या कवेत घेतलं...


Rate this content
Log in

More marathi story from Lata Rathi

Similar marathi story from Inspirational