दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

समाधान..(लघुकथा)

समाधान..(लघुकथा)

2 mins
231


कथा-१)


आज मंडपात मुलीच्या बापाच्या डोळ्यात आनंदाश्रु बरोबरच मनात एक वेगळेच "समाधान" दिसत होते.


तारा आणि संजय चे लग्न जमले होते.लवकरच लग्नाचा मुहूर्त ही निघाला होता. संजय एका मल्टी नॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण त्याच्या शिक्षण आणि पदाचा त्याला अजिबात गर्व नव्हता. त्याची अटच होती कुठल्याही मुलीशी लग्न केले तर न हुंडा घेताच लग्न करेल. पण त्याच्या आई-वडिलांना मात्र हुंडा हवा होता. लग्नाची बोलणी चालू असतांना तर हुंडा देण्याघेण्याची काहिही बोलणी झाली नाहीत.दोन्ही कडिल मंडळी लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करणार ठरले होते.पण संजयच्या आईला संजय चा हा निर्णय मान्य नव्हता. तीने नंतर एकट्याने मुलीच्या आई-वडिलांना भेटुन मानपानाच्या गोष्टी ठरवल्या होत्या.आणि संजयला याविषयी काहीही बोलायचे नाही हेदेखील त्यांना बजावले होते. तारा च्या आई-वडिलांना

सर्व गोष्टींची पुर्तता करण्याचा प्रयत्न केला होता.पण सोन्याची चेन तेवढी राहिली होती. ऐन लग्नाच्या दिवशी मंडपात संजयच्या आईने चेन मागीतली तेव्हा ताराच्या वडिलांनी हात जोडून सांगीतले "माझ्या परीस्थिती प्रमाणे जेवढं करु शकत होतो तेवढे केलं पण, माफ करा सोन्याची चेन नाही देऊ शकणार, समजुन घ्या."


संजयला सर्व प्रकार लक्षात येताच त्याने ताराच्या वडिलांच्या जोडलेल्या दोन्ही हातांना आपल्या हातात घेत सांगितले."चिंता करु नका मला कुठलीही चेन नको आहे,मी तेवढा सक्षम आहे की, स्वतः च्या आणि माझ्या होणाऱ्या पत्नीच्या सर्व गरजा मी भागवु शकतो.

आपण आपल्या मुलीसाठी एक योग्य जोडीदार निवडला आहे याचे "समाधान" ताराच्या वडिलांच्या डोळ्यात दिसत होते.


कथा -२)


आज मुलामुळे मिळालेल्या सन्मानाने आईच्या मनात मोठे "समाधान " होते.

गरीबीत दिवस काढत,लोकांची धुणीभांडी करून एक एक पैसा जोडुन आईने विकास ला शिकवले होते.पुढे जाऊन आपल्या हुशारीच्या आणि आभ्यासाच्या बळावर विकासने वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळवुन उच्च शिक्षण मिळवले. भरपुर मेहनत आणि अभ्यास करून तो आज क्लास वन अधिकारी बनला होता.त्याच्या नावाप्रमाणेच विकासाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली होती.आईच्या कष्टाचे आज त्याने चीज केले होते.आणि आईच्या मेहनतीचे पांग ही फेडले होते.आज गावात त्याचा मोठा सत्कार समारंभ होता.पण तो सत्कार घेण्यासाठी त्याने आईला बोलावले होते.आपल्या कष्टाला फळ मिळाले आपला मुलगा मोठा हापीसर झाला. याचे समाधान आज आईच्या डोळ्यात दिसत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational