Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ

2 mins
248


अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुलांचा सांभाड केला आहे. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधीठेवले. वर्धा जिल्हातील जंगल भागातील नवरगांव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम काम करायचे गांव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणित्या शाळेत जाउन बसायच्या, मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथी पर्यंत शिकता आले.


विवाह वयाच्या 9व्या वर्षी वयाने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला, घरी प्रचंड सासुरवास होता. अठारव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपणे झाली त्या चौथा वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांचा आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. दमडाजीने सिंधुताईच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरु केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चरित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारुन घराबाहेर काढलें, नवऱ्याने हाकलल्यानंतर गांवकऱ्यांनी हाकलले, सिंधुताई माहेरी आल्या, सख्ख्या आईने पाठ फिरवली, सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच 21 वर्षाच्या ताईंना संरक्षण दिले.


अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बालसदन संस्थेची स्थापना केली, 1994 साली पुण्याजवळ

पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते, त्याच्या भोजन,

कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते, शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठी ही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्य ही संस्थेकडूनच केले जाते,  अशी सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत. सिंधुताई यांनी अन्य संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या बालनिकेतन हडपसर पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बालभवन वर्धा, गोपिकागाई रक्षण केंद्र वर्धा, ममता बालसदन, सासवड.


सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाने प्रभावित केले आहे. परदेशीं अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.


पुरस्कार व गौरव : सिंधुताईना 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत


पदमश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,

पुण्याचा अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुरस्कार,

महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार,

मूर्तिमंत आई साठीचा राष्ट्रीय पुरस्कार,

आयटी प्रॉफिट ऑर्गनयजेशनचा दत्तक माता पुरस्कार,

सोलापूरचा डाँ निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार,

राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार,

श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा येथील सुनीता कला निकेतन न्यासतर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार

रियल हिरो पुरस्कार सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार,

दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार,

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार,

डाँ राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational